पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आळीवाचे लाडू कसे करायचे? आणि आळीवाला हिन्दीत/ इंग्लिशमधे काय म्हणतात?
१०-१२ लाडू करायचे आहेत, तर घटक पदार्थांचं प्रमाण काय तेही सांगा प्लीज.

नारळाचं दूध टोमॅटोच्या सारात, फिश करीत, कोणत्याही कडधान्याच्या बिरड्यात किंवा आमटीत, थायी सुपात वापरता येईल.

केक साठी आपल्या भारतीय पध्द्तीने icing बनवण्याची क्रुती कोणी प्लिज द्याल का? मी wilton च्या पध्द्तीने बर्याचदा icing केले आहे. पण मला आपल्या पध्द्तीचे icing खुप आवडते, म्हणुन विचारते आहे. धन्यवाद.

नारळाचे दूध घालून करायच्या अजून काही पाकृ

कोळंबो : नारळाचे दूध घालून केलेले सांबार : http://www.maayboli.com/node/22001

टोमॅटो बिर्याणीत ना. दू. : http://www.maayboli.com/node/21343

बटरनट स्क्वाश सूप : http://www.maayboli.com/node/22821

तिखटाचे भानोले, लसणाचे आक्षे : http://www.maayboli.com/node/3397

सात्त्विक गोकुळ भाजी : http://www.maayboli.com/node/19327

.

मला बटरनट स्क्वाश ची आपल्या महाराष्ट्रीयन पध्द्तीची पाकृ हवीय, कुणाला माहीत असेल कृपया लिंक द्या ना.
आणि बटरनट स्क्वाशचे साल काढूनच भाजी करावी की त्याचे साल पण शिजते?

दिपाली

दिपाली,
इथे आहे
http://www.maayboli.com/node/17967

खरं तर लाल भोपळ्याची कुठलिही कृति वापरता येईल. साल शिजते पण अगदी मऊ होत नाही.
पण काहि जणांना सालीची अ‍ॅलर्जी असू शकते. काढली तर चांगले.

साक्षी, मखाना च्या रेसीपी माहीत आहे का? मुलाना द्यायला योग्य आहे का? >>>

मखाने कुर्मा, भाजी, बिर्याणी, खिरीत वापरतात किंवा कढईत खमंग भाजून त्यात थोडे तूप सोडून मग मीठ, मीरपूड घालून खातात. पण हे पचायला जरा जड असतात. उत्तरप्रदेशात मखान्यांना फारच महत्त्वाचं मानलं जातं. त्यांना बदाम, काजूचा दर्जा आहे.

दिनेशजि मागे तुम्हि पालक पनिरचि भाजि कशि करायचि त्याचि link दिलि होति, ति पुन्हा द्याल का प्लिज. खुप छान झालि होती पण आता ती लिन्क मिलत नाहि आहे.

बाहेरच्या सारखे नुसते डिंक व खोबर्‍याचे लाडू मिळतात त्याची रेसीपी कोण देइल का?

छे छे! मला नकोय. मी असले उपव्याप करत नाही. स्वंयपाक करणे आपला नावडता भाग आहे कारण मी गायत्रीची लेक आहे. Wink
पण खरेच रेसीपी हवी आहे कुणालातरी.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/125809.html?1144955170

Sweetupie, इथे आहे बहुतेक ति कृति.

ध्वनी, इथे जी कृति आहे तिच वापरता येईल. पण डींक आणि खोबर्‍याशिवाय, गूळ वा साखर, खसखस
आणि तूप वापरावेच लागेल.

इथे डिंकाची रेसीपी नाहि मिळाली. मला लाडवाची चव बाहेरच्या सारखीच हवी होती. त्याच्यात काय काय असते. तुम्हाला माहित असेल तर प्लिज लिहा.

ध्वनी,
त्यात तळून घेतलेला डींक, सूक्या खोबर्‍याचा जाडसर किस, खसखस, काजू, बेदाणे, वेलची, जायफळ, भाजून घेतलेली कणीक एवढेच असते. हे सगळे गूळाच्या पाकात मिसळलेले असते.

सांगते मैत्रीणीला. बाहेरचा डिंक कसा अक्खा असतो व मस्त चिकट लागतो. आमच्या मातोश्री एकदम असेच करायच्या असे प्रकार पण आता बंद केलेत झेपत नाहित. मातोश्री फोनवर मिळाल्या नाहित म्हणून इथे विचारले.
तुम्हाला धन्यवाद.

दाताला चिकटतो ना तो. अर्थात त्याचीही एक मजा असतेच. तूपात तळून घेतलेले जाडे पोहे पण साधारण तसेच लागतात पण दाताला चिकटत नाहीत. म्हणून अनेकदा त्या लाडवात घालतात.

डींकाचे खडे बाजारात मिळतात तेवढ्याच आकाराचे ठेवले तर ते आतपर्यंत तळले जात नाहीत. त्यातला गाभा तसाच राहतो म्हणून त्याला चिकटपणा येतो.

घरगुती करताना ते खडे बारीक करतात किंवा त्याची पुड करतात.

मी नेहमी गीट्सचे गुलाबजामचे पाकीट आणून गुलाबजाम करते.
मला घरी खवा आणून गुलाबजाम करायचे आहेत. योग्य प्रमाण सांगाल का ?
ईथे शोधले तर गुलाबजामच्या साहित्यात, पनिर, मैदा, अरारूट पावडर, रवा , कॉर्न फ्लोअर यापैकी एक आहे.
नक्की काय घालावे आणि किती ?
मला पाव किलो खव्याच्या प्रमाणात साहित्य सांगाल प्लिज ?
मिल्क पावडर वापरून गुलाबजाम करता येतील ?
काला जामून , आणि गुलाबजाम यात फरक काय ?

जुयी, पाव किलो खव्याला एक टेबलस्पून अरारुट (नाहीच मिळाला तर मैदा) पुरेल. हे सगळे नीट मळून घ्यायचे. वरच्या घटकांपैकी एकच काहीतरी घालायचे.
चांगला ताजा खवा असेल तर नाही लागत, काही घालायला. पण यापैकी एक घटक टाकला तर गुलाबजाम सहसा फुटत नाहीत.

मिल्क पावडरचे गुलाबजाम इथे आहेत. पण पावडर चांगल्या दर्जाची नसेल तर चांगले होत नाहीत.

काला जामून हा वेगळा प्रकार. रंगाने काळाच असतो. त्यात पनीर घालतात. त्याची कृति मी लिहिली होती.
http://www.maayboli.com/node/13624

दिनेशदा वाटलच तुम्ही उत्तर द्याल ... धन्यवाद Happy

रवा घालायचा असल्यास कच्चा घालावा की भाजलेला..

आणि बेकिंग सोडा हवाच का?

Pages