पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो, एव्हरेस्टचा दूध मसाला येतो तो फार सुंदर असतो.

सुके अंजिर दुधात ब्लेंड करून घेता येतील.

मैत्रिणींनो धन्यवाद. अगदी भरपुर तोंडीलावणे मिळाले Happy

मंजुडी, तु लिहिलायस तसाच मसाला करुन मी या कोजागिरीला वापरला होता. खुप छान झालेला. थोडे केशरही टाकले होते त्यामुळे अगदी एवरेस्टसारखाच दिसला. बाहेरचे मसाले घेताना त्यातले जिन्नस कितपत चांगले असतील ही शंका मनात नेहमी असते.

पिझ्झाबरोबर जे मस्टर्ड येतं ते घरी कसं बनवायचं?

एगलेस मेयॉनिजची रेसिपीही हवी आहे. इथे शोधली पण मिळाली नाही.

जर तो मसाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर दूध पावडर नको. वेलची किंवा सूका मेवा बारिक करताना त्यात थोडी साखर घातली तर चांगली पूड होते.

अचानक ठरलेले पॉट्लक..काय घेवुन जावु आपेटायझर म्हणुन? देसी जनता कोणीच नाहिये. मेथीचे मुठीये कसे वाटताय?

.

मागे कुणीतरी मुलांचं वजन वाढावं म्हणुन गहु नाचणी (मोड काढुन)आणी डाळं एकत्र करुन करायची रेचिपे दिलि होती. आत्ता सापडत नाही. कुणाकडे असल्यास द्या प्लीझ

निकिता, गव्हाचे नाचणीचे सत्व बाजारात मिळते, सत्तूचे पिठ पण मिळते. घरी करायला जरा उपद्व्याप आहे ? करणार का ? तर लिहिन विपू मधे.

ओले अंजीर वापरून काही दिवस टिकेल, असे काही बनवता येईल का? लोणचे, मोरंबा अशाप्रकारचे....

दिनेशदा ,
अहो सत्व नव्हतं. मोड काढुन , भाजुन दळायचं आणि मग खिरि सारखं करायचं. पण माप विसरले.

मी अमि, ओल्या अंजिराचा जॅम मस्त लागतो. मी स्वतः कधी केलेला नाही, पण खाल्ला आहे. ही रेसिपी मिळाली : इथे.

काल अर्धा किलो परवर ( की परवल Uhoh ) आणले. नेहमी काप करुन फोडणी देउन मंद गॅसवर कडक करते.. आवडतात.
आज त्याचे साल काढुन थोडा मसाला भरुन शिजवले. ठीक झाले. पण साल फेकायची इच्छा झाली नाही.. फ्रीजमधे ठेवलेत... काय करता येइल Uhoh

हो गं मंजूडी, मी पिझ्झावाल्या मस्टर्डची रेसिपी शोधत असताना मिळाली ही लिंक. सही आहे ना? टनाने रेसिपीज आहेत तिथे.

मागे कुणीतरी मुलांचं वजन वाढावं म्हणुन गहु नाचणी (मोड काढुन)आणी डाळं एकत्र करुन करायची रेचिपे दिलि होती. आत्ता सापडत नाही. कुणाकडे असल्यास द्या प्लीझ

कुणाकडे हमखास यशस्वी चॉकलेट-वॉलनट ब्राउनी ची रेसेपी आहे का?
मागे मी एका कलिगच्या रेसेपीने बनवलेली तितकीशी चांगली झाली नव्हती.

अल्पना, मी बेट्टी क्रॉकरच्या मिक्स ने बनवायचे. चांगली होते. इकडे परवा बिग बझार मध्ये पॅक पाहिला. होप क्वालीटी सारखीच असेल.
स्क्रॅच पासुन बनवायचे असेल तर नाही माहिती.

अग मी एकदा बनवलं होते कोणतं तरी ब्राउनी मिक्स वापरुन. त्यावेळी बर्‍या झालेल्या. स्क्रॅचपासून पण केल्यात एकदा त्या नाही बर्‍या झाल्या. अगदी स्क्रॅच पासूनवाली मिळाली रेसेपी तर बरंय. घरातले वॉलनट संपतिल तरी.

बाळंतिणिला द्यायच्या खसखस आणि खारिक खिरिंची रेसिपी देवु शकेल कुणी( मैत्रीणीला द्यायची आहे.)
विपुत डकवलीत तरी चालेल. धन्यवाद!

खसखस आणि खारीक खीर
२ टे. स्पून खसखस, २ बदाम आणि १ खारीक हे सर्व रात्री भिजवावे. (मी दुधातच भिजवत असे). दुसर्या दिवशी हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटावे. ह्या मिश्रणात आवडी प्रमाणे दुध घालावे आणि उकळी आणावी. ह्या खिरीत केशर सुद्धा घालता येते. सगळ्यात शेवटी ह्यात गूळ घालावा. उकळताना गूळ घातला तर खीर नासू शकते. गूळ न घालता साखर सुद्धा घालू शकता. पण गुळाने खीर खमंग होते.
ही खीर अत्यंत पौष्टिक आहे आणि चवीलाही खूप छान होते.
बाळंतीणीला दुध येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

सानिका, मृनिश
इथे पाककृती लिहू नका. वेगळा धागा काढून लिहा. नंतर सापडायला सोपे जाईल. ह्या धाग्याच्या हेडरमध्ये तसे लिहीलेले आहे.

रूनी पॉटर,
लगेच नवीन धागा काढते. एकदम लक्षात आले नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

Pages