Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इडली, डोसा, उत्तप्प्याचं
इडली, डोसा, उत्तप्प्याचं कोरडं पीठ करायचं असेल तर तांदूळ-उडदाच्या डाळीचं प्रमाण काय घ्यायचं? तसंच ते दोन्ही धुवून वाळवून दळायला द्यायचं का?
आग्र्याचा पेठा कोहळ्यापासूनच
आग्र्याचा पेठा कोहळ्यापासूनच करतात, तसेच कुष्मांडपाक हे औषधदेखील कोहळ्यापासून करतात.
रोजच्या जेवणात, कोहळा सांबारामधे वापरता येईल. मोड काढलेल्या कडधान्याबरोबर म्हणजे मटकी वगैरे बरोबर तो चांगला लागतो. तो किसून हलवा (दूधी भोपळ्याप्रमाणेच) करता येतो, वा फोडी करुन खीर करता येते. ताकाच्या कढीत तो घालता येतो. किसून, उकडून ब्लेंड करुन सूप वा सार करता येते. म्हणजे साधारण कुठल्याही भाजीप्रमाणे तो वापरता येतो, पण तो कोवळा घेऊ नये, जूनच घ्यावा.
टिकाऊ पदार्थात त्याचे सांडगे करता येतात.
मंजूडी तांदूळ २ भाग व उडीद डाळ १ भाग हे प्रमाण घ्यायचे. तांदूळ धुवून, सावलीत वाळवून दळायला द्यायचे.
नागपूरच्या संत्राबर्फीत पण
नागपूरच्या संत्राबर्फीत पण कोहळाच वापरलेला असतो !
एम्बी अगदी अगदी, सांड्गे
एम्बी अगदी अगदी, सांड्गे नाहीतर पेठा.
ओके दिनेशदा, धन्यवाद पीठ
ओके दिनेशदा, धन्यवाद
पीठ बाहेरून आणलं होतं चाचणीसाठी; ते 72/- रुपये किलो... पण त्याचे डोसे एकदम सही झाले. मग म्हटलं घरीच करूया
दिनेशदा धन्यवाद.कढीमधे घालून
दिनेशदा धन्यवाद.कढीमधे घालून बघते.खीर, सूप पण जमेल असे वाटत आहे.एकदा पराठे करायचे मनात आहे.पण वाया जायची फार भिती वाटते.
बादवे, हे सांडगे कसे करायचे?
मंजूडी, या बाहेरच्या पिठात
मंजूडी, या बाहेरच्या पिठात आंबण्यासाठी काहि घटक मिसळले असण्याची शक्यता आहे. त्यामूळे घरचे पिठ भिजवताना, त्यात आंबण्यासाठी काहीतरी मिसळणे गरजेचे आहे. आपण मिक्सरमधे वा रगड्यात ज्यावेळी भिजवलेली उडदाची डाळ वाटतो, त्यावेळी त्यात आपसुक भरपुर हवा मिसळली जाते, म्हणून ते पदार्थ हलके होतात.
कोरडे पिठ भिजवताना, त्यात नारळ, नारळाचे पाणी, दही, यीष्ट असे काहितरी मिसळले तर चांगले.
एम्बी, मी अलिकडेच सांडगे या नावाखाली, अनेक प्रकारच्या सांडग्यांचे संकलन केले आहे, सहज मिळेल ते, वाळवण विभागात.
कोहळ्याचे पराठे विशेष चवदार
कोहळ्याचे पराठे विशेष चवदार लागतील असे वाटत नाही. पण हांडवो, इडली सारख्या पदार्थात तो किसून घालता येईल. थालीपिठात पण घालता येईल (कोहळा किसला, कि त्याला फार पाणी सुटते. पण कोहळा त्या पाण्यातच शिजवला तर चांगले. आणि या पाण्यामूळेच पराठे नीट होणार नाहीत असे वाटते.)
दिनेशदा धन्यवाद कोहळ्याच्या
दिनेशदा धन्यवाद कोहळ्याच्या माहितीसाठी

सांबार आणि हलवा करुन बघणार
सांडगे यम्मी करायला पाहिजेत आता उन असतानाच.
एम्बि एकत्र घालुयात सांडगे
माझ्याकडे ५ किले उकडा तांदुळ
माझ्याकडे ५ किले उकडा तांदुळ आहे, त्यात टोके झालेत. ते चाळणिने चाळले तर तांदुळही खाली पाण्यात पडतात. काय करता येईल?
आणि हो या एवढ्या तांदळाचे पिठ करुन आणणार आहे पण ते संपवायचे कसे?
दिनेशदा तुम्ही सांगितलेत तसे करुन आणिन थोड्या तांदळाचे पण ते पिठ रात्री ताकात भिजवुन सकाळी डोसे काढले तर होतील का?
इडलीसाठी उकडा तांदूळ वापरता
इडलीसाठी उकडा तांदूळ वापरता येतो. कांजीवरम इडलीसाठी एक भाग उ.तांदूळ, एक भाग साधा तांदूळ, एक भाग उडीद डाळ घेतात.
आमच्या गावी ब्रेकफास्ट, लंच , डिनर उकड्या तांदळाची पेज....
वर्षा मी इडली साठी १ वाटी
वर्षा मी इडली साठी १ वाटी उडीदडाळ असेल तर २ वाट्या उकडा तांदूळ वापरते. तु रवाही दळून आणू शकतेस म्हणजे त्याचे काकडीचे धोंडस, इडलीला वापरता येईल.
तांदळाला कुठलाही किटक आरपार
तांदळाला कुठलाही किटक आरपार भोक पाडू शकत नाही (म्हणून आपण त्याला अक्षत, अक्षता म्हणतो.)
पण टोके झालेच असतील, तर तांदूळ स्वच्छ धुवून, सावलीत वाळवून, वापरायचे. एरवी साध्या तांदळात न मिळणारी जीवनस्त्वे, उकड्या तांदळात मिळतात. (तो टरफलासकट शिजवलेला असतो.)
पण आणखी खात्री होण्यासाठी मी तो वरिलप्रमाणे वाळवल्यावर, भाजून घेण्याचा सल्ला देईन.
या भाजलेल्या तांदळाचा रवा काढून, धोंडस, खांडवी बगैरे करता येईल. भाज्या घालून शिजवून कदंबम नावाचा प्रकार करता येईल.
डोसे, इडलीसाठी पण वापरता
डोसे, इडलीसाठी पण वापरता येईलच. पण आधी धुणे व सावलीत वाळवणे गरजेचे आहे. धुताना, वर तरंगणारी तांदळाची शिते, टाकावी लागतील.
वर्षा मी इडली साठी १ वाटी
वर्षा मी इडली साठी १ वाटी उडीदडाळ असेल तर २ वाट्या उकडा तांदूळ वापरते>>>> जागु ईडल्या सॉफ्ट होतात का ग की त्यात आणखी काही घालावे लागते? मी नेहमी ईडली रवा आणि उ. डाळीच्या करते त्यात भात किंवा पोहे वाटुन घालते.
सॉफ्ट होत असतिल तर आता नागपंचमीला आमच्याकडे ईडलीच करतो आम्ही तेव्हा करीन पण जर का त्या सॉफ्ट झाल्या नाहितर कोणी खाणार नाही म्हणुन विचारले.
दिनेशदा तांदुळ पाण्यात टाकल्यावर टोकेही वर येतील ना? रवा करण्यासाठी मिक्सर चांगला हवा ना.
लाजो धन्स... चटणी छान झाली
लाजो धन्स...
चटणी छान झाली
वर्षा हो उकडा तांदुळनी सॉफ्ट
वर्षा हो उकडा तांदुळनी सॉफ्ट होतात इडल्या. आणि तु पोहेही घाल हवे तर, पोह्यानेपण सॉफ्ट होतात.
माझ सजेशन आहे की तु अर्ध पिठ आणि अर्धा रवा कर. पिठाच्या भाकर्या, घावन, मोदक करता येतील.
.
.
धन्स जागु. तु कोंबडी
धन्स जागु.
तु कोंबडी वड्याच्या पिठासाठी काय प्रमाण घेतेस? तेही करुन ठेविन थोडे. आमच्याकडे हे वडे खुप आवडतात सगळ्यांना, पण वडे आता श्रावण संपल्या नंतरच करता येतील.
अग कोंबडीवड्यांच्या धाग्यावर
अग कोंबडीवड्यांच्या धाग्यावर बघ दिले आहे मी पिठ कसे तयार करायचे ते. शिवाय प्रतिसादात तुला अजुन टिप्सही मिलतील.
असे धुवून सावलीत वाळवलेले
असे धुवून सावलीत वाळवलेले तांदूळ थोडे ठिसूळ होतात आणि ते दळणे सोपे जाते. आणि कितीही चांगला मिक्सर असला तरी जे काही होते, त्यात अर्धा रवाच निघतो !!
पण वडे आता श्रावण संपल्या
पण वडे आता श्रावण संपल्या नंतरच करता येतील.>>
वडे काळ्या वाटाण्याच्या आमटिबरोबर पण छान लागतात. त्यामुळे श्रावणात पण चालतिल.
दिनेशदा, नागपुर सन्तरा बर्फि
दिनेशदा, नागपुर सन्तरा बर्फि कशि करयचि? क्रुति सान्गता येइल का.
लाजो धन्स... चटणी छान झाली<<<
लाजो धन्स...
मी कधी दिली रेसिपी?
चटणी छान झाली<<<
अग प्रिया, मी नाही काही चटणीची रेसिपी दिली, ती अरुंधतीने दिलीये

तरी धन्स म्हंटल्याबद्दल धन्स
तुझे धन्स अरु ला पास करते
अरुंधती धन्स गं. प्रियाने केलेली चटणी छान झाली
कोणि नागपूरी भुरका कसा करायचा
कोणि नागपूरी भुरका कसा करायचा ते सान्गाल काय?
सुमेधा, नागपूरच्या संत्रा
सुमेधा, नागपूरच्या संत्रा बर्फीची कृती इथे आहे : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/108251.html?1155839098
प्रिया, लाजो, धन्स! मी फक्त
प्रिया, लाजो, धन्स!
मी फक्त रेसिपी हुडकायचे कामकेले आणि इथे लिंक दिली! 
अरे मलापण कोणीतरी मदत करा
अरे मलापण कोणीतरी मदत करा प्लिज...
मुलाला डब्यात भाजी चपाती द्यायची असते, आठवड्यातून एकदाच , मी त्याला त्यादिवशी घरी केलेली भाजीच देते आणि चपतीचे तुकडे करून देते, लवकर खाता यावे म्हणून, पण त्याच्या टिचरने सांगितले की भाजी चपातीत टाकून रोल करून द्या.. सुकी भाजी असेल तर ठिक आहे, नाहितर एरवी चपती फार उमळून जाईल , मला नाहि वाटत तो खाईल.
मला कोणीतरी यावर उपाय सुचवा ना ....
मी त्याला मागे मेथीचे ठेपले करून दिलेले , आणखी काहि ?
आणखीन एक त्याला डब्यात वेफर्स पण द्यायचे असतात. मी त्याला बाहेर विकत मिळतात ते केळ्याचे, बटाट्याचे, नाचणीचे वेफर्स देते, पण घरात करण्यासारखे अजून काही वेफर्सचे प्रकार आहेत का?
जुई, सुक्या भाज्या - बटाटा,
जुई,
सुक्या भाज्या - बटाटा, बीन्स, पीठ पेरुन कोबी, कॉलीफ्लावर, सिमला मिरची, कोरड्या उसळी असे देता येतिल. किंवा
मिक्स भाज्या किंवा कोबी, गाजर, बटटे वगैरे भाज्यांचे पराठे करता येतिल, किंवा
ऑम्लेट मधे भाज्या घालुन ते पोळीत रोल करुन देता येइल किंवा
मिश्र पीठे आणि भाज्या घालुन केलेल धीरड पोळीत घालुन देता येइल.
कच्चा बीट, कच्चे रताळे यांचे पातळ चकत्या करुन तळुन चिप्स चांगल्या होतात, साबुदाण्याच्या रंगित चिकवड्या, सांडगे वगैरे देता येतिल
नीता, दुधी, दोडका, गाजर, बीट,
नीता, दुधी, दोडका, गाजर, बीट, कोबी, लाल भोपळा यापैकी एक किंवा मिश्र भाज्या किसून कणकेत मिसळून पराठे करता येतील. शिवाय आलू, मेथी, पालक ह्या भाज्याही आहेतच. त्यात थोडं पनीरही कुस्करून घालता येईल.
काकडी किसून घालून तांदूळाच्या पीठाचे गोड किंवा तिखट घावन करता येतील.
Pages