Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://product-image.tradeind
http://product-image.tradeindia.com/00284913/b/0/puri-press.jpg
ह्या फोटोत दिसतो सेम तसा आहे. इथे मुंबैत अपना बाजारात घेतला. ब्रँड असा नाहीये, त्यावर पुरवी लिहिलेय.. साधारण १५० रुपयापर्यंत मिळतो. आता नक्की आठवत नाही. पण पु-या मात्र झटपट होतात अगदी..
मला वाटते, ही चर्चा
मला वाटते, ही चर्चा स्वयंपाकाची उपकरणे यात असायला हवी.
असो, मी असे ऐकून आहे की, यात लाटलेल्या (म्हणजे दाबून बनवलेल्या) पुर्या किंवा फुलके जाड राहतात, तळल्यानंतर/ भाजल्यानंतर लगेच खाल्ले नाही तर चिवट होतात. इ. म्हणून अनेकांनी मला ते पुरी प्रेस किंवा चपाती प्रेस घेऊ नको, म्हणून सल्ला दिला. साधना, तुझा अनुभव चांगला आहे का? तु याचा उपयोग करून फुलके बनवलेयस का?
मी मागच्या वर्षी स्टील चे
मी मागच्या वर्षी स्टील चे प्रेस मशिन घेतले, ४५० रुपयाला, पण ते चांगले नाही निघाले. अमि म्हणते तसे पुर्या जाड राहतात आणि चिवट होतात. मात्र माझ्या सासूबाईंकडे लोखंडाचे आहे, जे त्यांनी १५० रुपयाला घेतले आहे त्यात मात्र साधना म्हणते तश्या पुर्या पटापट आणि चांगल्या पण होतात.
माझाही या यंत्राचा अनुभव बरा
माझाही या यंत्राचा अनुभव बरा नाही. पोळ्या/फुलके/पुर्या चिवट, होतात. यंत्र माळ्यावर आहे.
मी मागच्याच आठवड्यात रोटीमेकर
मी मागच्याच आठवड्यात रोटीमेकर घेतला. दोन दिवसात जामच डिप्रेशन आलं पण तिसर्या दिवशी कम्पनीच्या माणसानी ययेऊन डेमो दिल्यापासुन मस्त व्हायला लागल्या पोळ्या. [फुलके] आणि काही प्रॉब्लेम येत नाहीये. छान चाल्लय.
अर्थात घडीच्या पोळीची कशाशीच तुलना नाही पण हा पर्याय चांगला वाटला मला तरी
माझा तरी लोखंडाच्या प्रेसचा
माझा तरी लोखंडाच्या प्रेसचा अनुभव चांगला आहे. माझ्या तिन्ही वहिन्यांकडे आहे आणि त्यांचाही हाच अभिप्राय आहे. त्यांचाच बघुन मी आणला..
मी पु-या, वडे करते आणि मोदकाच्या पा-या करते त्यात. फुलक्यापेक्षा गुजराथी खाकरा असतो प्रकार तो करुन पाहायचाय.. फुलके करुन पाहते आणि सांगते
काल सकाळी छोले बनविले व
काल सकाळी छोले बनविले व मावशींना सांगितले मैद्याच्या पुर्या बनवा आयत्या वेळी. पुन्नी शाळेतून आली की. त्यांनी मैद्याऐवजी तांदुळाची पिठी भिजवून ठेवली. आता त्या भांडे भर पिठाचे काय करावे? धिरडी? वडे, पापड्या? प्लीज टुबी टेलिन्ग मी.
साधना, खाकरा म्हणायचे आहे का
साधना, खाकरा म्हणायचे आहे का तुला.
मला पाऊंड केकची रेसिपी हवी आहे, कोणाला माहित आहे का?
बेस्ट म्हणजे त्या पिठात थोडे
बेस्ट म्हणजे त्या पिठात थोडे मिठ घालुन मळायचे आणि मग ते आपल्या शेवया पाडतो ना त्या सो-यात घालायचे. इडलीच्या भांड्यात ओला रुमाल पसरवुन त्यावर दोनदा सो-या गोल फिरवुन शेवया पाडायच्या आणि मग १० मिनिटे इडलीसारख्या वाफवायच्या.
अशा शेवयांना नंतर फोडणी देऊन फ्राईड नुड्ल्स सारखे करता येते. नाहीतर नारळाचे दुध काढुन त्यात साखर्/वेलची वगैरे घालुन त्यात शेवया घालुनही खाता येते. माझ्या लेकीला हे दोन्ही पदार्थ जाम आवडतात. मी मुद्दाम तांदळाअचे पिठ घरात ठेवते तिच्यासाठी
वर्षा अगं नावच आठवेना ...
वर्षा अगं नावच आठवेना ...
स्मरणशक्ती भारीच क्षीण झालीय.. 
किंवा घावन घाला ना मामी.
किंवा घावन घाला ना मामी. नाहीतर सरळ उकड :आई ग ल्लग्गेच खावीशी वाटत्ये :
साधना म्हणजे इदी आप्पाम ना?
साधना म्हणजे इदी आप्पाम ना? त्यासाठी आधी उकड काढायची काय? का तसेच शेवया बनवू? ते मला पण आवड्ते. अगदी नाजूक होतात त्या शेवया.
उकड बिकड काही काढायला नको.
उकड बिकड काही काढायला नको. तसेच थोडा तेलाचा हात लावुन वापर. मी तसेच वापरते. मस्त होते अगदी....
हा प्रकार जरा इडिआप्पमसारखाच आहे, पण आमच्याकडे शिरवाळ्या म्हणतात त्याला.
भांडेभर पिठाची उकड म्हणजे
भांडेभर पिठाची उकड म्हणजे मामीला इथेच आणावी लागेल ती संपवायला. उकडीसाठी पिठ अजुन पातळ करावे लागेल ना... उकडसुद्धा माझ्याकडे हिट आहे. मे महिन्यात रोज दुपारी उकड करुन खायची माझी लेक...
साधना तेच तर. दोन- अडीच धिरडी
साधना तेच तर. दोन- अडीच धिरडी म्हण्जे पोटभर जेवणच. कधी ऐशू आली घरी ना तर तिला उकड्च करून घालीन गरम गरम. मला पण जाम आवड्ते. त्या पिठावर माझ्या ३ संध्याकाळी गेल्या असत्या. पुन्नी म्हणते तसे मावशी इज लूटिन्ग अस.
एग मसाला आणि एग भुर्जी ची
एग मसाला आणि एग भुर्जी ची रेसिपी इथे आहे का? असेल तर लिंक द्या प्लीज. किंवा कृती सांगा कशी करायची ते. माझ्या विपूत या आणि डकवून जा प्लीज.
)
(कुणीतरी यावे आणि लिंक डकवून जावे. हसू नये. बोलू नये. गुपचूप बसावे.
अश्विनी शेवटी काय केलेस त्या
अश्विनी शेवटी काय केलेस त्या पिठाचे??
काय नाय ते फ्रिज मध्ये पड्ले
काय नाय ते फ्रिज मध्ये पड्ले आहे अन मी हपिसात घोरतेय. आता संध्याकाळी बघू. काल दुपारी मी भिशीचे जेवून तट्ट घरी गेले. पोरीचे जेवण झालेले त्यामुळे किचनला टाळे लावून शिवत बसले.
पुरि-प्रेसने बटाट्याचे
पुरि-प्रेसने बटाट्याचे पापड्,नागलिचे पापड, तांदळाचे (खिशी घेवुन) पापड फार मस्त आणि झटपट होतात, माझी आई नेहमी करायची , अजुनही करते.
मला फ्रेश सार्डिन्स
मला फ्रेश सार्डिन्स मिळालेत , ते फ्राय करूनच खायचे का ?
आर्टिसान लेट्यूस खूप खूप
आर्टिसान लेट्यूस खूप खूप जास्त आहे घरी.सॅलड सोडून काय करता येइल ?
ईथे व्हेज मन्च्युरीयन सुपची
ईथे व्हेज मन्च्युरीयन सुपची रेरीपि आहे का? असल्यास लिंक द्या.
मानचाव सूप हवय का? ईथे जुन्या
मानचाव सूप हवय का? ईथे जुन्या मायबोलीतली दिनेशदांची रेसेपी आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116384.html?1158252444
नाही . मला व्हेज मनच्युरीअन
नाही . मला व्हेज मनच्युरीअन सुप हवं आहे
हसरी, मला माबोवर नाही मिळाली
हसरी, मला माबोवर नाही मिळाली लिंक, पण नेटवर ही रेसिपी मिळाली :
http://www.indianfoodforever.com/indo-chinese/chinese-hot-sour.html
मावे त कोथिंबीर वडी कशी
मावे त कोथिंबीर वडी कशी करायची ?
buckwheat उपवासाला जमते का?
buckwheat उपवासाला जमते का? marathi मधे buckwheat/ kottu ला काय म्हनतात.
फ्रेश सार्डिन्स ना हळद, तिखट,
फ्रेश सार्डिन्स ना हळद, तिखट, मीठ थोडी लसूण ठेचून लावायची. चिंचेचा कोळ नाहीतर लिंबाचा रस लावायचा अन गव्हाच्या रव्ह्यात घोळून तव्यावर सढळ हाताने तेल घालून मंद आचेवर कुरकुरीत भाजायचे.
विषयवार यादीत न जाता
विषयवार यादीत न जाता आहारशास्त्राच्या मुख्य धाग्यावरुन पाककृती शोधता येते का?
चमकी, कोथिंबीर वडी च्या मला
चमकी, कोथिंबीर वडी च्या मला माबोवर ज्या रेसिपी मिळाल्या त्या ह्या : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/134662.html?1195480671
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/1400.html?1208307387
आणि मावेमध्ये वड्या करण्यासाठी ही लिंक बघ : http://www.vegrecipesofindia.com/kothimbir-vadi-maharashtrian-kothimbir-...
Pages