पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<लाल फुग्या मिरच्या बार्बेक्यु करायच्या अख्ख्या स्किन चांगली काळी पडली एका ब्राउन पेपर बॅगमधे गुंडाळून किंवा झिपलॉक बॅगमधे ठेवाय्च्या ५-७ मिनिटे. स्किन मस्त सुटून येते. ती सर्व काढून त्याच्या उभ्या स्ट्रिप्स कापायच्या ( अर्धा सेमी जाड ) . त्यात ठेचलेला लसूण, चांगलेसे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल अन थोडे मीठ- मिरपूड घालून मिक्स करायचे. बागेत किंवा क्रस्टी इटालियन ब्रेडच्या स्लाइस वर सर्व्ह करायचे. >>
मेधा तुझि ही रेसिपी बार्बेक्यु पार्टित जाम हिट झाली. सगळ्यांना आवडली.
बाकि ग्रिल्ड पोटॅटो (एक दोन बेसिल ची पान टाकुन फॉईल लावलेला ), ग्रील्ड भाज्या विथ डिप्स, ग्रील्ड अननस पन छान लागल
सगळ्यांना परत एक्दा धन्स Happy

पटकन कोणी असेल तर मदत करा ना.
बार्बेक्यू साठी मॅरिनेट केलेले पनीर फॉइल मधे घालून ग्रिल करायचे का तसेच डायरेक्ट ठेवले तरी चालते?

आम्ही ऋषीपंचमीला २१ भाज्या मिक्स करुन भाजी करतो. अर्थात त्या संखेत वाढ आणि घट होतेच. कारण सगळ्याच भाज्या काही मिळत नाहीत. जुन्या माबोवर असेल रेसिपी. आमच्या घरातली ही फेव्हरेट भाजी. मी मधुन मधुन करते.

कच्च्या पपयाची चटणी कशी करायची ? दादर टीटी ला डी दामोदरकडे सामोश्याबरोबर द्यायचे पूर्वी . काचर्‍यांसारखा पपया चिरून बहुतेक थोडे बेसन लावून शिजवलेली असायची ती . नक्की कृती माहिती नाही . Sad

संपदा, मी लिहिलीय इथे रेसिपी. क्वीक रेफरन्स साठी, पपईच्या पातळ चकत्या करायच्या. उकळत्या पाण्यात त्या दोन मिनिटे ठेवून निथळून घ्यायच्या. मग तेलाची हिंग, मोहरी आणि हिरव्या मिरचीची फोडणी करुन त्यात त्या परतून वाफ काढायची. मग थोडे बेसन शिवरुन आणखी वाफ काढायची, चवीला मीठ, साखर आणि लिंबू रस टाकायचा.

एम्बी, पनीर स्क्युअर्स ना लावून ग्रील करता येईल. थेट बार्बेक्यूच्या सळ्यांवर ठेवले तर चिकटून बसेल.

मला ना लोणकढी तुप घरी कस बनवयचं त्याची माहिती हवी आहे.
इकडे (अमेरीकेत ) फुल मिल्क आणुण प्रय्तन्न केला पण तुप काही निघल नाही...
कुणाला काही माहीती असेल तर प्लीज सांगा..

रचु, इथे अमेरिकेत घरी तूप करायचा सोप्पा मार्ग म्हणजे अनसॉल्टेड बटर. लोणी कडवतो तसे हे बटर कढवून घ्यायचे. तूप तयार झाले की वासाने/रंगाने दिसतेच. चवीला पण आपल्याकडच्या तुपासारखे लागते. ऑरगॅनिक बटरचे तूप रवाळ होते असा माझा अनुभव (ज्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत :फिदी:).

आंब्याचा केक (रव्याचा ) आणि मावा केक (मुंबईला मेरवान कडे मिळतो तो) ची रेसिपी आहे का कुणाकडे? प्लीज टाकाल का?

सिंडरेला,

मी सुद्धा माझा निषेध केला..आठवण काढून उसासे टाकल्याबद्दल! hope, कुणीतरी सुगरण (मित्र वा मैत्रिण) मायबोलीकर मावा केक कसा करायच ते सांगेल.

casatta ice cream चि recipe माहित आहे का?

अकु तो लेख चांगला आहे आणि रेसिपी पण. अंबाडी काहि मिळणार नाहित इथे, चिंच घालावी. पण अंबाडी घालुन मस्त लागते ना.
जागु धन्यवाद. तुझि रेसिपी पण देणार का?
मी शोधुन बघितली जुन्या माबोवर पण मिळाली नाही.

स्वरा, कसाटा आईसक्रिमची रेसिपी - करायच्या स्टेप्स दिनेशदांनी याच बाफ वर मला सांगितल्याच आठवतय. तु पहिल्यापासुन जरा हा बाफ चाळुन बघ.

सध्या जपान मधे सिझन असल्याने कोहाळा छान मिळतो आहे.लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी चांगला असतो असे म्हणतात.पण त्याचे फार पदार्थ माहित नाहित..१ कोशिंबीर येते पण ती फार आवडत नाही.कोणाला काही रेसिपीज माहित आहेत का?दिनेशदा कोहाळ्याचे काय करता येइल?

Pages