पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावभाजीसाठी भाज्यांचे प्रमाण कोणी सांगेल का? पाककृती लिहिली असेल तर धागा सांगितलात तरी चालेल.
मी केलेल्या भाजीला खुप पाणी सुटते, ते पाणी कमी करण्यासाठी बटाट्याचे प्रमाण वाढवले की मसाल्याचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने भाजी सपक लागते.

गौरी, त्यासाठी सोपा उपाय म्हणजे भाज्या शिजल्या की त्या मॅश करण्याआधी त्यातले सगळे पाणी काढून बाजुला ठेवायचे. आणि गरज लागेल तसे भाजीत घालायचे. पाणि राहिले तर आमटी/भाजी/सूप याला वापरता येते. मीठ मिरपूड घालून नुसते देखील प्यायला मस्त लागते.

तरीही रेसिपी हवी असेल तर इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/04/blog-post_06.html

गौरी, शिजवतानाच पणि अगदी कमी घाल. म्हणाजे नुसते शिंपडले तरी चालते. कुकर मधे शिजतात भाज्या.

लसणाच्या पातीची चटणी करताना, भर्पुर कोथींबीर घालुन केली तरी चालते, रंग हिरवा चा हिरवाच रहातो आणि चव पण चांगली येते.

गौरी, मला पूर्वी पावभाजी अजिबात जमायची नाही. आता जमते. माझ्यासाठी तरी जर मी कांदा, बटाटा आणि टोमॅटो समप्रमाणात वापरले तर भाजी गोडसर आणि सपक होते. त्यामुळे मी चार/पाच मध्यम आकाराचे बटाटे शक्यतो युकॉन गोल्ड ( मोठे घेतले तर तीन पुरे ) , 14 oz च्या आसपासचा टोमॅटो प्युरी कॅन ( त्याहून जास्त नको. १० oz चालेल एक वेळ ), अर्धा रेड अनियन मध्यम आकाराचा ( पिवळा कांदा नको ), आठ्-दहा फ्लॉवरचे तुरे, एक मोठी सिमला-मिरची, एक मोठी वाटी मटार चुरडून घेते.
भाजी करताना बटाटे आणि फ्लॉवर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. शिजल्यावर बटाटे सालं काढून किसणीवर किसून घ्यायचे ( गुठळ्या राहत नाहीत ) फ्लॉवर मॅश करुन घ्यायचा. एकीकडे कांदा, भोपळीमिरची बारीक चिरुन घ्यायची, वाटाणे हाताने चुरडून घ्यायचे ( फ्रोझन मटार थॉ करुन ) तेल तापवून थोडे जिरे घालायचे. तडतडले की कांदा घालून अर्धा मिनिट परतायचे, मग भोपळी-मिरची आणि मटार घालून दोन मिनिटे परतायचे. एक्-दीड चमचा लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी आणि मॅश केलेला फ्लॉवर घालून ढवळून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे ( पाणी घालायची गरज नाही. पाच्-दहा मिनिटात प्युरी शिजते ) मग आवडीप्रमाणे पावभाजी मसाला, मीठ आणि उकडलेला बटाटा घालून ढवळायचे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून भाजी सारखी करुन घ्यायची.
ह्या भाजीचा रंग अगदी छान लाल होतो. भारतात असलात तर प्युरी घ्यायची गरज नाही. छान लालबुंद टोमॅटो ( वरच्या प्रमाणाला चार्-पाच ) घेऊन मिक्सरमधून कच्चेच प्युरी करुन घेऊन वरीलप्रमाणेच शिजवावे. रंग चांगलाच येतो. इथले टोमॅटो मात्र सपक असतात आणि शिजवल्यावर गुलबट होतात म्हणून प्युरीच वापरलेली चांगली.

अधिक टीपा : ह्या भाजीचा रंग अगदी बाहेरच्या भाजीसारखा येतो. भाजी करताना प्रत्येक वेळी नवीन भाजी अ‍ॅड करताना १ छोटा चमचा बटर घालत गेले तर अजूनच सुंदर होते. एकूण भाजीला छोटे ४ चमचे ! नाही घातले तरी भाजी सपक तर नक्की होणार नाही. कांदा कमी वाटला तरी खाताना अजिबात जाणवत नाही. उलट कांदा चिरायचा त्रास कमीच ह्या रेसिपीत Happy वरील प्रमाणात चार जणांसाठी भाजी होईल.

अगो, मस रागावणार आता. पावभाजी असा नवा धागा काढ. म्हणजे इतरांना सुद्धा तिथेच आपापल्या टिप्स देता येतील.

अगो
अग पण कॅनमधल्या टोमॅटो प्युरीची चव वेगळी असते ना ताज्या टोमॅटो पेक्षा म्हणजे मला तरी दर वेळी जाणवते, पावभाजीत चांगली लागते का ती, कुठल्या ठराविक ब्रॅन्डची वापरतेस का प्युरी.
आणि हे दुसरीकडे कुठेतरी लिही इथे गर्दीत परत सापडणार नाही.

आरती, अगो धन्यवाद!

आरती, काल केली होती मी भाजी, तु लिहिलेस त्याप्रमाणे पाणी शिंपडुन नाही शिजवल्या भाज्या पण जास्तीचे सगळे पाणी काढुन मॅश केल्या. पुन्हा करेन तेव्हा पाणी जास्त घालणारच नाही.

अगो, छान रेसिपी. टॉमेटो प्युरी घालुन आणि कच्च्या टॉमेटोची प्युरी घालुन केली नाहिये भाजी कधी, ट्राय करेन पुढच्यावेळी.
कांद्याचे प्रमाण कमी असावे हे बरोबर आहे, ह्यावेळी कमीच घातला कांदा. मला कोणीतरी सांगितले होते की कांदा जास्त असला की चव छान येते, जरा जास्तच व्हायचा कांदा भाजीत. Happy

हसतमुख मदत समिती हसतहसत ओरडणार का ? Wink
गौरी, टोमॅटो प्युरी पूर्णपणे शिजवून घ्यायची असते. फक्त कुकरऐवजी साध्या पॅनमध्ये.
रुनी, भारतात मी ताजे टोमॅटो घेऊनच करते. इथे मात्र आवर्जून प्युरीच वापरते. पावभाजी पाणचट न होणे आणि छान लाल रंग येणे ह्या दोन्हीसाठी कॅन्ड प्युरीच वापरणे बेस्ट वाटते ! पावभाजी मसाल्याची चव इतकी strong असते की प्युरीची वेगळी चव लागत नाही. प्युरी जास्त झाली तर मात्र भाजी आंबट होते. बटाटे जास्त झाले तर चालेल एकवेळ. त्याने फक्त रंग फिका होईल पण चव नाही बिघडणार.

मला कोणीतरी सांगितले होते की कांदा जास्त असला की चव छान येते, जरा जास्तच व्हायचा कांदा भाजीत. >>> माझ्या पावभाजीला तरी जास्त कांदा लाभत नाही. चव बिघडते Proud

रुनी, टोमॅटो प्युरी कुठल्याही ब्रँडची चालेल. ( इथे पेस्ट, प्युरी आणि सॉस असे तीन प्रकार मिळतात. प्युरीच घे. पेस्ट घेतली तर खूप कमी लागते. सॉस वापरुन पाहिला नाही )

घरात पेस्ट्री शीट्स आहेत. वेजी पफ्स शिवाय अजुन काय काय करता येइल? २ आठवड्यात घर बदलायची गडबड आहे त्यामुळे लवकर सगळा फ्रीझ रिकामा करायचाय.

dandelian greens नावाची पालेभाजी आणली आहे. बाकीच्या पालेभाज्यांसारखीच करणार आहे (लसुण, हिरवी मिरची घालून) अजुन कुणी वेगळ्या पद्धतीने करुन पाहिली आहे का?

धन्यवाद मधुरा, मेधा. लाजोने इथे दिलेली 'खारी' पण सापडली मला. सध्या ह्या मुव्हीन्ग प्रकरणाने अजीबातच वेळ मीळत नाहीये..नेटवर शोधुन प्रयोग करण्याऐवजी इथुन सल्ले घेतलेले उत्तमच Happy

जागू
भरत बरोबर सांगताहेत. ती पाककृती इथुन काढून नवीन पाककृतीच्या धाग्यावर लिहा.
- मदत समिती

ज्ञाती, आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच करायची भाजी याची.
सविस्तर माहीती, माझ्या "विठाई" मधे येईलच.

ज्ञाती, आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच करायची भाजी याची.
सविस्तर माहीती, माझ्या "विठाई" मधे येईलच.>> बर बर मी वाटच पाहतेय विठाई मध्ये त्या भाजीची Happy

(कांदा मूळा भाजी,) अवघी विठाई माझी !!!
या नावाखाली मी काही अपरिचित भाज्यांची ओळख करुन देतोय. आणि तिथे सर्वच जण महत्वाची भर घालत आहेत. (रंगीबेरंगी मधे.)

मला दुधी भोपळ्याच्या थालीपीठाची कृती हवी आहे. खुप सर्च करुनही मिळत नाहीये म्हणुन इथे विचारते आहे.

माझी आजी करायची दुधी भोपळ्याची गोडसर [म्हणजे गोड चवीची] थालीपीठ. Happy

पुरीभाजी करताना त्यात कांद्याचे बी जे कलौंजी नावाने मिळते बाजारात ते घालायचे दोन चिमटी. आपल्याकडे वापरत नाहीत पण नॉर्थ इंडियन लोक घालतात पु-यांमध्ये. आपण गव्हाच्या पिठाच्या पु-या करतो, ते मैद्याच्या करतात. पांढ-या शुभ्र पुरीत काळी कलौंजी छान दिसते.

मी पुरीप्रेस घेतलाय. त्यात पु-या अगदी पटापट प्रेस होतात. मला आधी पुरी लाटा आणि शिवाय तळाअ ही दोन्ही कामे एकदम एकटीने जमायची नाहीत. मी आधी पु-या लाटायचे आणि मग तळत बसायचे. आता पुरीप्रेसमुळे दोन्ही कामे एकदम होतात. शिवाय पुरीप्रेस मोदक वगैरे करतानाही कामाला येतो.

Pages