पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो , मंजू धन्यवाद....
चिप्सबद्द्ल विशेष आभार.. बाहेरच्या चिप्सपेक्षा हे उत्तम.
पण बीट, रताळेच्या चिप्सला काहि लावायची गरज नाही आहे का ?

मश्रुमची एखादी चांगली डीश सांगा न कुणी. खूप दिवसांनी चांगले बटन मश्रुम मिळालेत. मश्रुम मटर, सायोच्या माखनी गव्हीमध्ये मश्रुम घालणे, मिक्स व्हेज वैगरे नेहेमीच केले जाते.

याशिवाय काही करता येईल का? मश्रुम ग्रील वैगरे करून चांगले लागतिल का? मायक्रोव्हेव आहे ग्रील ऑप्शनवाला. त्यात करता येईल का काही?

थँक्स अरुंधती, हे बघितले होते. Happy
शोनुची रेसेपी एकदम वेगळी वाटतेय. फक्त मला चेडार चीझ घालावं लागेल, तेच आहे घरी, आणि दुसरा काही ऑप्शन जवळपास मिळणारही नाही. Happy

मनःस्विनी ह्यांची एक बनाना ब्रेडची फेमस कृती वाचली होती व केली होती, मस्तच होती ती कृती एकदम हलका व चवीष्ट असा ब्रेड झालेला. बर्‍याच महिन्यांपुर्वी का वर्षापुर्वी बहुधा इथे होती. इथे इतकी शोधूनही मिळाली नाही. कृपया मदत कराल का?

मनुनी ती रेसेपी काढली नंतर. माझ्या आणि पूनमच्या विपुमध्ये आहे कुठेतरी. उद्या बघून सांगते. Happy

काढली? का बरे? ...त्यांच्या बहुतेक कृती चांगल्या असायच्या/असतात. बहुतेक कृती दिसत नाहीत. आज घरी सुट्टी घेतल्याने वेळ होता आणि बरीच पिकलेली केळी सुद्धा आहेत म्हणून सकाळपासून शोधली ती कृती. असो. तुम्ही पाककृतीत लिहिता का? इतरांना मिळेल पुढे मागे हाच हेतू. धन्यवाद.

हुश्श सापडली. अल्पनाने माझ्या विपूत लिहिली होती:-
दोन कप कणिक,
३ मध्यम पिकलेली केळी,
१/२ कप ऑ.ऑ,
१/२ कप घट्ट दही, २ अंडी(१ व्हाईट १अक्खे (लो फॅट आहे ना)),
१ चमचा बेकींग सोडा, १ चमचा बेकींग पावडर,
सिनामन,
अर्धा कप साखर(हवे तर अर्धा कप मध घालून पहा मस्त मॉईस्ट होतो पण मग तेल कमी करायचे,पावच घ्यायचे.) ३७५ वर २५ मिनीटे.

धन्यवाद सगळ्यांना. मनःस्विनी ह्यांनी बर्‍याच टिप्स दिल्या होत्या तेव्हा रेसीपीच्या बीबीवर, कोणाच्या लक्षात आहेत काय? मी ऑलीव ऑइल पेक्षा कनोला वापरले तर चालेल काय?

सिंडरेला, अहो माझा प्रश्ण वेगळा आहे. तुमची विनोद बुद्धी ठिक आहे पण इथे उपयोग नाही त्याचा व इथे अ‍ॅडम कोण? त्यांना कुठे व का शोधायचे? Happy
तुमच्या उदाहरणावरून आठवले, काही लोक अननसाचा शिरा अननसाशिवाय करतात, उकडीचे मोदक उरलेसुरलेले पुरणाचे मोदक घालून करतात तसे ते अ‍ॅडम पण ह्यातलेच का? Happy

मूळ प्रश्ण, कोणी कनोला तेल घालून केलाय का हा ब्रेड? वास येतो का? एका मैत्रीणीकडे करून घेवून जायचाय तेव्हा ज्यास्त केल्यास फेकावा लागेल.

तुम्हीच करून बघा व सांगा असे कोणी सांगू नका. तेच तेच विनोद इथे नको परत कारण हा विनोदाचा बीबी नाहीये.

कोणी कनोला तेल घालून केलाय का हा ब्रेड >> हा केलेला नाही पण दुसरा बिना अंड्याचा बनाना ब्रेड केलेला आहे. त्यात मी कनोला ऑईलच घालते. मला तरी वास येत नाही. त्यामुळे करुन पाहू शकता.

मी एकदा ऑऑ घालून अन एकदा नेहेमीचे रिफाइंड तेल घालून केला होता हा ब्रेड. दालचिनी अन केळ्याच्या वासामूळे मला तरी तेलाचा वास आला नाही.

मी एकदा ऑऑ घालून अन एकदा नेहेमीचे रिफाइंड तेल घालून केला होता हा ब्रेड. >> मला सांगा ऑऑ च्या एवजी रिफाइंड तेल वापरले एखात्या पाकक्रुतीत तर काय फरक पडतो Uhoh

मी कनोला किंवा सनफ्लॉवर ऑइल घालुन केलेले आहेत केक्स्/मफिन्स. काहिही फरक पडत नाही चवीत. उलट मॉईस्ट होतात.

http://www.maayboli.com/node/16132 या मफिन्स मधे तेलच वापरलय Happy

इन्फॅक्ट ऑ ऑ चाच वास जास्त येतो अस मला वाटत.

धन्यवाद सगळ्यांना. कनोला तेल व ऑलीव ऑइल तेल दोन्हीच्या चवीत फरक हा आहेच म्हणून विचारलेले बरे.

जो Happy

can anybody give me recipe for 'homemade (oven baked) khare shengdane'...

अजिबात न बिघड्णार्या खोबरयाच्या बर्फीची क्रुती सांगा ना कोणीतरी प्लीज... Happy

खोबऱ्याची बर्फी करताना त्यात थोडं दूध घाला
जर दोन वाटी खोबरं असेल तर साधारण १/२ वाटी चालू शकेल.
प्रथम जेव्हा PAN मध्ये तुपात साखर आणि खोबरं MIX करा आणि मंद आंचेवर धवला
साखर विरघळून झाली कि त्यात वेलची पूड टाका, आवडत असतील तर DRY FRUITS टाकू शकता
मग हळू हळू मिश्रण एक जीव झाला कि त्यात दूध घाला
मग ते एक PLATE मध्ये काढून थोडे थंड झाल्यावर त्याचे काप करा , PLATE ला आधी थोडं तूप लावा खोबऱ्याची बर्फी बिघडणार नाही

Pages