Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हवं तर आम्ही येतो बरोबर.
हवं तर आम्ही येतो बरोबर. तुम्ही फिरू येईपरेन्त खाणे रेडी. मुख्य म्हण्जे बाळासाठी पाणी ज्युस वगैरे खूप लागेल. फिरताना त्यांना तहान लागते लगेच.
मी प्रवासात काही गोड खावेसे
मी प्रवासात काही गोड खावेसे वाटलेच तर रव्याचा गोड शिर्याची तयारी अशी करते. जाडा रवा खरपूस भाजून घेते. मग तूप बर्यापैकी घेवून त्यात रवा पुन्हा मस्त परतते काजू, बेदाणे घालूनच. मग थंड झाले की साखर, वेलची सुद्धा घालून हवाबंद डब्यात घेवून जाते. कुठेही चहा/कॉफी साठी फिलटरमधले कडकडीत गरम पाणी मिळतेच जर मावे नसला तरी हॉटेलात. ते ओतले डबा बंद करून ठेवते की शिजतो मस्त.
दही भात एका दिवसासाठी पण मस्त. म्हणजे प्रवासाच्या पहिल्या दिवशी, गोड दह्यात दूध टाकून घ्यायचा. वगैरे.
मनस्विनी शिर्याची आयडीया
मनस्विनी शिर्याची आयडीया आवडली.
हॉटेलमधे मावे मिळणार असेल, तर
हॉटेलमधे मावे मिळणार असेल, तर चक्क भात पण करता येईल. एक कप तांदूळ( अर्धातास भिजवलेले)+२ कप पाणी याला १२ मिनिटे पुरे. शिरा पण करता येईल. रवा भाजण्यापासून करायचा तर २० मिनिटे, भाजलेला असेल तर १० मिनिटे पण मिडियम लो पॉवर वर (४०%).
मला पण शिर्याची आयडिया जाम
मला पण शिर्याची आयडिया जाम आवडली. थकून आले की काहीतरी गोड घरगुती खावे वाट्ते.
बाहेरगावी जाताना न्यायच्या
बाहेरगावी जाताना न्यायच्या टिकाऊ पदार्थांसाठी एक वेगळा धागा उघडायला हवा. किती वेळा तेच तेच प्रश्न येतात
पुदिन्याच्या चटणीसाठी मंजुने
पुदिन्याच्या चटणीसाठी मंजुने खालील प्रमाण दिले आहे. फ्रीझ करुन ठेवायची असेल तरी लिंबु पिळायचे का ?
१ वाटी पुदिन्याची पाने
अर्धी वाटी कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
अर्ध्या लिंबाचा रस
चवीला मीठ
बागेतला पुदिना खुडुन चटणी करुन ठेवायचा उत्साह आलाय. तो विरायच्या आत उत्तर द्या प्लीज
सिंडे, आयत्यावेळी लिंबू पिळ.
सिंडे, आयत्यावेळी लिंबू पिळ. फ्रिजमध्ये टिकवायची असेल तर पाच सहा दाणे सायट्रिक अॅसिड घाल.
बागेतला ताजा पुदीना>>तों पा सु
अक्षरशः तो ताजाताजा वास नाकात जाणवला.
मलाई सॅडंविच कसं करतात?
मलाई सॅडंविच कसं करतात? कोणाला रेसीपी माहीती आहे का?
अश्विनीमामी, अकु, मनःस्विनी ,
अश्विनीमामी, अकु, मनःस्विनी , पद्मजा मनापासून धन्स!!
>>हवं तर आम्ही येतो बरोबर. तुम्ही फिरू येईपरेन्त खाणे रेडी.
नक्की या मामी, तुमचं स्वागतच आहे
मलाई सँडविच : (हे दुकानात
मलाई सँडविच : (हे दुकानात जाऊन तिथे खाण्यातली मजा काय वर्णावी?)
http://beyondcurries.blogspot.com/2010/08/malai-sandwich-bengali-delicac...
मलाई सँडविच गुगलल्यावर ब्राउन ब्रेड मधे मलईचे स्टफिंग करून केलेले सँडविच अशी पण कृती दिसली. १ एप्रिलला करायला हरकत नाही.
मला कोणीतरी मदत करा प्लीज.
मला कोणीतरी मदत करा प्लीज. मला आत्ता लगेच आंब्यचा शिरा करायचा आहे. काही केल्या मला ती रेसिपी सापडत नाहीये. सर्व प्रकारे सर्च करुन झालं. अगदी रडायची पाळी आलीये......
सानुली, तुमची विचारपूस बघा.
सानुली, तुमची विचारपूस बघा.
मला २५ ते ३० लोकांचा शिरा
मला २५ ते ३० लोकांचा शिरा म्हणजे रव्याचा हलवा ( पंजाबी लोक करतात तसा) करायचा आहे. कसा करायचा? रवा, साखर कीती लागेल?
आता बाप्पाच्या
आता बाप्पाच्या प्रसादानिमीत्ताने खुप सुकामेवा आलाय घरात. एकदा बदामाचा शिरा झाला करुन पण घरात डायबेटीस आहे त्यामुळे सारखे गोड करुनही चालणार नाही. कसा संपवता येईल?
डायबेटीस असेल तर प्रत्येक
डायबेटीस असेल तर प्रत्येक जेवणात व स्नॅकबरोबर काहीतरी प्रोटीन खावे म्हणतात. फळे खाताना त्याबरोबर २-३ बदाम वा काजू खावेत.
हो खरेय मेधा, डीप फ्रीझमधे ४
हो खरेय मेधा, डीप फ्रीझमधे ४ महीने नीट टिकतील का? मागच्यावेळी देसी दुकानातुन आणलेले काजु फ्रीझ्मधे ठेवलेले तरी महीनाभरात खवट झालेले.
सोनपरी, मावेत जरासे गरम करुन
सोनपरी, मावेत जरासे गरम करुन ठेवले तर टिकतील...
काजू ची पेस्ट पनीर माखनी
काजू ची पेस्ट पनीर माखनी मध्ये वापरता येइल. बदाम प्रत्येकी पाच असे रोज पाण्यात भिजवून खाता येतील. अंजीर चकत्या व मनुका किशमिश मात्र मधुमेह्यांना अजिबात देऊ नका त्यात संपूर्ण साखरच असते.
लहानांना डब्यात स्नॅक्स म्हणून रोज देता येइल. अक्रोड ब्राउनी किंवा केक मध्ये घालता येतील. नाहीतर सरळ घरातील मेहनत करणार्या स्टाफला डोनेट करावे. ते खूप एनर्जी वापरतात त्यांनाच हाय एनर्जी फूड ची खरे तर गरज असते.
काजू, बदाम, पिस्ते समप्रमाणात
काजू, बदाम, पिस्ते समप्रमाणात घेऊन सालं काढून किँचीत भाजून मिक्सरमधून भरड पूड करून घे. त्यात वासापुरती वेलची पावडर मिसळ, दुधाचा मसाला तयार. कुठल्याही गोड पदार्थात घालता येतो आणि फ्रिजमध्ये भरपूर टिकतो.
अश्विनी, फार छान विचार. मी
अश्विनी, फार छान विचार. मी कधीही घरी जाताना, एक वेगळा पुडा, आमच्या जयाबाईंसाठी असतोच.
मस्टर्ड ग्रीन नावाची पालेभाजी
मस्टर्ड ग्रीन नावाची पालेभाजी आणलीये, कशी करावी?
(म्हणजे सरसो का? ते सरसो का साग म्हणतात ते याचेच करतात का? )
मला शेझवॉन चटणीची रेसीपी हवी
मला शेझवॉन चटणीची रेसीपी हवी आहे........कुठे मीळेल?
ड्रायफ्रूट्स भिअवून त्याचा
ड्रायफ्रूट्स भिअवून त्याचा मिल्कशेक करता येइल. प्रत्येकी २ काजू, बदाम, आक्रोड, अंजीर आणि मूठभर मनुके ह्यात कप-सव्वा कप दूध घालून छान दाट मिल्कशेक तयार होतो. साखर घालायची गरज नाही. स्वादासाठी एखादा वेलदोडा (२-३ दाणे).
ज्ञाती, मस्टर्ड ग्रीन म्हणजे
ज्ञाती, मस्टर्ड ग्रीन म्हणजे सरसोका सागच. ते आणि पालक मिळून भाजी करायची म्हणजे उग्र होत नाही.
गुंड्याभाऊ, इथे मिळेल घरगुती
गुंड्याभाऊ, इथे मिळेल घरगुती शेझवान सॉस कृती : http://chakali.blogspot.com/2008/08/schezwan-sauce.html
थॅन्क्स आर्च !!
थॅन्क्स आर्च !!
सोनपरी विपू पहा.
सोनपरी
विपू पहा.
मला पास्ता इन चिजी व्हाईट सॉस
मला पास्ता इन चिजी व्हाईट सॉस चि रेसेपी हवी आहे. इथे शोधली पण नाही मिळाली.
कस्टड ची रेसिपी हवी आहे.
कस्टड ची रेसिपी हवी आहे.
Pages