पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे भाजणी नाही .कडबोळी (तांदूळाच्या पिठाची) कशी करायची ते प्लीज सांगाल का? मला उद्या करायची आहे.

श्रावणी, तांदळाच्याच पिठाची का करयाचीय ? रव्याची जास्त खमंग
लागते, मी लिहिलीय कृति इथे. नाहीच मिळाली तर विपूत लिहितो,
संध्याकाळी.

धन्यवाद मंजुडी ....पण " गोळा फिरायला लागतो " ही स्टेज जरा कठीण वाटते..नेमकं कधी ते कळत नाही म्हणुन मावे चा पर्याय बघतेय

बार्बेक्यु पार्टि साठि व्हेजिटेरियन डिश सुचवा ना.
अगदि कमी तयारि लागणारे सुचवा , वेळ नाहिये तयारि करायला. शनिवारी पहाटेच निघायचय. आदल्या दिवशि रात्रि करावे लागेल तयारि.

आणी अंड व चिकन असलेले पण काहि डिश सुचवा. काहि जण खाणारे आहेत.

सावली, बार्बेक्यू पार्टीसाठी व्हेजिटेबल ओग्रातिन (ogratin) करता येईल तुला....किंवा बेक्ड पोटॅटो, स्वीट कॉर्न विथ चीझ सॉस / व्हाईट सॉस मधे व्हेजीज्....
वांग्याचं भरीत??? Proud

किति माणसं आहेत्?खूप नसतील तर रंगीबेरंगी सिमला, पनीर , कांदा असे तुकडे ऑलिव्ह ऑइल, मीठ, पेपर वगैरे मिसळून, skewers वर लावून ग्रिल करता येतिल. स्वीट डिश म्हणून पीच चे अर्धे केलेले तुकडे ग्रिल मार्क येइ पर्यंत भाजायचे, मग त्याच्यावर साखर शिंपडायची..असे अननसाच्या तुकड्यांचे पण करता येइल..

ogratin कसे करायचे?
बेक्ड पोटॅटो > करताना घरि थोडा शिजवुन नेउन तिथे फॉइल मधे शिजवु का? पुर्ण कच्चा नेला तर शिजेल का?

बेक्ड पोटॅटो, स्वीट कॉर्न विथ चीझ सॉस , रंगीबेरंगी सिमला, पनीर , कांदा skewers
हे छान वाटतय.

अजुन काहि डिप्स आणी डिशेस असतील तस सुचवा ना.

वांग्याचं भरित मस्त आयडीया पण खाणारे असतिल का महित नाहि. बरेच लोक वांग खात नाहित.

५/६ लोक असतील.

सावली
लाल फुग्या मिरच्या बार्बेक्यु करायच्या अख्ख्या स्किन चांगली काळी पडली एका ब्राउन पेपर बॅगमधे गुंडाळून किंवा झिपलॉक बॅगमधे ठेवाय्च्या ५-७ मिनिटे. स्किन मस्त सुटून येते. ती सर्व काढून त्याच्या उभ्या स्ट्रिप्स कापायच्या ( अर्धा सेमी जाड ) . त्यात ठेचलेला लसूण, चांगलेसे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल अन थोडे मीठ- मिरपूड घालून मिक्स करायचे. बागेत किंवा क्रस्टी इटालियन ब्रेडच्या स्लाइस वर सर्व्ह करायचे.

पायनॅपल च्या जाडसर ( अर्धा इंच) चकत्या ग्रिल करायच्या अन त्यावर गरम असतानाच एक चमचाभर वॅनिला आइसक्रीम घालून सर्व्ह करायचे.

दोन्हीला आधी अजिबात तयारी करायला नको. पायनॅपल, ब्रेड, मिरच्या सगळं नुस्तं गाडीत घालून नेता येईल.
आइसक्रीम मात्र आयत्यावेळी मिळणार नसेल तर आइसबॉक्स मधून न्यावं लागेल .

अस्पॅरॅगस नेऊन ते पण बार्बेक्यु करून त्यावर तेल- मीठ - मिरपूड घालून सर्व्ह करता येईल.

मेधा आयडिया छान वाटतेय फुग्या मिरच्याची . करुन बघेन
अननस ग्रील करुन खाल्ल नाहिय पण बघायला हव.

आइस्क्रिम जमणार नाहि बहुधा. आम्हि सायकल वरुन जाणार त्यामुळे आइस्बॉक्स इ. नेता येणार नाहि.

गार्लिक ब्रेड, बहुतेक बेकरी सेक्शनला तयार मिळतो फॉईल मधे गुंडाळुन भाजायचा. कमी अंतरावर जायच असेल तर फ्रोजनही नेता येईल.
कणस भाजता येतील.
मेधाची आईडिया आवडली.

सिमला मिरची भाजून तिचेही दह्यात जिरेपूड, तिखट, मीठ इत्यादी घालून छान रायते बनवता येते.

पिझ्झा पण करू शकतेस....ऐनवेळी टॉपिंग्ज घालून चीज घालून ग्रील करता येइल...
अदल्या दिवशीपिझ्झा पीठ तयार करून छोटे छोटे पिझ्झा बनवून डिप फ्रिज मधे ठेऊन दे...

सगळे मिक्स होतेय. आधी स्वयंपाकाची भांडी आली इथे आणि आता बेत काय करावा हेही आले.... Happy

हा हा हा, साधना, हे तर लक्षातच नव्हते आले! Happy
आणि इथं माबोवर शोधलं तर ह्या लिंक्स मिळाल्या बार्बेक्यू पार्टीसाठी :

http://www.maayboli.com/node/2602?page=3

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/50131.html

http://www.maayboli.com/node/2602?page=11

कांदे विसरलात ? कांदे भाजून मस्त लागतात. तिथे वेगवेगळी वांगी मिळतात ना ती भाजून घ्यायची. हिरव्या मिरच्या, लसणाचे कांदे, लाल भोपळा, रताळे हे सगळे भाजून छान लागते.
कांदा व हिरव्या मिरच्या भाजून कुसकरून, त्यात तेल व मीठ घालायचे.
लसून भाजून त्यात, मिरपूड आणि मीठ घालायचे.
वांगी भाजून कुसकरुन त्या दही व भाजलेली मिरची घालायची.
या सगळ्याबरोबर पिटा ब्रेड, किंवा फ्रेंच बगेत, छान लागतो.

वा वा अरुंधती,sneha1,प्राजक्ता,swati_rajesh,मेधा, दिनेशदा
सगळ्यांना धन्यवाद .
उद्या करुन झाल्यावर टाकेनच इथे रिपोर्ट Happy
अकु लिंक साठि धन्स Happy

ताज्या लाल मिरच्यांचे काय करता येईल? गेले काही आठवडे खूप गरम असल्याने मिरच्या झाडावरच पिकून लाल होत आहेत. दीड / दोन पाउंड तरी असतील; म्हणून फेकून द्यायला जिवावर येतं. काही बनवता येईल का?

मैद्याच्या खार्या शकरपाळ्यांची रेसीपी माहित आहे का?
दिनेशदा तुम्हाला माहिती असल्यास द्या.

Pages