Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पर्वाच मैत्रीणीने दाण्याच्या
पर्वाच मैत्रीणीने दाण्याच्या आमटीची सोपी कृती सांगितली. पीनट बटर वापरून. पाणी घालून पीनट बटर सरसरीत करून घ्यायचं आणी नेहेमी प्रमाणे आमटी करायची. मी ट्राय नाही केली अजून. पण छान होते ईती मैत्रीण.
पीनट बटर आमटी... हम्म्म... पण
पीनट बटर आमटी... हम्म्म... पण त्या पीनट बटर मधे केव्हढे तेल असते.. पाणी घालुन गरम केल्यावर चिकट तर नाही ना होणार???
फ्लेमिंग हलूमी : हलूमीच्या
फ्लेमिंग हलूमी : हलूमीच्या अर्धा इंच जाड स्लाईसेस तव्यावर जरासं लोणी घालून परतायच्या, दोन्ही बाजूंनी सोनेरी झाल्या की एका प्लेटमध्ये काढून त्यावर एक चमचा कोमट ब्रँडी ओतावी व ( सांभाळून, केस, चष्मा, दुपट्टा, टाय इत्यादी जपून ) ब्रँडी पेटवून द्यावी. लगेच अर्ध्या लिंबाचा रस त्या चीझवर पिळावा. पिटा ब्रेडच्या तुकड्यांबरोबर हे चीझ खावे.
पिटा ब्रेड व हलूमी चीझ वापरून
पिटा ब्रेड व हलूमी चीझ वापरून ट्रेडिशनल सायप्रस सँडविच करता येते. त्याची कृती इथे मिळेल.
सेल्फ रायझिंग फ्लोअर वापरुन
सेल्फ रायझिंग फ्लोअर वापरुन केक्स सोडुन काय काय करता येईल? आपले पदार्थ काही करता येतात का?
अमया हे युक्ती सांगा/सुचावा
अमया हे युक्ती सांगा/सुचावा मध्ये विचारा
चांगली दाल तडका ची रेसिपी
चांगली दाल तडका ची रेसिपी कोणाकडे आहे का?एकदम ऑथेंटीक ढाबेवाली?
एम्बी, सासने इथे ह्याआधी
एम्बी, सासने इथे ह्याआधी लिहिली होती दाल तडकाची कृती, मी फक्त कॉपी पेस्ट करत आहे :
मसुर लगेच शिजतात, मी दाल तडक्या साठी तुरिची डाळ व मसुर दोन्हि एकाच वेळेस कुकर मध्ये लावले, वरण करण्या साठी जितक्या शिट्ट्या घेतो तितक्याच घेतल्या.
दाल तडका:
यात मह्त्वाच काय तर वरणावर लाल लाल फोडणीचा तर दिसण.
तेलात हिंग, मोहरी, जिर, बारीक चिरलेला कांदा, हव असल्यास लसुन, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला टमेटो, हळद, धणे पुड, तिखट घालुन फोडणी करायची व शिजलेली दाळ टाकायची (न घोटता that is mash न करता)
वरिल दोन्ही पदार्थात चवीनुसार मीठ ही घालायच ..
थँक्स अकु..मला तुरीची डाळ
थँक्स अकु..मला तुरीची डाळ वापरतात असे वाटले होते. अशी करून बघते आणि कळवते.
इथे मुलांचे खायचे पदार्थ
इथे मुलांचे खायचे पदार्थ किंवा मुलांना डब्यात द्यायचे पदार्थ असा बाफ होता ना?? मला माझ्या ४ वर्षाच्या मुलाला डब्यात द्यायला प्रकार सुचवा ना?
सायलीमी, ही त्या बाफची लिंक :
सायलीमी, ही त्या बाफची लिंक : http://www.maayboli.com/node/7044
कुणाला salad dressing करता
कुणाला salad dressing करता येत का?
घरी सॅलड ड्रेसिंग बनवायचे
घरी सॅलड ड्रेसिंग बनवायचे असेल तर १-२-३ हे प्रमाण वापरून बरेच प्रकार करता येतील
१ चमचा फ्लेवरिंग
२ चमचे व्हिनेगर, लाइम जूस, लेमन जूस , ऑरेंज जूस यातलं काहीतरी एक
३ चमचे ऑलिव्ह ऑइल, वॉलनट ऑइल, ग्रेप ऑइल , सेसमी ऑइल किंवा इतर कुठलीही तेल.
सगळ्यात सोपं म्हणजे मस्टर्ड, रेड वाईन व्हिनेगर अन ऑ ऑ या वरच्या प्रमाणात मिसळणे , चवी प्रमाणे मीठ अन मिरपूड - हे बेसिक व्हिनेग्रेट. यात एखादी पाकळी लसूण ठेचून / किसून घालायची.
नाहीतर वसाबी मस्टर्ड, किंवा वेगवेगळे फ्लेवर वाले व्हिनेगर / ऑइल्स वापरायचे.
थँक्स मेधा....फ्लेवरिंग काय
थँक्स मेधा....फ्लेवरिंग काय वापरु शकातो?
मेधा, मस्त काँबो आहेत. मी कधी
मेधा, मस्त काँबो आहेत. मी कधी कधी हनी-बाल्सामिक व्हिनेगर, थोडी मिरपूड, मीठ, ऑ ऑ आणि लसणाची छोटी पाकळी चुरडून घालते. ते पण एकदम मस्त लागतं.
स्लो कूकरमध्ये हाफ अन हाफ दूध
स्लो कूकरमध्ये हाफ अन हाफ दूध वापरुन करायची बासुंदीची कृती माहिती आहे का कुणाला ? एका LNO मध्ये उडत उडत ऐकले पण आता आठवत नाही. रात्रभर ठेवायचे आणि सकाळी बासुंदी तयार अशी काही तरी भानगड आहे म्हणे.
वेगवेगळ्या फ्लेवरचे मस्टर्ड
वेगवेगळ्या फ्लेवरचे मस्टर्ड सॉस, वेगळे हर्ब कॉम्बो ( बेसिल - ओरेगनो, चाइव्ह्स, थाइम - टॅरॅगॉन , प्रोवेन्साल हर्ब ब्लेंड, इत्यादी )
आवडत /चालत असल्यास क्रिस्पी बेकन / पार्मेझान चीझ, /अँचोव्हीज / सॉय सॉस्+फिशसॉस+ साम्बाल सॉस ( याबरोबर मिरिन अन सेसमी ऑइल्स मस्त लागेल ) यातले काही घालता येईल .
how to make panner from
how to make panner from store baught cottage cheese
or Any recipes using the cottage cheese as it is....
तुम्ही सगळेजण एखादी पाककॄती
तुम्ही सगळेजण एखादी पाककॄती शोधताना कशी शोधता ? मी आत्ता खाली सर्चच्या विंडोत भुरका असा शब्द दिला तर मला हवी ती पाककृती मिळालीच नाही . मला मी पहिल्यांदा ती चटणी कधी केली हे आठवत असल्याने माझ्या पाऊलखुणांत जाऊन शोधले , तर मिळाली . पण दरवेळी असं करणं शक्य नसतं . जसं मागे मला आंब्याचा केक - मानुषींनी दिलेली कॄती हवी होती , तेव्हा अनेक वेगवेगळे शब्द देऊन सुद्धा ती मिळाली नव्हतीच .
मलाही हा प्रॉब्लेम खुप वेळा
मलाही हा प्रॉब्लेम खुप वेळा आलाय नो सोल्युशन...
नविन मायबोलीची सर्च सुविधा
नविन मायबोलीची सर्च सुविधा अजिबात कामाची नाही ..
संपदा, हा घे भुरका-
संपदा,
हा घे भुरका- http://www.maayboli.com/node/18084
थँक्स मितान , रेसिपी मला
थँक्स मितान , रेसिपी मला सापडली होती , पण शोधताना त्रास पडला आणि वेळ गेला म्हणून इथे लिहिलं . आजच पुन्हा एकदा भुरका करून झालाय .
दुधीच juice कंस करायच
दुधीच juice कंस करायच ?
कच्चाच मिक्सर मधुन काढायचा की थोडा शिजवायचा?
आणि त्यात त्याच्या बिया पण घालतात का?
दुधी किसून घ्यायचा. सालं
दुधी किसून घ्यायचा. सालं शक्यतो काढायची नाहीत. बिया दुधी किसताना किसणी वरच राहातात. मिक्सर मधून दोन तुळशीची पानं, दोन मिरे घालून फिरवायचा. गाळून घ्यायचा रस( माझी आई गाळत नाही.चोथा चांगला म्हणून) त्यात काळं मीठ , लिंबू पिळून सर्व्ह करायचा. रस काढल्या काढल्या लगेच घ्यायचा.
धन्यवाद प्रज्ञा खुप गोंधळले
धन्यवाद प्रज्ञा
खुप गोंधळले होते बरीच वेगवेगळी माहीती मिळत होति. आता असाच करत जाईन.
सिंडरेला, मी स्लोकुकर मधे
सिंडरेला,
मी स्लोकुकर मधे बासुंदी करते तेव्हा इव्हॅपरेटेड मिल्क आणि साधे फुल फॅट मिल्क वापरते. सुरुवातीला उकळी येइपर्यंत हाय वर ठेवयचे. कहीही बघवे लागत नाही. पण नंतर लो सेटिंगवर करुन मधुन मधुन लक्ष ठेवावे लागते कारण दुध जसे आटत जाइल तसे भांड्याच्या तळाला घट्ट थर तयार व्हायला लागतो आणि ढवळले नाही तर तो करपण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रभर न ढवळता ठेउन पर्फेक्ट बासुंदी तयार होण्याची रेसिपी तुला मिळली तर जरुर लिंक दे.
स्लोकुकर मधे बासुंदी/रबडी मात्र झक्कास होते. स्लोकुकरच एक फायदा म्हणजे सारख गॅसपाशी उभ राहुन ढवळाव लागत नाही आणि इतर काम करायला वेळ मिळतो.
८ दिवस बाहेरगावी जात आहोत. पण
८ दिवस बाहेरगावी जात आहोत. पण सतत हॉटेलमध्ये जेवणे त्रासदायक ठरेल. तरी फक्त मायक्रोवेव्ह (हॉटेल मध्ये किमान उपलब्ध्द)वापरून करता येण्यासारखे कुठले टिकाउ पदार्थ आहेत? बरोबर सव्वा वर्षाचे चिरंजीव आहेत त्यांना काय देता येईल. कॄपया काही सुचवा.
१) घरून उपमाचा रवा भाजून
१) घरून उपमाचा रवा भाजून फोड्णी घालून न्यायचा मग पाणी घालून मावे करायचा.
२) पुण्यात वैद्य कडे तसलीच खिचडी मिळते.
३ ) नेहमीचे यशस्वी तिखट मिठा च्या पुर्या, डाळीचे सारण असलेली कचोरी, खाकरा.
४) ब्रेड बटर म्यागी ( चालत असेल तर)
५) बाळाला काय आवड्ते? बरोबर फळे बिस्किटे चीटोज ठेवायचे. साइट सीइन्ग मध्ये नक्की भूक लागेल.
६) बाळासाठी दूध बिस्किट बरोबर हवे.
७) ठेपला खार्या शंकरपाळ्या.
अश्विनीमामीच्या यादीत अजून
अश्विनीमामीच्या यादीत अजून थोड्या अॅडिशन्स!
८) मुगाच्या डाळीची खिचडी....पाणी न घालता बाकी सर्व साहित्य तेलावर फोडणीत कोरडेच परतून घ्यायचे, आयत्या वेळी पाणी घालून शिजवायची.
९) रव्याचा शिरा : कोरडा परतून घ्यायचा, आयत्या वेळी पाणी.
१०) घारगे, ठेपले, धपाटे, पुरणपोळ्या
११) मसालेभातही भाज्या न घालता कोरडा भाजून नेता येतो, आयत्या वेळी गरम पाणी झिंदाबाद!
१२) इन्स्टंट सांबार पावडर पाण्यात घालून उकळली की सांबार रेडी!
Pages