लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

नाही मामी. पाणी भरपूर पितो. भाज्या अन सफरचंद वैगरे पण आवडीने खातो. त्याला लाल भोपळा, दुधी भोपळा, बिन्स, भेंडी, टॉमॅटो वैगरे भाज्या मनापासून आवडतात. Happy

माझी मुलगी (वय वर्ष ३) २-३ दिवसन्पासून कानात माशी गेली आहे अस म्हणत होती. आणि ताप (९९ )होता. काल पसून ताप नाहीये .कान पाहील्यावर त्यात मळ ear wax दिसतोय. अगदी बाहेर च्या बजुला.पण ती मलाच काय डोक्टर ला ही नाही हात घालू देणार Sad
मी सध्या अमेरीकेत आहे.इथे सोलिवाक्स सारखे otc medicine मिळेल का फार्मसीत?
का डोक्टर चीच appointment घेऊ?
ही मुलगी पण अशी आहे ना की अत्ताच ४ दिवसान्पूर्वीच तिची जनरल चेकप साठी dr app झाली. पण तिने काही डॉ ला कान नीट बघु दिला नाही ,आणि डॉ पण अशी की तिने ही हिला काही होत नाही ना अस विचारून सोडून दिल..... आणि मी पण तिला तस करू दिल मुर्खासारख Sad

तोशावी,

डॉक्टरकडे घेउन जा. इअर इंफेक्शन असेल तर वेळीच उपाययोजना केलेली बरी. (ताप नाही हे चांगले आहे पण कान दुखत असेल तर..) डॉक्टरांच्या तोंडुन आलेले बरे.

माझी मुले कान कधीच नीट बघु देत नाहीत पण आमचे डॉक्टर कान चेक करतातच. तुम्हीही इन्सिस्ट करा.

माझ्या मैत्रिणीच्या मुलाला इअर इंफेक्शन झालं होतं तेव्हा तोहि कानात माशी गेलीय असं सांगायचा. मनस्मि म्हणतायेत तसं डॉक्टरकडे नेणं जास्त योग्य.

लगेच डॉक्टरकडे नेणंच योग्य. आणि शक्यतो नर्स प्रॅक्टीशनरऐवजी डॉक्टरचीच अपॉइंटमेंट घे. माझा अनुभव फार वाईट आहे नर्स प्रॅक्टीशनरचा विशेषतः इअर इन्फेक्शनच्याच बाबतीत. अँटीबायोटीक्सचा कोर्स सुरू केला की लगेच थांबेल दुखायचं. काही काही बाबतीत अँटीबायोटीक्सला पर्याय नसतो. ही त्यातलीच एक गोष्ट आहे. बाकी तुझ्याकडे कपर्दिक भस्म आहे का? ते कानात टाकून त्यावर किंचीत लिंबूरस सोड. तुला माहिती असेलच. आणि तेल गरम करून (सोसवेल इतके कोमट, आधी तुझ्या हातावर थेंब टाकून पाहा) तिच्या कानात २-३ थेंब टाक. दोन्ही (कपर्दिक भस्म आणि तेल) एकदम नको करुस. मध्ये वेळ जाऊदे.

सगळ्यान्चे आभार!
आज काही तक्रार नाहीये तिची ,पण डॉ ची आपोइन्ट्मेन्ट घेत आहोत्.
आश्विनी ,mansmi हो इअर इन्फेक्शन आसेलही बहुदा ,अपल्याला मळ झालाय हे बरेचदा लक्षात येत नाही ,आणि पाणि वै. जाउन इन्फेक्शन होउ शकते.आणि तिला ताप ही येत होता ना......
बघू तिचि डॉ कय म्हणतेय्?
नाही ग कपर्दिक भस्म नाहीये.
कळवते,
तोषवी.

मी अमेरिकेत असते. माझा मुलगा अडिच वर्षाचा आहे. तो शाळेत जायला लागल्यापासुन त्याची सर्दिच कमी होत नाहिये.मी १/२ दा डॉ कदे घेऊन गेले पण हे नॉर्मल आहे असं म्हणून त्यानी सोडून दिलं.मागच्या वर्षी दुस-या डॉ ने ब्राँकायटीसचे निदान करुन antibiotics course करवला होता..गेला १ महिना त्याचे नाक सतत गळते आहे.खोकलाही ब-यापैकी आहेच मला कोणी उपाय सुचवाल का?

स्वप्ना,
ईथल्या डॉ ना एक छान सबब मिळालेली असते,की मुलगा डे केअर किवा स्कूल ला जातोय ना,देन इन्फेक्शन इज वेरी कॉमन......
हा अ‍ॅलर्जी सिजन आहे शाळेतली बरीच मुल सर्दी खोकल्यानेच आजारी पडतात या काळात.
तू मुलाला सध्या सितोपलादि चूर्ण (indian grocerry मधे मिळेल बहुदा.)१/४ चमचा मधातून दे दिवसातून दोनदा.यानी खोक्ला कमी होइलच आणि यातील घटकान्मूळे त्याची प्रतिकार शक्ती ही वाढेल.
याशिवाय जर तो सकाळी दुध पित आसेल तर त्याला १ चुप दूध आणि १ कप पाणी एकत्र करुन त्यात चिमुट्भर सुन्ठ आणि पाव चमचा हळद घलुन हे उकळू द्द्यायचे (१ कप दूध शिल्लक राही पर्यन्त )देत जा.
त्याला नाक शिन्करणे(blow ur nose)कसे ते शिकव्,यानी कफाचा बरच जोर कमी होतो(आणि सर्दी ओल्या खोक्ल्यात रुपान्तर होत नाही पुढील इन्फेक्शन होणे टळते).
वाफ घ्यावी यानी नाक चोन्दण बर्यापैकी कमी होत.

स्वपना,

ह्युमिडीफायर लावता का? काही वेळेला कोरड्या हवेने खोकला येतो.

तोषावी,
सीतोपलादी चुर्णाचे काही ब्रँड नेम आहे का? (ग्रोसरी स्टोअर मधे कुठल्या नावाने विचारायचे? सेम नाव?)

मनस्मी,सितोपलादि चुर्ण इथे यु एस मधे मी बैद्यनाथ आणि डाबर यान्चे पाहिल्लेले आहे.भारतात असशील तर आयुर्वेद रसशाळा पुणे/बैद्यनाथ्/धूत्पापेश्वर यापैकी कुठलेही घेउ शकता.

माझा मुलगा दोन वर्षाचा आहे , त्याला सतत सर्दि, खोकला याचा त्रास आहे.
खाण्याचे नखरे असतात. डौकटर म्हणतात खाण्यासाठि त्याला जबरदस्ती करु नका.
त्याच हिमोग्लोबीन कमी आहे, वजन देखील ११.५ आहे
हल्ली त्याला पित्ताचा त्रास होतो आहे.
नॉन व्हेज , अड , बेसन, पदार्थ खायला नाही सागितले आहे
खाण्यामध्ये काही बदल करु का? काही तरी ऊपाय सुचवा.

तोषावी,
धन्यवाद.

जुई,
तुम्ही अश्विनी याना त्यांच्या विपु मधे लिहुन बघा तुम्हाला लवकर उत्तर हवे असल्यास.

जुई, त्याला च्यवनप्राश लगेच चालू कर.

सकाळी उठल्या उठल्या एक चमचा च्यवनप्राश घ्यायचा काहीही खाण्यापिण्यापूर्वी. मग मोजून अर्ध्या तासाने एक कपभर गरम दुध घ्यायचे. नंतर मग भूक लागेल तसे खाऊदे. आपोआप भूक वाढेल. आणि हळू हळू प्रतिकार शक्ती पण वाढेल. तसेच सर्दी, खोकला सगळे कमी होईल. सितोपलादी चूर्ण पण चालू कर लगेच.

सितोपलादी चूर्ण (१/८ चमचा), गुळवेल सत्व (१/१६ चमचा), आणि हळद (१/१६ चमचा) असे दिवसातून ३ वेळा दे.

च्यवनप्राश पुण्यात मनोज पत्की करतात त्यांचा उत्कृष्ट असतो. सितोपलादी पण तुला त्यांच्यकडे मिळेल.
त्याचा नंबरः 9850974741

हा प्रश्ण कुठे लिहावा हे नक्की कळत नाहीये.पण मुलान्च्या सन्दर्भातील म्हणून इथे लिहितेय.
माझी मुलगी वय वर्ष साडे तीन. सध्या काही महिन्यान्पासून खूप ओरडायला शिकली आहे.थोड्क्यात तिच्या म्ह्णण्या प्रमाणे झाल नाही की ती तिचा राग ओरडून व्यक्त करते.मग बरच वेळ खूप अरडाओरडा करते,रडते.अशावेळी ती समजवण्याचा परिस्थीतीत ही नसते.आणि ओरडल तर आणखीनच रडते.कधीकधी मला राग आवरत नाही.बाहेर अस झाल तर आवाज ही च्ढ्वून बोलता येत नाही इथे अमेरिकेत.आज तिच्या प्लेस्कूल मधून ही तक्रार आली की ती ऐकत नाही.घरी प्रयत्न करा त्यासाठी.घरी ही सध्या तेच चाललय्.मला आधी वाटल कि laungue problem असेल पण तिला तितक इन्ग्रजी नक्किच समजत.आपण काही सान्गायला गेलो ३/४ वेळा ते ही शेवटी रागाउन सान्गितले की ती ऐकते तेवढ्यापुरत.
बरेचदा अपल्याच दुनियेत वावरत असते. रात्री ही शान्त झोपत नाही.
म्हणाव तर खूप हुशार आहे.लक्षात ही पटकन राहात तिच्या.बर्याच कविता गाणी तोन्ड्पाठ.पण concentration नाही.काय करू?

मनस्मी धन्यवाद
(तुम्ही अश्विनी याना त्यांच्या विपु मधे लिहुन बघा तुम्हाला लवकर उत्तर हवे असल्यास.)
मनस्मी मला सांगाल का नक्की कुठे म्हणजे एखादी लिंक वगेरे आहे का ?

अश्विनी खुप धन्यवाद.
गेले काही महिने मी सितोपलादी चुर्ण अगदी चिमटिभर मधातुन देते त्याला
आता वर सुचवल्याप्रमाणे त्याला चुर्ण देइन .

मी मुंबईत ( परेल ) राहते. गुळवेल सत्व कुठे मिळेल ते सांगाल का?

मी त्याला च्यवनप्राश द्यायची मधातुन पण अगदी थोड म्हण्जे पाव चमचा. पण मी अस ऐकलेल की लहान मुलांना देउ नये म्हणुन मी परत बंद केल.
पण आता परत चालु करेन.. नुसतच देऊ की मधातुन दिल तरी चालेल . सकाळीच देण जरुरी आहे का ?

मी वर प्रश्न विचारल्याप्रमाणे त्याला पित्ताचा त्रास होतो आहे.. त्यावर काही सुचवाल का?
खाण्यापिण्यात काही बदल ...

फार प्रश्न होताहेत पण मला मदत कराल प्लिज.......

माझ्या मुलाचे खाण्याचे फार नखरे असतात.
मुग भाताची खिचडि तर तो खातो पण अगदी भुक लागली असेल तरच.
रात्रितर तो भात चपाति खायला मागतच नाही. फळ आवडीने खातो.
डाळींब , पपई खातो. फळ दिली की तिच खाईल मग बाकिच राहुन जात.
डॉक्टर सांगतात त्याला जबरदस्ती करु नका. आवडेल ते खाऊ दे. मला त्यांच म्हणण पटत पण घरचे सारख म्हणतात की फळ खाऊन काय पोट भरणार ...
म्हणुन मी त्याला जबरदस्तीने रात्री हळदीचे दुध पाजते
तसा तो रात्री झोपतो.

सकाळी ऊठ्ल्यावर त्याला मारी बिस्कीटे आणि दुध देते आणि नंतर जवळजवळ ११ वाजता त्याला दुधातुन दिड चपाती देते. सगळ देते तेपण जबरदस्तीने. फळ सोडुन...
माझ्याकडे ' वंशवेल ' पुस्तक आहे. त्यात दिलेल्या तक्त्याप्रमाणे जेवण द्यायच प्रयत्न करते.

जुयी,
दादर ल रनडे रोड वर पटवर्धन ब्रदर्स आहेत त्यन्चाकडे सर्व प्रकारची सुटी आणि कम्पन्यान्ची आयुर्वेदिक औषधे मिळतात.

जुयी,

तुम्ही लॉगॉन केल्यावर "माझे सदस्यत्व" वर क्लिक करा. त्या पानावर "विचारपुस" ही लिन्क असेल त्यात मी तुम्हाला माहिती पाठवली आहे. (इथे विषयांतर नको म्हणुन). कृपया चेक करा.

तोषावी हा माझ्या मुलाचाही problem आहे आणि तू म्हटल्याप्रमाणे इथे अमेरिकेत ओरडताही येत नाही ..माझा मुलगा अडिच वर्षाचा आहे. त्याच्याही playschool मधून असाच सूर ऐकु येतो तो ऐकतच नाही, जोरात ओरडतो वगैरे...मी एक प्रयोग केला बघ तुला पटतोय का ते..जेव्हा ती ओरडायला लागेल किंवा चिरकायला लागेल बाहेर अथवा घरी कुठेही ..तू त्यावेळेस जे काही करत असशील ते थांबव आणि शांतपणे तिच्यासमोर बसून रहा. अगदी मैत्रिणीशी बोलताना तर त्याना उधाण येतं ...म्हणून म्हटलं जे काही करत असशील अगदी shopping करत असशील तरीही ...मी कितीतरी वेळा shopping, park , library इथून तिथले काम न करताच परत घरी आले आहे..म्हणून सांगते सरळ कडक शब्दात तिला सांग , car मध्ये बसल्यावरही सांगू शकतेस्..की आज आपण काहीही काम न करताच का परत चाललोय? तर तू गोंधळ घातलास म्हणून ही मुलं फार हुशार असतात त्याना माहीत असतं की आपला patience कधी test करायचा ते..म्हणून आधी तुझं डोकं शांत ठेव (हे फार कठीण आहे ..मी जाणते)
आणि हा प्रयोग करून बघ..

स्वप्ना अनुमोदन. शिवाय एक attention deficit disorder/ ADHD ची टेस्ट अस्ते ती करून घ्यावी. प्रोसेस्स्ड अन्न, कोका कोला, हाय ग्लायसेमिक इन्डेक्स वाले स्नॅक्स मुळे असे होते. ते कमी करून बघावे. जसे पेस्ट्री च्या ऐवजी सफर्चन्द.शुगरी सोडाच्या ऐवजी मिल्क्/कुकी.

माझी मुलगी तर रागाने थरथरत असे लहानपणी. आपले त्यान्च्यावरील लक्ष एक क्षण ही दूर होता कामा नये असे त्याना वाट्ते. तेन्वा मी असेच करायचे. ते बिहेवीयर संपेपरेन्त शान्त बसायचे. मग समजावून सान्गायचे. काही मुले हाय एनर्जी वाली असतात त्याना शारीरीक द्रुष्ट्या दमून जातील अशी चॅलेनज द्यायची मग चट दमून आइजवळ येवून बसतात.

काल्विन आणी हॉब्स वाच जरूर.

स्वप्ना ,अश्विनीमामी,तुमचा सल्ला जरूर अमलात आणेन.
हो तिला ही attenssion fever आहे.सम्पूर्ण दिवस आता माझी सवय झाली आहे ना तिला .त्यामुळे तिला पटकन मागताच सगळ्या गोष्टी मिळ्ण्याची सवय झाली आहे.मग एखाद्या गोष्टी च नाही पचवता येत नाही.त्यमुळे हल्ली 'नाही ' हे ऐकण्याची थोडी सवय देतोय तिला.आणि तिन ऐकल तर तिला वेरी गुड /स्टार वैगरे देतो.कधी कधी प्रयोग जमतोय. Happy
अश्विनी मामी,हो मी पण adhd बद्दल वाचतेय नेट वर्.एखादी विशेष साइट माहीत आहे का?कोणती टेस्ट आसते ADHD साठी?मधे तिच्या पेडिअट्रीशन नी १ फोर्म भरून घेतला होता तिच्या जनरल चेकप सठी गेले होते तेव्हा.त्यात ती मित्र मैत्रीणीत रमते क?नेचर मधे इन्टरेस्ट घेते का?मोठ्या आवाजाला घाबरते का?असे प्रश्न होते ,ते का भरून घेतले ते मी विचारल नाही त्यावेळी.पण ते त्यासाठी होते का?तेव्हा ती पेडीअट्रीशन सगळ नोर्मल म्हणाली....
अशावेळी खूप आधार वाटतो मायबोली चा ....धन्यवाद.

तोशावी, मला नाही वाटत ADHD असेल, पण इथे माहिती वाचा- http://www.webmd.com/add-adhd/guide/adhd-symptoms
ती कधीपासून शाळेत जात आहे? सुरुवातच असेल तर मुलांना अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागतो. शाळेत नियमाप्रमाणे वागावे लागते, गोष्टी शेअर कराव्या लागतात ते सुरुवातीला जड जाते, सहसा आधी घरी एकटं खेळायची आणि हां तेव्हा हवं ते मिळायची सवय असेल तर. त्यामुळे तुम्ही 'नाही' ऐकायची सवय करताय ते बरोबरच आहे. Happy

जुई,

वरती सांगितले आहे ना च्यवनप्राशबद्दल अगदी त्याच पद्धतीने घ्यायचा. काहीही बदल न करता. पुन्हा देते.
मधातून नको, नुसताच दे. सकाळी देणे जरूरी आहे. संध्याकाळी दिलास तर रिकाम्या पोटी देशील हे पाहा. आणि नंतर अर्ध्या तासाने दुध.

सकाळी उठल्या उठल्या एक चमचा च्यवनप्राश घ्यायचा काहीही खाण्यापिण्यापूर्वी. मग मोजून अर्ध्या तासाने एक कपभर गरम दुध घ्यायचे. नंतर मग भूक लागेल तसे खाऊदे. आपोआप भूक वाढेल. आणि हळू हळू प्रतिकार शक्ती पण वाढेल. तसेच सर्दी, खोकला सगळे कमी होईल. सितोपलादी चूर्ण पण चालू कर लगेच.

सितोपलादी चूर्ण (१/८ चमचा), गुळवेल सत्व (१/१६ चमचा), आणि हळद (१/१६ चमचा) असे दिवसातून ३ वेळा दे.

हे जे औषध सांगितले आहे ते पित्तावर पण काम करेल (प्रायः गुळवेल सत्व).

मुंबईत कुठे मिळेल ते मला माहिती नाही. तोषावीने सांगितले आहे तिथे बघ ना.

तुझे सगळे प्रश्न कव्हर झाले ना? काही राहून गेले असल्यास विचार.

अश्विनी
कुठले च्यवनप्राश चांगले.. बाजारत आज्काल बर्‍याच प्रकारचे आलेत नविन नविन..
च्यवनप्राशचा माझा अनुभव खरच चांगला आहे.. मी लहान असतांना माझे आजोबा मला डाबर च्यवन्प्राश चा १ चमचा नित्यनेयमाने द्यायचे..
प्लीज सांगशिल का ?

Pages