लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

धन्यवाद सिंड्रेला, मृण्मयी..
काल दुपारी त्याला टॉमेटो घालुन उपमा दिला होता, रात्री मुग्-मसुर वरण (परत टॉमेटो घालुन्) अन भात दिला. संध्याकाळी संत्र्याचा रस्..थोडासा आंबा. रात्री झोपताना तुप घालुन कोमट पाणी अन सकाळी, भिजवलेल्या मनुका.
यासगळ्याचा एकत्रित परिणाम... आज त्याला बिलकुल त्रास झाला नाही.
तुम्हा सगळ्यांना परत एकदा धन्यवाद Happy

हाय अश्विनी, खुप उशिरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व. तुम्हि सन्गितल्या प्रमाणे चन्दना चा लेप लावला त्याला. त्या मुळे म्हणा कि औषधा मुळे म्हणा, तो आता ठिक आहे. त्याचि immunity वाढवण्या सठि आता एक आयुर्वेदिक doctor मित्राकडुन औषध सुरु केलं आहे.

एक चाटण आहे,कुमारि आसव आणि अम्रुतरिष्ट.

पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद. तुमच्या सारख्या लोकांमुळे आमच्या सारख्या नविन आयांना,होउ घातलेल्या आयंना दिलासा मिळतो Happy

माझी मुलगी ११ वर्शाची आहे. माझा नवरा ह्रिदय् विकाराच्या झट्क्याने तिच्या समोरच गेला. तेव्हा ती ८ वर्शाची होती. ती अजुन ही मला सोडून रात्रीची झोपत नाही. मला सोडून दुस्र्यान्च्या घरी रहाइला तिला जमत नाही. मला काहितरी होइल म्हणून. घाबर्ते. एकटे पालक म्हणून मला ही एकच गोश्तकशी सुधाराइची ते कळत नाही. तिची शाळेतली प्रगती मस्त आहे. तिचा विश्वास कसा सुधारावा. मी कधी रडलेली पण तिला आवडत नाही. वीनी आनी स्वीट dogs ना पण ती खूप जपते. त्याना काहितरी होइल म्हनून घाबरते. काय करावे.

अश्विनिमामी
तुमच्या लेकीच्या शाळेत काउंसेलर असतील तर त्यांच्याशी बोलून पहा. तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने एखाद्या बाल मानसोपचार तज्ज्ञाशी बोलू शकता. अजून अकरा वर्षे म्हणजे तशी लहानच आहे.

हल्ली माझ्या ११ महिन्यांच्या लेकाच्या अंगावर बारिक फोड येतात.. बहुतेक डास चावल्याप्रमाणे..लाल्सर होवुन थोडीशी सुज आल्याप्रमाणे ती जागा फुलते.. नंतर त्या फोडाला छोटं तोंड तयार होतं... अश्यावेळी तो भाग खुप खाजतो.. हातावर, पायावर, पाठीवर, कपाळावर अन डोक्यावर झालय असं.. (हल्लीच जावळ काढलय, त्यामुळे डोक्यावर आलेला फोड पण लगेच दिसतो.) हे फोड नंतर हळुहळु सुकुन जातात्..खपली धरते..अन ती पण निघुन जाते...

मध्यंतरी घरी थोडे डास होते, त्यामुळे आम्हाला वाटायचं चावल्यामुळे होतय.. मच्छरदाणीत झोपवुन बघितले.. गुड नाईट वैगरे पण वापरले.. तरी फोड येतातच आहेत. खरंतर पुर्वी पण गावाकडे गेलो असतांना २-३ वेळा त्याला असे फोड आले होते..पण त्यावेळी काहीतरी चावलं असेल असच वाटलं सगळ्यांना.

दोन आठवड्यांपुर्वी पायावर २-३ फोड होते ..डॉ. नी रक्त तपासलं.. त्यात सी रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाण वाढले होते.. ७.२... त्यांच म्हणणं त्यामुळे खाज येतेय व फोड येताहेत.. अ‍ॅन्टीबायोटीक्स दिले होतेआठवडाभर.
नंतर काही दिवस आले नाहीत फोड्..मग परत आलेत ४-५.. आता दोन दिवसांपासुन नवा फोड नाहीये.. जुने पण बहुतेक सुकुन गेलेत. पण त्याचं अंग खुप खाजवत्..सारखा डोकं/ अंग्/हात वैगरे घासत असतो जमिनीवर, भिंतीवर आमच्या अंगावर..
काही उपाय सुचवु शकाल.. परत एकदा डॉ.कडे जाणार आहेच.

अल्पना,
एक कडू तेल म्हणुन मिळते ते लावत जा रात्री त्याच्या अंगाला. त्याने खाज कमी होइल. माझ्या लहान भावाला असे होत असे. ईथे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते ते म्हणायचे की गोडे अंग आहे.
नक्की फोड कशामुळे आले होते ते लक्षात नाही आता पण त्यांनी त्याचे गोड खाणे कमी करायला लावले होते आणि कार्ल्याचा रस द्यायला सांगितला होता

हा गोड तर नाही खात सहसा... क्वचित कधीतरी रव्याची खिर किंवा नाचणी सत्व गोड खातो..एरवी त्याला मिठाचच लागत खायला... दुध पण साखरेशिवाय घेतो.. फक्त फळं खातो तेवढच गोड...
बघते चौकशी करुन, कडु तेलाबद्दल.. अग माझे चुलत सासरे आहेत वैद्य, पण त्यांनी अजुन काही सांगितलं नाहीये.. अन तसं माझ्या नवर्‍याचं घराणं पारंपारिक वैद्यांचच आहे.. सासुबाईंनी आज एक उपाय सांगितला आहे... आंबट दह्यात सरसोचे तेल घालुन मालिश करायला..अंघोळी आधी. आज तर नाही करता आलं..उद्या ते पण करुन बघेन्...(यामुळे अंग थंड रहात्...खाजणार नाही ..पण नक्की काय असेल हे त्यांना कळत नाहीये म्हणुन उपाय पण सांगता येत नाहीत न)

>>मिठाचच लागत खायला...
म्हणजे खारट खातो का जास्त?

>>नाहीये म्हणुन उपाय पण सांगता येत नाहीत न
ही तर समस्या आहे..कळत नाहिये की नक्की काय आहे...

>>करुन, कडु तेलाबद्दल
करंजी तेल किंवा कडूलिंबाच तेल त्वचा रोगात वापरतात

अरे खारट नाही..मिठाचं म्हणजे किंचित मीठ ,हिंग अन जीरे घातलेली भाजी, वरण किंवा सांजा वैगरे.. गोड अगदी क्वचित खातो... खिमटी वैगरे केलं नं, तर साखर्-गुळ घालुन नाही खात तो. त्याला जिरे किंवा जिर्‍याची पुड अन थोडस मीठ, अन लिंबु पिळुन अश्या चवीचं लागतं...
खरतर गेल्या महिन्याभरात तो आम्ही खात असलेली भाजी-वरण खायला लागला म्हणुन त्याच्या जेवणात थोडतरी मीठ घातलं जातय नाहीतर पुर्वी तो बिना मिठा-साखरेचं खायचा..
इथे शेजारीच एक आयुर्वैदिक औषधांचं दुकान आहे तिथे मिळेल कडु तेल..

अल्पना माझ्याच लेकिसारखा दिसतोय तुझा लेक. तीलाहि सगळ मिठाच नाहितर तिखट हव असत. गोड दिल तर ३ - ४ चमचे घेते फक्त Sad
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

हो ग... शिरा वैगरे करुन काही उपयोग नाही...

डाँ. कडे गेलीच असशील. तरीही मला वाटते की शीतोपचार उन्हाळ्यात करावे.. गुलकंद (गोड म्हणून नाकारेल कदाचित तो पण एक तरी चमचा देणे.) लिंबूसरबत, पित्तशामक म्हणून आमसुल सरबत.. ते नको असेल तर आमसुलाची आमटी ..
माझ्या मनीला दरवर्षी कोपरांवर बारीक पुरळ येते. पावडर लावत रहाते सारखी ..
लहान असताना पण मानेवर, गळ्यावर कपाळावर, हनुवटीवर फोड यायचे.. तिला घामोळं ही होतं.. टच वूड यावर्षी कमी आहे घामोळं..

काल गेले होते डॉ. कडे.. सध्या नविन फोड नाही, त्यामुळे त्यांनी सगळं ठीक आहे असचं सांगितलय..
अ‍ॅना, गुलकंद खातो आवडीने.. लिंबुसरबत, लस्सी, दही वैगरे पितो.. कोकम किंवा कोकम सरबत नाहीये माझ्याकडे. इथे मिळणारही नाही.. Sad
सध्या तरी मधुनच अंग किंवा डोकं खाजतय हाच एक प्रॉब्लेम आहे.. बाकी घामोळ्यांचा मला पण त्रास व्हायचा.. अन आई सांगते माझं अंग खुप चिडकं होतं लहानपणी.. काहीही चावलं की लगेच फोड्..त्यात पाणी वैगरे व्हायचं.. अजुनही मला असा अ‍ॅलर्जीचा त्रास होतो उन्हाळ्याच्या शेवटी अन हिवाळ्यात्..अंगावर एकदम पित्त उठल्याप्रमाणे काही ठिकाणी पुटकुळ्या येतात.. अजुन तरी यावर मला उपाय नाही मिळाला... याला असं काही नसावं..

कोकम नाहीच मिळत इकडही.. मी तिकडे गेले की आगळाचा कॅन घेऊन येते.. माझ्या सा.बांना लहानपणी देवी निघाल्याने त्यांना उन्हाळे लागतात.. केव्हाही.. Sad आई, मावशीला असाच अ‍ॅलर्जीचा त्रास आहे.. खूप वर्षे आईने दुर्लक्ष केलं अन आता म्हातारपणामुळे इम्युनिटी कमी झाली असावी म्हणून जास्तच त्रास होतोय.. २ वर्षापासून उपाय चालु आहेत. दुखण क्रॉनिक झालय अस त्वचारोग expert म्हणतात. असच हातापायां वर, गळ्यावर पोट्-पाठ खाज, पुरळ, नंतर ते चिघळणं.. साडीला पिन लावली तरी तिथं लाल होतं., खाज सुटते..

आई ग.... अग मी फक्त सरबताचा कॅन आनते दरवेळी..अन एकटीच पिवुन संपवते.. माझ्या घरी कुणालाच कोकम हा प्रकार आवडला नाही..पण यावेळी मी घेवुन येईन एखादं पाकीट कोकमाचं पण..

पाकिटाचा उपयोग सार, आमटीत बुटुक टाकून कर.. दिसू नाही अस वाटल तर काढून टाक. भेंडीभाजीत फोडणीत टाकावं म्हणजे चिकट होणार नाही.. नंतर काढून टाक.. आगळ हा साखरेशिवाय असतो त्याच सार करू शकतेस.. लेक अजुन लहान आहे, त्याला आमसुलाची सवय लावायचा प्रयत्न करू शकतेस.. Happy

>बाकी घामोळ्यांचा मला पण त्रास व्हायचा.. अन आई सांगते माझं अंग खुप चिडकं होतं लहानपणी.. काहीही चावलं की लगेच फोड्..त्यात पाणी वैगरे व्हायचं.. अजुनही मला असा अ‍ॅलर्जीचा त्रास होतो उन्हाळ्याच्या शेवटी अन हिवाळ्यात्..अंगावर एकदम पित्त उठल्याप्रमाणे काही ठिकाणी पुटकुळ्या येतात.. अजुन तरी यावर मला उपाय नाही मिळाला
>>
त्यालाही हे होतय का पहा...

उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळ्याच्या सुरुवातील शशरिरातील पित्तदोष वाढतो, त्यासाठी पित्तशामक औषधींच सेवन करावं... अ‍ॅना म्हणते त्याप्रमाणे कोकम चा पण फायदा होतो पित्तासाठी.

त्याला घामोळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून अंग कोरडे ठेवायचा प्रयत्न कर, पावडरचा वापर कर

अल्पना,

तु हे केले असशीलच पण तरी सांगतेच...

बाळाची झोपण्याची जागा नीट स्वच्छ आहे ना बघ. हंथरुण पांघरुण मऊ सुती कपड्याचच वापर. काही वेळेला नाजुक त्वचा असेल तर कपडे घासल्याने सुद्धा पुरळ येऊ शकते. उन्हाळा असेल तर बाळाला दिवसातुन थोडा वेळ उघड ठेव. मला स्वतःला लोकरीची अ‍ॅलर्जी आहे. लोकरीचे कपडे डायरेक्ट अंगावर चढवले तर त्वचा लाल होते, पुरळ येत आणि भयाण खाज सुटते...

बाळाला कुठली पावडर, क्रिम वापरत असशील तर थोडे दिवस वापरु नकोस, कधी कधी त्यामुळे ही पुरळ येऊ शकते. माझ्या लेकीला जॉन्सन्स च्या पावडरी ची अ‍ॅलर्जी होती. पावडर लावली की अंग लाल व्हायच...

अजुन एक, बाळाला लॅक्टोज/ग्लुटन इंटोलरन्स नाहिये ना हे डॉक्टर कडुन चेक करुन घे जमल्यास.

या मुलांच्या वजनाची भानगड आहे. WHO ने वय आणि आदर्श वजन याचा चार्ट प्रसिद्ध केला आहे. तो सगळ्याच बालरोग तज्ञाकडे असतो. त्यातील नॉर्मल वजन /वय चा चा स्ट्रेट लाइन ग्राफ असतो. नॉर्मल लाइनच्या खालची मुले कुपोषितच समजली जातात भलेही ती श्रीमन्त घरातली का असेनात. व ही मुले नेहमी छोट्या मोठ्या आजाराला व्हल्नेरेबल असतात. माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिला सारखी सर्दी व्हायची अथवा बर्‍याचदा तापही येत असे. व तो ३-४ दिवसाच्या उपचारानी जाईही. पन १५ -२० दिवसानी तेच. शेवटी एक नवीन बालरोग तज्ञ भेटला त्याने ही वजनाच्या ग्राफची भानगड समजावून सांगितली. जो पर्यन्त ह्या मुलीचे वजन नोर्मल लाईनच्या वर जाणार नाही तो पर्यन्त हिला कसलाना कसला त्रास होत राहणार हेही त्याने स्पष्ट सांगितले. मग मुलीचे वजन वाढविले मग ते आजारी पडणे बन्द झाले. पण आता पुन्हा तीच अदचण आली आहे. आता तिचे वजन उंचीच्या प्रमाणात ६० कि. पाहिजे ते ४७ कि. आहे त्यामुळे पुनहा तिला सर्दीचा त्रास सुरु झाला आहे....
अन्डरवेट असणे प्रॉब्लेमॅटिकच असते...

असे काही नाही. इशानचे वजन नेहेमी १५-२०% मधे येते म्हणजे तो अंडरवेट आहे. पण म्हणुन त्याला असे काही आजार वगैरे होत नाहीत. भरपूर अ‍ॅक्टिव्ह देखिल आहे (झक्कींना विचारा :फिदी:).

रॉबिन मुलीचे वजन वाढवायला काय केले? माझी मुलगीही प्रचंड अंडरवेट आहे (वय ६ आहे आत्ता, पण पहिल्यापासून अंडरवेट)

त्यातील नॉर्मल वजन /वय चा चा स्ट्रेट लाइन ग्राफ असतो. >> हे माहिती नव्हते. हे graph सरळ रेषेतले असतात का ? logarithmic असतात ना ? इथे तरी सरास असे सांगतात कि range मधे असणे जरुरी आहे. एका रेषेच्या वर किंवा खाली नाही.

भारतात पण डॉक्टर्स जो तक्ता देतात आणि ग्राफ मांडतात त्यात रेंज असते दिलेली.
आणि त्या रेंजमधे असणारी रिडिन्ग्ज ठीक. त्यावरून मुल ओव्हरवेट होत जातय का अंडरवेट ह्यावर लक्ष ठेवता येतं.
पोर गुबगुबीत नसेल पण खेळकर असेल, वाढीच्या मैलाचे दगड पार करत असेल तर वजन कमी असणारं (रेंजमधलं) मूल पण हेल्दी समजल्या जातं.
भारतात हे असे तक्ते मिळतात :unchi-chart-maayboli.jpgvajan-chart-maayboli.jpg

बरोबर, त्या तक्त्यात माझी मुलं कधीच बसली नाहीत. कधी उंचीच कमी तर कधी वजनच कमी. Sad

माझ्या मुलीचे वजन वाढत होते म्हणून आता चिकन, जंक फूड,कोक, इ. बंद केले आहे. तिने स्वतःच. वजनाचा प्रश्न येतोखरा.

हम्म्म्म्म्म....

वजन आणि उंचीचे समीकरण - मी ही या तक्त्यांची शिकार झाले होते पण इथल्या आणि भारतातल्या बालरोग तज्ञांनी मला दिलेल्या खालिल सल्ल्या मुळे मी या तक्त्यांना अवास्तव महत्व देत नाही. एक गाईडलाईन, वाढ नीट होत्येय ना हे बघण्याच (चेक ठेवण्याच) माध्यम म्हणुन या कडे पहाते.

हे तक्ते प्रत्येक ठिकाणी वेगळे इन्टरप्रिट करतात. इथले वाढीचे तक्ते (आणि डाएट) हे ऑस्ट्रेलिअन लोकांच्या एकंदर जीन्स (गुणसुत्र), रहाणीमन, खान्-पानाच्या सवयी या वरुन बेतलेले असतात. त्या तक्त्यांवर आपली देशी मुलं नेहमीच अंडरवेट (किंवा डोक्याचा घेर कमी) दिसतात (अपवाद वगळता). भारतात जे तक्ते असतात त्या तक्त्यांप्रमाणे आपली मुले व्यवस्थित वजनाच्या/उंचीच्या रेंजमधे (कधी कधी अबाव रेंज) असतात. हे मी माझ्या लेकीच्या बाबतित पाहिलय.

तक्ता कुठलाही असो जो पर्यंत ग्राफ हा चढता आहे आणि एका रेंज मधे स्टेबल आहे तो पर्यंत आणि मुलाची बौद्धिक आणि शारिरीक वाढ जोपर्यंत व्यवस्थित होत्येय तो पर्यंत मुल अंडरवेटच आहे, ग्राफ च्या खालतिच आहे ह्या गोष्टींनी चिंतीत व्ह्यायचे कारण नाही. जर मुलाचे वजन वाढतच नसेल किंवा कमीच होत असेल. त्याची उंची वाढत नाहिये, शरीराची वाढ प्रपोर्शनेट नाहिये, त्या त्या वयाच्या बौद्धिक वाढीचे टप्पे मुल गाठत नाहिये (डेव्हलपमेंट स्टेजेस) तर लगेच डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.

WHO ने केलेला चार्ट हा एक गाईडलाईन आहे. प्रदेश, तेथल्या एथनिक बॅकग्राउंड्स, जीन्स या प्रमाणे वाढ - वजन्/उंची चे समीकरण यात बदल होतो. आपले पूर्वज कसे होते. आई-वडिल कसे आहेत? यावर मुलाचे वजन-उंची-चण अवलंबुन असते (चीनी माणसाच्या घरात अर्नॉल्ड श्वझनेगर कसा जन्माला येइल? - माझ्या लेकीच्या पेडी ने दिलेले उदाहरण Happy )

वजन तक्त्याच्या ग्राफ प्रमाणे वजन कमी असले म्हणजे मुल आजारी पडते हे एक मिथ आहे / चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. हे एक कारण असुही शकेल. पण आजारी पडायला इतरही अनेक कारण / परिस्थिती (सर्कम्स्टान्सेस) जबाबदार असतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे थोड्याश्या एक्स्पोजर ने इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणे महत्वाचे.

मुलांची वाढ होतच असते. त्यांना योग्य आहार, व्यायाम, करमणुक, शिक्षण आणि गरज पडेल तेव्हा वेळेवर औषध पाणी देणे आपल्या हातात असते.

पट्ले हो अगदी. मुलान्चे वजन या विशया मुळे आपल्याला मानसिक ताण येतो त्या चे काय? केक, आइस्क्रीम इ सर्व बंद केले आहे. सा. खिचडी सुद्धा.

मामी, ताण आला की लगेच 'ताण घालवण्याची माझी युक्ती ' बी बी वर जायचं...
Happy

Pages