लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

^^^^^^
मी जे वक्य लिहिलय <<>>आभ्यासात असे सिद्ध झालय की जी मूले जास्त भाज्या खातात त्याना मासाहारी मुलान्च्या पेक्षा आलर्जीन्चा खूप कमी त्रास होतो>>ते जुयी च्या मला विपुत टाकलेल्या प्रश्णासाठी होत.(अन्ड खाऊन यापूर्वी मुलाला आलर्जीचा त्रास झाला होता,)
juyee said,
5 December, 2009 - 02:29
तोषवी धन्यवाद..
तुम्ही सर्वांनी सांगितलेले सगळ पटतय .. पण माझा प्रोब्लेम असा आहे की तो आधी काही खायला मागत नाही, अंड, नॉन व्हेज ( इंग्लिश मध्ये कस लिहायच ) आधी द्यायची तर तो खायच नाही, आता तो घरी केले तर आवडीने मागतो, आणि खातोदेखील , काल देखील त्याला अंड दिलेले तर त्याला काही चट्टे आले नाही.
एकदम बंद करणे मला खरच शक्य नाही, कारण घरी आमच्याकडे बनवल तर तो ताटात बघितले तर तो मागणारच आणि मी अडवू शकणार नाही.

हा तो प्रश्न होता.
तिला मी अन्ड्याखेरीज इतर पर्याय सुचव्ले होते.त्यात फिश चा उल्लेख ही केलाय.

जुई त्याला ज्या गोश्टी खाऊन त्रास होतो (अंगावर चट्टे येणे वगेरे) ते न देणच उत्तम. तू त्याला चिकन सूप देऊ शकतेस. शर्मिला ने सुचवलेले मासे देऊ शकतेस. shell fish देताना जपुन दे. prawns वगेरे ची allergy नाही ना ते बघ. आंबवलेले पदार्थ, ब्रेड शक्यतो टाळलेले बरे. तू जर आयुर्वेदाचा विचार करत असशिल तर मुलावर खाण्याचे बरेच निर्बन्ध येणारच. स्वानुभव. आणि ते जर नीट नाही पाळले तर त्या medicins चा काहीही उपयोग होत नाहि. (हाही स्वानुभव.)
आणि alopathy मधे दम्याला steroids and broncodialtors खेरीज कहीही उपाय नाही आए गं. इतक्या लहान मुलांना किती steroids देणार? त्याचेही खूप side effects असतात. शिवाय exima वगेरे झाला की परत steroids cremes ना पर्याय नसतो. ९०% दम्याच्या लोकांना exima चा त्रास होतोच होतो.माझ्या मुलाला ही होतो. आणि त्यासाठी त्यांचे पोट साफ असणे, त्यांना पचायला जड गोश्टी खायला न देणे, आंबवलेले न देणे हे सगळं करावं लागतं.
दम्याचा attackयेतो तेंव्हा पोरांची अवस्था पहावत नाही गं. माझा लेक एका जागी बसुन असतो, तरीही नुसत्या श्वास घेण्यासाठी त्याला जे efforts घ्यावे लागतात त्यानेच दमतो. litarally धापा टाकतो.
prednizone द्यावच लागतं मग अशा वेळी. इतक्या लहान मुलांना nebulizer देणे ही पण एक challenging गोष्ट आहे. तुला घाबरवायचा अजिबात हेतु नाही. पण ज्या चुका मी केल्या आहेत awareness नवता पुरेसा म्हणुन त्या मुळे माझ्याच पिल्लाला त्रास झाला आहे. आणि अनुभवतुन बरेच धडे मी घेतले आहेत.

आणि हे खाण्यापिण्यावरचे निर्बन्ध बरेच वेळा temp. असतात. जशी मुले मोठी होतात तसं या allergies कमी होतात. आणि समजा नाहीच झाल्या तर कोणिच काहीच करू शकत नाही.

एल जी चा एअर प्युरिफायर उपलब्ध आहे. त्यात हवा १६ प्रकारे फिल्टर होते. दम्याचे त्रास हवेच्या प्रदुषणामुळे वाढ्तात. त्याच्या खोलीला एअर प्युरिफायर सुविधा असलेला एसी लावावा. प्रदुषित ठिकाणी शक्यतो त्याला नेवू नये. त्याला सिगारेटच्या धुरापासुन दूर ठेवावे. घरात स्मोकिन्ग तर रुल्ड आउट.
तो जिथे झोपतो ती गादी व पांघरुण व्हॅक्युम क्लीन केलेले असावे. क्विल्ट मधील कापसाने दमा अग्रेवेट होउ शकतो. त्यापेक्षा दोन सोलापुरी चादरी व एक पातळ चादर असे जोडुन त्याला द्यावे. लोकरीचे स्वेटर,
कुत्रा मांजराचे केस, फर चे जॅकेट, शाल/ ब्लॅन्केट ची तुसे यातील सूक्ष्म धाग्यांमुळे दमा अटॅक येवू शकतो.

तळणीचा धूर, फटाक्यांचा धूर हे ही वाइट.

Asthma in Children and Infants
How can I tell if my child has asthma?

Not all children have the same asthma symptoms, and these symptoms can vary from episode to episode in the same child. Possible signs and symptoms of asthma in children include:

http://www.webmd.com/asthma/guide/children-asthma

बरीच माहिती इथे मिळेल.

good point मामी. सिगरेट च्या धुराचं मी पण विसरले होते सांगायला तिला. एअर प्युरिफायर चा पण उपयोग होईल. पण temp. change चा ही खूप त्रास होतो आणि त्यावर काय करणार? इथे सकाळी खूप गार, दुपारी जरा बरं नाहीतर कधीकधी चक्क उकडणार आणि रात्री परत थंडी, असं ३/४ दिवस झालं की माझ्या लेकाला लगेच सर्दी , मग आमचे fingers cross Happy याला सर्दी नको व्हायला, झाली तरी लवकर बरी होउदे.

मला ही एक एसी मध्ये झोपले की होणारी सरदी होते नेहमी. मी डोक्याभोवती आपली साधी सुती ओढ्णी पुर्ण ओढुन घेते. घट्ट. तालिबान फ्याशन. अगदी ताज/ट्रायडंट मध्ये राहिले तरी माझा हा देशी उपाय कायम असतो. तसेच परफयुम,डीओ, एरोसोल वर आधारित रूम फ्रेशनर, हिट स्प्रे वगैरे कोणते ही स्प्रे मारु नयेत. जेणे करुन नाजुक ब्रॉन्कियल लायनिन्ग इरिटेट होउ नये.

फुलपाखरू, आपल्या मुलांना क्लायमेट चेंज च्या वातावरणातच मोठे व्हावे लागणार आहे. अवघड आहे खरे.

माझ्याही मुलीला क्लायमेट चेंजने सतत नाक चोंदणं, सर्दी ह्याचा त्रास होतो. आणि ती सर्दी अशी असते की नाकावाटे वाहून बाहेरही पडत नाही. काही दिवसांनी आपोआप बरी होते.

Is Your Home's Air Unhealthy? Try Plants
Plants Can Remove Harmful Indoor Airborne Contaminants, Study Says

http://www.webmd.com/lung/news/20091204/is-your-homes-air-unhealthy-try-...

ही पण चान्गली माहिती आहे. माझा लिन्कस शोधुन बातमीपत्र बनवायचा रोजचा उद्योग चालु आहे
त्यातच हे सापड्ले.

सायो आल्याचा रस मध घालून देऊन पाहिला आहेस का? अशी क्लायमेट चेंजने झालेली सर्दी लवकर कंट्रोल मधे येते मुलाची पण ते त्याला प्यायला लावणं महाकठिण काम. कोणतंही आयुर्वेदिक med मी द्यायला लागले की तो तिखट मेडिसीन नाही ना असं विचारतो Happy पण खूप त्रास होत असतो तेंव्हा बिचारा तेही मुकाट्याने घेतो.

सर्वांना धन्यवाद...
<आपल्या मुलांना क्लायमेट चेंज च्या वातावरणातच मोठे व्हावे लागणार आहे. अवघड आहे खरे. > पटतय.
आता उपाय एकच आपण मेहनत घेत राहायची , प्रयत्न करत राहायचे. रिझ्ल्ट्ची अपेक्शा निदान आता तरी नको. वेळ आल्यावर तो नक्कीच मिळेल.

तोषवी, मी त्याच दिवशी डॉ. ना फोन केला होता.. ते मुंबईत २० तारखेला येणार आहेत, तेव्हा मी नक्की जाणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

ज्याना अ‍ॅलर्जीचा त्रास आहे त्याना एकच सांगावस वाटत कि एका छोट्या कार्ड वर अ‍ॅलर्जीची सगळी info लिहुन कार मध्ये,पर्स मध्ये कायम ठेवा. शाळेत फोटो कार्ड देतात त्यावर पण सगळी माहिती लिहिता येते.
माझ्या मुलीला पेनिसिलीन ची severe अ‍ॅलर्जी आहे. मी मागच्या वर्षी तसे कार्ड बनवुन घेतल.

>>>>>>>>एकदम बंद करणे मला खरच शक्य नाही, कारण घरी आमच्याकडे बनवल तर तो ताटात बघितले तर तो मागणारच आणि मी अडवू शकणार नाही>>>>>>>>>>>
"आपणच खायच नाही. "

"आपणच खायच नाही. ">>ह्यात खरच काहीच कठीण नाही. माझ्या मुलीला असलेल्या food allergies मधल्या बहुतेक गोष्टी आम्ही खात नाहीत. (घरी तर नक्कीच नाहि). विशेष म्हणजे आमच्याकडे येणारे जाणारे पण कारण सांगितले कि सहज समजून घेतात, किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर तेव्हढीच काळजी घेतात. तेंव्हा ह्या गोष्टिंचा बाऊ न करण्याचा प्रयत्न करा.

असामी, सीमा - भारतात बाहेर हे कितपत शक्य आहे माहिती नाही. घरात मात्र करु नये हे नक्कीच जमण्याजोगे आहे. माझ्या भावाला लहानाणी बोरे, पेरु, केळ वगैरे चालत नसे. त्यामुळे मी देखील ते खाल्लेले मला आठवत नाही.

आमचा एक मित्र भारतात कायमचा गेलाय त्याच्या मुलाला मिल्क अ‍ॅलर्जी आहे (इंटॉलरन्स नाही). तर कुणाकडे गेला बाहेर तर काय होते येवढे खाल्ले तर असे विचारणारे लोक आहेत! किती वेळा सांगितले तरी तेच तेच त्याच त्याच लोकाना परत परत सांगावे लागते हा तिचा अनुभव आहे.

सीमा, असामीचा 'आपणच खायचं नाही ' हा सल्ला अगदी योग्य आहे. जर मुलाला त्रास होत असेल एखाद्या गोष्टीने तर काही वर्ष घरात आणणं बंद करणंच योग्य नाही का? घरी एकदा केल्यावर मग थांबवणं नको वाटतं. त्याला समजावून बघा.
फुलपाखरु, नेहमी नाही पण क्वचित देऊन पाहिलंय आल्याचा रस नी मध एकत्र करुन. उपयोग होतोय्/नाही हे बघायला सातत्याने दिलं पाहिजे.

मला आपण खायचच नाही हा सल्ला पटला नाही कितीही योग्य आणि प्रॅक्टीकल वाटत असला तरी. मुलासमोर खायचे नाही इतपत ठीक आहे. माझ्या मैत्रीणीचे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे तिच्या मुलाला नट्स, ग्लुटन, अंडी, चना डाळ, मुग डाळ, मटार, स्ट्रोबेरी आणि अजून बर्‍याच कसल्या कसल्या अ‍ॅलर्जीज आहेत, त्यामुळे तिनेपण घरात हे सगळे आणणे, स्वतः खाणे बंद केले होते त्यामुळे अंडी, पोळी, डाळी इ. पूर्ण बंद झाले. त्याचे परीणाम तिला १-२ वर्षानंतर दिसायला लागले. तिला डॉक्टरांनी सांगीतले की तिच्या शरीराला सगळे घटक मिळत नाहीत आणि तिची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे म्हणून ती सारखी आजारी पडते लहान सहान गोष्टींनीपण. हे खाणे बंद केले तर त्यातुन मिळणार्‍या घटकांना दुसरा पर्याय काय हे पण शोधायला हवे आणि ते खायला हवेत पण बहुतेल पालक मुलांच्याच काळजीत इतके व्यस्त असतात की स्वतःच्या तब्येतीची हेळसांड होतेय हे कळून वळत नाही.

हे खाणे बंद केले तर त्यातुन मिळणार्‍या घटकांना दुसरा पर्याय काय हे पण शोधायला हवे आणि ते खायला हवेत>>हे साहजिकच आहे ना ? तुमच्याचसाठी नाही तर मुलांसाठिही पर्याय शोधायला हवेत. आणि मी बहुतेक शब्द वापरलाय बघ. म्हणजे ज्या गोष्टि जास्त problematic आहेत, त्या तरी नक्की बंद कराव्या.

मिनोती भारताबाबत इतरांना समजावण्याबद्दल अनुमोदन. मला ped ला पण समजावावे लागलेले Sad

बहुतेल पालक मुलांच्याच काळजीत इतके व्यस्त असतात की स्वतःच्या तब्येतीची हेळसांड होतेय हे कळून वळत नाही.>>>>>>
अग कधी कधी नुस्त्या पीनट्स च्या "स्पर्शान" सुद्धा allergy ट्रिगर होवुन ते जीवावर बेतु शकत.
त्यामुळ कधी कधी extreme level वर काळजी घ्यावी लागते. अशावेळी पालकांनी कितीही ठरवल तरी होत जरा दुर्लक्ष स्वतःकडे.
योग्य त्या पोषण मुल्यांसाठी दुसरा पर्याय शोधण हे असामी म्हणतोय तस करण साहजिकच आहे.
आणि मुलांना जोवर कळत नाही तो पर्यंत हे करायलाच पाहिजे. रोजचे खायचे पदार्थ सोडुन ensure, निरनिराळे बार ,एनर्जी चन्क्स असे बरेच पर्याय तर सहज उपल्ब्ध आहेत.
मिनोती , भारतात खरच अ‍ॅलर्जी विषयी खुप उदासिनता आहे. माझ्या आईला फुड कलर ची अ‍ॅलर्जी तिच्या ४५ त develope झाली. प्रचंड त्रास झाला तीला योग्य ते उपचार मिळवण्यासाठी.

नमस्कार,
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे. गेल्या दिड वर्षापासून त्याला रोज झोपेत खोकल्याची उबळ येते. दिवसभर तो एकदम नोर्मल असतो.पण झोपला की मधेच खोकला येतो, नी तो रड्त उठ्तो. पुर्ण एक वर्ष त्याला होमिओपॅथी केल. त्याने त्याचा बाळदम्याचा एटॅक येणे कमी झाले पण झोपेत खोकला येण चालूच आहे. आडुळ्सा, सितोफलादि, तुळशीचा काढा चालूच असतो. काही उपाय आहे का?

झोपेत खोकल्याच्या उबळीचं एक कारण अ‍ॅसिड रीफ्लक्स हे पण असू शकतं. मुलगा जेवणानंतर लागलीच झोपतो का? झोपायच्या आधी दूध प्यायलेलं असतं का? दिवसभरात फळं, साखरेचे पदार्थ, पचायला जड किंवा आंबवलेल्या पिठांचे पदार्थ खाल्ल्यावर हा त्रास झोपेत जास्त होऊ शकतो.

दिपा,
बरेच्दा झोपल्एल्या अवस्थेत नाकातील कफ हा घशात मागील बाजूस येतो,आणि अडकल्या सारखे होउन खोकला येतो.तसेच झोपलेल्या उताण्या स्थीतीत्,फुफ्फुसातील कफ हा श्वास्नलिका आणि ब्रोन्कुओल्स मधे पसरतो आणि खोकल्याची उबळ येते किवा श्वास घेण्यास त्रास होतो. अशा पेशन्ट मधे डोक्या चा भाग थोडा उन्चावर (उशी वैगरे थेउन ) ठेवावा.किवा कुशीवर झोपवून बघ.
मृण्मयी म्हणतेय तस तो जेवणा नन्तर लगेचच झोपतो का?रात्री अगदी झोपताना दूध पित असेल तर ते बन्द ठेव.
दम्या च्या / इतर श्वासाचे आजार असलेल्या रुग्णान्साठी अजून घ्यावयाची काळजी म्हणजे,
अशा लोकानी रात्री चे जेवण होडे लवकर घ्यावे.
जेवल्यावर लगेच झोपू नये.
जेवणात आम्बवलेले पदार्थ ,कफ वाढ्वणारे पदार्थ टाळावेत.
ज्यावेळी खोकल्याची उबळ येते त्यावेळी थोडे पुढे वाकून गुढग्यावर हाताचे पन्जे ठेउन बसावे.याने कफाचा बेड़का (अडकलेला कफ)बाहेर पडायला सोपे होते

भारतात अलर्जी माहिती नाही असा माझा अनुभव नाही. तिथे अनेकदा डॉ. अलर्जी शब्द न वापरता पथ्य पाळायला सांगतात. केळ, वांग याने घसा दुखणे सुजणे, घशाला खाज येणे हे अनेक लोकांमध्ये आढळते. दुधाने पोट वारंवार बिघडणे, धूळ् धुराने खूप शिंका येणे, खोकलासर्दी होणे , तसेच हवामान बदलते तेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास होणे ही कमी प्रमाणात अस्त्तित्वात असणार्‍या अ‍ॅलर्जीचीच लक्षणे आहेत. अंगावर रॅश येणे, अक्झिमा आणि श्वास लागणे,( दमा , बाळदमा) ही अ‍ॅलजीची तीव्र दिसणारी लक्षणे आहेत. त्याचे प्रमाण थोडे कमी असू शकते पण अनेकदा आपल्याला आठवते तेव्हापासून तीव्र लक्षणे नाहिशी झाल्यानंतरचे आठवत असते असे म्हणेन. दोन्हीकडच्या आजी/आजोबांना विचारले तर लहानपणी खोकला यायचा तेव्हा छाती उडायची का असे विचारा. खेड्यामधली अशिक्षित बाई सुद्धा ही लक्षणे माझ्या मुलात होती/ नव्हती ते सांगू शकते. सुदैवाने दमा हा योग्य औषधोपचार आणि आहारविहार याने नीट मॅनेज करता येतो. कित्येकदा मुले वयात आली की त्रास होत नाही असे सुद्धा दिसते. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. पालकांनी दोघांनी जागरूक आणि खंबीर राहून निर्णय घ्यायचे आहेत, त्यापैकी अ‍ॅलर्जी मॅनेजमेंट. तुमच्या मुलाला कोणते औषध अत्यावश्यक आहे ते एक पॅटर्न बघून लक्षात येते. पथ्य पाळल्याने त्या औषधाची गरज कमी पडते एवढे नक्की. कायम दररोज ओरल स्टेरोइडस घ्यावा लागणारा दमा ही गोष्ट सुद्धा अनेकांमध्ये आढळते पण अशी मुले आहेत म्हणून कमीपणा बाळगण्याचे कारण नाही. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या मुलाचे आरोग्य तुमच्या हातात आहे आणि त्याकडे लक्ष देणे तुमचे पहिले कर्तव्य आहे. मेडिकल टेस्ट्मधे अ‍ॅलर्जी निघाली, एक पॅटर्न बघता ती समजली तर त्याकडे ध्यान द्या. खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असेल तर कोणत्याही स्वरुपात तो पोटात जाणार नाही याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. अशाने दम्याचा अटॅक येत असेल तर त्याचे प्रमाण कमी होते.

मधुमेह, हृदयरोग / बीपी, संधीवात , पित्त हे जसे अनेकदा अनुवांशिक असते तसेच अ‍ॅलर्जीचे आहे. पिढी पिढीत, व्यक्ती मध्ये त्याचा कमी अधिक प्रमाणात त्रास जाणवतो. ज्यांच्या मागच्या दोन्ही पिढयात अर्लजी नाही त्या मुलांना केवळ प्रतिकार शकती कमी, वातावरण, जीवनमान यातील वारंवार होणार्‍या बदलामुळे सामोरे जावे लागते असे म्हणेन. तीव्र स्वरुपाची,जीवाला धोका असणारे लक्षण दिसणारी अ‍ॅलर्जी असेल तर ते कुपथ्य करू नका, योग्य ती काळजी घ्या. तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या आरोग्याकरता योग्य ते पथ्य पाळा, औषधोपचार करा , आहारात जे पदार्थ चालतील त्यातून योग्य तशी निवड करून सर्व प्रथिने, जीवनसत्त्वे इत्यादी मिळवण्याचा प्रयत्न करा.
मला धुळीची अ‍ॅलर्जी आहे. पोलनची आहे. मला बाळदमा होता, तो त्रास नाहीसा झाला. आता श्वास लागत नसला तरी डोळे लाल होणे चुरचुरणे, सर्दी होते. नवर्‍याला कोणतीही अ‍ॅलर्जी नाही. पण मुलीला हरबर्‍याच्या डाळीने रॅश येतो. तिला अक्झिमा होता. गेली दोन वर्षे तिला स्प्रिंग मध्ये एक आठवडा इन्हेलर द्यावे लागते. इतर वेळी गरज पडत नाही. ती ७ वर्षाची आहे पण डाळीची अ‍ॅलर्जी गेली नाही. मुलाला कोणतीही अ‍ॅलर्जी नाही. मुलीचा त्रास कमी होईल किन्वा होणारही नाही. त्याची काळजी घेणे माझ्या हातात आहे.

मी मुलाला सध्या काढा करून देते, दिवसातून दोन तीन वेळा साधारण २ चमचे.
( अडुळसा, ओवा, कांदा, लवंग, गुळ, अळशी, आल, तुळशीची पाने )
मला अस विचारायच होत की , दोन तीन दिवस त्याला थोडी पातळ संडासला होते आहे. या काढ्यामुळे होत असेल का ? खाण पिण तस व्यवस्थित आहे.
यावर काही उपाय आहे का ?

मी देखिल असा काढा माझ्या मुलीला दिला होता. तेव्हा तिला अशीच फेसाळ शी तिन चार वेळा होत असे. घरातल्या मोठ्या माणसान्चा मते तो कफ पडतो. पाच पेक्शा जास्त वेळा शी होत असेल तर डोक्टरकडे जा.

आळशी हे पचायला जड्(गुरु) आहे शिवाय कफनिस्सारक आहे.शी तून कफ बाहेर पडत आसेल तर असे होउ शकते.(चिकट्,थोडी पातळ) .मात्र पाण्या सरखी होत नाही ना आणि प्रमाण या कडे लक्ष ठेव.

मधुमेह, हृदयरोग / बीपी, संधीवात , पित्त हे जसे अनेकदा अनुवांशिक असते तसेच अ‍ॅलर्जीचे आहे.>>हे फारसे बरोबर विधान नाही. अजून allegies का निर्माण होते ह्यावर संशोधन सुरू आहे. अनुवंशिकता हे एक कारण असू शकते पण ते एकमेव कारण आहे का हे अजून स्पष्ट झालेले नाही.

कशा होतात (म्हणजे mast cells reaction etc) हे कळले आहे तरी मुळात हे trigger का येतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. boston Children Hospital मधे नुकतीच नवीन drug ची टेस्ट केली गेली ज्याच्या वापराने peanuts and milk allergies बर्‍या झाल्या. अजून पायलट टेस्ट सुरू आहेत.

बाकी चांगले मुद्दे मांडले आहेत, विशेषत: ठळक केलेले.

हा प्रश्न नक्कि कुठे विचारावा हे कळत नाहिये. लहान मुलांमध्ये स्ट्रेंजर अ‍ॅन्झायटि नसेल तर ते काळजिचे कारण आहे का? स्ट्रेंजर अ‍ॅन्झायटि साधारण ८ महिन्यापासुन सुरु होते अस मी नेट वर वाचल त्यापुढचि स्टेप म्हणजे सेपरेशन अ‍ॅन्झायटि (आई-वडिलांपासुन). ह्या दोन्हि गोष्टि मुलांच्या नॉर्मल डेव्हलपमेंट साठि आवश्यक आहेत अस म्हणतात.

माझा १०.५ महिन्यांचा मुलगा मात्र स्ट्रेंजर अ‍ॅनझायटि च कुठलहि लक्षण दाखवत नाहिये. अनोळखि व्यक्तिंशि लगेच मैत्रि करतो, घरि कुणि आल किंवा तो कुठे नविन ठिकाणि गेला तरिहि कधिच घाबरुन रडत वगैरे नाहि. हा काहि प्रॉब्लेम असु शकेल का? पुढच्या महिन्यात त्याचि डॉ. चि व्हिसिट आहे तेंव्हा विचारिनच पण कुणाला ह्याबद्दल काहि माहिति असेल तर प्लिज सांगा मला फारच टेंशन आलय.

रमा, माझी भाची अगदी याच प्रकारात मोडते. वय १६ महिने. आता तर दुकानात वगैरे गेली की सर्वांशी गप्पा वगैरे पण मारते Happy आता वहिनीला मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ही कोणाकडेपण जाते काय करायचे.

Pages