लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

अश्वीनी वर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्याल प्लिज.....
त्याला कोमट पाणी देते ... मागे वाचलेले पाण्यात जेष्ठ्मध , ओवा टाकावा..
मी त्याला दिले तर चालेल का ? प्रमाण वगेरे आहे का काही ...
दोन तीन दिवस जास्त घरघरने वाटत आहे. डॉक्टरकडे घेऊन जाऊ का ?
मेडीसीन नको वाटतात, आधीच कंटाळला आहे तो.. घरगुती काही ?

जुई,
अल्पनाने सांगितलेला काढा चांगला आहे. मिळाली तर त्यात तुळसपण घाल. जरा छाती गरम कापडाने शेक. (आधी आपल्या हाताला सोसेल का ते पाहायचे, प्रत्येक वेळी). ज्येष्ठमधाची काडी त्याला नुसतीच चोखायला दे. प्यायचं पाणी चांगलं कोमट असू दे.

जुई तिळाचं तेल कोमट कर त्यात २/३ चिमुट सैंधव घाल. मग ते मुलाच्या छातीला आणि पाठीला लाव. चोळू नको नुसतं लाव. आणि मग heating pad ने त्याला शेकायला दे. निदान अर्धा तास तरी शेकूदे. heating pad नसेल तर टॉवेल गॅस वर ठेवून गरम करून शेक. पण hot water bag ने शेकू नकोस.
त्याच्या छातीतील घरघर बरीच कमी होईल. आणि त्याला शांत झोप पण लागेल.

नमस्कार,

माझी मुलगी १ वर्षाची आहे. डॉक्टरानी आता बाटली सोडवायला सान्गितली आहे. पण तिला रात्री एकदा तरी दूध लागतच आणि पाणी देउन ती झोपत नाही (डॉक्टर म्हणाल्या होत्या की पाणी द्या रात्री म्हणून).

भात \ खिचडी वगैरे खाते जेवताना, पण तरीही रात्री उठतेच एकदा तरी.

रात्री दुसर काही दिल तर उठण कमी होईल का ?

- प्राजक्ता.

अश्विनी , फुलपाखरू थँक्स...
अश्विनी आज त्याला अंदाजे १ चमचा कोरफडिचा गर, चार पाच पाने तुळस सानेवर थोडे चुरडुन घेतले, अडुळस्याची दोन पाने आणि थोडे जेष्ठमध घातलेले पाणी अंदाजे अर्धा वाटी पाण्यात उकळवले , पाणी आटत आल्यावर कोरफडिचा गर आणि तुळस घातले. थोडे कोमट असताना किंचित मध घालून दिले. (हे मी त्याला दुपारी साधारण ११.३० च्या दरम्यान दिले. ) ( माझ्याकडे कोरफड्चे झाड, अडुळश्याचे झाड आहे ) पाणी कोमट असताना मध टाकले तर चालेल ना.. मागे वाचलेले मध गरम देऊ नये म्हणून

मी दिले आहे ते बरोबर आहे का? त्याला डॉक्टरांनी दिलेली मेडिसीन पण देलेले.
फुलपाखरू ... रात्री त्याला अळशी तव्यावर गरम करून फड्क्यात बांधून शेक दिला. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे करेन. सैंधव म्हणजे मीठच ना... मग साधे चालेल का , काळ मीठ पाहिजे.

अश्विनी सांगायला विसरले माझ्या मुलाला गेल्या महिन्यात ताप आला होता. १०० १०२ च्या दरम्यान .एक दोन दिवस आधी त्याला खोकला होता, ताप आल्यावर मी त्याला पिडिमॉल दिले, तसा ताप थोडा कमी झाला , नंतर लगेचच मी त्याला डॉ. कडे नेले , त्यांनी अ‍ॅझिथ्रोल दिले , थोडा ताप कमी होता पण पुर्णपणे नाही. संध्याकाळपर्यंत ताप उतरला नाही ( पाण्याच्या घड्या ठेऊनही ) म्हणून मी परत त्याला नेणार होते, पण तेव्हाच त्याला आकडी आली. आम्हि लगेच त्याला अ‍ॅडमीट केले. रिपोर्ट आल्यावर कळले की कॅल्शियम कमी झाले आहे. डॉ. नी कॅल्शियम सिरप, बिकोझिंक दिले, आणि फलुझियम गोळि दिली. त्यांनी सांगितले ही गोळी त्याला पाच वर्षापर्यंत ताप आल्यावर ३ दिवस दे. .... तेव्हापासून मला फार काळजी वाटते.

अशी परिस्थिती परत येऊ नये म्हणून काय करावे , कोणती काळजी घ्यावी.

वर सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे कोरफड, अडुळसा आहे. त्याचा उपयोग नेहमी किंवा अधून मघून करता येइल का?
त्याला नेहमी पाणी चांगले उकळून , थोडे कोमटच देते. लहान असताना त्याला बाळ्शेपा , वावडिंग घालून द्यायची. आता तसे काही करू का?

मला प्लिज मदत कराल का ?

प्राजक्ता, तिला फळांचे रस देतेस का ? सुरुवातीला थोडा फळाचा रस द्यायचा. मग ३/४ रस + १/४ पाणी असे द्यायचे. हळु हळु पाण्याचे प्रमाण वाढवत ने आणि मग पाणीच दे. तिला जर सध्या रस देत नसशील तर एकदम रात्री देऊ नकोस. मुलीला चव माहिती होण्यासाठी आधी दिवसा दे. आवडायला लागला की मग रात्री दे. सायट्र्स रस (ऑरेंज ज्युस) रात्री देऊ नकोस.

प्राजक्ता, रात्री पाणीच दे. सात्-आठ दिवस रडेल, नवव्या दिवशी बिलकुन उठणार नाही. माझ्या डॉक्टरने असं सांगितलेलं करायला. थोडं अवघड आहे (वाईट वाटतं), पण वर्क होतं.

सिंडरेला, प्रीति धन्यवाद Happy

ती फळ खाते, पण रस अजून देउन नाही बघितलाय. आता try करुन बघेन.

रात्री आता फक्त पाणी द्यायला सुरु करेन. २-३ दिवस उठली तरी पाणी पिउन झोपते, पण एकदा तरी दूध लागतच.आणि रात्री खूप जोरात रडली कि मग नाईलाज होतो. नाहीतर शेजारी-पाजारी वाटायच की आम्ही लक्षच नाही देत आहोत Happy

<नाहीतर शेजारी-पाजारी वाटायच की आम्ही लक्षच नाही देत आहोत > अस अजिबात समजू नकोस.
थोडा त्रास होतो , पण पुढ्च्या परिणामापेक्षा आताच त्रास झालेला चांगला.
माझ्या मुलाला मी कधी बाटली लावलीच नाही, ( मलाही खूप जणी बोलल्या तुलाच त्रास होईल , त्रास झालाच, तरीही मी बाटली दिली नाही ) म्हणून तो अंगावरच दूध प्यायचा. तोही दूध सोडायला मागायचाच नाही, पण मी मात्र त्याला रात्री दूध द्यायची नाही, काही दिवस तो देखील झोपत नसे, रात्री दोन तीन वेळा उठायचा , रडत राहायचा, कघी कधी बिस्किट मागायचा, मी देखील त्याच्याबरोबर तास दिड तास जागी राहायची.
काही दिवसात तो रात्री उठायचा देखील बंद झाला, बिस्कीटे पण तो मागायचा नाही . पण मी त्याला रात्री ८.३० ९.०० वाजता जेवू घालते ( कधी कधी जबरदस्तीने ) आणि १० १०.३० ला दूध पाजते. त्यामुळे तो आता रात्री छान झोपतो ( दिवसभर खेळून खेळून दमलेला पण असतो )

प्राजक्ता पण मी तुला आवर्जून एक सांगते... तीला बाटलीची सवय आहे तर ती जबरदस्तीने सोडू नको, डॉ . आणि इतरांनी सांगितल्याप्रमाणे तीला पाणी किंवा फळांचा रस दे. हळूहळू सवय नक्की सुटेल.
कारण मला माझे डॉ. नी सांगितले कुठलीही सवय एकाएकी सोडण्याचा प्रयत्न केला तर मुलांच्या मेंदुवर परिणाम होऊ शकतो. ( होतोही ).

juyee , मनापासून धन्यवाद.

शिरीनला दूध खूप आवडत. छान जेवली असेल तरीही झोपताना दूध लागतच. त्यामुळे रात्री उठून दूध पिण्याची सवय सोडण जरा कठीण जाणारे अस दिसतय. थोडे दिवस रात्री जागायची तयारी ठेवून हळूह्ळूच सवय सोडेन.

जुई मलाही नक्की कारण माहीत नाही गं, निलय ला एका आयुर्वेदिक डॉ कडे नेलं होतं मी तिनेच तसं सांगितलं होतं की hot water bag ने नको शेकू, electric heating pad ने शेक आणि नसेल तर मग कापड गॅस वर गरम करून मग शेक. मी निलय ला बरेच वेळा electric heating pad ने शेकलं आहे आणि खूप फरक पडतो त्याला म्हणुन तुला सुचवलं.

प्राजक्ता रात्रीची बाटली बन्द करायला थोडा त्रास होतोच. आणि मुलान्ना दात आले की ती बन्द करावीच लागते. फार तर पाणि देता येतं पण दूध नाहीच. आणि तू जेंव्हा बाटली पुर्ण बन्द करशील तेन्व्हा थोडे दिवस मुलगी रडणारच. त्याला इलाज नाहीच. तुलाच तिच्याबरोबर जागून, खेळून तिला परत झोपवावं लागेल.

बालदमा म्हणजे लहान मुलात होणारा दमा,याची लक्षणे बरीचशी मोठ्यान्च्या दम्या सरखीच असतात.
अनुवन्षीकता,वारवार होणार्या allergies,वरवार होणारी रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ,जन्मतह कमी वजनाची मुले अशी याची काही कारणे देता येतील्.पण आजुनही याचे नक्की कारण सापडलेले नाही.
सध्या डॉ नी सन्गीतलेले उपाय करणे हे योग्य.बरेच्दा वय वाढ्ते तसे ही लक्शणे कमी होतात.
त्याला शक्यतो धूळ /धूर / पोलन्स या पासून दूर ठेव्.आनखी ही इतर कोणत्या खाद्यपदार्थान्ची allergy आहे का ते पहा.barech daa ashaa peshnT मधे तेलबीयान्ची allergy दिसून येते.
ही मुले ही इतर सर्वसामान्य मुलान्सरखीच असतात्,फक्त थोद जपाव लागत आलर्जीन्साठी.
त्याच्या आहारत cacium and vit D योग्य असूदेत.

तू मुम्बई पुण्यात असशील तर वैद्य नरेन्द्र पेन्डसे याना भेटु शकतेस ,सरानी असे बरेच पेशन्ट बरे केलेले मी पाहीले आहेत.

जुई माझ्या मुलाला ही बालदमा आहे. मला इथल्या डॉ. ने सांगितलं आहे की त्याला बालदमा असताना जर काही allergy सापडली तर तो कायमचा दमा असण्याची शक्यता असते. म्हणून दर वर्शी allergy test करावी. आणि ही test -ve येत असेल तर त्याचा दमा तो ७/८ वर्शाचा झाल्यावर जाईल. तो नक्की कशाने होतो यावर तसं काही कारण नाही. तोशवी म्हणते तसं अनुवन्षीकता,वारवार होणार्या allergies इत्यादी कारणं असतात. दम्याचा attack कशामुळे येतो हे शोधणं महत्त्वाचं आहे. म्हणजे धुळीत मुलगा खेळला तर त्रास होतो का? मांजर किंवा अशा प्राण्याशी खेळला तर त्रास होतो का वगेरे. basically triggers शोधुन काढणं महत्त्वाचं आहे. आहारातही काही restrictions गरजेची असतात. मुलाला आयुर्वेदाची treatment मी try केली आहे. त्यात सांगितलेली पथ्य मी अजुनही पाळते ९०% वेळा. preventive म्हणून मला चांगला अनुभव आहे पण attack अला तर alopathi ला पर्याय नाही. nasal / oral steroids and broncodialators ला पर्याय नाही. म्हणुन काळजी घेणे हे उत्तम. मुलांची नीट काळजी घेतली तर ही मुलही normal च असतात. माझ्या अनुभवानुसार सारखं बदलणारं temp. या मुलांना जास्त त्रास देतं. इथे
fall season मधे माझ्या मुलाला जास्त त्रास होतो. बाकी वर्शभर तो बराच normal असतो. आणि काही माहिति हवी असेल तर नक्की विचार. (तुला ते तेल लाऊन शेक सांगितलं होतं ना ते त्याच्या आयुर्वेदिक डॉ. नेच सांगितलं होतं मला. nasal steroids दोन वेळा देण्यापेक्शा मला ते जास्त आवडतं.)
all the best

धन्यवाद तोषवी , फुलपाखरू..
माहिती वाचून खरच बर वाटल... निदान आपण काळजी तरी घेऊ शकतो.

त्याला अ‍ॅलर्जी आहे , म्हणजे नक्की कसली ते मी नाही सांगू शकेन , ( नक्की आहाराची, धुळीची वगेरे ) शोधायचा प्रयत्न केला पण मला नाही जमल. म्हणजे मागे त्याने अंड , भजी खाल्लेली तर त्याच्या अंगावर लाल चट्टे आलेले , डॉ. नी सांगितले ते बंद करा. मेडिसीनने बर झाल . (स्कीन स्पेशलीस्ट्ला पण दाखवलेले .) पण माझा मुलगा ते आवडीने खातो. एक दोनदा असच झाल , पण आता एक दोन दिवसापुर्वी परत त्याने अंड खाल्ले , थोड अंगावर चट्टे आले , मी काही मेडिसीन दिले नाही, एकादिवसात आपणहून चट्टे गेले .
सिझन बदला की त्याला सर्दी , खोकल्याचा त्रास होतो. जन्मता त्याचे वजन अगदी बरोबर होते , ( वजन ३.०४० होते ) वर्षापर्यंत त्याचे वजन बरोबर वाढ्त होते , ( वजन ११.४०० होते ) पण वर्षानंतर मात्र त्याचे वजन अजून ११.६५ आहे आणी एच बी ११ आहे

फुलपाखरू मी त्याला तुम्ही सांगितल्यापासून रोज त्याला रात्री तिळाचे तेल लावून कपड्याने शेकवते. त्याला भरपूर कफ झाला आहे , मधे मधे ताप पण येतो, काल मी त्याला परत डॉ. कडे घेऊन गेलेले , मेडिसीन दिले आहे, मेडिसीनच इतके असतात की काढा वगेरे देता येत नाही ( अधुन मधून देते , सकाळी आणि रात्री )

< barech daa ashaa peshnT मधे तेलबीयान्ची allergy दिसून येते. > मी त्याला सकाळी दुधात चिमुटभर सुंठ पावडर, हळद, बदामाची पुड, अक्रोड्ची पुड देते. त्याने असेल का?

मी मुंबईत परळ ला राहते. तुम्ही सांगितलेल्या डॉ. चा नंबर, पत्ता सांगाल का ? त्याला नाहीतरी मला आयुर्वेदिक डॉ. ना दाखवायचे आहे.
पुण्यात डॉ. बालाजी तांबे यांना भेटायच होते, पण मी त्यांच्या क्लिनिकमध्ये फोन केलेला तर कळले की, त्यांचे असिस्टंट बघतात म्हणून .
<त्याच्या आहारत cacium and vit D योग्य असूदेत. > म्हणजे नक्की काय ते सांगाल का?
फुलपाखरू अ‍ॅलर्जी टेस्ट कशी करावी ?

जुई अ‍ॅलर्जी टेस्ट डॉ. कडे जाउन करावी लागेल. तू तुझ्या डॉ. ना विचार. मुलाला अंड्याची अ‍ॅलर्जी असेल तर देऊ नकोस अजिबात. बर्‍याच दम्याच्या लोकांना अंड्याची अ‍ॅलर्जी असते. माझ्या आयुर्वेदिक डॉ. ने मुलाला सितोपलादी घातल्याशिवाय दूध देऊ नकोसाजिबात प्यायला असं सांगितलं आहे. रात्री झोपताना पण ददूध नाही द्यायचं असं सांगितलं आहे. तसच त्याला केळं , अंड, काकडी , दही (ताक चालेल पण दही अजिबात नाही), टोमॅटो या गोश्टी द्यायच्या नाहीत असं सांगितलं आहे. या मुलांचं पोट साफ असणं ही खूप imp. असतं. कारण दम्याच्या लोकांना दम्याबरोबरच exzima चा त्रास ही होतो बर्याच वेळा. हे alopathy वाले पण असच सांगतात. या मुलांना विरुद्ध अन्न पण अजिबात देऊ नये. (exzima पाई)
तसच या मुलांना काहिही गार सहन होत नाही.

जुई, ज्या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे असा संशय आहे ते अजिबात देऊ नका. बर्‍याच गोष्टींचा इन्टॉलरन्स असतो तो वय ५ पर्यंत जातो. अंड, शेंगदाणे, नट्स (बदाम, पिस्ते, काजू) आणि अजून काही तेलबिया यांची अ‍ॅलर्जी असू शकते. भजी खाल्यावर चट्टे आले तर ती कोणत्या तेलात तळलेली होती? रिअ‍ॅक्शन आल्यानंतर आधी काय काय केले, खाल्ले होते ते लिहून ठेवावे. अ‍ॅलर्जी शोधून काढणे हे आपल्याच हातात जास्त असते. टेस्टही करता येतील. रिअ‍ॅक्शन थांबली की चट्टे आपोआप जातात, त्यासाठी औषधाची गरज नाही, पण ती जास्त येऊ नये म्हणून antihistamine बेनॅड्रिल वगैरे देतात. त्याने मूळ अ‍ॅलर्जी जात नाही.
कॅल्शियम ज्या पदार्थात असते असे पदार्थ व्यवस्थित खायला, प्यायला देणे. दुधाची अ‍ॅलर्जी नसेल तर दूध द्या. डॉक्टरना विचारुन अधूनमधून व्हिटॅमिनच्या गोळ्या ड्रॉप्सही द्यायला हरकत नाही म्हणजे खाण्यात पदार्थांवर मर्यादा आली तरी व्हिटॅमिन्स मिळत राहतील.

फुलपाखरुनी बरीच चांगली माहिती दिली आहे.

मुलाला अंड्याची अ‍ॅलर्जी असेल तर देऊ नकोस अजिबात.तेलबीया,(शेन्गदाणे,सुर्यफूल ,बदाम, पिस्ते, काजू) यांची अ‍ॅलर्जी असू शकते.सध्या ते बन्दच थेवलेल बर्.मागे मी म्हन्टल्याप्रमाणे कॅल्शियम व विटामीन डी आहारातून नाहीतर डॉ च्या सल्याने सप्लिमेन्टस घ्यायला हव्यात्.सकाळी कोवळ्या उन्हात बसवत जा.
आलर्जीच्या काही टेस्टही करता येतील.आलोपथी च्या बरयाच आलर्जी प्रतिरोधक antihistamine मूळ आलर्जी नष्ट नाही होत.
तुझ्या वि पु त माझ्या सरान्चा डॉ,पत्ता आणि फोन न देते

जुयी,
अग फूड आलर्जी आणि अस्थमा ह्यचा फरच जवळचा सम्बन्ध आहे तेव्हा सध्या काही महीने तरी त्याला ज्या पदार्थान्ची allergy आहे असा सन्शय असेल ते बन्द ठेव.
त्याला पौष्टीक आसे इतर अनेक पदार्थ तू देऊ शकतेस.
आभ्यासात असे सिद्ध झालय की जी मूले जास्त भाज्या खातात त्याना मासाहारी मुलान्च्या पेक्षा खूप कमी त्रास होतो .त्याला सलाड ची आवड निर्माण कर. pear ,apples ,figs,orange,anjeer,kalayaa manuka,
(diet rich in calcium vit D vit C).कफ वढव्णारे पदार्थ दूर ठेव केळी ,दही ,आम्बवलीले पदर्थ केक पेस्ट्रीज नकोत.
काही मासे ही तू त्याला देउ शकतेस, पण मला त्याची नीट माहीती नाही त्यामउळे मी त्यान्ची नव आत्तातरी सन्गू शकत नाहे नेट वर शोध.
घरत air purifires lau shakates.
आयुर्वेदा नुसार वर्धमान पिम्पळी /पिम्पळी सिद्ध दूध देतात.
तूला सरान्चा न पाठवला आहे वि.पू त.

>>आभ्यासात असे सिद्ध झालय की जी मूले जास्त भाज्या खातात त्याना मासाहारी मुलान्च्या पेक्षा खूप कमी त्रास होतो
कशाचा? अ‍ॅलर्जीचा? हे कुठे वाचलेत कळेल का?

जुई, मांसाहार चालत असेल तर चिकन, मटण देता येईल पण सीफूड ची अ‍ॅलर्जी असू शकते. ते पण prawns, crab, lobster अश्या crustaceans ची. गोड्या पाण्यातले आणि समुद्रातले 'मासे' चालायला हरकत नाही पण कोणताही नवीन पदार्थ देताना थोडा देऊन पहा. एकावेळी एकच नवीन पदार्थ द्या. दुसरा काही दिवसांनी ट्राय करा.

टेस्ट आत्ता नाही केली तरी चालेल, शक्यतो ५ वर्षांनन्तर केली तर बरे पडेल तोवर known allergen आणि ज्याची त्याला अ‍ॅलर्जी आहे हे लक्षात आले आहे असे पदार्थ देऊ नका.

>>आभ्यासात असे सिद्ध झालय की जी मूले जास्त भाज्या खातात त्याना मासाहारी मुलान्च्या पेक्षा खूप कमी त्रास होतो
माझ्या मुलाच्या पेडीनुसार हाय प्रोटिन्सची अ‍ॅलर्जी असणार्‍या मुलांना मांसाहारी पदार्थाचा त्रास होणं स्वाभाविक आहे, पण मांसाहारामुळे अ‍ॅलर्जीज होत नाहीत. अ‍ॅलर्जी नसणार्‍या मुलांना, जे काय मांस खाल्ल्या जातंय ते चांगल्या प्रतीचं नसेल, त्याला आधी अँटिबायॉटिक्स किंवा हॉर्मोन्स दिले गेले असतील तर त्याची रिअ‍ॅक्शन होऊ शकते.

>>हाय प्रोटिन्सची अ‍ॅलर्जी असणार्‍या मुलांना मांसाहारी पदार्थाचा त्रास होणं स्वाभाविक आहे
अ‍ॅलर्जी एका ठराविक प्रोटीनची असू शकते, 'हाय प्रोटीन फूड्स' चा संबंध नाही. सहसा चिकन, टर्की इ. पक्ष्यांचे मांस, मीट (लॅम्ब, गोट, बीफ) इ. ची अ‍ॅलर्जी नसते.

अर्थात भाज्यांमध्येही शेंगदाण्याची असेल तर इतर लेग्यूम्स्ची असू शकते. कॉलिफ्लावर वर्गातल्या भाज्यांची अ‍ॅलर्जी मी ऐकली आहे.

तेलबियांची अ‍ॅलर्जी असेल तर प्रोटीनसाठी पर्याय म्हणून उलट मांसाहार सुचवतात.

Pages