- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
योग आणि आयुर्वेद
सदस्य प्रवेश |
बाळगुटी आणि इतर माहीतीबाळगुटी आणि इतर माहीती या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल |
|
मागे याच बीबीवर वाचले होते की अंगावरची लव कमी करायला वेखंड लावावे. माझ्या मुलीला लहानपणी atopic dermatitis चा त्रास होता. (अजुनही आहे पण होमिओपॅथी औषधामुळे आणि सायीमुळे आटोक्यात आहे), त्यामुळे तिला बेसनवगैरे काहीच लावले नव्हते. ती आता १० महिन्याची आहे तर तिला आता बेसन / कणिक आणि वेखंड लावले तर लव जाईल का? उन्हाळ्यात या उपायांचा त्रासतर नाही होणार?
माझी मैत्रीण पुढच्या वीकमध्ये भारतातून येते आहे तिला सांगता येइल आणायला.
अंगावरची लव जायला अजून काही उपाय आहेत का?
अजूनही लावायला हरकत नाही. बेसन + हळद + दुध हे साबणाऐवजी लावावे. आंघोळ झाल्यावर वेखंड लावावे. डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
कोरफडीचा गर लावल्यासही फायदा होईल. कोरफडीची पाने grocery store मध्ये मिळतात.
थॅंक्स अश्विनी.
वेखंड आंघोळ झाल्यावर म्हणजे ते दिवसभर तसेच राहू द्यायचे का, धुवायचे नाही?
वॉलमार्टमध्ये बहुतेक कोरफडीचे जेल मिळते, त्याचा उपयोग होईल का?
धुवायचे नाही. आपोआप जाते.
कोरफडीचे ताजे पान मिळाले तर उत्तम. नाहीतर जेल लावून पाहा.
अश्विनी, वेखंड चेहर्यावर लावले तर चालेल का? आणि उगाळून लावायचे नं?
सॉरी, खुप प्रश्न विचारते आहे, पण बाळाला लावयचे ना म्हणून.
चेहर्याला नको. डोळ्यात जाण्याची भिती आहे. उगाळून लावायची गरज नाही. चूर्ण चालेल. फक्त लावताना डोळ्यात उडणार नाही याची काळजी घे.
प्रश्न पाहिजे तितके विचार. मी इथे येईन तेंव्हा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन.
अश्विनी, अजून एक राहिलं विचारायचं.
तीला नं परवा ताप आला होता आणि २-३ दा उलट्या पण झाल्या. आता ताप नाहीया पण दुध प्यायल्यावर तीला जोरात खोकला येतो आणि उलटी होतेय. मला आधी वाटले सॉलीडमुळे होते आहे म्हणून मी तीला सॉलीड नाही दिले, पण आज पुन्हा तसेच झाले. आणि तिच्या श्वास घेतांना खूप घरघर आवाज येतोय.
तीला रविवारी सन्ध्याकाळी केळ दिले होते आणि रात्रीच ताप चढला, केळामुळे कफवगैरे झाला असेल का?
खोकल्यासाठी व उलट्यांसाठी काही घरगुती औषध देता येइल का? डॉक्टरनी तापाकरता टायलेनॉल सांगितले होते आणि खोकल्यावर इतक्या लहान वयात औषध देणे सेफ नाही असे म्हटले.
मी जुने आर्काईव्हस पण वाचून बघते आहे.
केळ्यामुळे कफ होतो. छाती गरम (सोसवेल इतक्या) कापडाने शेकून घे. गुटी देत असशील तर वेखंड, सुंठ, ज्येष्ठमध, हळद प्रत्येकी १०/१२ वेढे मधात उगाळून दे. दिवसातून ३ वेळा.
थंड काही खायला प्यायला देऊ नकोस. पाणी पण कोमट दे.
अश्विनी....
माझा आयाम सात दिवसांचा आहे. सी सेक्शन झाले होते. पहिले दोन दिवस दुध आलेच नाही म्हणुन त्याला वरचे दुध {लक्टोज मिल्क}दिले. तिसर्या दिवशी त्याने दुध प्यायला त्रास दिल पण आता तो अंगावरचे दुध पितोय... काल पासुन त्याला दुध पुरत नाही असे जाणवतय.... रात्री आणि पहाटे.... त्याने ओढ्ल्यामुळे निप्पल्स दुखायला लागले..पण त्याचे पोट भरत नाहीये... मला तर निप्पल्सना जखम होइल कि काय वाटायला लागलय...
मी रोज सकाळी कडुलिंबाच्या काड्यांचा रस पितेय कपभर्....दिवसतुन किमान ५ ते ६ ग्लास दुध शतावरी कल्प घालुन.. तसेच एकदा खसखशीची आणि अळिवाची खिर..... डॉक्टरनी गोळ्या पण दिल्या आहेत....
काय करु?
बाळाला न्हाऊ घालणार्या बाईच्या मते दुध आहे पण नस मोकळ्या नाहीत.. मालिशने होतिल मोकळ्या... उद्या सकळई ह पण उपाय करुन बघेन्....पण मला दुध असल्याचे जाणवत नाही.....
आयामला वरचे दुध देवुनही त्याची भुक भागत नाहीये..... अंगावरचे दुध प्यायला कि शांत झोपतो...डॉक्टर म्हणतात सप्लिमेंट वापरा....पण दुसरा काही उपाय नाही का?
नेट वापरु नको...बसु नकोस असे सगळे म्हणत असतानाही मायबोलीवर मदत मिळेल म्हणुन आ़ज ऑनलाईन आलेय.... प्लिज ज्यांना जे उपाय माहित असतिल ते कळवा....
अल्पना, अभिनंदन.

दूध वाढण्यासाठी अजून काही वेगळा उपाय माहित नाही, मेथीचा उपयोग होतो. पाणीही व्यवस्थित पी. वरचे दूध देऊनही त्याची भूक भागत नाही असे का वाटते? आणि भूक भागत नसेल तर सप्लिमेंट द्यायला काहीच हरकत नसावी. अंगावरचे आणि सप्लिमेंट असे दोन्ही चालू ठेवता येते. आणि लगेच दूध येत नाही, तिसर्या-चौथ्या दिवसापासूनच नीट येते तेव्हा आधी सप्लिमेंट देतात.
ही लिन्क पहा- http://www.breastfeeding.com/all_about/fenugreek/all_about_fenugreek_mil...
तिथे अजूनही बरीच माहिती आहे. इथे अजून काही लोक सांगतीलच. टेन्शन घेऊ नको.
खसखसीची खीर असा एक उपाय सांगितला होता

.............................................................
तो उपाय ती करतेच आहे. लिहिलंय तिने वर.
धन्यवाद लालु, झकास....
लालु, अगं तो एक तर वाटी चमच्याने दुध पित नाही... एक एक तास लगतो ३० मिलि. पाजायला..... तयार केलेले सगळे दुध संप्वत नाही. पोट भरल्याप्रमाणे गिळायचे थांबवतो किंवा बाहेर काढतो. झोपायला पण लागतो.. आणि नंतर १०-१५ मिनिटात परत हात चोखायला लागतो किन्वा भुक लागल्याप्रमाणे तोंड उघडुन नुसते चोखल्यासरखे करतो.
अंगावरचए पाजायला घेतले कि मग शांत होतो.....एक दिड तास अगदी जोर्जोरत चोखतो.....डोळ्यातुन पाणी येईल इतके दुखते...दवाखान्यात निप्पल्स तयार करण्यासाठी इंजेक्शन्च्या सिरिंजनी सक्शन केले होतो...त्यावेळी पण दुखले नव्ह्ते इतके दुखते....
>>एक तर वाटी चमच्याने दुध पित नाही
मग बाटली देऊन पाहिलीस का? हे बाटलीबद्दलच लिहीले असशील तर बाटलीने नीट पिता येत नाही आहे असं वाटतंय. अंगावरचे आणि बाटलीने पिणे याच्या टेक्निक मध्ये जरा फरक असतो. काही मुले कन्फ्युज होतात. नीट पिता येत नसल्यामुळे खूप वेळ लागत असेल आणि कंटाळून तो झोपी जात असेल. पण पोट तर भरलेले नसते.
नाही बाटली नाही वापरली... पण काल पासुन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखे वाटतयं. मेथ्याचे पाणी घ्यायला सुरवात केली... दुध येतय आणि सध्या त्याला पुरतय्...त्याचा दुध प्यायचा त्रास संपलाय...
अश्विनी, आयामला बेसन आणि हळ्दीने अंघोळ चालु आहे, पण अंगावरची लव अजुनतरी कमी झालेली नाही. तो आता चार आठवड्याचा होईल. त्याला कोरफडीचा ग्र लावु का? चेहेर्यावर म्हणजे कपाळावर खुप लव आहे, तिथे लावले तर चालेल का? आणि हा गर अंघोळीनंतर लावावा का?
अजुन एक प्रश्न.... गेले ३-४ दिवस तो खुप रडतोय, सारखा दुध प्यायला मागतो...पोट भरले तरी मागतो आणि नंतर उलटुन टाकतो...सध्या तो फक्त अंगावरचे दुध पितोय.. दुध कमी पडते कि काय वाटुन फॉर्म्युला मिल्क देवुन बघितले...पण ते पिवुनही त्याला अंगावरचे दुध हवे असते.. दुध पितनच तो झोपतो,आणि निप्पल तोंडातुन निघाले कि लगेच उठतो... त्यामुळे रात्रभर व कधी कधी दिवसभर जागा असतो. झोप आली तरी निप्पल तोंडात नसेल तर त्याला झोप लागत नाही... डॉक्टर म्हणताहेत कि तो मदर निप्पलचा एडिक्ट झालाय... झोप लागावी म्हणुन त्यांनी त्याला रात्री फिनार्गंद द्यायला सांगितलेय्...पण मग त्याची सवय नाही का लागणार?
दुसरा काही उपाय आहॅ का? जर त्याला नुसते चोखायला म्हणुन पोट भरले असताना प्यायला घेतले नाही तर अक्रस्थाळेपणा करतो..आवाज फुटेपर्यंत रडतो..इतक्या लहाणपणी इतके रडु द्यायची भीती वाटते...
अल्पना... सर्वप्रथम तुझे अभिनंदन.
बाळ झाल्यानंतर आईला सतवणारा सर्वात मोठा प्रश्न, कि बाळाची भुक भागते की नाही. माझे पहिले सांगणे आहे की तु tension free रहा. त्यामुळे तुला दुध व्यवस्थित सुटेल. तुझ्या आहारावर concentrate कर. eggs / fish / chicken soup चालत असेल तर त्याचा समावेश कर. बाजरिच्या रव्याची, खसखशिची खिर, डिंकाचे - मेथिचे लाडु, शतावरि, मेथिची भाजी तसेच पुर्ण आहार घे. चहा-कॉफी कमी कर.
बहुतेक बाळांचेही स्वभाव असतात. पोट भरले तरी रडत राहतात. त्याचे जर वजन नीट वाढ्त असेल तर तुझे दुध नक्कीच कमी पड्त नाहिये. शक्यतो त्याला ३ ते ३.६ महिन्याचा होईपर्यंत वरचे देऊ नको. मला doctor ने बाळ जेव्हा मागेल तेव्हा त्याला दुध पाजायला सांगितले होते. बाळाच्या सवयी set होईपर्यंत आईला खुप patience ठेवावे लागतात. बाळ झोपला की तुही झोपून घेत जा. न जानो नंतर किती वेळ जागावे लागेल. दूध पिताना झोपला तर. निप्पल सोडवुन घेताना, जो हात free असेल त्याची करंगळी हळुच त्याच्या तोंडामध्ये सरकवायची आणि नंतर अलगद सोडवुन घ्यायची. कितीहि त्रास झाला तरी बाळाला बाटली / रबरी निप्पल तोंडात धरायला देऊ नको.
बाळाचे शैशव एकदाच अनुभवायचे असते. आत्ता कितीही त्रास झाला तरी त्याच पुढे HAPPY MEMORIES होतात.
धन्यवाद पल्लवी.... अग ह्याचे पोट भरतय्...मला काळजी तो झोपत नाही ह्याची वाटतेय.... तो फक्त निप्पल तोंडात असेपर्यंत झोपतो...तोंडतुन निप्पल सोडवले किन्वा सुटले कि लगेच जागा होतो... त्यामुळे २४ तासात तो ८-९ तास झोपतो फक्त....
अल्पना तु त्याला पाळण्यात झोपवते का?
पाळण्यापेक्शा झोळीत बाळ जास्त छान झोपतं. त्याला झोळीत आईच्या पोटात असल्यासारखे वाटत असाव. तु बाळाला गुटी देते का? बाळ झोपल्यावर थोडा अंधार कर ... हवा खेळ्ती असु दे. रात्री झोपण्यापूर्वी तु तुझ्या हाताने बाळाला हलकेच मसाज कर. बाळाला छातीशी घेऊन थोडं गुणगुणलं तरी थोडी गुंगी येऊ शकेल. नऊ महिने बाळ आईच्या पोटात असतं .. त्याला बाहेर आल्यावरही आई जवळ आहे अस feeling करुन द्यायला हवे. doctor म्हणत असतील तर ७-८ दिवस फेनर्रगन द्यायला हरकत नाही. येवढ्यामूळे लगेच सवय लागत नाही. बाकी तुला मदत करायला मोठी माणसं तुझ्याजवळ असतीलच. तेही तुला योग्य सल्ला देतिलच.
hi
my son is 19 months old . recetnly there was blood work done on him and the results are shocking .
He is allergic to peanut,egg white ,corn,seasame seeds,milk ,soy and Wheat . he is very thin and also suffered from eczema and asama . I need some help with receipes as well any other indian remedies to manage this .
oen more thing is how do u deal all these food allergies in india ,here we read the food lables and all . Please help me on this .
सर्वात प्रथम म्हणजे Its important that (you may have done this already) you and your husband (and close family) educate themselves about food allergies. You can check with public libraries about material. Secondly get enrolled in FANAA at least you get familiar with whole paradigm. There are alternatives available which can help for almost normal life, you will explore them as you get to know more about, and they are not very difficult to work with. Last but most important, make your son aware of his food allergies, there is no substitute to it.
As far as managing in India goes, it is pretty much same as in here. You will surprised to find alternatives available in India as well, once you start looking around (Al bait it's little difficult to control in India than in US) . I can not really enumerate over here as they keep changing depending upon circumstances and time.
Hopefully he will outgrow his allergies ( at least egg, corn and milk) over the period of time.
अश्विनी, तुम्ही पूर्वी कधी ऐकले नसेल म्हणून शॉकिन्ग वाटले पण हे तसे फार कॉमन आहे. ज्यांची allergy आहे त्या गोष्टी देणे ताबडतोब बंद करा. बरेच दिवस बन्द केल्यावर एक एक पदार्थ सुरु करुन पहायचा. जर त्रास झाला तर पुन्हा नवीन पदार्थ देण्यापूर्वी काही दिवस थांबावे. एक्झिमा आणि अस्थमा याशिवाय इतर काही त्रास आहे का? म्हणजे कधी रॅश उठणे, अंगावर, चेहर्यावर सूज येणे इत्यादी. वर असामीने लिहील्याप्रमाणे काही गोष्टींचा intolerance असतो. मूल मोठे होऊन पचनशक्ती सुधारली की ते कमी होते. एक शेंगदाणे सोडल्यास बाकी सगळ्या allergies वय ५ पर्यंत जातीलही. सध्या भात, डाळी, भाज्या, मांसाहार (चालत असेल तर. यात सीफूड मध्ये शेलफिश-प्रॉन्स इत्यादी ची allergy असू शकते.) यावर भर देता येईल. vitamis, calcium supplement देता येईल.
thanks for your response. today only we had a allergist appointment and he said my son can have milk as well corn . Nuts are to be avoided till some more time and Wheat is going to be tested on thursday .
I'm not sure if you are aware of this or not but coconut is considered as allergen induced food and especially people with nuts allergies can be (mot necessarily) susceptible to it. Hence be cautious when (if) you try coconut or any derived food.
गेल्या तीन-चार दिवसांपासुन, मी दिल्लिला आल्यापासुन माझ्या बाळाला प्रत्येकवेळी दुध प्यायल्यावर लगेच शी होतेय...सुरवातिला पाण्याचे प्रमाण जास्त होते... नुसता पिवळा फेस असायचा.. कालपासुन पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण अजुन्ही फेस येतोय. मी त्याला गुटी देतेय.. गुटिमध्ये जायफ्ळ आणि मुरुडशेन्गेचा वेढा वाढवलाय व हिरड्याचा कमी केलाय. तसेच आज त्याला फाटलेल्या दुधाचे पाणी दिले होते.. त्यची रुटिन स्टुल टेस्ट केली होती.... त्याचे रिपोर्ट ठिक आहेत...
मी सध्या खिचडी, दही असेच जेवण घेतेय... अजुन काही उपाय सान्गा.. माझ्या सासुबाई माझे दुध बंद करा म्हणत आहेत...
अल्पना, शी पुसताना बाळ नेहमीपेक्षा जास्त रडतंय का? शीची जागा लाल झालीय का? काही वेळा अशी शी होणं पण 'नॉर्मल' आहे असं सांगतात.१-२ दिवसात हा त्रास थांबला नाही तर पुन्हा डॉक्टरला दाखवा. कारण सांगते.माझ्या मुलाला तो चार महिन्यांचा असताना असाच त्रास सुरु झाला. पहिली स्टूल टेस्ट नॉर्मल आली. (त्या दिवसात मी गुटी द्यायचं पूर्ण थांबवलं!) पण त्रास सुरुच राहिला. इतका की शी पुसताना श्वास कोंडेपर्यंत रडायचा. दुसर्या टेस्ट मधे 'स्टूल्स हायली ऍसिडिक' म्हणून सांगीतलं. 'टेंपररी लॅक्टोज इंटोलरन्स' आहे असं प्रमाण झालं. बाकी दूध बंद करून फक्त'झीरो लॅक' ब्रँडचं लॅक्टोज रहित दुध द्यायला लागलं. एक आठवड्यात गाडी रुळावर आली.
बाळ व्यवस्थीत दूध पीत असेल, खेळंत असेल तर काळजी करु नका.
सासुबाई माझे दुध बंद करा म्हणत आहेत<<< आधी डॉ़क्टरना विचारलेलं बरं!
जायफळाचा वेढा वाढवल्यामुळे जरा घट्ट होते आहे का ? बाळ केव्हढे आहे आता ? माझ्या बाळाला २-२.५ महिन्याचा असताना असाच त्रास झाला होता अगदी २-३ दिवस. पण रडत वगैरे नसे. डॉ म्हणाले होते ४ दिवस झाल्यावरही असेच झाले तर स्टूल टेस्ट करु. पण काही उपाय न करताच त्रास थांबला. मृ म्हणाल्याप्रमाणे डॉ. ना विचारुनच काय करायचे ते केलेले बरे.
बाळ सव्वा दोन महिन्याचे आहे.. जायफळाने शी थोडीशी घट्ट झाली...पण तरीही मधुनच एकदम पाण्यासारखा पातळ फेसही येतो...आता प्रमाणही कमी झालेय... दिवसातुन ५-६ वेळा. शी ची जागा किंचितशी लालसर झालीये...पण तो रडत नाही...खेळत असतो...१-२ दिवसांनी परत भेटायचे आहे डॉ ला....
तुमच्या दोघींच्या उत्तरामुळे थोडसे बरे वाटले...
आपल्या कडच्या आणि माझ्या सासरच्या रीतींमध्ये खुप फरक आहे...दररोजच मोठे मोठे धक्के बसतात... अंघोळ घालण्याची पद्धत, बाळांतणीचे खाणे सगळेच वेगळे, त्यामुळे काय करावे कळत नाही...
नमस्कर मन्डलि,
मी मायबोलिवर नविन आहे. ३-४ वर्शा पुर्वि एक दोन वेला अलेले इथे पन नन्तर कधि अलेच नहि इथे... मराठी मि पहिल्यन्दाच लिहितेय. प्रेग्नन्त असतअना इथे अले असते तर फार हेल्प झलि असति... असो ...मला एक प्रश्न विचरायचा आहे. Not sure if this is the right thread or not. Aadhich maafi magate yogya thread nasel tar... Maza prashna - maza mulagaa 14 mahinyancha hoil ya mahinyat. khupach active ahe to. pan to khat matra titakasa nahi. especially dudhala khup natak karato... itaka ki amhala radavato... divasbharat far far tar 12-15 ozs milk kasabasa deto amhi tyala... तो अगदि लहान पनापासुन अस्अच आहे... त्यल दुध मुलिच नहि अवडत... he is better with solids compare to milk. Mala sangal ka please ki tyane kiti dudh ghetal pahije ani kahi tricks ki tyane tyala dudh avadel? mi anek formule change kele... atta wholemilk detey. same natak
Bottle tar to ghetach nahi... spoonfeed karav lagat... PLS PLS PLS need some help. Also mala 0 knowledge ahe ayurvedatal. would love to know what all i can give him to increase his apetite? and good for his health?
mi USA madhe rahate. Ithalya doctoranchya mhananyane to thoda underwt ahe... pan te sagale measurements american asatat... 14 mahinyanch indian baby asel tar sadharan kiti weight asat, konala kahi info ahe ka ya baddal?
इथले डॉक्टर सहसा अंडरवेट म्हणून सांगत नाहीत. माझी दोन्ही मुलं वेट चार्ट च्या प्रमाणे दहा-बारा पर्सेंटाईलच्या आसपास आहेत. पण इथले अन भारतातले डॉक्टर त्याबद्दल काळजी करत नाहीत.
बाळाच्या वजनाची ( पुष्कळदा अवाजवी ) काळजी आई वडिल, आजी आजोबा वा इतर नातेवा़इकच जास्त करतात
दूधच द्यायचं असेल तर चॉकलेट सीरप किंवा स्ट्रॉबेरी सीरप घालून पहा. बोर्नव्हिटा किंवा केशर वेलची साखर घालून देऊन पहा.
तुमच्या मुलाला दही, चीझ, अंडं , लोणी, तूप या सारखे पदार्थ देउ शकता. मासे, चिकन वगैरे चालत असेल तर ते द्या. मॅकरोनी किंवा स्पघेटी मधे लोणी घालून दिलं तर मुलं प्रेमाने खातात. केळी कुसकरून, सफरचंद उकडून कुसकरुन देता येईल. भाज्या ज्या काही देत असाल त्यात लोणी किंवा चीझ घालून देता येईल.बाळाचे इतर डेव्हलपमेंट बरोबर असेल तर वजनाची चिंता सोडून द्या.
वजनाची चिंता करण्याच्या बाबतीत भारतीय पालक कदाचित ९० पर्सेंटाइल वर असावेत
वर्षा-सव्वावर्षाच्या बाळाचं वजन त्याच्या जन्मतः असलेल्या वजनाच्या साधारण तिप्पट असावं असा एक ठोकताळा असतो. ह्यानुसार वजन योग्य असेल तर काळजी करु नका. शोनू म्हणतेय तसं दुधातल्या कॅल्शियम्ची गरज इतर दुग्धनज्य पदार्थांतून पूर्ण केली जाऊ शकते. दही आणि चीज खाऊ घालता येईल. चॉकलेट दूध (शक्य असल्यास ऑरगॅनिक) देऊन बघा. मिल्क शेक किंवा अगदी घरगुती आइसक्रीम द्यायला हरकत नाही. नाचणीसत्व देता आलं तर बघा. (दुधात शिजवून).
शोनु आणि मृ ने सांगितलेच आहे. नुसते दुध्-दुध्/वजन्-वजन करु नका (मी पण ह्या सगळ्यातुन गेले आहे). त्याने तुम्हालाच त्रस होइल आणि मनापासुन, आवडीने खाल्लेले जास्त अंगी लागते असे म्हणतात. माझा मुलगा ह्याच वयाचा आहे. त्याला दुध अजिबात आवडत नाही. माझ्या सारखे दुध देण्याच्या प्रयत्नांनी तो अजुनच irritate व्ह्यायला लागला. तेव्हा मी जे नाही त्याच्या मागे धावणे सोडले. तसेच रोज खीर देईन म्हणु तर त्याला ते ही चालत नाही. तेव्हा मी- मनुके घालुन milkshake, दही, चीज, नाचणीची खीर, बदाम्/खारीक्/रवा खीर, दुध्-भात, दुध्-पोळी, केळं, ब्रोकोली, लिमा बीन्स, अंड, Calcium-fortified orange juice ह्यातले काही ना काही त्याच्या खाण्यात देण्याचा प्रयत्न करते. तरी माझ्या सगळ्याच प्रयत्नाना यश येतेच असे नाही
हे खाण्या-पिण्याचे नखरे त्याच्यात कुठुन आलेत माहिती नाही. आम्ही दोघेही असे नाही, लहानपणी नव्हतो, असो.
तसेच तुमच्या बाळाची १ वर्षांनंतर होते ती तपासणी झाली आहे का ? तेव्हा डॉ सर्व ठीकठाक आहे असे म्हणाले असतील तर जास्त काळजी करु नका. काही काही बाळे फार तडतडी असतात. त्यांचे वजन फार छान नसले तरी एकुण तब्येत चांगली असते. ते महत्वाचे.
Shonoo, Mru and cinderella
Thank you soooooooo much for responding… you guys are awesome…
LOL Shono -<< वजनाची चिंता करण्याच्या बाबतीत भारतीय पालक कदाचित ९० पर्सेंटाइल वर असावेत >>
Shonoo, Mi chocolate / strawberry syrup try karun zal. Organic chocolate milk hi try kel.
He is around 5 percentile in weight and close to 90 percentile in height...
To almost tyachya vajanachya tippat ahe but not quiet… १९.५ - २0 pounds right now (14 months). Tyach birthwt was almost 7 pounds. Mala sarakha vatat ki tyache bones week hotil dudh ghetal nahi tar… khupach kami gheto to dudh… Mi tyala dahi dete divasatun ekda…
BTW Mru, he nachani satva kasa banavayach? Ani ithe Indian store madhe milate ti nachani vaparali tar chalel ka? Personally mala tari avadat nahi ti…asa vatat ki tyat kasalitari powder misalaliye...
Cinderella, ditto… amhihi already give up kelay dhavan tyachya mage lagan dudhasathi… pan kalaji vatat rahate ga sarakhi.. anyways mi tuम्हि सगल्यानि sangitalelya goshti karun baghate khato ka te… kheer matra avadat nahi tyalahi yevhadi...Tyach 12 month ch checkup zal. Doc sagal vyavasthit ahe mhanali except vajan thoda kami ahe mhanali. Ani ti sarakhi mage lagate ki tyala atleast 16 oz tari dudh de mhanun Ti mhanali ki he is gonna be tall and skinny
Anakhi ek prashna – Mi working mom ahe… Mostly mi tyala gerber food dete… ani daalbhat/ khichadi bhaat divasatun ekda… adhemadhe kadhitari poli ani daal dete… Is it OK? Gerber food denyamage uddeshya haach ahe ki mala kalat tyane kiti ani kai khaal also its very convenient…
षोनू, बोर्नव्हिटा मि आनलय पन इतक्या लहान मुल्ल्लना चालत का ते? अनि कितिवेल दिल तर च्चलेल? मागे एकदा प्र् यत्न केला त्याल द्ययचा, पन त्यआल फारस अव् डल नहि ते...
ईथे दुधाचा विषय निघालाचं आहे. मलाही एक शंका आहे. माझी मुलगी २ वर्ष १ महिन्याची आहे. तिला सकाळी एकदा आणि रात्री एकदा असं २ वेळा मी दुध देते. एकुण ती १६-१७oz दुध पिते. एवढं दुध तिच्या वयाला पुरेसं आहे का अजुन वाढवु?तिला boost आवडतं पण मग तिच्या solid खाण्यावर परिणाम होतो म्हणुन मी तिला limit केलं.हे प्रमाण जर कमी असेल तर मी दुध वाढवते तिचं. कृपया सल्ला द्या. (काही केल्या glass ने दुध पीत नाही ती.bottle हवी अजुनही तिला
)
ममु, ह्या लिन्क वर क्लिक करुन तिथले २ बीबी पहा-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/92989.html?1219738700
तुम्हाला हवी असलेली बरीच माहिती तिथे आहे. दुधाऐवजी दही, चीज चालेल. अजून काही महिन्यांनी (वय दीड वर्षे) मोठी माणसं जे जेवतात तेच बरेचसे अन्न दिले तरी चालते. फक्त खूप मसालेदार, तेलकट नसावे.
ढन्यवाद लालु... मि चेक करते... बाप्रे माझ मर्राथी त्याय्पिन्ग भयइकर अहे... सोरि फोर दआत...
असूदे, असूदे.

>>ढन्यवाद
चालेल. हे 'धन्स' पेक्षा बरं आहे.
मराठमोळी मुलगी
हळू हळू जमेल मराठी नीट लिहायला. प्रयत्न करत रहा.
व्हॉट टू एक्स्पेक्ट - टॉडलर इयर्स असं पुस्तक मिळत. अमेरिकेत. त्यात एक ते तीन वर्षे वयाच्या मुलांना वाढवण्याबद्दल फार छान माहिती दिली आहे. शिवाय
बेबीसेंटर डॉट कॉम इथे व आय व्हिलेज इथे पण बरीच माहिती मिळेल. या वयावर मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची ओळख करून द्यावी. एखादा प्रकार नाही आवडला तर त्यामागे कटकट करू नये. आठ्-दहा दिवसांनी परत देऊन पहावं.गर्बर अडि अडचणीला, प्रवासात वगैरे सोयीचं आहे. पण रोज मुलांना एखादि भाजी अन एखादं फळ उकडून मॅश करुन देणं काही फारसं जिकिरीचं नाही. सफरचंद, रताळं , फरसबी, पालक, छोटी गाजरं, वटाणे, बटाटा, भोपळा यातले दोन प्रकार दोन छोट्या वाट्यांमधे ठेवून प्रेशर पॅन मधून दोन शिट्या शिजवून घ्यावे. व गार झाल्यावर मॅश करून टपरवेअर च्या डब्यातनं डेकेअर मधे अथवा बेबी सीटर कडे द्यावेत. भाज्या उकडून झाल्याबरोबर थोडं लोणी किंवा तूप घातलं तर ते नीट मिसळून येतं. घरि दही लावत असाल तर ते सुद्धा छोट्या टपर वेअर मधेच लावलं तर तेही डेकेअर मधे द्यायला सोपं पडतं.
सुप्रिया बॉटल ऐवजी सिप्पी कप देता येइल. डोरा, प्रिंसेस किंवा तत्सम तिच्या आवडीचं चित्र असणारा सिप्पी कप मिळाला तर त्या आकर्षणाने बाटली चा हट्ट कमी होईल. इथले पालक कधी कधी बाटली किंवा पॅसिफायर 'सँटा क्लॉज ला देऊन टाकतात' तसं करुन पाहता येईल. गणपती बाप्पाला पण चालेल बॉटल दिऊन टाकली तर
धन्यवाद षोनु,
खुप छअन महिति दिलित. मि खरतर हे सगल विकत अनुन देते. दहिहि मि घरि लावत नहि. पन प्रयत्न नक्कि करेन.
तो सोलिड्स बर्यापेकि अच्चेप्त करतो. पन तुम्हि म्हनतय तस फूड बनवुन त्यामधे लोनि किव तुप घातल तर हेल्प होइल.
खरच खुप खुप धन्यवाद.
हाहाहाहाहा @ << असूदे, असूदे.
>>ढन्यवाद
चालेल. हे 'धन्स' पेक्षा बरं आहे. >> लालु अपन फारच फनि बुवा.
लालु बुवा नाही बाई आहेत
मुलांना एखाद्या पदार्थाची आवड निर्माण करायचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे आई-बाबांनी स्वतः ते खाणे, नियमीतपणे. माझ्या मुलाच्या बाबतीत तरी ही पद्धत चालते. त्याला कुठलाही नवा पदार्थ द्यायचा असेल तर मी त्याच्यादेखत खाते. मग तो आपणहुन मागतो आणि खातो. तसे त्याला द्यायला गेले तर खात नाही. असे ४-५ वेळा केल्यावर मग काही प्रश्न नाही. दुधाचेच काय घोडे अडले आहे कळत नाही
अह ओह!!! माफि अस्सावि लालु बाइ...
नविन असल्यवर अष्या चुका व्व्हयच्याच. लालु प्रसाद मुळे सगले लालु बुवाच वाट्त्तात.
cinderella, धन्यवाद ग सन्गित्ल्या बद्द्ल.
हे कोनाला माहित्ति आहे का कि कुमारि आसव कश्यसाथि वापरतात... आनि लहान बालाना दिल तर चलत का...क्रुपया कहि महिति मिलेल का मला? माझि एक मैत्रिन तिच्य ६ महिन्यच्य मुलला रोज ४-५ थेम्ब पन्यातुन देते...
मि उत्तराचि वाट पहातेय.... कोणि स्सन्गु शकाल का कि कुमारि आसव कश्यसाथि वापरतात...आनि लहान बालाना दिल तर चलत का ते......