लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

माझी लेक अता १४ महिन्यांची आहे. खूप ऍक्टिव आणि खेळकर आहे. तिची बाकी डेव्हलपमेंट व्यवस्थीत आहे.पण तिचे वजन ऍवरेज पेक्षा कमी आहे. ती formula घेत नाही. गाईचे दूध देण्याचा प्रयत्न चालू आहे. चीज, दही आवडीने खाते. खाण्यात पण मी जास्तित जास्त पौष्टीक देण्याचा प्रयत्न करते. तिचे वजन वाढण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का?

मला एका कलीगने Pediasure - suppliment देण्यास सुचवले आहे. कुणाला माहित आहे का या product बद्दल?

हो,मला चांगला अनुभव आहे त्याचा.माझ्या मुलीच्या पेडियाट्रिक डायेटिशिअन नेच मला सान्.गितले होते.माझी मुलगी ते आवडीने घ्यायची, बाकि खाण्याचे खूप नखरे होते.अजुनही आ हेतच तसे.त्याने वजन वाढेल का मा।ईत नाही , पण न्युट्रिशनसाट्।ई छान आहे.त्यात फ्लेवर पण आहेत.

माझा मुलगा अडिच वर्ष वय, एक महिन्यापासून ऑबझर्व करत आहे आवाज खूप तुटक फाटल्यासारखा येतो, जेव्हा खेळताना ओरडतो तेव्हा तर तसा येतोच पण जेव्हा नाहि ओरडत तेव्हाहि तसेच.
नॉरमल बोलतानाहि मग असेच बोलतो , दिवसभर असाच आवज नसतो काहि पण ३-४ तास दिवसाचे हाच आवाज असतो.
इएन्टि वाल्याकडे नेले १०० डोलर घेतले त्याला हातहि लावला नाहि, तपासलेहि नाहि, स्क्रिमस वॉइस सांगितला, काहि मेडिसिन पण सांगितले नाहि.
काहि घरगुति देउ का? मध सुरु केले आहे.

पीडिआ शुअर शेवटचा उपाय असावा असे मला वाटते. बाकी अन्नधान्य/फळा/भाज्यांमधुन जे पौष्टीक घटक मिळतात ते केव्हाही जास्त चांगले. माझ्या मुलाचे पण वजन पण फार "वजनदार" नाही पण त्याच्या डॉ च्या भाषेत पीईंग/पूपींग करतो आणि खेळतो-बिळतो मग वजन थोडे कमी जास्त चालायचेच.
.
तिच्या प्रत्येक खाण्यात एक चमचा iron fortified cereal मिसळुन बघा. माझ्या मुलाला ते आवडत नाही आणि अगदी अर्धा चमचा जरी घातले तरी तो जे तोंड घट्ट मिटुन घेतो ते तासभर उघडत नाही. तेव्हा तुमच्या मुलीच्या आवडी नुसार घाला.

हॅलो, माझ्या समस्येलाहि उत्तर द्याना प्लिज.

लाजो, मुलगी ऍक्टीव्ह असेल आणि तिची शारीरीक, बौद्धिक वाढ व्यवस्थित असेल तर वजनाबद्दल जास्त काळजी करू नकोस. आपलं नेहमीचं जेवण आणि फळं, सुकामेवा वगैरेंचा आहारात समावेश असला की वेगळं काही द्यायला लागत नाही मुलांना.... शक्यतो supplement food देऊ नकोस आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर अजिबात नको.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
लेक खूप एक्टीव आहे. तिची बौद्धिक आणि शरिरीक वाढ पण व्यवस्थित आहे. फक्त वजन वयाच्या मानाने कमी आहे म्हणून जरा काळजी वाटते. तिला जास्तित जास्त पौष्टीक आहार देण्याचा मी प्रयत्न करते आहेच.
तुम्हा सर्वांचे अनुभव आणि सल्ले वाचुन जरा काळजी कमी झालीये. धन्स...

हा प्रश्न आधी विचारला असेल तर माहीत नाही )
माझ्या मुलाला (४ वर्षे वय) सतत सर्दी खोकला होत असतो २०/२५ दिवसांआड.
कफ होतो आणि २/३ दिवस ढास लागणे, उलट्या, बारीक ताप, जेवण न जाणे असे प्रकार. सारख सारख antibiotic द्याव लागत. डॉ म्हणतात, ५/६ वर्षाचा होइपर्यंत असच होईल. काही घरगुती उपाय आहे का? वासावलेह चांगले म्हणतात, द्यावे का? बाकी त्याची तब्येत चांगली आहे हे सोडल्यास.

मला हे जाणुन घ्यायचे आहे की "करट" या शब्दाला इंग्रजी मध्धे काय म्हणतात.
करट म्हणजे त्वचेचा आजार. आणि मला हे पण जाणुन घ्यायचे आहे कि, त्यावर काही घरगुती उपचार आहे का ?

धन्यवाद,
सुयोग

आमचे आजोबा करट झाले की त्याच्यावर पोटीस बांधायचे. (हा पोटीस शब्द कुठल्यातरी इंग्रजी शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे). करट झाले की त्यावर पोटीस बांधायचे हा गावातला सर्वसाधारण उपाय होता. ते पोटीस कसे करतात हे घरी कुणालातरी विचारुन सांगतो.

माझ्या मुलिला एक्झेमाचा त्रास होत आहे. डॉ. ने तिला बाथटबम्ध्ये , ओट्मील मिक्स केलेल्या पाण्यात आंघोळ घालायला सांगितले आहे. बहुधा त्याचा फायदाही होत आहे पण ओट्मील वापरायचा दुसरा काही रस्ता नाही का? हे बाथ प्रकरण वेळ्खाउ आणि त्रासाचं आहे. मी करु शकते,करतही आहे पण कोणाला काही सोपा प्रकार माहित असेल तर कृपया कळवा.मी डॉ.ला ओटमीलच्या लेपविषयीही विचारलं पण तो फक्त बाथ एके बाथ करत आहे. olive oil ही नको म्हणाला.
अजुन एक, ओट्मीलच्या packet वर लिहिलंय की,सोप वापरु नका ओट्मीलच क्लीन करतं.हेही मला विचित्र वाटत आहे.असं कसं क्लीन होईल?हे पाणि थोडं चिकट असतं.हा ओट्मील बाथ दिल्यावर baby soap ने आंघोळ घालु का?किंवा थोडं साधं पाणि अंगावर ओतु का?की काहिचं करु नको. सरळ बाहेर काढुन vacelline लावु? (अति प्रश्न झाले. :))
कोणाला काही माहिती असेल तर कृपया लिहा.

बेबी सोप वापरु नको. ओटमीलच क्लीन करतं. ते स्क्रब म्हणूनही वापरतात. पॅकेटमधल्या ऐवजी Aveeno चा ओटमील सोप मिळतो तो वापरता येईल. डॉक्टरला विचारुन पहा. शक्यतो डॉक्टर ने ज्या गोष्टी करु नका म्हटले आहे त्या करु नको. पॅकेटमधले ओटमील वापरल्यावर साधे पाणी अंगावर घालायला हरकत नाही पण जास्त नको. अंग जोरात पुसून काढू नये, टिपून घ्यायचे. यामुळेच फायदा होतो, सगळे moisture पुसून काढले तर उपयोग होणार नाही. इथे अजून चर्चा आहे-
atopic dermatitis/eczema

धन्यवाद लालु.
मी त्याला Aveeno च्या ओट्मील सोपविषयीही विचारलं पण तेही नको म्हणाला. काय फरक असणार दोन्हीत कुणास ठाउक.

कुठलाही साबण तयार करताना काही रसायनांचा वापर टाळणं अशक्य असतं. म्हणून डॉक्टरांनी अव्हीनो सोप नको असं सांगीतलं असेल. ओटमील वापरायचं झालं तर मऊ कापडात त्याच्या छोट्या छोट्या पुरचुंड्या बांधून वापरता येतील. ओटमील किती जाड किंवा बारीक आहे ह्यावर कापड ठरवता येईल. चीझ क्लॉथ, मस्लीन क्लॉथ किंवा अगदी सुती, वापरून मऊ झालेल्या साडीचं कापड वापरता येईल.

कुठलाही साबण तयार करताना काही रसायनांचा वापर टाळणं अशक्य असतं. म्हणून डॉक्टरांनी अव्हीनो सोप नको असं सांगीतलं असेल>>> ह्म्मं...पटतंय.
धन्यवाद मृण्मयी.

करट म्हणजे गळू ना? गळूला abscess म्हणतात.

आई पोटीस बांधते ते कणिक आणि हळद - एकत्र गरम करून [ भाजणार नाही इतपत] जखमेवरती
फडक्याने अथवा प्लॅस्टीकने बांधते.

माझा मुलगा सहा महिन्याचा पूर्ण आहे. मला त्याला भाज्यांचे सूप्स देउन बघायचा आहे. कुठले सूप्स त्याला देणे चान्गले आहे? कृति दिली तर फारच चान्गले.

माझा मुलगा ७ महिन्याचा आहे. परवा त्याला साडेतीन पर्यंत ताप आला होता. डॉ. शी फोन्वर बोलले... त्यांनी कॅलपॉल द्यायला सांगितले... तसेच रात्रीपर्यंत फरक नाही पडला तर antibiotic द्यायला सांगितले होते... प्ण ताप लगेचच उतरला... परवा आणि काल त्याला फक्त दुध (फॉर्म्युला व माझे) दिले होते आणि काल डाळ्-तांदळाची पातळ्सर भरड... दुसरे काही दिले नाही.... काल दुपारी एकदा, संध्याकाळी दोनदा व रात्री एकदा त्याला पात्ळ शी झाली... रंग हिरवट होता व वास येत होता... रात्री शी झाल्यापासुन तो काही खात नाहीये... माझे दुध पहाटे १-२ वेळा... सकाळी १० वाजता, अन आता संध्याकाळी ५ वाजता... मध्ये सासुबाईंनी दालचीनी, मोठी विलायची, छोटी विलायची, बडीशेप व शेपा यांचा काढा दिला... तो थोडासा प्यायला... बाकी पाणी पण पीत नाहीये... सकळि १० पासुन आत्तापर्यंत फक्त एकदा शु केलिये... रात्री पण १-२ वेळा केली... रात्रीनंतर शी नाही झाली... सासुबाई त्याला काही खायला-प्यायला देवु नको म्हण्ताहेत.. उसमे बोझ है असे म्हणाल्या..... आज डॉ फोनवर पण भेटले नाहीत... दवाखान्यात उद्या संध्याकाळी जाता येईल... (सकाळी क्लिनिक बंद असते)... रात्री छान खेळत होता... पण दिवस्भर खेळला नाही.... थोडेसे हसला असेल्..बस्स.. झोपुन आहे...अगदी मलुल दिसतोय...

काय करु? मला काळजी वाटतेय.... त्याला माझे दुध परत नव्हते म्हणुन २ वेळा फॉर्म्युला व दोन वेळा सॉलिड देत होतो इतके दिवस... २-३ वेळा माझे दुध प्यायचा....
आत्ता सासुबाईंनी अजवायन व पुदिन्याचा काढा बनवला आहे थोडीशी मोठी विलायची घालुन्...त्याला द्यायला....
काय खाऊ घालावे? प्लिज मदत करा..........

आत्ता खाण्याचा जास्त आग्रह करू नकोस. पाणी मात्र सारखे दे. चमचा चमचा एक वेळ प्यायला तरी चालेल. लाह्यांचे पाणी थोडी साखर व मीठ घालून दिवसभर देत जा. जेवणाच्या वेळी वरण भाताची गुरगुटी पेज तूप घालून, भाज्या उकडून गाळून त्यांचे सूप दे. या सूपला किंचीत कणिक तुपात भाजून सूप करताना घालायची म्हणजे थोडे घट्ट होते आणि चवपण येते.

आल्याचा रस मध घालून दे २-३ वेळा. बाकी ओवा, पुदिना काढा चालेल.
शक्यतो जे काही द्यायचे ते कोमट दे, पाणीसुद्धा.

पोटात दुखत असेल तर कापडाने शेक दे. कापडामध्ये ओवा टाकलास तरी चालेल.

आणि सासूबाईंचं ऐक की जरा! Happy

धन्यवाद अश्विनी.... भाज्यांचे सुप देते...काल सफरचंदाचा ज्युस दिला होता... थोडासा प्यायला.... नंतर शी झाली...काल दिवसभरात एकदाच पातळ... पण काल त्याने २-३ वेळा ब्रेस्ट फीड घेतले होते..अन काढा.... पाणी पण पीत नव्हता....
लालु अग त्या म्हणतात म्हणुन तर काढा देतेय... पण खायला-प्यायला काय द्यावे त्यांना पण समजत नाहीये... त्या तर खुप काळजीत आहेत, तो फॉर्म्युला घेत नाहीये म्हणुन...

सफरचंदाचा ज्यूस नको. तो सारक असतो. उलटाच परिणाम होईल.
लाह्यांचे पाणी सुरू केलेस का? लाह्या चांगल्या उकळायच्या, पाणी गाळून घ्यायचे. किंचित जिर्‍याची पूड, मीठ आणि साखर घालून चमच्याने दिवसभर पाज.

हो.... लाह्यांचे पाणी देतेय... शी कमी झालीये... दिवसातुन एकदा..पण अजुन वास आहे.... उलट्या सुरु आहेत... पण पाणी वैगरे पितोय.....खेळायला लागलाय आत्ता...

उलट्यांसाठी आल्याचा रस मध घालून किंवा सुंठ उगाळून (थोडी, फार झाल्यास उष्णता वाढेल) मध खडिसाखर घालून दे. मोरावळा पण अधून मधून चाटव.

माझी मुलगी आता ८ महिन्याची आहे. कालपासुन तीच्या दोन्ही डोळ्यात उजव्या बाजुला बुभुळाला चिकटुन जरासा लालसर रॅश दिअतोय. काय असावे?? आज तीला डॉ.कडे नेणार आहे.

दुसरे म्हणजे तीच्या शी ला अजुनहि वास येतो. खरेतर आता वास यायला नको ना??

sakhi_d,

कधी कधी मुलांची बोटे त्यांच्या डोळ्याला लागतात आणि त्या मुळे rash type दिसते but it disappears in a day or two. Same thing happening to my 2.5 month old baby and we showed it to doctor.

नमस्कार,
माझी मुलगी १४ महिन्याची आहे .तिचे वजन खुपच कमी आहे .आनि खात पन नाहि.काहि उपाय सागा.मि खुप वेताग्ले आहे

shanky, अरे असेच झाले होते. Doctor हेच म्हणाले कि ती आता रांगायला लागली आहे तर धुळ वैगरे गेली असेल. आता बरे झाले आहेत.

तरी धन्यवाद्...(खुप लवकरच देतेय ना.... :फिदी:)

माझा मुलगा ११ महिन्याचा आहे. मागच्या आठवड्यात त्याला ताप्,सर्दि,खोकला झाला होता. आता ताप गेला आहे. सर्दि वहाती आहे. खोकला पण आहे खुप सारा कफ आहे. सर्दि खोकल्या साठि त्याला होमेओपेथि चे औषध सुरु आहे.

ईथे पुणे ला खुप गरमि/उष्णता आहे सध्या. त्याचा खुप त्रास होतो आहे.सारखा किरकिर करत असतो.
खाणं पिणं कमि झालं आहे. मि त्याला गुलकन्द खायला देते आहे. अजुन काहि उपाय आहे का जेणेकरुन त्याला ऊष्णते चा त्रास होणार नाहि.

Pages