लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

जरा लग्गेच मदत हवी होती........

माझ्या मैत्रिणीच्या १५ महीन्यांच्या मुलाला मागचे २ दिवस हाय फीव्हर आहे. डॉक्टर म्हणाली व्हायरल इंफेक्शन आहे त्यामुळे अँटीबायॉटीक्स नाहीत. पण पॅरासिटॅमॉल ने ताप उतरत नाहीये. पाण्याच्या पट्ट्या, बर्फ, कंदा इ. प्रयोग चालू आहेत. अजुन काही करता येइल का?

प्लीज जरा लगेच सांगा ना. मैत्रिण जाम घाबरली आहे.

पूर्ण उघडा करून गार पाण्याने अधूनमधून स्पंजिग करा.. अन ताप आधी उतरला पाहिजे.. खूप ताप वाढला की लहान मुलांच्या डोक्यात जातो.. Sad अन पाणी पाजा सारखं मग शू वाटे पण ताप जाईल..

माझ्या लेकाच्या बेबी बूक मधे असे लिहिले आहे की ताप डोक्यात जाणे ही केवळ मिथ आहे. पण मी हे नेहेमी ऐकले आहे की ताप डोक्यात जातो. असो, इशानला इअर इनफेक्शन झाले की २-२ दिवस १०२ ताप असतो. पण त्याचे डॉक्टर म्हणतात की १०५/१०६ जात नाही आणि त्याच्या डोळ्यात ओळख/चमक दिसते आहे तोवर काळजी करायचे कारण नाही. तसेच उलट्या होत नाहीयेत ना ?

लाजो मैत्रिण हे सर्व करत असेलचः- ताप वाढला की बाळाला कोमट पाण्याने आंघोळ, भरपूर पाणी म्हणजे डिहायड्रेशन होत नाही. तसेच अधुन मधुन काळे मनुके किंवा खडीसाखर खायला द्यावे. बाकी तज्ञ सांगतीलच.

माझ्या मनूला ३ वर्षाची असताना कणकण होती तर औषध घेऊन झोपली अन २ तासात अचानक खूप ताप वाढला रडत ऊठली अन तापातली फीट आली.. convulsion म्हणाले त्याला डॉक्टर..फूड इनफेक्शन झाले होते तेव्हा. डोळे फिरवले तिने एकदम.. आईने तिच्या डोक्यावर पाणी थापले बरेच तेव्हा बुब्बुळ ठिकाणावर आली, अन क्षीण आवाजात रडू लागली.. Sad
खूप ताप अजिबात वाढू देता कामा नये.. डॉक्टर म्हणाले की ५ वर्षाचे होईपर्यंत तापावर खूप लक्ष
ठेवायला हवं..

अरूधंती,
सर्दी असेल तर सध्या गुलकंद नको. शक्यतो एका पॅथीची औषधे चालू असताना सरमिसळ करू नये. आत्ताच्या स्थितीत म्हणजे उष्णता पण आहे, कफ पण आहे अशात न पाहाता औषधे सुचवणे योग्य नव्हे. तुम्ही पुण्यातच आहात आणि होमिओपॅथीचे उपचार चालू आहेत तर त्यांनाच विचारले तर योग्य ठरेल.

गरमी आहे म्हणून शक्यतो मुलांना कमी कपड्यात ठेवण्याचा कल असतो पण वार्‍यात जाताना अंग विशेषतः छाती झाकली आहे ना ते पाहावे. नाहीतर सर्दी, कफ होतो.
मुलांना हलके सुती कपडे घालावेत. फॅनचा वारा एकदम त्यांच्या अंगावर येणार नाही असे पाहावे. प्यायला थंड पाणी देऊ नये.

सर्दी नसेल आणि खूप तलखी होत असेल तर अंगाला चंदनाच्या पावडरचा लेप करून लावावा. तळपायाला शतधौतघृत लावावे.

लाजो,
कपाळावर, हातापायावर गार पाण्याच्या पट्ट्या चालू राहू देत. एकदम बर्फाचे पाणी घेऊ नये. साधारण गार असावे.
सतत म्हणजे दर अर्ध्या तासाने, लाह्यांचे पाणी, मनुका खडीसाखर घातलेले पाणी पाजायला सांग. चमचा चमचा एका वेळेस प्यायला तरी हरकत नाही.

गुळवेल सत्व मोरावळ्यातून दिवसातून ३-४ वेळा चाटवायला सांग.
खाण्याचा आग्रह नको. भाताची पातळ पेज, सूप घेतले तरी चालेल.

लाजो ताप १०२ किंवा वर असेल तर माझ्या मुलाला आम्ही वोलटारेन ही सपोजिट्री देतो. (त्याला १ वर्षाचा असताना फीट आली होती.) कमी ताप असेल तर पाण्याच्या पट्ट्या आणि दर चार तासांनी पॅरासिटॅमॉल (अ‍ॅडॉल किंवा कॅलपॉल). अंघोळ घालतांना डोक्यावरुन घालावी. जितकं पाणी देणं शक्य होइल तितकं चांगलच. दुधभातसाखर मिक्सर मधुन छान बारीक करुन (दुध जरा जास्त असावं) जरा पातळ आणि कोमट करुन भरवाव.

माझ्या मुलालाही एक वर्षाचा असताना खूप तापामुळे फीट आली होती. त्याला जेव्हा जेव्हा ताप येतो तेव्हा नेहमीच १०२ किंवा १०४ ताप येतो. मेफटाल-पी किंवा क्वचित एखाद वेळी लो टेंप हे औषध द्यावे लागते.
अना मिरा म्हणते तसं डॉ. नी पाच वर्शा पर्यंत काळजी घ्यायला सांगितली आहे.

मी त्याला साध्या पाण्याने स्पंजींग करते.. शक्य तोवर एक्दम पातळ कपडे घालून ठेवते. ताप पुर्ण उतरेपर्यंत कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवते. आणी कांद्याचा रस तळपाय कपाळ आणी हाताच्या तळव्यांना चोळते.

तरिही तासा दोन तासात ताप उतरला नाही तर, ड्युकोलॅक्स सपोजिटरी द्यावी लागते.
कोमट पाण्याच्या आंघोळीने बरेचदा उतार येतो पण काही वेळा थंडी वाजून पुन्हा ताप येतो.
तापात मुलं जेवढं पाणी पितिल तेवढं चांगलं.

माझ्या लेकाला जेव्हा असा ताप यायचा तेव्हा मलाही खूप भिती वाटायची. पण आता मी सांभाळू शकते.
अश्या खूप तापाच्या वेळी घरात आई किंवा सासूबाईंसारखे कुणी अनुभवी नसेल तर आपली भंबेरी उडते.
दोन चार वर्षात मग हळूहळू आपल्याला सवय्/माहीती होते.. ताप चढा-उतरायचा कालवधी..उपाय ई.

डाफोडिल, एसआरके माझी मनी कमी वजनाची असल्याने तिला सहाव्या वर्षी परत एकदा असाच त्रास झाला. पण त्यावेळेला तिने दात घट्ट आवळून मान फिरवून प्रतिकार केला. मी कामावर गेलेले होते.. मामीने व शेजारच्या बाईने तिला गार पाण्याच्या बादलीत बसवले, नंतर पुसून पट्ट्या ठेवायला सुरूवात केली.. आता ती १३ वर्षाची आहे. तिला माझ्यासारखीच हाय टेंपरेचरची टेन्डन्सी आहे..
दोन्ही वेळी मी फारच घाबरले होते. दुसर्‍या प्रसंगानंतर तर मी नोकरी सोडून घरी बसले २-३ वर्षे. तिच्या आहाराकडे नीट लक्ष दिले तेव्हा कुठे ती अंगाने बरी झाली. कमजोर बालके हाय टेंपरेचर सहन करू शकत नाहीत असे मला वाटते. बाकी सर्वांनी योग्य त्या सुचना दिल्या आहेतच म्हणा.

हाय टेंपरेचर असताना स्पंजिंग किंवा पट्ट्या जरूर ठेवाव्या पण आंघोळ घालू नये. डोक्यावरून तर मूळीच नको. त्याने कफ होऊन ताप वाढू शकतो. कपाळ आणि हाता पायावर गार (अतिथंड नव्हे) पाण्याच्या पट्ट्या पुरेश्या आहेत.

अश्विनि, अगं मला डॉ.नीच सांगितलय. याला फीट येउन गेल्यामुळे असेल. पण त्याचा ताप लवकर उतरतो. मलापण ५ वर्षापर्यंत काळजी घ्यायला सांगितलय. असो. लाजो, तुझ्या मैत्रिणीच बाळ कसं आहे आता? लवकर बरा होउ देत बाई.

तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बाळ आता बरा आहे. ताप उतरला आहे पण सर्दी आहेच. खूप मलूल झालाय. खाणं-पीणं नीट घेत नाहीये. वरणाचं पाणी, पातळं भात इ इ देण्याचा प्रयत्न मैत्रिण करत्येय. त्यालाही फीट आली होती. अँब्युलन्स बोलवलीन तीने घाबरून. हॉस्पिटल मधे नेले. म्हणे वायरल इन्फेक्शन आहे. पण आता मेन म्हणजे ताप उतरलाय. तुम्हाला परत एकदा थँक्स वेरी मच.

srk, इथे डॉक्टर्स सांगतात तसं. पण खरोखर नुसत्या स्पंजिंगने पण तोच परीणाम होतो आणि इतर प्रॉब्लेम्सचा धोका उरत नाही.

माझा मुलगा आता ८ माहिन्याचा आहे.त्याचे जावळ मे मध्ये काढनार आहे.तेव्हा उन्हाळा कडक असतो .त्यामुळे असे विचारायचे आहे की केस काढल्यावर काय लावावे,काढण्या अगोदर व नतर काय काळजी घ्यावी? मी भारतात असते.त्यामुळे ईकड्चे उपाय सूचवावेत. धन्यवाद.

जावळ काढल्यावर कोरफड चा गर लावा. शान्त वाटते. नन्तरही उन्हात डोकं उघड ठेउन बाहेर जाऊ नका.
तळहाताला खोबर्याचे तैल लऊन रोज "चंपी" वरुन हात फीरवत जा.
Happy

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

माझ्या मुलाला (वय १६ महीने) सारखा food poisoning चा त्रास होतो आहे. क्रुपया काय उपाय केल्यास हा त्रास होणार नाही? त्याचा आहार अगदी व्यवस्थीत आहे पण आता या त्रासामुळे त्याचे वजन खुपच कमी झाले आहे. Please help me.

food poisoning ? कशाने होते आहे food poisoning ?

(हायला झोपच उडाली की एकदम Wink )

काहीही खाल्ले की जुलाब, उलट्या होतात की अजुन काही?

masa mulga 20 mahinyacha ahe pan tyla tewadhe kes (hair)nahi mi kay karu koni suchwale ka plz.................

माझ्या १० महिन्यांच्या मुलाला गेल्या ३-४ दिवसांपासुन खुप कॉन्स्टीपेशन होतय... शी रोज होतेय पण त्याला त्रास होत असल्यामुळे तो शी करायला घाबरतोय्..खुप रडतोपण शी करायच्या वेळी.. सध्या ऊन पण खुप आहे.. त्याला भरपुर पाणी देतेय, काल पासुन ओव्याचा काढा दिला..
तो रोज थोडासा फुलका, भाजी/वरण, खिचडी किंवा वरणभात, रव्याची खीर्/शिरा/उपमा, नाचणी सत्व / खिमटी / गव्हाचे सत्व, केळे /द्राक्षं / आंबा, दुध यापैकीच का।इ गोष्टी आलटुन पालटुन खातो.. खाण्यात काही बदल करावे का? अजुन काय द्यावे? काही घरगुती औषध?

अल्पना,
पाणी भरपुर पाजा.
जेवणातील fiber चे प्रमाण वाढवा.
रोज २ चमचे तुप खाउ घाला.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

अल्पना-
माझ्या मुलीलाही कधी कधी असा त्रास होतो. सालासकट सफरचंद/चिकू/ काकडी/ टोमॅटो /प्रुन्स (मिळाले तर) खायला देत रहाणे + बिस्कीट बंद/ दामटून झोपवणे/झोप पूर्ण होईल हे बघणे हे उपाय तिला लागू पडतात.

वर मनू नी नमुद केल्याप्रमाणे फायबर वाढवावे. उदा- खिचडीत - पालकाची पानं बारीक करुन टाकणे + टॉमेटो / कधी कोथींबीर तर कधी काही भाज्या टाकणे.

नाचणी मुळे ही असे होते हा लेकीच्या बाबतीतला अनुभव. शेवटी ती वर्षाची झाल्यावर आम्ही नाचणी देणे बंद केले.

गर्मी साठी आम्ही गुलकंद देतो सध्या (तो तिला का कोण जाणे पण आवडत नाही- त्यामूळे तो देणे ही कसोटीच असते. तरीही.)

अजून एक- तिच्या आवडत्या व्यक्ति घरी असल्या/ रोज व्यवस्थित वेळच्यावेळी झोप झाली की पोट साफ असतं. मी दोनचार दिवस ऑफीसच्या कटकटींमध्ये गुंतले की पोटाचे हाल सुरु. हे कितीही हास्यास्पद वाटलं तरी खरं आहे.

धन्यवाद रैना....
टॉमेटो घातलेलं काहीही आवडतं त्याला.. त्यामुळे त्याच्या खिचडीत, वरणात अन रव्याच्या मिठ घातलेल्या लापशीत तरी टॉमेटो घालते...पालक खुप दिवसात खाल्ला नाहीये, आज देवुन बघते. बाकी आंब्याचा काय परिणाम होतो? परवा अन तेरवा त्यानी आंबा खाल्ला होता..परवापर्यंत रोज केळं खायचा तो, पण कालपासुन देत नाहीये त्याला. प्रुन्स तर नाही मिळणार, त्याऐवजी मनुका पाण्यात भिजवुन चालेल का?
मी पण आजच घेवुन आलेय गुलकंद्..बघुया खातो का?

काळ्या मनुका पाण्यात भिजवून उत्तम.. आणि सकाळी एका ठराविक वेळी त्याला थोडावेळ बसवत जा. साधारण तो उठला की दुध पिऊन झालं की.. आणि सुरूवातीला नाही झाली तरी ८ दिवसात लागायला लागेल बघ शी.. बाकी मलावरोधासाठी बाकीच्यांनी लिहीलं आहेच.. Happy

अल्पना,
एकदम सोपा नी खूप चांगला उपाय आहे:
रात्री झोपताना, कोमट पाण्यातून / कोमट दूधातून २ चमचे साजूक तूप द्या त्याला नी बघा...
शी मऊ होऊन अजिबात त्रास होणार नाही

धन्यवाद मनकवडा, आत्ता आई पण असचं सांगितलंय.. आता हे सगळे उपाय, अन खाण्यातले बदल करेन.. Happy

तूप कोमट पाण्यातुनच द्यावे असे मी पण ऐकले आहे.

केळं देउ नकोस. हिरवे मटर बारीक करुन खिचडीत घालु शकतेस. पेअर्स मिळत असतील तर ते दे. दिल्लीला प्लम्स भरपूर मिळतात ना, ते पण दे. भात पटकन पचतो त्यामुळे खिचडीत तांदळाचे प्रमाण कमी ठेवुन बाकी भाज्या/डाळ जास्त घालुन बघ. एखाद्या सुपर मार्केटमधे ड्राइड प्रुन्स, प्रुन ज्युस मिळेल कदाचीत. आणि भरपूर पाणी तर हवेच. शी लागत नसेल तर पोटाला हलका मसाज करुन बघ. बाकी अश्विनी सांगेलच.

अल्पना, गहू आणि गव्हापासून होणारे बाकी पदार्थ काही दिवस बंद करता आले तर बघा. लहान मुलांमधे बध्दकोष्ठतेची कारणं बरीच असु शकतात. पण गहु आणि पर्यायाने ग्लुटेन कमी दिलं तरी योग्य परिणाम होतो. एकदा डॉक्टरला विचारून घ्या. मोठ्यांना मिल्क ऑफ मॅग्नेशिया मुळे खूप बरं वाटतं. तसं लहान मुलांना काय देतात येईल ते विचारा.शीच्या जागी जखम झाली असेल तर तज्ञाच्या सल्ल्यानुसार एखादं औषध किंवा कैलाश जीवन लावता येईल.

Pages