Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायनसचा त्रास आहे का?
सायनसचा त्रास आहे का?
केस लगेच मोकळे करून झटकून
केस लगेच मोकळे करून झटकून टाकतात >> कदाचित हेच कारण असावं. गरम पाण्याने केस धुतल्यावर लगेच गार हवा लागली की डोकं दुखू शकतं. डोक्याला स्कार्फ न बांधता वारं अंगावर घेत सकाळी गाडीवरून गेलं की पण दुखतं डोकं. न्हायल्यानंतर केसांतून टपकणारं पाणी थांबेल एवढेच केस पुसा व पंधरा वीस मिनीटं टॉवेल बांधून ठेवा. मग हळूहळू मोकळे सोडून पुसा, गुंता सोडवा. डोकेदुखी जाणवणार नाही.
केस बांधायला जाड टोवेल वापरु
केस बांधायला जाड टोवेल वापरु नका. पातळ सुती कापडाचा वापर करा. म्हणजे ओढणी किंवा सुती साडीचा तुकडा. मी को-ऑप्टेक्स मधुन पातळ पंचे आणले आहेत. त्याने केस गुंडाळते. शक्य असल्यास हेअर ड्रायरने केस थोडे वाळवून घ्या
मी पण समदु:खी कॉलेजपासून च
मी पण समदु:खी
कॉलेजपासून च केसात रुपेरी छटा दिसू लागल्याने तेव्हा मेहंदी लावायला सुरू केली. त्यात पुर्ण अंडं मिक्स करून लावत असल्याने रंग आणि पोत चांगला होता केसांचा फक्त अंड्याचा वास... अरेरे....
अनेक वर्ष हे फॉलो केल्यावर एकदा (पुण्यातली) पार्लरवाली म्हणाली रंग लाव आता, मेंदीत रंग नीट येत नाही आणि वेळ ही भरपूर जातो, मग रंगाकडे वळले. तरीही पहिल्यापासून लॉरिअल चा ३.१६ बरगंडी वापरते (रंग बदलला नाही कधीच) बरेच केस पांढरे आहेत. रंग न लावता स्वतःचे पांढरे केस कधीच धीर करून पाहिलेले नाहीत.
इथे ग्रेनील बद्दल वाचून ते लावणं सुरू करावं असं वाटतंय.
ग्रेनील मध्ये रंग मिळतात का?
संपुर्ण केसांना लावायचं की फक्त मुळांना?
किती वेळ ठेवायचं?
रंगावरून डायरेक्ट ग्रेनील वर शिफ्ट मारली तर चालेल का?
ग्रेनिल मेहंदी नाहीच्चे. आय
ग्रेनिल मेहंदी नाहीच्चे. आय मीन, प्युअर हर्बल मेहेंदी नाहीए. यामधे काही डाय/ केमिकल आहे म्हणे. मग कलर का नको? ग्रेनिल का वापरावा? ज्यांनी दोन्ही वापरलं आहे त्यांनी सुचवा कि कलर बरा कि ग्रेनिल?
ते कलरपेक्षा कमी हार्मफुल आहे
ते कलरपेक्षा कमी हार्मफुल आहे असं म्हणतात, खखोदेजा
मला ग्रेनिल चा रंग बिलकुल
मला ग्रेनिल चा रंग बिलकुल आवडला नाही बहुदा केस जास्त पांढरे असतील तर वेगळा effect दिसत असेल मुझे पुढचा भांग बराच पांढरा आहे so colour must
ग्रेनिल मेहंदी नाहीच्चे. आय
ग्रेनिल मेहंदी नाहीच्चे. आय मीन, प्युअर हर्बल मेहेंदी नाहीए. यामधे काही डाय/ केमिकल आहे म्हणे. मग कलर का नको? ग्रेनिल का वापरावा? ज्यांनी दोन्ही वापरलं आहे त्यांनी सुचवा कि कलर बरा कि ग्रेनिल?
ग्रेनिलमध्ये मेहंदी आणि इन्डिगो पावडर आहे. डाय/केमिकल अजिबात नाहीय. उर्जिता जैनचे प्रॉडक्ट आहे. त्यामुळे ब-यापैकी विश्वास आहे.
अमि & साधना, थँक्स. या
अमि & साधना, थँक्स. या विकेंडला पहिल्यांदाच लावणार आहे.
डाय/केमिकल अजिबात नाहीय.
डाय/केमिकल अजिबात नाहीय. उर्जिता जैनचे प्रॉडक्ट आहे>>>>>>>> माझ्या बाईने मला ग्रेनील लावताना ,ग्लोव्हज काढून टाकले आणि नुस्त्या हाताने लावले होते.८-१० दिवस हाताची पहिली पेरं काळी होती.डाय असणारच.
देवकी तुमचे बरोबर आहे, इंडिगो
देवकी तुमचे बरोबर आहे, इंडिगो पावडर indigofera tinctoria हा नैसर्गिक डाय आहे. मला वाटले तुम्ही कृत्रिम रासायनिक डाय बद्दल बोलत आहात म्हणून मी नाही म्हटलेले.
केसांना नुसती मेंदी लावली तर ते लाल होणार, काळे नाही. मी बरीच वर्षे नुसती मेंदी, नुपूर, सुप्रीम इत्यादी वापरलीय. इंडिगो पावडर वापरून केसांचा हवा तो रंग मिळवता येतो.
अच्छा.
अच्छा.
साधना- मी इथल्या पोस्टी वाचून
साधना- मी इथल्या पोस्टी वाचून ग्रेनील गेले वर्शभर लावतेय. त्याआधी गार्निअर - ब्लक लावत होते(२ ते ३ वेळाच लावलाय). माझे माथ्यावरचे केस जास्त पांडरे आहेत. पण ३ तास मेंदी थापूनही केस पूर्ण कलर होत नाहीत. आणि ८-१० दिवस हाताची पहिली पेरं काळी वगेरे रहीली नव्ह्ती. दोन दिवसातच ओके होती. पुन्हा कलरकडे वळणार होते. पण इथे वाचून नको वाट्तेय. गार्निअर लावण्याअगोदर केस १०-१५% पांडरे होते. एक वर्शानंतर २५-३०% पांडरे झाले. पण ग्रेनिल लावल्यापासून तेवडेच पांडरे आहेत. मी ग्रेनिल २० देवसातून लावते. शिवाय घरातच जास्वंद आहे. ते पण ग्रेनिल्मधे मिसळ्ते.
परवा एका घरगुती कार्यक्रमात ५०+ काकवांचे केस छान काळेभोर होते. त्या मला म्हणाल्या, अगं लावत जा काहीतरी. शिवाय नवरा कलर(गार्निअर) करतो. त्या दिवशी मला कसंसच झालं.
सायनसचा त्रास आहे का?>>>>
सायनसचा त्रास आहे का?>>>> नाही हो.त्रास नाही आहे.पाहु तुम्ही दोघांनी सांगितलेले यावेळी ट्राय करुन पाहते.
ननी लोकांचे काळे केस बघुन
ननी
लोकांचे काळे केस बघुन थोडे वाईट वाटते हे खरे आहे.
कोणीतरी नेटवर लिहिलेले की ग्रेनिलमध्ये कधीकधी डुप्लिकेट माल येतो अशी शंका आहे. मलाही काही वेळा असा अनुभव आलाय. केस रंगत नाहीत. गेल्या ३ वेळा वापरालेल्या पॅकमधुन मात्र चांगला रंग आला. ब्राऊन वापरली तर वेळ लागतो रंग चढायला. ब्लॅक वापरली तर केस लवकर काळे दिसतात. मला ब्लॅक सुट करत नाही कारण मुळचे केस ब्राऊन आहेत. म्हणुन मी ब्राऊनच वापरते.
माझेही केस आता पांढरे दिसू
माझेही केस आता पांढरे दिसू लागलेत. म्हणजे मोकळे सोडले किंवा बांधले तरी दिसून येतात. काही तरी करायला हवचं. इथली चर्चा वाचून ग्रेनिल वापरावं असं वाटतयं पण कालच पतंजलि च्या केशकांती नॅचरल कलर बद्दल कळालं. कुणी वापरलं आहे का?
सर्वात पहिल्यांदा कलर वापरावा की मेहंदी? पार्लरवाली सांगते नेहमी कलर च लावा. मेहंदीच्या वाटेलाही जावू नको. खूप कन्फ्यूज झालीये.प्लीज तुमचे अनुभव सांगा..आगाऊ धन्यवाद.
ब्लॅक वापरली तर केस लवकर काळे
ब्लॅक वापरली तर केस लवकर काळे दिसतात>> ह्म्म. हा अनुभव मला पण आलाय.
डिंपल- कलरने केस जास्त गळतात. पहिल्यांदाच केसांच्या वाटेला जायचे असेल तर नैसर्गिक उपाय करून बघा. निदान अपाय नाही.
माझे केस हळूहळू पांढरे
माझे केस हळूहळू पांढरे व्हायला लागले आहेत. पण इथली चर्चा वाचून केसांना काहीहीच लावायची हिंमत होणार नाही असं आकळलं
मला वाटतं मी salt and pepper look च ठेवीन आणि नंतर white 
धन्यवाद ननि. मेहंदी च वापरुन
धन्यवाद ननि.
मेहंदी च वापरुन पहावी असं वाटतयं .उर्जिता जैन ची .
ननि, ग्रेनिल मध्ये जास्वंद कशी मिक्स करता? फुल वाटून त्यात टाकून किती वेळ ठेवता किंवा कसे?
लाल जास्वंदाची फुले परागकण
लाल जास्वंदाची फुले परागकण काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्यातच कोरफडीच्या एका पानाचा गर टाकायचा.गर्र फिरवायचे. ते मेंदीत मिक्स करायचे. सध्या बाजारात ताजा आवळा मिळ्तो. तो ही खिसून त्यात टाकायचा. याच धाग्यावर मागे वाचलेय की मेथ्या ही वापराव्यात.
मी डॉ.जैन जास्वंद जेल आणलयं..
मी डॉ.जैन जास्वंद जेल आणलयं.. त्याचा वास नि टेक्स्चर पण गुलकंदासारखंच आहे
आज केशकांतीने शॉम्पु करुन मी हे जेल लावलं ..५ मिनिट ठेवुन धुतल्यावर मला केस एकमेकांना फारच चिकटलेत असं वाटलं .. नंतर लिवॉन लावुन केस कोरडे केले तर मऊ वाटतायत .. हे असचं होत का माकाचु?
एक चमचा जास्वंद जेल दोन चमचे
एक चमचा जास्वंद जेल दोन चमचे पाण्यात डायल्यूट करून लावायचं असतं.
केशकांती शाम्पू मुळात खूप कोरडा आहे.
पुन्हा धन्यवाद ननि. मी कालच
पुन्हा धन्यवाद ननि.
मी कालच आणलय ग्रेनिल. आज लावणार आहे. रिझल्ट लिहिते एक दोन दिवसात..
चनस मी आजच जास्वंद जेल लावलयं.केशकांती ने शाम्पू केल्यावर .छान म ऊ झालेत केस. नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे डायल्यूट करुन लावून पहा.
ओके नीधप .. थँक्स
ओके नीधप .. थँक्स
डीम्पल, मेंदी भिजवताना
डीम्पल, मेंदी भिजवताना उकळते पाणि टाक त्यात आणि बराच वेळ चमच्याने फिरवत राहा. थोडीशी गरम असतानाच लाव केसांना. एकदम थंडगार करुन लावू नकोस. निलगीरी तेल घालायचे असेल तर लावताना घाल. आधी घालुन ठेऊ नकोस.
डिंपल, ग्रेनील लावून झाल्यावर
डिंपल, ग्रेनील लावून झाल्यावर त्या दिवशी नुसत्या पाण्याने आणि दुसर्या दिवशी रात्री तेल लावून, तिसर्या दिवशी केस शॅम्पूने धूवायचे असतात. मी आतापर्यंत त्याचे दिवशी रात्री तेल लावून नेक्स्ट डे केस धूवायचे. परवा ग्रेनील लावताना इन्स्ट्र्क्शन्स पुन्हा एक्दा नीट वाचली तेव्हा साक्षात्कार झाला.
मी इथेच वाचून ग्रेनील लावायला सुरवात केली. कलर करायचे न्हवते. सध्या तरी ठीक वाटते आहे. पण फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल.
थॅंक्स साधना आणि सामी..
थॅंक्स साधना आणि सामी..
मी नीधपच्या नारळाच्या दुधाचा
मी नीधपच्या नारळाच्या दुधाचा उपाय करतांना चक्क डाबरचे टेट्रा पॅकचे रेडिमेड दुध वापरते. मागे कोणीतरी लिहीले आहे ना, नारळाचे दुध काढणे कटकटीचे वाटते म्हणुन लिहीले. मी विचार केला, त्यात काही केमिकल असले तरी आपण जर ते खाऊ शकतो तर केसांना लावायला तर काहीच हरकत नाही. आणि रिझल्ट्स मिळतात.
मी ग्रेनिल ची ब्राऊन मेहंदी
मी ग्रेनिल ची ब्राऊन मेहंदी काॅफी च्या गरम पाण्यात भिजवली .लगेच लावणार होती पण पाहुणे आल्यामुळे राहिलं.थेट संध्याकाळी ७ ला लावली. २ तासानी केस धुतले..
सामी ने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तेल लावून तिसऱ्या दिवशी केस धुतले.जास्वंद जेल ही लावलं होतं तेव्हा मऊ झाले केस. कलर ही ठीक आला केसांना.म्हणावं तसं जास्त रंगले नाहीत केस.
अश्विनी, आवडला हा शॉर्टकट.
अश्विनी, आवडला हा शॉर्टकट. मला ना.दु काढणं अवघड वाटत होतं, पण हा सहज आणि सोपा उपचार आहे. आणि तुझं ते केमिकलवालं लॉजिक पण पटण्यसारखं आहे.
Pages