केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉल्ट न पेपर मधले सॉल्ट वाढल्यावर काय करायचे ते ठरवले नाही.>>>> मेरेको सच मे नहीं झेप्या... म्हण्जे काळे पांढरे केस अस का ????

ममा, मी आधी २ वेळा केलाय कलर पण त्याला साधारण २-२ १/२ वर्षं उलटुन गेलीत आणि आता बरेच पांढरे केस दिसु लागलेत. म्हणुन हा खटाटोप. मेंदी लावुन कोरडे होतात आणि कलर लावुन खुप पिकतात असा रिव्यु मिळालाय.. आता टक्कल करणंच बाकी आहे... Proud

मनिमाऊ, उलट आहे. मेंदीनंतर कलर नीट बसत नाही. किमान सहा महिने जाऊ द्यावे लागतात. सहा महिने हे माझ्या पार्लरवालीनेच सांगितलंय.

योडी कलर लावुन पण कोरडे होतातच. मग आता असं क्म्पेअर कर कि मेहंदी लावुन फकत कोरडे होतात आणि कलर लावुन कोरडे होतातच, शिवाय अजुन जास्तच पांढरे होतात.

श्रद्धा, थँक्स. तसाही एकदा हा प्रयोग करायचा आहेच. आता कलर करुन ५ महिने झालेत तर सरळ मेहेंदी लावुन टाकते.

मेहेंदीमधे काय काय घालावं हे शोधण्यासाठी सगळा चॅट पुर्ण वाचावं लागणार का? बापरे !!

तो शांपू आणला होता. पण त्याचा वास बीयर चाच आहे Happy एक दोन वेळा वापरला होता, कंडीशनर म्हणून ठिक होता.
बीयर लावून नंतर कशाने तरी धुवून वास कमी होईल पण बीयर चा शांपू लावून तो आंबूस घाणेरडा वास केसात ठेवावा लागेल.

केसांवर मेण्दीचा रंग असेल तरीही दुसरा रंग नीट चढत नाही. मी एकदा घरचे खुपच प्रेशर आल्याने पार्लर वालीला केस रंगवण्याबद्दल विचहरले. तिने माझे मेंदीचे केस पाहुन केस नीट रंगणार नाही, मधुन मधुन पॅचेस राहतील. मी रंगवुन द्यायला तयार आहे पण हा धोका आहे, तो कसा फेस करायचा ते तुम्ही पाहा म्हणुन सांगितले. मी तर काय, अस्ले काहीतरी ऐकाय्ची वाटच पाहात होते. पैसे वाचल्याच्या आनंदात मी घरी परतले. तेव्हा तसेही केस कमरेइतपत लांब होते. त्यामुळे भरपुरच पैसे वाचले याचा खरेतर अत्यानंद झाला होता.

मीही बरेच वर्ष नुपुर मेण्दी वापरली, केस खुप कोरडे होत, मला त्यांना हात लावावेसेही वाटात नसे. पण आता फक्त आणि फक्त ग्रेनिल. अजिबात कोरडेपणा नाही. मात्र मेण्दी धुतल्यावर न चुकता तेल हवेच. आणि ते जर ना.दु असेल तर मग .. आहाहा.. असा मऊपणा येतो की केस परत परत हात फिरवुन बघावेसे वाटतात.

मी सॉल्ट एण्ड पेपर चा उद्योग करुन पाहिला. चेह-याला अजिबात शोभला नाही माझ्या, वर म्हाता-यासारखे दिसायला पण लागले. Sad Sad आता या अशा अर्धवट वयात असे वरुन म्हाता-यासारखे दिसणे अजिबात सोसवत नाही. शारिरिक आणि मानसिक आघात एका वेळेस होताहेत असे वाटायला लागते. साठी गाठली की करेन विचार.

कलर लावल्यानंतर केस पांढरे का होतील पण? मी फॅशन कलर, हायलाईट बरेचदा केलंय. असा अनुभव आला नाही. केस कोरडे होत असतील तर हेअर स्पा, डीप कंडिशनिंग मस्ट आहे.

ग्रेनिल काय आहे? मेहेंदीचा ब्रँन्ड? नुसतीच लावायची कि त्यातही काही मिक्स करायचं?

आणि ना.दु = नासलेले दुध का? ते कसं आणि कधी लावायचं?

यंदा केसांची दुरुस्ती आणि नंतर व्यवस्थित काळजी घेणं हे नविन वर्षाच्या resolution मधे आहे.

ममा, नादु म्हणजे नारळाच दूध गं Proud
केसांची निगा यावर फक्त वाचन चालुये सध्या...ऑलमोस्ट टक्कल पडलयं थंडीत केस अजुनच गळतात म्हणे Sad

<< ग्रेनिल काय आहे? मेहेंदीचा ब्रँन्ड? नुसतीच लावायची कि त्यातही काही मिक्स करायचं? >>

ही डॉ. ऊर्जिता जैन यांची मेहेंदी आहे. गरम पाण्यात भिजवुन, ५-१० मिनिटे घोटुन लावायची.

आदल्या दिवशी भिजवावी लागत नाही..

पॅक बरोबर सविस्तर सुचना + हातमोजे + २ रबर बॅन्ड्स मिळतात Happy

या बाफवर वाचुन , केसा साथी 'सिसा' तेल आणले. त्याने केस गळणे कमी झाले. एकदा शिकेकाइ ने आणी ड्व शाम्न्पू ने केस धुते. बाकी पुर्वि लोरिअल टोट्ल रिपेअर ५ + बोरिग चे पाणी याने केसची वाट लावली होति.

केस खूप गळताहेत आता पूर्वीच्या केसांच्या जेमतेम २०% राहिलाय केसांचा व्हॉल्युम, काय करावे???

नीधप आणि अश्विनी के. बरोबर आहे गं तुमचं लॉजिक!
आणि काय गं मने ना.दू . म्हण्जे काय ? मज्जाच करतेस तू! :स्मितः
धनवन्ती.....खरंय. बहुतांश केस पांढरे असतील तर मेन्दी लाऊन लाऊन डोक्याचा तांबडा भोपळा होतो.

अदितीतै
घराजवळच्या वैद्य खडीवाले ना गाठ.आनि आधी पोटातुन औषध घे.डाएट नीट ठेव.आनि जागरणे टाळ.सगळ्या गोष्टी चिलपिल मधे घे. Happy

कलर लावल्यानंतर केस पांढरे का होतील पण

मला असे वाटते की पांढरे केस ब-यापैकी असताना ते लपवण्यासाठी रंग लावला तर उरलेले काळे पण पांढरे होतात. तेच जर मुळात केस पांढरे नसतील आणि फॅशन म्हणुन रंग लावला असेल तर काही फरक पडत नसेल. माझी एक वहिनी केस रंगवते आणि तिला काहीही त्रास नाही होत रंगवण्याचा. तिचे केस काळेभोर आहेत आणि त्यावर ती छान पैकी डार्क कॉफी वगैरे रंग लावते. मला केसांचे रंग नावाने ओळखता येत नाही त्यामुळे तो कॉफिच आहे का माहित नाही पण जे काय आहे ते छान दिसते.

धनवन्ती, थँक्स.

२ रबर बॅन्ड्स मिळतात Happy >>>>> आता ग्रेनीलच घेणार. मला रबर बॅन्ड्स हवेच होते. Lol

आणि काय गं मने ना.दू . म्हण्जे काय ? मज्जाच करतेस तू! :स्मितः >>> मानु गं. मी सिरियसली विचारलं. आता आयने अकबरी सारखा माझा किस्सा आणि मी माबो फेमस होणार. Wink

खरंय. बहुतांश केस पांढरे असतील तर मेन्दी लाऊन लाऊन डोक्याचा तांबडा भोपळा होतो. >>> I swear..... त्यापेक्षा पांढरे केस बरे दिसतात.

Pages