केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@स्वधा, माझ्या दिड वर्शाच्या मुलिला हा त्रास खुप झाला होता....पेडी. ने स्पेशल तेल अनि क्रीम दिले होते....एक् दा तर पोटातून औषढ् पन दिले...पन पुन्हा पुन्हा त्रास होत च होता...
मग मी तिला जोन्सन शाम्पू बन्द करून अवीनो चालू के ला, तेव्हा पासून हा त्रास पुर्न बन्द झाला.जेव्हा हा त्रास चालू होता तेव्हा तीचे केस पन गळत होते..

वरदा, आत्ता वाचली पोस्ट. चरणकमल>> Lol
खरं सांगू? फार वेळ नाही लागत. केसांना मी रोज अगदी एक थेंब का असेना, तेल लावायचं नक्की केलंय. आणि केस धुवायच्या आधी मसाज. मसाज करताना ते पावडरींचं मिश्रण उकळून ठेवायचं. रात्री/ सकाळी मिश्रण करूनही ठेवता येईल. ते वस्त्रगाळ करायचं. (लेकीचे चिंटुकले रुमाल आहेत अगदी मऊ त्यातून १ पळवला Wink ). लिक्विड निघेल तेच शाम्पूऐवजी वापरायचं. अजिबातच वेळ लागत नाही. आणि उरलेला चोथा हाता-पायाला फासून आंघोळ. लगे हाथ स्क्रबिंग वगैरेही होऊन जातं! कडूनिंब असल्यामुळे एकदम मस्त! मी हे केलं नि काय मस्त वाटलंय! शिकेकाईच्या मस्त वासानेच फील गुड झालं अगदी. Happy

अवांतर : सध्या नोकरीच्या चक्रात नाहिये. ते सुरू झाल्यावर काय ते नंतर बघू म्हणून विचार नाही करत त्याचा.

मला एक सांगा प्लीज .. मी रेग्यूलरली कलर करते., आत. जर ते ग्रेनील वापरायला सुरुवात केली, तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार ? आणि ते सुरुवातीला ४/५ दिवसांआड लावायच असत ना ? अस किती दिवस करायच ?

@प्रज्ञा९-
२ पत्ते देतेय- तीथे आपल्याला हव्या असणार्‍या पावडर्स मिळतील.
अगदी धायरीत नाही पण- राजाराम पुल ओलांडावा लागेल.
१) राज़ाराम पुल वरुन आलात की समोर मातोश्री लागेल. तिथुन उजवी कडे वळा- मग लगेच डावी कडे (विठ्ठल मंदिरा वरुन) सरळ जा. उजवी कडे बघत जा. पिपल्स को-ऑप ब्यान्केच्या पुढे- एन. माधव नावाचे दुकान आहे.तिथे नक्की मिळतील. (पुर्वी जीथे स्पेन्सर्स होते त्याच्या बरोब्बर समोर-शेजारी- युनि-सलुन आहे)
२) याच रस्त्या वरुन मागे या- प्रतिज्ञा मंगल का. च्या रस्त्यावर- गणेश भेळ वरुन सरळ जा- उजव्या हाताला एक मंदीर आहे- त्याच्या पुढे-ग्रीन फ़ार्मसी आहे. तिथे पण या वस्तु मिळतील.
हॅप्पी शॉपिंग Happy

थँक्स पत्ता दिल्याबद्दल. Happy

नोट करून ठेवलं आहे. यावेळी आणल्या मी दुसरीकडून. आता पुढव्या वेळी या पत्त्यावर जाईन.

मी सध्या केलेल्या उपचारांमुळे असलेले केसही गळाताहेत .... या स्टेजमधे आहे.(वयामुळे!)
पण तरीही आशेची दोरी चिवट असते. मी उर्जिता जैनचं "न्युक्रॉप" नावाचं जेल आणते. त्यात घरच्या जासवंदाची फुलं आणि काही पानं मिक्सीतून काढून लावते. बाटलीवर १० मि. ठेवा असं आहे पण मी २ तास ठेवते(आशेची दोरी!!!!!!!!!!!!!! :फिदी:) की बॉ जास्तीत जास्त ठेवलं तर जास्तीत जास्त उपेग होईल!

आणि अनघा......मीही आधी मुलांची लग्नं झाली की केस रंगवणं बंद करीन..........मग नातवंड झालं की बंद करीन असं करत करत अजूनही केस रंगवतेच. आणि जितका डाय वापरीन तितक्या प्रमाणात प्रत्येक वेळी केस नव्या उत्साहाने गळतात. माझ्या मते डाय इज द मेन कल्प्रिट! असो..........
चला गं पोरीनो चालू द्या..........

मंडई रस्त्यावर एक केमिकल चे दुकान आहे (तिथे जमिन आणि टाईल साफ सफाई केमिकल्स मिळतात.) नवनाथ रसवंती गृह पासून त्या रस्त्यावर गेल्यास तिसरे चौथे दुकान असेल. बाहेत ब्लेझ टाईल क्लीनर ची जाहिरात आहे.
(नमनाला घडाभर तेल ओतल्यावर विषयाला हातः) त्या दुकानात या सर्व आयुर्वेदिक पावडरींचा सेट मिळतो, मिसळायचा आणि लावायचा.

बाटलीवर १० मि. ठेवा असं आहे पण मी २ तास ठेवते << सगळ्या ठिकाणी अधिकस्य अधिकं फलं उपयोगाला येत नाही हो. Happy

मानुषी, बाबा रामदेव चे केश कांती तेल ट्राय केले आहे का? किंवाउपअडाबर आमल? दोन्ही उपयोग होतो केस गळती साठी.

नाही गं अमा ........आणीन ना तेही! इथे आहेत पतंजली प्रॉडक्ट्सचं दुकान.
डाबर आमला बद्दल ऐकलं होतं की त्यात लिक्विड पॅरॅफिन असतं म्हणून. पाहू ...सध्या पतंजली ट्राय करीन.
पण मला जाणवतं की जर डाय नाही केला तर केस गळती कम्पॅरिटिव्हली कमी होते.

बाटलीवर १० मि. ठेवा असं आहे पण मी २ तास ठेवते << सगळ्या ठिकाणी अधिकस्य अधिकं फलं उपयोगाला येत नाही हो. >>> +१ मानुषीताई, जेवढा वेळ ठेवायला सांगितलं आहे तेवढा वेळच ठेवा. जास्तीचा वेळ हानी करत असेल, केसांची मुळं कमकुवत होत असतील.

केश कांती चा वास घाण आहे आणि त्याचा पोत केसांवर पटकन पसरण्यासारखा नाही (पण ते गुणकारी आहे असे बर्‍याच जणांकडून ऐकले आहे. त्यामुळे आणायला हवे.)

निलगिरी तेलाची आयडीया काम कर गयी. मेंदीत तर तेल घातलं होतंच पण नंतर मालिश करताना तेलात काही थेंब घातले होते. सर्दी नाही झाली. धन्यवाद!

मी परवाच लेकीला केश कांतीने मसाज करून दिला इतका घाण किंवा काही फारसा वासच नाही . कदाचित सुगंध घातलाच नसेल. एकतर कॉस्ट कमी होते व लेस केमिकल्स द बेटर फॉर युअर हेअर. माझे फेवरिट डाबर आमला.

केश कांतीच्या नवीन तेलाचा वास घाण नाहीये. आधीच्या तेलाचा होता. आता केसांसाठीच्या सगळ्या पावडरी शिकेकाईबरोबर खळखळ उकळल्यावर जो मस्त वास येतो त्याचेच इण्टेन्सिफाइड रूप(गंध) आहे.

इण्टेन्सिफाइड रूप(गंध) आहे.
>> ओडर प्रोफाइल म्हणतात त्यासी. केस गळतीवर उपाय शोधायचा आहे. पूर्ण बाफ वाचून बघते.

केस रंगवणे थांबवणार्‍यांमधे मी पण. ऑलरेडी थांबवले आहे... ट्रान्स्फॉर्मेशन कठीण झालेय मात्र. धड न पांढरे व धड ना काळे.

मी मेंदीवरून रंगावर उडी मारणार होते, पण मेंदीवरच थांबणं बरं वाटतंय इथल्या पोस्टी वाचून.

मी लोरिआल हेअर कलर वापरते किंवा मग तो एक नो अमोनिया येतो तो. बरोबरीने ऑइल
मसाजेस व वॉश नीट केले तर त्रासेस होत नाहीत. हेअर कलर वन्स अ मंथ, ट्वाइस वीकली
ऑइल मसाज. मग नेक्स्ट डे शांपू असे सध्या रूटीन आहे. कंडिशनर तो हेअर डाय बरोबर येतो तोच. पण ऐश्वर्या जाहिरात करते तो फाइव्ह प्रॉब्लेम्स वन सोलुशन शांपू खरेच मस्त आहे. फार सुळसुळीत होतात केस.

मी एकदा रंगवले. सुंदर दिसत होते पण तो लुक सुरूवातीला अजिबात आवडला नाही. माझ्या व्यक्तिमत्वाशी सुंदर गोष्टी मॅच होत नाहीत.
मग दोन तीन आठवड्याने डायचे गडदपण, एकसारखे असणे हे कमी झाले किंवा माझ्या नजरेला सवय झाली किंवा अजून काही. पण बरे वाटले.
पण रेग्युलर करायला नकोच वाटते आहे.
सॉल्ट न पेपरकडे वेगाने वाटचाल आहे.
सध्या तरी महत्वाचा इव्हेण्ट वगैरे असेल तेवढ्यापुरते डाय करायचे एरवी जैसा भी होगा अच्छा है या नोटवर आहे.
ते चालूनही जातंय सध्या.
सॉल्ट न पेपर मधले सॉल्ट वाढल्यावर काय करायचे ते ठरवले नाही.

मी पण कलर करते. लोरिएलचा Majirel हा प्रोफेशनल कलर आणि लोरिएलचंच डेव्हलपर वापरते. मला अजून तरी काही प्रॉब्लेम आला नाही. केस गळले नाहीत. केस अजून पांढरे झाले असतील पण त्यात केमिकल्सबरोबर वाढत्या वयाचा परिणामही असतोच. जेव्हा कलर करायचे नसतील तेव्हा न्हायच्या आधी केसांना तेल लावते इतकीच काय ती काळजी घेते. पंचविशीतच एखाद दुसरा केस पांढरा दिसू लागला होता हा अनुवंशिकतेचा तोटा झाला पण भरघोस आणि मजबूत केस हा अनुवंशिकतेचाच फायदाही झाला. आहार चौरस आहे.

लॉरियल चा रंग वापरला होता. व्यवस्थित सूचना फॉलो करुन..पोशन, कंडिशनर वगैरे. पण केस गळलेच. (केसांची मूळ टेंडेन्सी गळण्याची आहे आणि फॅमिली हिस्ट्री पातळ केसांची.)
आहार त्रिकोणी आहे,(प्रोटिन्स व्यवस्थित पण व्हिटामिन्स नाहीत) चौरस करण्याचा प्रयत्न करते

अनु, भाज्या आणि कोशिंबिरी भरपूर खा. डॉक्टरंना विचारुन व्हिटॅमिन 'इ'च्या गोळ्या घेवून बघ महिनाभर. फरक पडेल केसांच्या दाटपणात.

मी बरीच वर्षे नुपूर मेहन्दी वापरली..
कालान्तराने मग केस शहनाज हुसेन सारखे दिसु लागले.. Sad

मुले मला बघून घाबरतील त्याच्या आधी पर्याय शोधणे गरजेचे वाटले मला..

सद्ध्या ग्रेनिल वापरते.. केस बरेच बरे दिसत आहेत...
मऊ झालेत अन माणसात आलेत.. Wink

पण ग्रेनिलचा रंग फार टिकत नाही...
१०-१५ दिवसानी लावावे लागते..

मेंदी टु हेअर कलर किंवा उलट - कलर टु मेहंदी असं स्वीच ओवर करताना मधे किती पिरियड जावुन द्यायचा?

मी एकही केस पांढरा नसताना, आगावुपणा करुन ग्लोबल कलर ( loreal inoa) करायला सुरुवात केली. तरीही तोपर्यंत केस चांगलेच होते, पण जेव्हा एकदा हायलाइट्स केले, तेव्हा पासुन केसांना हेल्दी टेक्स्चर नाहीच. फ्रीझी/बुशी झाले आहेत. मुख्य म्हणजे पुढे थोडेसे पांढरे पण होताहेत. सध्या तरी ६-८ महिन्यातुन एकदा कलर करते. पण पुढचं नुकसान कमी व्हावं म्हणुन मेंदी लावायला सुरुवात करायची आहे. कलर असल्यावर मेंदी लागत नाही असं ऐकलं. तर मधे किती वेळ जावुन देवु? केसांवरचं कलर कोटिंग कमी व्हायला साधारण किती वेळ लागतो? याची उत्तरं माझ्या loreal पार्लर मधे हुशारीने टाळली जाताहेत. म्हणुन इथे विचारते.

मेहेंदी मधे कोणते चांगले ब्रँड आहेत? कि आयुर्वेदिक दुकानातली मेहेंदी चांगली.

Pages