केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलकम मनिमाऊ Happy Happy

( माझ्या लेकीला मी लाडाने मनिमाऊ म्हणते )

ग्रेनिलचा अजुन एक फायदा म्हणजे ती लावायला फार प्लानिंग लागत नाही.... केस तेलकट नसतील तर १० मिनीटात मेहंदी लावायला तयार !!

..

वर्शा
तुम्ही आधी डॉक्टर कडे जा..लेकीचे वय लहान आहे की तुमच्या.मे बी हार्मोनल चेजेंस मुळे पण होत असेन.
हेयर स्पा करून घेऊ का?>>>> पार्लर ट्रीटमेंट पेक्षा आधी डॉक्टरांना भेटा.

फार जिव्हाळ्याचा विषय आहे.
पांढरे केस.
मी तर कलरच करते. dry होतातच केस. त्यासाठी तेल लावणेच , conditioner लावणेच.
आणि कितीही काहीही केल तरी पार्लरमध्ये गेल कि 'खूप dry झालेत ग केस " हे ऐकणे ह्याला पर्याय नाही .
salt pepper लूक काही लोकांनाच शोभून दिसतो. त्यात मी येत नाही त्यामुळे कलर करण्याला पर्याय नाही.
ह्यासाठी काही कायमस्वरूपी उपाय का कोणी शोधून काढत नाही ???
लेसर हेअर रिमुव्हल , Permanent मेक अप सारख काही शोधून काढल तर किती कटकट वाचेल .

ह्यासाठी काही कायमस्वरूपी उपाय का कोणी शोधून काढत नाही ???

खरेच.... मी तर मेंदी लावताना हात दुखायला लागायचे आणि खुप वैताग यायचा म्हणुन केस कापले. परवा अचानक एक जुना फोटो माझ्य मोबाईलने मला दाखवला, जुन्या मेमरीज म्हणे. नेमक्या त्या फोटोत मी पाठमोरी होते आणि माझे केस.... ते केस कापले हा विचार करुन मला अचानक दिवसभर (च) टिकणारे नैराश्य आले. जर कोणी अस्ला काही उपाय शोधला तर मी परत केस वाढवेन...

(रच्याकने, माझ्या केसांबद्दल बोलणारे हेमाशेपो. हे मी प्रत्येक पोस्टीला मनातल्या मनात म्हणते पण केस कापल्याचे दु:ख इतके ना.. ते मेल्या म्हशीला घंघाळभर दुधाचे उमाळे तिच्या मालकिणीला येत असतात तसे मला केसांचे उमाळे येत राहतात. Happy Happy )

योडी, नाही गं. उगीच पीजे होता तो. Wink

बाकी सगळ्या पोस्टस वाचुन 'अगदी अगदी' होतं आहे. शेवटी केसांचं दु़:ख सगळ्यांचच सारखं. थोडं कमी किंवा थोडं जास्त एवढंच.

..

..

साधना वाढव ग केस .
पाढरे तर पांढरे , कलर केल्यामुळे कोरडे तर कोरडे
पण लांब केस तर आहेत कि नाही आपल्याकडे ( अस आपण आपल्यालाच म्हणून घायचं )
मी तर highlights पण केल होत ( म्हणतात न मेलेल्या मढ्याला , त्यातली गत )

वर्शातै... एवढ काय हाईपर होताय ???
गोळ्या चालू असे पर्यंत फरक पडतो.>>> हे जर पोस्ट मधे लिहले असते तर बरं झाल असत.तुमची मुलगी फक्त १२ वी त आहे,,लहान आहे म्ह्न्नुन म्हटल. जाऊ देत.असोच.

बादवे, हे जास्वंद जेल नक्की कस वापरायच?
म्हणजे केस धुण्याच्या आधी की शांपु करुन नंतर जेल लाउन परत केस धुवायचे.

ग्रेनील वापरणार्यांनो एक सांगा मला, आपल्याच हाताने लावताना मागच्या बाजूचे केस कसे कव्हर करता ? मागच्या बाजूने नीट लागलय का ते कस चेक करता ?

मी वर २/३ वेळा लिहीलय तस, मी गेली २/३ वर्ष नियमीत पणे कलर करते आहे. कलर केलुआने के. पांढरे होत नसावेत, ते मुळातून पांढरे येत असतील तर तो डिफेक्ट आहे अस मला वाटत. तेव्हा मुळातून येणारे केस काळे यावेत ह्याचा काही ऊपाय असला तर तो केला पाहीजे.

रंगवल्याने म्हणा किंवा. नीट काळजी न घेतल्याने किवा आहार बरोबर नसल्याने माझे केस अती गळायचे. मी. रोज २ एग व्हाईट्स खायला. सुरुवात केली आणि तेल लावणे, वन्स अ व्हाईल स्पा वगैरे. आणि जादू झाल्यासारखे केस गळणे आणि कोरडे होणे कमी झाले.

अजून एक.... एखद्या वेळी महत्त्वाच्या कामासाठी / ठिकाणी जायच असत, माथ्यावर पांढरे केस डोकावत असतात, कलर / मेंदीला वेळ नसतो, तेव्हा काळे काजळ मदतीला येते. बोटांवर फासून केसांवर चोळावे. वेळ साजरी होते.

हो खरंच, जाई काजळ.
कमी केस पांढरे असतील तर खूप उपयोगी. पूर्वी म्हणे केसांना रंगवायचा काळा खडू मिळायचा. थेट घ्यायचा आणि कागद रंगवल्यासारखे केस रंगवायचे.
पण कोणी भेटलंच आणि प्रेमाने केसावर हात फिरवला तर हात काळे नको व्हायला Happy

थंडी आली की केस डोक्यावरून चालू लागतात. मग जाग येते उपाय करायचेत म्हणून. या वेळी धाडस करून केस कलर केलेत. खास आवडले/नावडले नाहीयेत. परत मेंदीकडेच वळेन म्हणतेय. मधे किती गॅप जाऊ द्यावी? पुरेशी नाही गेली तर काही अपाय होतो का?

डबल शाम्पू म्हणजे काय? एकाच नहाण्यात दोनदा शाम्पू लावणे का? त्याने काय अपाय होतो?

टीप : केस कोरडे पडणार्यांनी तेल लावल्यानंतर केसांना वाफ द्या. काही दिवस नियमितपणे दिल्यास जादूसारखा परिणाम दिसेल. माझे झाडूसारखे रखरखीत झालेले केस छान मऊ झाले होते. शक्यतो रोज अंघेळीच्या वेळी ५ मिनिटं वाफ द्या सुरुवातीला काही दिवस.

केस जर टिकवायचे असतील तर आधी शॅम्पू लावणे सोडा आणि तेल लावल्यावर जरी डोक चिपकू दिसत तरी तेलामुळे केस अजून काळे दिसतात.

जर केस गळत असतील तर घरच्या घरी महाभृंगराज तेल करता येत. कारण, आपल्या आजूबाजूला पानथळी जागी भृंगराज वनस्पती सहज सापडते. माझ्या बहिणीचे केस गळायचे तिन हा घरच्या घरी म. भृ. बनवने आणि लावणे सुरु केले तर तिचे केस आता ओढले तरी तुटत नाही इतके मजबुत झाले आहेत.

माझी एक केरळची कलीग आहे ती सांगत होती आमच्या केरळात डोक धुण्यापुर्वी एक तासभर तेंव्हाच्या तेंव्हा तयार केलल जास्वंदाच तेल लावतात. त्यामुळे केस चकचक चकाकतात.

जर केस कोरडे झाले असतील तर शिकेकईचा कोळ डोक्यावर लावला तर केस कोरडे होणे कमी होते.

जर डो़क्याचे तेल निघत नसेल तर खूप जास्त प्रमाणात तेल न लावता थोड्या प्रमाणात आठवड्यातून दोन वेळ तेल लावायचे दोन वेळा डोक धुवायचे रिठा आवळा पावडर घरीच तयार करायचे. तेल बर्‍यापैकी निघत.

हे सर्व उपान माझ्या बहिणींचे आहेत. मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. ताया हेच करतात. सारख करायला कंटाळा येतो पण केस गळणे, पांढरे होणे हे जर वाट्याला येणे नको असेल तर हे करायलाच पाहिजे हे ठाम माहिती असल्यामुळे कंटाळा ने केलेला बरा हे त्यांना चांगले माहिती झाले आहे.

मेहन्दी लावुन झाल्यावर INDIGO पावडर लावली आहे का कोणी?
त्याने पण black शेड येतो अस ऐकल आहे. प्रमाण माहीत आहे का कोणाला त्याचे?

पांढरे केस आणि त्याबरोबर येणार्‍या समस्यांन्ना माझा पण मम!:( त्यात आणखी मला केस धुतल्यानंतर हमखास अ‍ॅसिडिटी होते. उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो. मी मेंदी डाय नावाचा एक प्रकार लावते. पण किती दिवसांनी लावावा हा प्रश्न आणि घाम , अ‍ॅसिडिटी (टाळण्याचा) उपाय सांगा.

ग्रेनिल ब्राऊन मध्ये मेण्दी आणि इण्डिगो पावडर ५०:५० या प्रमाणात आहे. मागे इथे निधपने ल्लिहिलेले की या पावडरचा य्पयोग करुन रंगाची कमीजास्त शेड ठरवता येते. सो, इन्डिगो मुळे रंग येतो हे नक्की. जर तुम्ही फक्त इंडिगोच लावणार तर मग प्रमाण कसले त्यात? केसांची लांबी पाहुन पावडर घ्यायची.

केस धुतल्याअर अ‍ॅसिडिटी??? पहिल्यांदाच ऐकले. केस धुण्याचा आणि पोटाचा काय संबंध...

उन्हाळ्यात केसांवर स्कार्फ बांधटा, टोपी घालणे टाळा म्हणजे घाम येणार नाही. पण जर शरीराची जास्त घामाचीच टेंडंसी असेल तर काय करणार? माझ्या मुलीलाही हा त्रास आहे. ती सरळ शॉर्ट कट करते उन्हाळ्यात.

केस धुतल्याअर अ‍ॅसिडिटी??? पहिल्यांदाच ऐकले. केस धुण्याचा आणि पोटाचा काय संबंध...> माहिती नाही. पण होतो नक्की. :(. सुरूवात डोकेदुखीने होते.

अ‍ॅसिडिटी होत नाही पण डोके दुखीचा त्रास होतो कधीतरी. केस धुतल्यावर दुपारी झोप येते आणि झोपले नाही तर डोकं दुखतं आणि क्वचितच अ‍ॅसिडिटी होते. सुरुवात डोकं जड होण्याने होते. म्हणून दुपारी झोप काढतेच.

माझ्या सा.बा ना ही हा डोकेदुखीचा त्रास होतो.तो संबंध दिवस त्याचे डोके उठते.त्या सरळ कपाळाला रुमाल बांधुन ठेवतात.खरं काय कारण असाव ???? केस धुतल्यानंतर डोकेदुखीचा.त्या लगेच केस मोकळे करुन झटकुन ही टाकतात.जास्त वेळ टॉवेल मधे बांधत नाहीत.तरी त्यांना त्रास होतोच होतो. Sad

Pages