केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks all for the tips. Any reco on patanjali shampoo n conditioner for hair fall? US madhe asto pan India tun magawata yeil. Jaswand gel urjita jain Che magvaycha plan ahe.

फेबुवर एक हेअर मास्क ची पोस्ट आली आहे.
अर्धं केळं मॅश करुन त्यात एक अंड फोडुन थोडं फेटुन घ्यायचं. त्यात २ टेस्पून खोबरेल तेल ३ टेबलस्पून ऑलिव तेल मिसळायचं.मग अर्धा कप दुध घालुन नीट मिक्स करायचं. थोडा वेळ ओवेन मधे गरम करायच. साधारण ४५ सेकंद. मग थंड झाल्यावर केसांना मुळापासुन पुर्ण शेंड्यांपर्यंत चोळायचं. तीस मिनिटांनी धुवायचं.
मी गरम करण्याची प्रोसेस न करता उद्या मास्क करणार आहे. हा काला गरम करायच जीवावर येतंय. असाच ट्राय करेन.

सस्मित
मी इमॅजिनल ,, डेंजर हेअर मास्क वाटतोय ग.. वास आनि अ‍ॅपरीयन्स मधे.
वापरल्यावर नक्की लिहि इथे.

मी दर तीन महिन्यांनी एकदा तरी शिरोधरा करते. केसांसाठी इतके पैसे करुन शेवटी शिरोधरा केल्यानी मला सर्वाधिक फायदे मिळत आहेत.

Hi,
Kuni rogain treatment ghetliye ka for hairfall. Dermatologist ne suggest keliye. Want to know if someone has done it. Kahi side effects ahet ka? Pls suggest
Nehami karava lagta ka..nahitar parat kes galtat ka?
Thanks

Hi

@सुशिन्दे
मी त्या हेअर आनि नेल्स वाल्या गोळ्या ट्राय केल्या आहेत...मला तरी फारसा फरक वाट ला नव्हता केस-गळती साठी..अजून एक, शॉवर-फिल्टेर वापरून बघा काही फरक वाटतोय का...रोगेन बद्दल फारशी माहिती नाही...

कुणी केस गळण्यावर पेरूच्या पानांचा (पानं उकळून ते पाणी डोक्याला लावायचं) उपाय करून बघितलाय का? youtube वर बरेच video बघितले पण कुणाचा स्वानुभव असेल तर त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. विडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे केस गळण्यावर हमखास उपाय आहे हा. कुणी केलाय का हा प्रयोग?

फेबु वर मिथिला सुभाष यांची एक पोस्ट पाहिली होती.
२ मूठ कढिपत्ता पाने आणि तेवढेच दही यांची पेस्ट करुन स्काल्प ला लावायची आणि ३०-४० मिनिटांनी कोणत्याही माईल्ड शांपु ने केस धुवुन टाकायचे.
काल मी हा उपाय करुन पाहिला..
नेहेमी केस धुतले की अतिशय गळतात काल खरच केस कमी गळल्याचा अनुभव आला.
तसंच केस माउ आणि चमकदार झालेत.

केस गळण्यावर एक उपाय..
एक मध्यम कांदा किसून घ्या. रूमालात तो किस, पुरचुंडी सारखा बांधून, पिळून त्याचा रस काढून घ्या. एका वाटीत सम प्रमाणात खोबरेल तेल आणि एरंडेल तेल घेऊन ते गरम करुन घ्या. थंड झाल्यावर कांद्याचा रस मिक्स करा. आता ह्या मिश्रणाने केसांना आणि स्काल्प ला छान मसाज करा.
दोन तासांनी शाम्पूने केस धुवायला. कंडिशनर करा. छान मऊ होतात केस आणि गळायचे कमी होतात.
आठवड्यातून दोनदा असे 1 ते 2 महिने तरी करायला हवे. मी स्वतः हे 1 महिन्यापासून करतेय. माझे केस गळणे खूप कमी झाले. माहिती चा स्त्रोत.. गुगल+यूट्यूब वरून स्वतः केलेला प्रयोग..

कन्या ट्रेकिंग ला जाते आहे...त्या काळात केसांची काळजी कशी घ्यावी, आधी काय तयरी करावी याबद्दल कोणास काही माहित असल्यास कृपया मदत करावी.
ठिकाण: मनाली...तिथे बर्फ़ असेल.
राहणे: टेन्ट मधे असेल
कालावधी: प्रवास धरुन १२-१३ दिबस.
लेकीचे वय: १३ वर्षे..वेणी घालता येत नाही.
केस बर्‍यापैकी लांब आहेत. व जाड हि आहेत त्यामुळे संभाळणे कठीण वाटते आहे.
थोड्या मोठ्या ताया आहेत त्या मदत करतीलच. पण आधी काय तयारी करावी हा प्रश्न आहे.
जसे की तेल्या मारुती करुन पाठवावे. (जे तिला नाही आवडायचे :))
कोणास असा काही अनुभव असेल तर सल्ले द्या.
धन्यवाद.

नीरा, केसांना तेल लावून ठेवले तर केस सांभाळायला सोपे जातात, एवढे तिला पटवा. तिथे खूप थंडी असल्याने ते झाकलेले रहातील, घाम येणार नाही, त्यामुळे फार धुतले नाही तरी चालतील.
आम्ही अज्जिबात न्हायच्या फंदात पडायचो नाही. पण त्याचे कारण म्हणजे आम्हाला ट्रेकला गरम पाणी मिळायचे नाही. ड्रायर वगैरे प्रकार नसायचे. हे सगळे असेल तर न्हायला हरकत नाही. पण न्हायच्या आधी तेल लावणे आणि नंतर कोणते तरी सिरम लावणे याने केस छान रहातेल.

हा प्रश्न नेमका कुठे विचारावा कळत नव्हतं. पण तो केसांच्या आरोग्याविषयीच आहे, म्हणून इकडे विचारते. पोहायला जायला लागल्यावर केसांची (अजूनच) वाट लागली आहे. लाँग हेअर कॅप घालूनही केसात (आणि कानातही) पाणी शिरतंच. रोज न्हायल्याने त्रास होतो, न्हायलं नाही तर पूलमधल्या पाण्यामुळे डोकं खाजतं, केस गळतात, चिकट होतात. ज्यात केस ओले होणार नाहीत अशी कॅप मला अजून तरी सापडली नाहीये. (माझ्या डोक्याचा आकार मोठा आहे त्यामुळे मला नीट होणारी कॅप / टोपी क्वचितच मिळते!) पोहायला जातांना केसांची तुम्ही काय काळजी घेता?

गौरी, या कॅपने ओले होत नाहीत, पण काढता घालताना केस तुटतात आणि स्कीन पण ओढली जाते. केस तडतडण्याच्या कल्पनेने मला आता पण लिहिताना शहारा आला.

मला तर केवळ केसांची वाट लागते या एका कारणासाठी स्विमिंग करायला नको वाटतं.

स्विम टीम मॉम्स कडून मिळालेल्या टिप्स अशा
कॅप कितीही टाइट असली तरी केस ओले होतातच.
स्विमिंग करायच्या आधी थोडा कंडिशनर केसांना लावून मग कॅप घालावी. खोबरेल तेल लावले तरी चालते पण इतर मुलं मुली ' ईयू, स्मेली म्हणतात' अशी कटकट आपल्या मुलांकडून एइकावी लागते.
माइल्डेस्ट शॅम्पू , क्लोरिन क्लेन्सिंग शॅम्पू वापरावा. संत्र्याची साल थोड्या पाण्यात उकळून ते पाणी वापरुन शेवटचे रिंस करावे.
स्विमिंग झालं की शक्य तितक्या लवकर केस धुवावे. स्विमिंग संपल्यावर बाथरूम मधे गर्दी आहे, गरम पाणी येत नाही, घरी जाऊन नीट आंघोळ करीन या सर्व सबबींकडे दुर्लक्ष करावे.
अति गरम पाण्याने केस धुऊ नयेत.
आठवड्यातून एकदा तरी भरपूर तेल चोपडून १०-१२ तास राहू द्यावे.

शिकेकाई आणि रीठा पावडर जास्तच उरली आहे. तर ती खोबरेल तेलात चांगली उकळून त्याचं तेल करता येईल का? केलं तर ते कोमट झाल्यावर वस्त्रगाळ करावं लागेल का?

डीप conditioning चे काही तोटे आहेत का? सध्या केस रोल करायची फॅशन आहे? तुम्ही कुणी घरी केस रोल करण ट्राय केलेय का?

मेंदी लावायच्या आधी केसाना तेल लावू नये. मेंदी लावून अंघोळ केल्यानंतर त्या किंवा पुढच्या रात्री केसाना तेल लावून सकाळी परत नहावे.

शिकेकाई आणि रीठा पावडर जास्तच उरली आहे. तर ती खोबरेल तेलात चांगली उकळून त्याचं तेल करता येईल का? केलं तर ते कोमट झाल्यावर वस्त्रगाळ करावं लागेल का?>>>>

शिकेकाई व रिठा ह्या दोघांमध्ये क्लीनझिंग प्रॉपर्टीज आहेत. रिठ्याच्या तेल पूर्ण काढून टाकण्याचा गुणांचा उपयोग नैसर्गिक तेल खाणींमधले तेल पूर्णपणे काढण्यासाठी करावा का यावर संशोधन चालु आहे. रिठे तेलात उकळले तर जे काही हाती लागेल ते वापरून केसांना फायदा व्हायची शक्यता फारशी नसावी. Happy शाम्पू बनेल का हे मात्र माहीत नाही.

केस वाढण्यासाठी ट्रिम करायला सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? ट्रिम करायला गेलं , कि पार्लर वाल्या खुप केस कापतात, आणि मला अत्ता केस वाढ्वायचेत.

Pages