केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम हिअर धनुडी.. मलाही हा प्रश्न पडलाय... एक तर वाढवायला इतकी वर्ष जातात आणि ट्रीमच्या नावाखाली किती कमी करतात केस.. Sad

माझे केस पुढून पांढरे झाले आहेत पण मागचे केस काळे आहेत, माझ्या आईसारखे. कलर करून पंधरा दिवसही पूर्ण होत नाहीत तर परत पांढरे व्हायला लागतात. फक्त पुढून पांढरे असल्यामुळे ते विचित्र दिसतात. चांगले कपडेही घालावेसे वाटत नाहीत कारण चेहे-याची रयाच जाते. फोटोतही ते ऊठून दिसतात. पांढरे होऊ द्यावे जया बच्चन सारखे तर मागचे केस काळेच. गार्निअर वापरत होते आता लाॅरिअल वापरते, पण कोणताच रंग पूर्ण महिना टिकत नाही. मेंदी लावली तर केस आॅरेंज दिसतात आणि परत पांढरे होतातच. ईथे कोणी कलर वापरतं का आणि कोणता. जास्त दिवस टिकणारा कलर मिळतो का. पांढरे केस काळे करण्याचा (कलर किंवा मेंदी सोडून) काही ऊपाय आहे का जेणेकरून नविन केस काळे येतील.

>>पांढरे केस काळे करण्याचा (कलर किंवा मेंदी सोडून) काही ऊपाय आहे का जेणेकरून नविन केस काळे येतील.>> जे काळे केस आता पांढरे होतायत, ते काळे कसे येतील?

कलर ट्रीटेड हेअरसाठी वेगळा शॅन्पु येतो तो वापरा किवा एखादा माइल्ड शॅन्पु वापरा, कलर करताना ब्लॅक शेड एवजी डार्क ब्राउन किवा बरगन्डि ब्राउन चुझ करु शकता, त्याने फरक चटकन दिसुन येत नाही, टचप अ‍ॅप्लिकेशन करुन तेवढेच केस रन्गवु शकता.
कुठलाही रन्ग पुर्ण महिना टिकतच नाही मॅक्स २-३ आठवडे ..
एकदा पाढरे झालेले केस परत काळे उगवुन येण अशक्य आहे ...

केस पहिल्यांदाच highlight करताना कोणती काळजी घ्यावी? Highlights नंतर केस खराब होतात का? मला केस highlight करण्याची इच्छा तर आहे पण केस खराब होऊ द्यायचे नाहीयेत.. कोणाला अनुभव असेल तर कृपया सांगा Happy

Pages