केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कन्येला शांपूआधी १ तास “एक अंडे + चमचाभर खोबरेल तेल जे मी ऑर्गॅनीक वापरते + चमचाभर मध” मिसळून व चांगले फेटुन घेऊन केसांच्या मुळाशी लावते. त्याने फरक दिसलाय. कोंडा दिसत नाही हल्ली केसात.
शांपू करताना एकदम गरम पाणी डोक्यावर घ्यायचे नाही. अंडे शिजेल म्हणे. आधी अंड्याचे मिश्रण डोक्यातुन नुसत्याच पाण्याने काढुन टाकायचे व मग शांपू लावायचा.

शांपू करताना एकदम गरम पाणी डोक्यावर घ्यायचे नाही. अंडे शिजेल म्हणे.>> शिजेल का ते माहिति नाही पण गरम पाणी घेतले तर भयकर वास येतो.

फार पूर्वी डोक्यात कोंडा झाला होता तेव्हा scalpe मेडिकेटेड शाम्पू दिला होता डॉक्टरने. एका आठवड्यात फरक पडला.. फक्त मेडिकल मध्ये मिळेल.. गुलाबी बाटली आहे.. त्यानंतर परत कधी हि झाला नाही कोंडा..

स्काल्प चुलत बहीणीने वापरला होता. तिला नाही सूट झाला. नंतर डॉक्टरांनी सेल्सन शाम्पू सांगितला. त्याचे रिझल्टस चांगले आहेत पण डॉक्टरांनी सांगितले तरच वापरावा. टाळूवर बारीक फुटकुळ्या येत असतील तर त्यावर पण चालतो.

मध्यंतरी केसात खूप कोंडा झाला होता म्हणून मी केसाला तेल लावलं. केस धुवायच्या आधी मेथ्यांच्या दाण्याची पेस्ट (त्यात कोरफडीचा गर मिक्स केला होता ) लावली आणि अर्ध्या तासाने माईल्ड शाम्पूने केस धुतले.
चांगला फरक पडला.

हो ... मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवले होते आणि तेल ही रात्री लावलं होत.
दुसऱ्या दिवशी केस धुवायच्या आधी अर्धा तास मेथी दाण्यांची पेस्ट लावली होती.

एक प्रोटीप- भल्लातक रसायन (शुद्ध केलेल्या बिब्ब्याचा ) सेवनाने केसांचे आरोग्य राखायला मदत होते. कमी वयात केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर याचे सेवनाने ते थांबते. मी स्वतः अनुभवले आहे. ही तशी महाऔषधी आहे. पक्षाघात,लकवा,नपुंसकता यांच्या मॉडर्न मेडिसिनने सोडून दिलेल्या केसेस याच्या सेवनाने ठीक झालेली उदाहरणे बघितली आहेत (शिवाय वैद्य पट्टीचा असावा लागतो). बिब्बा उग्र औषध असल्याने ते शक्यतो कडक थन्डितच सेवन केले जाते आणि पित्त प्रकृतिवाल्याना झेपणे जड जाते. मांसाहार वर्ज्य करावा लागतो या काळात. आधी विरेचन घ्यावे लागते सुरु करायच्या आधी. याबरोबर सुवर्णभसम घेतल्यास सोनेपे सुहागा. सध्या मी घेतोय आणि काही दिवस थन्डीही शिल्लक आहे तर तुमच्या ओळखीत कोणी चांगले वैद्य असल्यास त्यांच्या सल्ल्यानेच घेऊ शकता.

तुमच्या ओळखीत कोणी चांगले वैद्य असल्यास त्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता.>>>

हे सगळ्यात जास्त महत्वाचे. बिब्बा हे प्रकरण जपुन हाताळणे आवश्यक.

@जिद्दू: बीब्बा कसा खाणार? एकतर त्याला चव नसते, दूसरे ईतका कडक असतो की चावला जाणार नाही. काही पाककृती करुन खायचा असतो का?

अहो बिब्बा खाणे लांब तो हाताळला तरी त्वचा जळते. इथे बिब्बा म्हणजे शोधीत बिब्बा अभिप्रेत आहे. इव्हन शोधीत बिब्बा सुद्धा बाहेरून लागला तरी उतू शकतो. पण समहाऊ आंतरिक प्रयोगात तशी भीती नसते. हा एक विडिओ पहा संदर्भासाठी -
https://youtu.be/_4SoS4TYoJ4
विदर्भात बिब्बे मिळतात. तिथल्या गरीब स्त्रियांना पोटासाठी ते हाताळणे भाग असते. त्यांच्या हातभार जखमा दिसतात. शिवाय नंतर जे डाग पडतात ते कधी जात नाहीत. त्यांना लग्न जमण्यापासून बऱ्याच अडचणी आहेत. यावरून ते आठवले. Sad

जिद्दु,
बिब्बा खूप म्हणजे खूप घातक आहे.

मला white flakes चा त्रास होता..OTC Neutrogena चा T-Gen or T-Sal (मी हा घेतला), एका वॉश मधे फरक पडला.

अजून एक नेक्स्ट लेव्हल प्रोटिप -
भल्लातक कल्प बहुतेकांना शक्य नाही दिसत तरी निराश होण्याची गरज नाही पण मेथीची भाजी खाणे तर सर्वांना शक्य असेल. तर मोकळी कुंडी घ्या, परसबाग असेल तर उत्तमच. पाव किलो बिब्बे आणा. ते चेचून-चेचून पसरवून टाका मातीत. त्या मातीत मेथी पेरा. नंतर ही जी भाजी तयार होईल ती चवीपुरते मीठ घालून शिजवून घ्या आणि खात जावा सर्वानी. तशी मेथीची भाजी पण उष्ण आणि पित्तकर असते आणि अशी भाजी तर थोडी जास्तच असणार पण न घेण्यापेक्षा उत्तमच खाल्लेली. यात बिब्याचे गुण उतरतात आणि रिस्कफ्री आहे. नंतर मला अनुभव कळवा.

Pages