केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर एक भयाणक टिप वाचली की आवळा किसून डोक्याला लावायचा. हे असे चुकुनही करु नका. आवळ्यात कमालीचे अ‍ॅसिड असते. त्यामुळे केस अजून खराब होतात. आवळ्याची पावडर अर्थात आवळाकंठी सर्वात छान उपाय आहे.

केस तुटत असतील तर घरच्या घरी महाभृंगराजचे तेल करा. मी नंतर त्याची कृती सचित्र लिहून देतो. मी इथे घरीच हे तेल करतो.

तेल लावलेले केस नुसत्या शिकेकाईने साफ होत नाहीत. मुलतानी माती लावून, मुलतानी माती शिकेकाई च्या पाण्यात मिसळून लावले तर तेल निघून जाते असे ऐकले आहे. कुणी करून पाहिले आहे का? केस खूप ड्राय तर नाही ना होणार मुलतानी मातीने?

पूनम +१०० Proud

परवाच "कलर नाही करत का? बरेच ग्रे झाले आहेत..." या पार्लरवाल्याच्या प्रश्नावर "होऊ देत की, त्यात काय!" असं उत्तर फेकून आले आहे. Lol

स्नेहा, मुलतानी मातीचा अनुभव नाही, पण रिठापावडर किंवा रिठ्याची फळं (म्हणजे रिंग्या. थोडीफार करवंदासारखी दिसतात.) शिकेकाईबरोबर भिजवा. रिठा शाम्पूला रेप्लिसमेंट ठरतो. एक मूठ शिकेकाई पूड असेल तर ६-७ रिंग्या किंवा १ मोठा चमचा रिठेपूड.

मला बरी सापडलीये पार्लरवाली सध्या. तिने आपल्याकडच्या मुलींना शिकवून ठेवलेले आहे की पांढरे बिंढरे केस दिसले तर कलर करा म्हणत गळ्यात पडू नका. ट्रीटमेंटसचे सल्ले न मागता देऊ नका. पांढरे झालेत हो केस हे सांगितलेले कुणालाच आवडत नाही परत सगळ्यांनाच कलर केलेला लुक हवा असतो, आवडतो असे नाही. आणि कलर केलेला लुक म्हणजेच योग्य असेही नाही.

ग्रे पांढरे मिक्स केस <<
त्याला मीठमिरी लूक म्हणतात. आपण मीठमोहर्‍याही म्हणू शकतो मोहर्‍या काळ्याच असतात त्यामुळे. Wink

आमच्या पार्लर वाली ला कोणी सांगा.. तिला लेयर कट चांगला येतो म्हणून सगळ्यांच्या गळ्यात लेयर कट मारत असते.
आता पार्लर बदलायचं आहे.

त्याआधी त्या पार्लरवालीचे डिटेल्स माझ्या विपुत टाकून ठेव अनु. एका पुण्याच्या मैत्रीणीला हवे आहेत आणि ही मदत करण्यासाठी मी सर्वात जवळ आहे तिला (virtually) Proud

मुलींनो, मला घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा, कुठली क्रिम्स वापरतात वगैरे सांगाल का?

परवा लेकीला हेअरकट करण्यासाठी घेऊन गेले असता, तिथल्या एका ऑफरला बळी पडून स्पा करुन घेतला. त्यात फारसे काही नव्हते, एक क्रिम फासुन थोडा मसाज केला आणि थोडी वाफ दिली. आता स्पा मध्ये फक्त एअढेच असते की ऑफर होती म्हणुन थोडक्यात आवरले याची मला काही कल्पना नाही पण त्या क्रिममुळे केस मात्र खुप छान झाले. हे एवढेच काम असेल तर मी आरामात घरच्या घरी करु शकेन.

एअढेच असते की ऑफर होती म्हणुन थोडक्यात आवरले याची मला काही कल्पना नाही>>>> मला वाटत थोडक्यात च आवरले.
मी घरी एकदा असा प्रयोग केला होता.
१) जास्वंद तेल - मालीश
२) गरम पाण्यातुन पिळुन काढलेल्या टॉवेल ने १०-२० मी केसांना वाफ
३) वॉश
४) मेंहदी चा पॅक - मेंहंदी, अंड , दही १/२ तासाने पुन्हा वॉश.
ह्यात ४ स्टेप -पॅक केसांच्या प्रकारा नुसार बदलता येतो.
बाजारात तयार हेअर पॅक पण मिळतात .

मी घरी हेअर स्पा साठी लॉरियाल क्रीम वापरते. स्टेप्स तुम्ही संगितल्यात तेवढ्याच. ज्या दिवशी केस धुतलेले असतीन, त्या दिवशीच स्पा करायचा. थोडक्यात स्वच्छ केसांवर. आणि स्पा नंतर लॉरेअल शॅम्पू नेच केस धुते. मस्त मौ मौ होतात.

L'OREAL Hair Spa Deep Nourishing Cream Bath For Dry Hair
साधना हे ट्राय करा.

L'OREAL Hair Spa Deep Nourishing Cream Bath For Dry Hair हे क्रीम मसाज ला वापरायचे ना ?
आणि लॉरीअल चा कोणता शांपु वापरायचा ? बरेच आहेत कारण.
मी पण मागच्या आठवड्यात स्पा केला...त्यानी स्काल्प ला मसाज केलाच नाही...फक्त केसांना लेंथवाईज क्रीम लावलं..
स्पा मद्दे स्काल्प ला मसाज नसतो का ?
मला पण असं वाटलं की त्याला १४००-१५०० देण्यापेक्षा घरी स्पा करणे जमेल आपल्याला...

L'OREAL Hair Spa Deep Nourishing Cream Bath For Dry Hair हे क्रीम मसाज ला वापरायचे ना ?>>हो.

आणि लॉरीअल चा कोणता शांपु वापरायचा ? बरेच आहेत कारण.>> L'Oreal Hair Spa Deep Nourishing Shampoo - 230ml
अॅमेझाॅन वर दोन्हीअॅव्हेलेबल आहे. Happy

मी_चिउ, धन्यवाद .
वापरुन बघते.
मसाज करताना स्काल्प ला करायचा की नाही ते पण सांगा प्लीज.

1. Massage your scalp: This is the first step to start a hair treatment at home. Warm up some coconut oil or olive oil. Massage your head gently. This increases blood circulation and boosts hair growth.

2. Steam the hair: Dip a towel in warm water and squeeze the excess water out. Wrap the towel around the hair. This allows the oil to penetrate deep into the scalp. Do this for about 5-6 minutes.

3. Wash your hair: Now, wash the hair with a mild shampoo. Use only cold water as hot water is harmful to the hair roots.

4. Apply conditioner: Post the shampooing, use a conditioner. You can also use the water of tea leaves to which a few drops of lime juice has been added. Or try a paste of grated beetroot to which hibiscus powder has been added. The hibiscus flower powder is a great base and is rich in iron and other vitamins. Rinse it off after half an hour with just warm water and no shampoo.

5. Lastly, a hair mask: The last step is crucial as it seals in the nourishment. Try making this mask at home. In a bowl, mix two eggs, honey and some coconut oil. You can add a ripe banana to this - banana is a hair softener. You can also use olive oil instead of coconut oil. Leave the mask on for 20 minutes, then rinse with a mild shampoo.

That's it. You have successfully completed a home hair spa therapy at home in just 5 simple steps. We recommend repeating this process once a month to ensure healthy, soft & shiny hair.

ओह. तरी धन्यवाद. Happy

स्पा ट्रीटमेंटमधे अत्यंत कमी रस असल्याने कधी चुकुनमाकुन गुगलले तर इतकी माहिती येते की, भंजाळून जायला होतं. तो गुंता सोडवेपर्यंत कसल्याही ट्रीटमेंटचा उत्साहच संपतो. तुम्ही शोधलेल्या स्टेप्स जमतील असं वाटतंय, परत कधी हुक्की आली तर करायला. Happy

Pages