केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जवळच्या पार्लर मधे हेअर स्पा करायला सुरुवात केली आहे. ८००/-.
उत्तम वाटते. आता दर महिन्याला करणार.
केस मौ झालेत, गळणे कमी झाले.

घरी...... अ बिग नो.

मसाज आणी वाफ देणे, आणि ४५ मि. ते १ तास. निवांत बसणे घरी शक्य नाही.

निवांत बसणे घरी शक्य नाही.>>>+१
मसाज्+वाफ+शाम्पु+कण्डीश्नर+मास्क+पुन्हा धुवा. बापरे! Happy
पुन्हा कुणीतरी मागच्या पानावर लिहिलय की स्पा च्या क्रीमींनी बाथरुम चिकट गळगळीत स्लिपरी होतं ते धुवायला पाणी आणि एक्ष्ट्रा वेळ.

पेक्षा जे पॅप्मरिन्ग मिळत त्याने रिलॅक्स व्हायला होत, इन्डियात अस्ताना मी आणि वहिनी एकमेकिना हेड मसाज करुन द्यायचो, तेलाचा मसाज ही स्टेप तरी दुसर्‍या कुणितरी करुन द्यावी.
इथे असे स्पा आहेत का माहित नाही, बघायला हव.

धन्यवाद, मॅगी. Happy

हो, भारतात असताना हे कधीच घरी केले नाही. तेवढा वेळ मस्त रिलॅक्स वाटायचं. पण आता इथल्या थंड हवेत केस खूपच कोरडे पडू लागलेत आणि दर महिन्याल स्पा शक्य नाही. तेव्हा शोध चालू झाला.

सस्मित धन्यवाद ग. मला गुगलून तेल मालिश, नंतर शाम्पू व नंतर डॉन तास कंडिशनर हे मिळत होते.

लोरीएचे क्रीम पण पाहते. इथे हवेत इतकी धूळ आहे कि सकाळी धुतलेले केस संध्याकाळपर्यंत ओके राहतात आणि दुसऱ्या दिवशी हात लावू नये असे वाटायला लागते. रविवारी स्पा केल्यावर अजूनही सॉफ्टनेस शिल्लक आहे त्यामुळे खूप बरे वाटतेय.

Pamparing मलाही आवडेल पण एकतर त्यासाठी भरपूर किंमत आणि किती व कसे pamparing ते करणारीवर अवलंबून.

मी ज्या ऑफेरला बळी पडले त्यात अरोमा फेशिअल, स्पा आणि manicure होते. या सगळ्याची एकत्रित किंमत 999. फेशिअल व manicure करणारीने व्यवस्थित मसाज केला पण हेअर स्पावालीने मात्र नावाला मसाज केला.

स्मिता श्रीपाद, क्रीम लावले असेल तर ते स्काल्प ला नाही लागणार, फक्त केसांनाच, कंडिशनरसारखे. तेलाने मसाज असतो तो स्काल्पला. मी पार्लरमध्ये हेड मसाज आणि स्पा असे दोन वेगळे ऑप्शन्स पाहिलेत. हेड मसाजमध्ये केसांच्या मुळांना तेल लावून मसाज करतात. मी एकदा करून घेतलेला आणि इतरांना दोन तीनदा पाहिले करताना. स्पा मी पहिल्यांदा केला, त्यात फक्त क्रीम लावले. जर ते हेअर सॉफ्टनिंग क्रीम असेल तर स्काल्पला गरज नाही ना त्याची.

साधना धन्यवाद ग..
पण मग केस मउ होण्यासाठी स्काल्प ला पण nourishment मिळायला हवी ना...म्हणुन मला वाटलं की स्काल्प ला पण मसाज करयला पाहिजे का...
स्काल्प ला तेलाने मसाज करणे बरोबर वाटतय तु म्हणतेस तसं...
मी आता घरगुती आणि लॉरीअल दोन्ही चा स्पा घरी करुन पाहाणार
सगळ्याना धन्यवाद छान छान प्रतिसादांसाठी
बर्याच शंका दूर झाल्या

Pamparing मलाही आवडेल पण एकतर त्यासाठी भरपूर किंमत आणि किती व कसे pamparing ते करणारीवर अवलंबून.>> येस्स.
काही काही पार्लरमधल्या मुली फेशियल करतानाही असा मसाज करतात की रीलॅक्स वाटण्याऐवजी मला राग राग येतो. अजिबात मनासारखं होत नाही कधी कधी. एकमेकींशी बोलणं, गप्पा, हसणं ह्यामुळे कस्ट्मरकडे दुर्ल्क्ष होतं हे ही त्यांना कळत नाही. Sad मी सरळ त्या पार्लर मधे जायचं बंद करते आणी नवीन शोधते.

साधना, ऑफर मधे उगीच करायचं म्हणुन करतात ते लोक. तेव्हा ऑफरच्या फंदात न पडलेले बरे.

पण मग केस मउ होण्यासाठी स्काल्प ला पण nourishment मिळायला हवी ना...म्हणुन मला वाटलं की स्काल्प ला पण मसाज करयला पाहिजे का...

स्काल्पला तेलाने मसाज करायचा. हेअर स्मुदनिंग क्रिमचा स्काल्पला फायदा नाही होणार. आपण कंडिशनर लावतो तोही केसांनाच लावतो, स्काल्पला नाही.

सस्मित म्हणुन मला पार्लरम्ध्ये जायला आवडत नाही. आमच्याकडे मी जिथे जाते तिथले पब्लिक दर चार महिन्यांनी बदलते. एखादी जरा बरी भेटले, बरे काम करते तर पुढच्या वेळेस ती गडपलेली असते. लक्मे वगैरेचे दर कैच्याकै वाटतात. आणि आमच्याइथल्या लक्मेमधल्या मुली इतरत्र असलेल्या मुलिंसारख्याच काम करतात. उगीच पैसे मात्र जास्त घेतात. मी थ्रेडींग पुरते जाते पार्लरमध्ये. बाकी पेडीबिडि सगळे घरीच करते. पण एखादी चांगली असेल तर मला जायला नक्कीच आवडेल. आरामात लाड करुन घ्ययला कोणाला आवडणार नाही? Happy

एखादी जरा बरी भेटले, बरे काम करते तर पुढच्या वेळेस ती गडपलेली असते. लक्मे वगैरेचे दर कैच्याकै वाटतात. आणि आमच्याइथल्या लक्मेमधल्या मुली इतरत्र असलेल्या मुलिंसारख्याच काम करतात. उगीच पैसे मात्र जास्त घेतात. >>> +१००

बाकी पेडीबिडि सगळे घरीच करते.>>> माझी मेली वेळेची सदोदित बोंब ना. Sad

साधना, ऑफर मधे उगीच करायचं म्हणुन करतात ते लोक. तेव्हा ऑफरच्या फंदात न पडलेले बरे

हो, अक्कलखाती खर्ची पडले दाम, शहाणपण येण्या.. Happy

अंबर फार्म केम मधून शिकेकाई साठी लागणार्‍या ५-६ पावडरी आणल्या होत्या त्या मिसळल्या आणि उकळल्या आणि गाळल्या.केसांना लावल्यावर केस मऊ बिऊ विशेष झाले नाही पण वाळल्यावर गळलेही नाहीत.(साध्या शांपूने किमान १०-१५ गळतात.) शिकेकाई गाळून वापरुन पण छोटे मायक्रो कण केसात राहिले.बाथरुम फार खराब झाले नाही बाथटब वापरल्याने.
मला वाटून गेले की पूर्वीच्या काळी मस्त बाटलीतले शांपू आणि कंडिशनर असते तर अजिंठा लेण्यातल्या बायका नक्की आनंदाने शांपूने केस धुताना दाखवल्या असत्या शेजारी शांपू बॉटल ठेवून.
हर्बल हेअर वॉश कम्स अ‍ॅट बाथरुम क्लिनिंग कॉस्ट.

माझे आधी सरळ असणारे केस खुपच वाकडे तिकडे झालेले, धड कुरळेही नाही त्यामुळे मी केस स्ट्रेटनिंग केले पण तेव्हापासुन केस खुपच गळतात Sad आधीही गळायचे पण आता प्रमाण भयंकर वाढलाय त्यात कोंडाही खुप आहे. आतातर केस इतके विरळ झाले आहेत की आधी जेव्हा मी वेणी घालताना तीन बटांपैकी एक बट जेव्हढी होती तेव्हढे आता माझे संपुर्ण केस आहेत Sad

याआधी यावर चर्चा झाली आहे का? मी शेवटची काही पाने वाचली पण त्यात स्ट्रेटनिंगमुळे गळणार्‍या केसांसाठी काही उपाय नाही दिसले. घरगुतीच हवे आहे असे काही नाही जर एखादा चांगला रिझल्ट देणारे शॅम्पु. कंडिशनर, औषधे तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर सुचविलेत तरी चालेल. जर याआधी ही चर्चा झाली असेल तर सांगा म्हंजे मी शोधुन बघते, ६०-६५ पाने वाचायला कंटाळा आलाय.

निल्सन, आधी डॉक्टरांना भेटा. तुमची सारी लक्षणं आणि तुम्हाला जाणवणारी कारणं ( कोंडा, केस धुण्यासाठी वापरणारे पाणी, शांपू यातील बदल, आजारात घेतलेली strong औषधं, hormonal changes) हे सर्व सांगा. कित्येक वेळा योग्य औषधोपचार सुरू झाल्यावर २ आठवड्यात फरक जाणवतो. मीही महिना झालाय उपचार सुरू करुन. चांगलाच फरक जाणवतो आहे आणि त्यांनी गोळ्या vitamin च्या दिल्या आहेत आणि कोंड्यावर वरुन लावायला औषध. म्हणजे मला असं जाणवलं की आतूनही काहीतरी कमी पडतंय.
तुमच्या family doctor ला विचारू शकता एखाद्या dermatologist चं नाव/पत्ता.

हैर स्मूथ्निन्ग मस्त आहे.
मि केले आहे.मस्त झालेत केस
अधिक माहितिसथि लिन्क पहा.
अनि माझे बेफोर आफ्टर फोतो टाक्ते नन्तर.

हैर स्मूथ्निन्ग विशयि खलिल लिन्क पहा.

http://www.theindianbeauty.com/2015/02/hair-smoothening-experience-geeta...

सारेग, प्राचिस धन्यवाद.
मीपण अखेर चांगल्या dermatologist कडे जायला हवे या निर्णयावर आली आहे. आता ठाण्यात एखादा dermatologist शोधणे आले.

माझे केस लांब सडक आहेत. आधी जाड होते, पण आताशा खूप विरळ झाले आहेत Sad केस वाढले कि गळतात का? जर तसे असेल तर मी केस ट्रिम करू का? किंवा कुठली ट्रीटमेंट जी आपल्यापैकी कुणी केली असेल तर please सांगा..

Hi,

Please suggest solution on hair fall. Kes khup galat ahet. No vitamin deficiency or dandruff. Indiat bore well chya panyane kes dhutlysne zale asave Ka? Pls suggest any remedies

केसांच्या एकुणच सर्व तक्रारींमध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे "शतावरी" चा वापर.....

शतावरी आजकाल गोळ्यांच्या स्वरुपात पण अनेक आयुर्वेदिक कंपन्यांनी काढली आहेत, जी आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळ्तात.....

मी 'शारंगधर कंपाऊंड' च्या गोळ्या घेते....

माझ्या होस्टेलवर बोअरवेलचे पाणी आहे. त्याचा केसांवर काही दुष्परिणाम होतो का?
जसे की केस गळणे , पांढरे होणे.

Thanks a lot. Me patanjali Che products indiatun magvaycha plan kartey. Any suggestions for hair products like oil, shampoo, conditioner..pls Sanga. Shivay nature bounty chya hair skin n nail chya 5000mcg biotin chya Costco chya golya suru kelya ahet. Have anybody used it? Kiva dusra kahi..will appreciate any feedback. Also does a trip to dermatologist help? Any reco?

Thanks a lot

पतंजली चे बदाम तेल चाम्ङले आहे केसांना.आणि एक साधे आहे त्याचा वास जरा तीव्र आहे.(ज्यांना केओ कार्पिन किंवा हेअर अँड केअर वापरायला आवडत होते त्यांना चालू शकेल.)
मिल्क प्रोटिन शांपू आहे तो मला आवडला.बाकी साधा क्लिनिंग केश कांती कोरडे केस वाल्यांना थोडा कोरडा वाटू शकतो.

Sesa (सेसा) hair oil केसगळती साठी खूप चांगलं आहे.
पण ते बोअरवेल चं पाणी नक्कीच केसांना फार अपाय करतं Sad
तो प्रश्न सुटण्यासार्खा असला तर आधी बघा...

Pages