केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नी, ते म्हणजे अगदी शाही स्नानाच्या वेळेस. (म्हणजे जेव्हा वेळ, मूड और नारळ जब मिल बैठेंगे तीन यार वगैरे Wink )
मंजूडे, संत्रं सोलायची सवय वाईट. Lol मृणाल १, हो छान होतात केस.
ज्यांच्या घरी जास्वंद आहे त्यांनी त्याचे फूल मिक्सरमधे फिरवून तो गर तेलात मिक्स करून डोक्याला चोपडा. कोणत्या रंगाची जास्वंद केसांना चांगली यावर स्वतंत्र चर्चा करा.

मला केसांना फक्त क्लासिक लाल भडक रंगाची सिंगल लेयर जास्वंद च गुण देत असेल असं वाटतं. बाकी मॅजेंटा/पिवळ्या/मल्टिलेयर लाल जास्वंदाच्या फंदात पडत नाही Happy

आशू, थांकू.

कधीकाळी केसांना फक्त आणि फक्त शिकेकाई-रिठाच लागायचा आणि नियमितपणे खोबरेल तेल, ते दिवस सगळ्यात ब्येश्ट होते केसांसाठी. आता तेच करायचंय. फक्त आवळा वगैरे भर घालून. कंडिशनिंगसुद्धा असंच नैसर्गिक पदार्थंच्या पावडरी वापरून किंवा अंगणातून कोरफड काढून ताजा गर चोळून व्हायचं.
मी ना दु काढून तो प्रयोग यशस्वी केलाय, पण तेवढे पेशन्स आत्ता तरी नाहीत. बाकी लहर आली तर क्वचित दही/ लिंबू वगैरेही लावलंय. मेंदी अगदीच कमी वेळा.
असो. वरचे सगळे सल्ले लक्षात ठेवून कायकाय करता येईल ते बघते. (कंडिशनर लावल्यावरची २-३ मिनिटंही नीट वाया घालवेन Wink )

केसांना कलर (loreal वापरला होता ) केल्यावर केस खूप गळतात. मेंदी लावल्यावर सर्दी होतेआणि मेंदीने येणारा रंग मला आवडत नाही. केस खूप पांढरे झाले आहेत, म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. काय करू?

केस खूप पांढरे झाले आहेत, म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. काय करू?

काही करण्यासारखे असते तर मी माझे लांब केस कापुन टिचभर केले नसते. केस एकदा पांढरे झाले म्हणजे झालेच असा एकुण ९९% अनुभव आहे. बाकी १ टक्का नशिबवान लोकांचे परत काळे होतही असतील.

रंग लावला की केसांची वाट लागते, त्यातही १ टक्का नशिबवान लोक असतील ज्यांची लागत नसेल. माझ्या ओळखीतल्या केस रंगवलेल्या लोकांमध्ये नशिबवान आहेत एक दोघे. बाकी सगळे केस अज्जिबात रंगवु नकोस म्हणुन सांगणारे आहेत.

मी सर्दी झाली तरी निमुट ग्रेनिल मेंदी लावते. मेंदीत निलगीरी तेल घालायचे म्हणजे सर्दी होत नाही.

माझा ही same problemआहे. केस कमरेपर्यंत लांब आहेत. 2 वर्षापूर्वी 1फुट कमी केले होते, खूप गळतात म्हणून. नंतर खूप वाईट वाटलं. आता पुन्हा कापणार नाही. निलगीरीची आयडीया भारी आहे. या वेळेस करून पाहते.
धन्यवाद!

प्राची, आपण दोघी एकाच बोटीत... मेंदीने केस कोरडे होतात असं बर्‍याच पार्लरवाल्या सांगतात. खरं आहे का हे?? कलर केल्याने केस जास्त पिकतात असंही ऐकलंय.. आता 'जाये तो जाये कहां' असं झालंय माझं पिकलेल्या केसांमुळे...

खरं आहे का हे?? >> हो कोरडे होतात .. मी मेंदी धुतल्यावर नंतर तेल लावुन मसाज करते नि परत दुसर्या दिवशी धुते.. १-२ दिवस लागतात जरा सुळसुळीत व्हायला.. मी ह्यावेळी पतंजलीची मेंदी वापरली.. मेंदी भिजवताना अंड घातलं तर मऊ होतात असा मैत्रिणीचा अनुभव आहे..
आमच्याकडे तर अनुवंशिक आहे केस पांढरे होणे ..अगदी १०वी पासुन Sad .. मेंदी लावणे हे तेव्हापासुनच आहे!

आयाबायांनो, विशेषतः प्र९ आणि आशू, तुमचे चरणकमल इकडे फोटो-पोस्ट करा. त्याचं तीर्थ घेते Proud
किती तो उत्साह आणि उरक!!

आमच्याकडे तर अनुवंशिक आहे केस पांढरे होणे ..अगदी १०वी पासुन अरेरे .. मेंदी लावणे हे तेव्हापासुनच आहे!

सेम पिंच.......... Sad मी तर आता बॉयकट करणार आहे आणि सरळ पांढरेच ठेवणार आहे त्यांना. मरा साल्यानो.. Happy

वरदा, चरणकमल नाही केस धुवायचा विषय आहे. मात्र आम्ही शंकरासारखं केसांतून गंगातीर्थ नाही देऊ शकत. Wink
एवढा उत्साह प्रत्येक वेळी नसतो गं. पण चारापैकी एका तरी रविवारी करावं हा बेंचमार्क.

साधना मीही कन्येच्या विवाहानंतर पांढरेच ठेवणार आहे, म्हणून वरचे वाचून फसकन हसू आले. Lol मला आताही काहीच हरकत नाही पण लेकीला आवडत नाही आई म्हातारी दिसलेली म्हणून.. (असली तर चालते पण दिसू नये :नामुभा:

साधनातै Proud
साधना मीही कन्येच्या विवाहानंतर पांढरेच ठेवणार आहे >> असं आमच्या मातोश्री बॉयकट साठी म्हणायच्या गंमतीने .. नाईलाजाने हेच आपोआप झालं ही गोश्ट वेगळी..

मलाही कलर करावे लागतात महिन्यातून एकदा. मी लॉरीयल चा व्हिटॅमिनो कलर शॅम्पू न कंडिशनर वापरते., आठवड्यातून दोनदा भरपुर तेल लावून धुते . घट्ट बांधत नाही. ड्रायर वापरत नाही.

सुरुवातीला भरपून गळले. मग रोज २ अंडी खायला सुरुवात केल्यापासून कमी झाले.

मी पण पन्नाशी नंतर. कलर करण थांबवणार.

माझ्या ४ वर्षाच्या लेकीच्या डोक्यात थोडा कोंडा दिसतोय

तेल खुप कमी वापरते.

जास्त तेलाने स्कीन प्रोब्लेमस् होत होते.

उपाय सांगा

मेंदी लावताना २ चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा ना दू ची साय घाला त्यात. कमी कोरडे होतील.>> पण असं केल्याने रंग चढतो का? आपण आधी केस स्वच्छ धुऊन घेतो कारण तेलकट केसांवर रंग चढत नाही.

मला आताही काहीच हरकत नाही पण लेकीला आवडत नाही आई म्हातारी दिसलेली म्हणून.. (असली तर चालते पण दिसू नये :नामुभा:

तुलाही सेम पिंच ग.. Happy

स्वधा - जास्त थंडी असेल तर स्केलिंग जास्त होते . कोंडा & स्केलिंग वेगळे वेगळे प्रकार आहेत . स्केलिंग असेल तर सूट होणारे तेल लावणे हाच उपाय कारण मुलगी खूप लहान आहे .
इतक्या लहान वयात कोंडा नाही होत - हे एका पेडी ने सांगितलेले आठवले

पण असं केल्याने रंग चढतो का? <<
ते नाही माहित. मी आजवर मेंदीच्या हलक्या छटेसाठी आणि मेनली कंडिशनिंगसाठीच मेंदी लावलीये.
तसाही मेंदीचा केशरी रंग विचित्र वाटतो केसांवर.

मेंदी लावल्यावर ती नुसत्या पाण्याने काढून टाकायची आणि भरपूर तेल लावून ठेवायचे. मग दुसर्‍या दिवशी शांपू करायचा असेच करता ना? की मेंदी काढून टाकली की लगेच शांपू करता?

जर कंडिशनिंगपुरती लावत असशील तर ऑऑ/ ना दू क्री घालून कर.
रंगासाठी करत असलीस तर मग मेंदी काढून टाकल्यावर भरपूर कोमट तेल स्काल्पमधे मुरवणे व केसांच्या टोकांपर्यंत लावणे मस्ट.

मी तरी दुसर्या दिवशी शांपु करते.. मी मेंदी २-३ महिन्यातुन एकदा लावते>>+१
मेंदी काढून टाकल्यावर भरपूर कोमट तेल स्काल्पमधे मुरवणे व केसांच्या टोकांपर्यंत लावणे मस्ट.>> मीही हेच करते

स्वधा, स्केली स्कॅल्प असेल तर आंघोळीच्या ५-१० मिन. आधी लाइट मॉइश्चरायझर लावून (हो, स्कॅल्पवर)आणि हलक्या हातांनी मसाज करायचा. जरा ५ मिन. थांबून सॉफ्ट ब्रशने ब्रश करायचे केस आणि मग जो कुठला शॅम्पू असेल तो लावून स्वच्छ धुवून टाकायचे केस. असे ४-५ दिवस केलेत तर कमी होइल. लाइट हेयर ऑइल लावलं तरी चालेल मात्र केस धुताना व्यवस्थित धुवून टाकलं पाहिजे नाही तर कोंडा/स्केल्स आणखीच वाढतील.

माझ्या मुलाला खूप लहान असताना हा त्रास होता आणि मॉइश्चरायझर + मसाज या उपायानं कमी झाला.

Pages