Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला विचारायचे होते की हेअर
मला विचारायचे होते की हेअर कलरींग मुळे बाकिचे केसही पांढरे होतात ना....
मला अगदी जनरलाईज करुन सांगता नाही येणार पण माझ्या नणंदेने केस एकदा रंगवले आणि नंतर तिच्या केसांची वाट लागली. आधी थोडेसेच केस पांढरे होते पण रंगवल्यावर पांढरे व्हायचा स्पीड खुप वाढला. आता जे काही आहे ते लपवण्यासाठी सतत रंगवावे लागतात.
तिच्या केसांची अशी वाट लागण्यामागे तिच्या रोजच्या आहाराचा, वयाचा आणि आनुवंशिकतेचाही मोठा वाटा असु शकतो. केसरंगावरच पुर्ण दोष देता येणार नाही. पण ती मात्र रंगालाच शिव्या देत असते
काही जणांना केस रंगवल्यावर फारसा त्रास होत नाही हेही मी पाहिलेय.
कलर केले तर सगळेच केस पांढरे
कलर केले तर सगळेच केस पांढरे होतात हा बर्यापैकी गैरसमज आहे. निदान माझे नाही झाले.
<<मला अगदी जनरलाईज करुन
<<मला अगदी जनरलाईज करुन सांगता नाही येणार पण माझ्या नणंदेने केस एकदा रंगवले आणि नंतर तिच्या केसांची वाट लागली. आधी थोडेसेच केस पांढरे होते पण रंगवल्यावर पांढरे व्हायचा स्पीड खुप वाढला. आता जे काही आहे ते लपवण्यासाठी सतत रंगवावे लागतात.>> हो मीदेखील असच पाहिल आहे... म्हणूनच विचारले..
मेहंदी एकवेळ बरी पण कलर नकोच असच मी पार्लरवालीला सांगितल..
केस मोकळे सोडले तर ते खूप
केस मोकळे सोडले तर ते खूप गुंततात. काही ट्रीक आहे एखाद वेळेस केस मोकळे सोडायचे असती पण जास्त गुंतू नाहीत .
आधी थोडेसेच केस पांढरे होते
आधी थोडेसेच केस पांढरे होते पण रंगवल्यावर पांढरे व्हायचा स्पीड खुप वाढला. आता जे काही आहे ते लपवण्यासाठी सतत रंगवावे लागतात.>>>>>>>>> हो साधना! असंच होतं.मीही त्यातून जातेय.पण माझे केस जास्त पिकले त्यात आनुवंशिकता तर आहेच,पण केस भर्पूर पांढरेही झाले.आता(दीड वर्र्षात) तर अर्धे झालेत.त्याला घ्यावी लागणारी स्टिरॉईड्स, पिण्यात आलेले बोअरिंगचे पाणी,अत्यंत कमी झोप आणि कलर सर्व गोष्टी कारणीभूत आहेत.
केस मोकळे सोडले तर ते खूप
केस मोकळे सोडले तर ते खूप गुंततात. काही ट्रीक आहे एखाद वेळेस केस मोकळे सोडायचे असती पण जास्त गुंतू नाहीत . ----- conditioner वापरतेस का ??
इथे उपयुक्त माहीती आहे.
इथे उपयुक्त माहीती आहे. आजूबाजूला स्क्रॉल करत रहा.
http://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality/page/5
केस कसे धुवावेत
केस कसे धुवावेत ?
http://www.sanatan.org/mr/a/1263.html
---------/\---------. अवांतर
---------/\---------.
अवांतर तरीही, तळेगावच्या एका आयुर्वेदिक डॉ.नी त्यांना झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरमधे, कोणतीही अॅलोपॅथिक औषधे, सर्जरी न करता केवळ आयुर्वेदिक औषधे+ गोमूत्र यांचा वापर करून गाठ कमी केली होती.त्या डॉ.चे नाव मिळाले तर लिहिन.त्यांना वैद्य रमेश नानल यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
स्ट्रीक्स रंगवलेल्या कोरड्या
स्ट्रीक्स रंगवलेल्या कोरड्या केसांना लावायला कुठलं हेअर सेरम चांगलं आहे?
खडीसाखर
खडीसाखर
काही दिवसांपुर्वी नवी मुंबई
काही दिवसांपुर्वी नवी मुंबई या धाग्यावर केश-तेलाबद्दल चर्चा झाली होती. कर्नाटकमधील आदिवासी लोकांकडुन मिळालेलं केश-तेल होत, रिसल्ट खुप चांगला आहे मी स्वत: तेल वापरत आहे.
केस गळणे, कोंडा, पांढरे होणे या समस्यांवर खुप उपयोगी आहे. माझ्या केसांना कोणत्याही गोष्टीचा उपयोग होत नव्हता पण ह्या तेलाने चांगलाच फ़रक पडला.
कोणाला हवे असल्यास मला विपु करा. मी जास्त तेल मागवले आहे. मोठी बाटली ५०० रु. आणि छोटी बाटली २५० रु. ला आहे.
कोनते तेल आहे ? वेब साइ ट वर
कोनते तेल आहे ?
वेब साइ ट वर मिळेल का ते ? नाव काय आहे ?
Alopecia and baldness var
Alopecia and baldness var kahi ayurvedic upay ahet ka? Me 6 mahinyapurvi color laval aani maze kes galne ani itching chalu zale ani alopecia trigger houn baldness aala ahe.
मीरा मला जेवढा अनुभव आणि
मीरा मला जेवढा अनुभव आणि माहिती आहे त्यानुसार सांगते, female baldness किंवा alopecia ही समस्या हॉर्मोनल इमबॅलन्स मुळे होते, यामधे खुप मोठ्या प्रमाणावर केस गळतात, माथ्यावरचे केस खुप विरळ होतात वेळीच लक्ष दिले नाही तर टक्कलही पडु शकते. याचा संबंध तुमच वय आणि मासिक पाळी याच्याशी असतो. त्याचा केस रंगवण्याशी तसा काहीच संबंध नाही. केस रंगवण्यामुळे फ़ारतर केस गळणे वाढू शकते पण alopecia होण्याची शक्यता अगदी नगण्य.
यामधे तुम्ही सर्वात जलद आणि खात्रीशीर उपाय म्हणून प्रथम एखादा चांगला dermatologist / skin & hair specialist बघा. ते १-२ प्रकारच्या गोळ्या आणि केसांना ( विरळ केस असलेल्या जागी ) लावायला लोशन देतील. त्या लोशन मधे जनरली मिनॉक्साईड असतं त्याचं % तुमच्या समस्येच्या तीव्रतेवर अवलंबुन आहे. २% / ५% असं असेल.रेग्युलर ट्रीट्मेंट घेतल्यास २-३ महिन्यात केसांची स्थिती खुप सुधारते. हे बर्यापैकी खर्चिक प्रकरण आहे.
आयुर्वेदाबद्दल जाणकरांनी अधिक माहिती द्यावी.
thanks mugdha. nahi
thanks mugdha. nahi minidoxidil work nahi zale mala 8 diwasatach band karave lagale. tyane itching ani puffiness wadhala. yeah tuze barobar ahe, mi 47 ahe ani mazi masik pali irregular ahe.
tyamule color khup vel theval tyache blame karat note pan age and pali maybe blame ahe.
केसांच्या बाबतीत बॅक टू
केसांच्या बाबतीत बॅक टू बेसिक्स जायचं ठरवलंय. पूर्वी मी शिकेकाई वगैरे लाड करायचे ते पुन्हा सुरू करायचं मनात घोळतंय. तर मला चांगल्या पावडरी कुठे मिळतील? सुरूवातील लहान पॅकेट्स आणून माझा लाड करायचा उत्साह किती टिकतो ते बघून मग मोठी पॅक्स आणता येतील. हव्या असलेल्या पावडरी :
शिकेकाई
रिठा
आवळा
कडुनिंब
नागरमोथा
ब्राह्मी
माका
एकदम एकत्र केलेली मसाला शिकेकाई मिळते ती नकोय. मी मला मानवणार्या प्रमाणात ह्या पावडरी मिसळणार आहे. मी पुण्यात धायरीत रहाते. तुळशीबाग वगइरे ठिकाणी जास्त जायला हल्ली जमत नाही. अंबादास दुकान माहिती आहे ऐकून, पण तिथे छोटे पॅकेट्स असतील का? किंवा इतर कुठे मिळतील?
नाहीतर सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे आमच्या रत्नांग्रीतून मागवणे!
अजून एक म्हणजे मी कंडिशनर फारसा कधी वापरलेला नाही. पूर्वी लिवोन सिल्की वापरलाय, केस वाळले की पहिल्यांदा विंचरायच्या आधी लावायचा त्या टाईप्स. तर सौम्य असा कोणता चांगलाय?
पावडरींसाठी तुळशीबागेतले
पावडरींसाठी तुळशीबागेतले काष्ठौषधीचे दुकान.
लिवोन सिल्की हे कंडीशनर नाही. कंडीशनर हे ओल्या केसांना लावून धुवून टाकायचे असते. लोशन टाइप प्रकार असतो. लिवोन वगैरे सिरम्स आहेत.
सिरम वापरायचे तर मेट्रिक्सचे सगळ्यात उत्तम. अक्षरश: एक थेंब पुरते.
ओके. पण सिरम नको. कंडिशनर
ओके.
पण सिरम नको. कंडिशनर ठीके. डव्ह चं एक पॅक फुकट मिळालंय. त्यावर ते एका वेळि संपवायला सांगितलंय, पण मला ते जास्त वाटतंय. कमरेपर्यंत लांब केस असतील तर किती लावायचा कंडिशनर? आणि फुकट असलं तरी तेच वापरलं पाहिजे हा हट्ट नाही. त्यामुळे अजून कोणता चांगला असेल तर तोही सुचव.
सिरम का नको? कंडिशनर का
सिरम का नको? कंडिशनर का ठिके?
गरज वाटत नसेल तर काहीच वापरू नकोस.
तेल लावताना मात्र अगदी केसाच्या टोकांपर्यंत लावत जा.
कंडीशनर भरपूर लावलेला चालतो. पण शांपू वा कंडिशनर काहीही केसात राहता कामा नये.
लोटस किंवा मेट्रिक्स बायोलाज वापर.
जो शाम्पू त्यांचेच कंडीशनर हा मंत्र लक्षात ठेव.
सिरम का नको? कंडिशनर का
सिरम का नको? कंडिशनर का ठिके?>> काही कारण नाही. केस विंचरायच्या आधी ते सिरम वगैरे विसरले तर उगीच अरेरे वाटेल
कंडिशनर विसरले तर काय वाटेल याचा अजून विचार नाही केलेला.
म्हणजे तुझं बरोबर आहे, पण कसं जमावं आता!
मी शाम्पू प्रकरण थांबवायचं म्हणून बॅक टू बेसिक्स जायचं म्हणतेय नि तू सांगतेयस की जो शाम्पू त्यांचाच कंडिशनर!
मी शाम्पू करताना केसांत तो रहाणार नाही याची काळजी घेते. पण आता शिकेकाई वगैरेच माझे केस वाचवू शकेल याची खात्री झाली आहे. तेलबिल यथासांग नीटपणे असतं.
गरज वाटत नसेल तर काहीच वापरू नकोस>>> हेच घडणारसं दिसतंय!
बघू कायकाय जमतंय.
थांकू.
हेअर मास्क कोणता चांगला?
हेअर मास्क कोणता चांगला? कोणाला अनुभव आहे का?
केस विंचरायच्या आधी ते सिरम
केस विंचरायच्या आधी ते सिरम वगैरे विसरले तर उगीच अरेरे वाटेल << मग परत लाव आणि विंचर. हा का ना का..
पेरू, विकतच्यातला मला रिचफीलचा आवडला.
अन्यथा मी माझा माझा घरगुती करते वेळ आणि मूड असेल तेव्हा.
हाय
हाय
माझ्या केसात फार कोंडा झाला
माझ्या केसात फार कोंडा झाला आहे ?
घरगुति उपाय सुचवा
प्र, तुला केमिकल काही नकोय
प्र, तुला केमिकल काही नकोय असं दिसतंय म्हणून -
मग हलक्या हाताने कोमट पाण्याने केस धू. चोळू नको. टॉवेलने टिपून घे आणि तसाच बांध. वाफ आत मुरू दे. जरा वेळाने टॉवेल सोडून केस वाळू दे मग गुंता सोडवत बस. 
रात्री तेल गरम करून केसांना चोपड. तेल लावल्यावर कंगव्याने विंचर म्हणजे तेल सगळीकडे लागेल. दुसर्या दिवशी न्हाताना केस पुन्हा विंचरून गुंता नसेल असे ठेव. वरील सर्व पावडरी नी ने लिहीलंय तिथे छोट्या प्रमाणात मिळतील. सिंहगड रोडला नाही. त्यासोबत जास्वंद पावडरही घे. तुझी ही शिकेकाई गरम पाण्यात भिजवून मग गाळून घे. कारण या पावडरी स्काल्पला चिकटून राहतात आणि खसाखसा चोळलं तर केस तुटतात. स्काल्पला राहिलेल्या या पावडरींनी डोकं खाजतं आणि खाजवल्यावर नखात येतात (ईइ :फिदी:). शिकेकाई धुवून झाली की जास्वंद पावडरची पाण्यात पेस्ट करून तेलासारखी मुळापासून शेंड्यापर्यंत लाव. हे झालं कंडिशनिंग. आता मधे जी दोन तीन मिनीटं वाया घालवायची त्यात बाथरूम आवरून घे. साबण, पावडर, फिनेलची इन्व्हेन्ट्री घे.
अनेकदा चुकून माझ्यासाठी उपयोगी ठरलेला फॉर्म्युला तुम्हालाही उपयोगी पडो ही साठा उ क पा उ सु संपूर्ण!
आता मधे जी दोन तीन मिनीटं
आता मधे जी दोन तीन मिनीटं वाया घालवायची त्यात बाथरूम आवरून घे.>>
फरशीवर आणि टाईल्सवर कुठे शिकेकाई/ इतर पावडरी उडाल्या असतील तर प्रोजेक्ट टाईल्स सफाई हाती घेण्यास हरकत नाही. कंडिशनिंग जितकं जास्त तित्के केस मऊमऊमऊमऊमऊ!!
वा हे शिकेकाई वाले ऐकायला छान
वा हे शिकेकाई वाले ऐकायला छान वाटते आहे. कधी गावात जाऊन पावडरी आणणे झाले तर नक्की करेन.
@ आशु - जास्वंद पावडरची
@ आशु - जास्वंद पावडरची पाण्यात पेस्ट करून तेलासारखी मुळापासून शेंड्यापर्यंत लाव. हे झालं कंडिशनिंग. - खरच regular conditioner चा effect येतो का ग ?
आशू हे सगळं करताना एकदा
आशू हे सगळं करताना एकदा नारळाचं दूध वापरून बघ. अजूनच मऊ होतील बघ केस.
Pages