कोणी 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' पाहिला आहे का? हॉरर फिल्म आहे... पण angle वेगळाच आहे. काही तरुण 'ब्लेअर विच' या दंतकथेवर डॉकुमेंटरी करायला जंगलात जातात आणि त्यांना बाहेर पडता येत नाही... त्यांच्या कॅमेरातुन त्यांना जे काही दिसतं (किंवा नाही दिसत), ते जे अनुभवतात ते दाखवलय. हातात धरलेला कॅमेरा, अजुबाजुचे आवाज यामुळे मस्त वातावरण निर्मिती झाली आहे... प्रत्यक्ष काही दाखवलच नाहिये पण हॉरर मस्त तयार होतो.
याचे शुटपण तसेच झाले होते.. काही कलाकारांना जंगलात सोडुन द्यायचे व दिवसभरात काय करायचय ते साधारण त्यांना सांगायचं, त्यातल्याच एकाला कॅमेरा दिला होता!
'गंध' मी बघितला. एक वेगळा प्रयोग असलेला सिनेमा म्हणून सर्वांनी बघावा असे वाटते. एकमेकांशी संबंध नसलेल्या, पण 'गंध' हा 'धागा' असलेल्या तीन अप्रतिम कथा या सिनेम्यात आहेत. चित्रपट चालेल की नाही, याची काळजी न करता मराठी सिनेमाचे निर्माते असे धाडस करीत आहेत, ही फारच छान गोष्ट आहे.
मिलिंद सोमणचे दर्शन सुखावून जाते. मराठी बोलताना त्याला पहिल्यांदाच पाहिले मी तरी. सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, नीना कुलकर्णीही अप्रतिम. इंग्रजी सबटायटल्ससकटही आहे हा सिनेमा काही थेटरांत.
Saw (1 to 5) सुद्धा त्याच प्रकारात मोडतो अस ऐकून आहे
--------------------------------------------------
१००% ..चुकुनही वाटेला जाउ नका..मी सॉ ५ पाहिला..आता परत सॉ चे नाव काढणार नाही..
Submitted by mansmi18 on 1 September, 2009 - 09:54
मनोरमा... बघितला. संग्रही ठेवण्यालायक. अभय देओलचे काम मस्त. मात्र मंत्र्याला (राठोड ?)विनाकारणच "हिंदूत्ववादी" पक्षाचा नेता दाखवले आहे. तो कुठल्याही पक्षाचा दाखवला असता तरी कथानकाचे काही नुकसान होणार नव्हते.
अँकी, बॉलीटीव्हीच्या लिंकबद्दल धन्यवाद. मी डीव्हीडी आणून ठेवली होती, ती अर्ध्यातच अडकली. मग उरलेला बॉलीटीव्हीवर बघितला
Submitted by तृप्ती आवटी on 1 September, 2009 - 17:22
Quintin Tarantino चा Inglorious Bastards बघीतला. माझ्या पॅलेटसाठी थोडा जास्त violent असला तरी क्रिस्तोफ वॉल्झनी केलेली हान्सची भुमिका बघण्यासाठी तरी नक्कीच बघायला हवा. एकदम सही काम केलय त्याने.
बाकी ब्रॅड पीटचा सदर्न अॅक्सेंट कळायला मला जरा कष्ट पडले थेटरात सबटायटल नसल्यामुळे.
Submitted by रूनी पॉटर on 1 September, 2009 - 17:27
' निशाणी डावा अंगठा ', एक जबरदस्त चित्रपट..
खूप दिवसापासून बघायचा होता पण ऑनलाइन उपलब्ध नव्हता... कालच आपलीमराठी साइट वर पाहिला.... सगळ्यानी एकदा तरी आवर्जून पहावा असा पिक्चर... अशोक सराफ, मोहन आगाशे, निर्मिती सावंत, अनासपूरे याची कामे एकदम खतरनाक झालीत... कुठेही कंटाळवाणा होत नाही..प्रौढ साक्षरता अभियाना चा शिक्षक लोक कसा बोर्या वाजवतात त्यावर आहे.... काही-काही संवाद एकदम भारी आहेत..
जिल्हा परिषदेमधल्या शाळा - मास्तर लोक, सरकारी अधिकारी वर्ग यांचे चित्रण अगदी पर्फेक्ट घेतलेय..
काल शॅडो पाहिला (का? का?? का???) नासिर खानने हिरो बनण्याची हौस भागवुन घेतली आणि सोबत सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर वगैरे मंडळींनी पैशांकडे पाहुन डोळे मिटुन त्याला साथ दिली.
सुरवातीपासुन शेवटपर्यंत फक्त अ. आणि आ. आहे. रिपोर्टर ह्रिशिता एकदाच हातात माइक घेऊन काहीतरी बोलते, पुढे फक्त आयटेम साँग्स करते.
सगळ्यात कहर सोनाली कुलकर्णीचा. सोनालीताईंच्या तोंडुन नासिरला उद्देशुन 'मै तुमसे प्यार करती हु' हे ऐकुन मी सोफ्यावरुन खाली पडले. असा डायलाग पुढे येईल याची जराही चुणुक आधीच्या एकाही सिनमध्ये न दाखवता डायरेक्ट 'मै अभी चाय पिने जा रही हु' च्या थाटात हा डायलाग आल्यावर मला जोरदार धक्का बसला. शेवटी लग्न बिग्न केलं की काय देव जाणे. सीडी आणलीय तर पुर्ण पाहिलीच पाहिजे म्हणुन डोळे जबरदस्तीने उघडे ठेवलेले मी, पण तरीही कधी मिटले कळालेच नाही......
सोनालीच्या बाबाचे डबिंग कोणी केलेय ते ओळखता आले नाही, पण आवाज खुप ओळखीचा वाटत होता. आवाजात खुप भाव होते पण नटाच्या चेह-यावरील रेषही हलत नव्हती.
त्या रात्री पाउस होता पाहिला. मला बोर वाटला. तोच विषय. गावातले नीच पॉलीटीशन बायकांचे शोषण करणार. त्यात एका फॅमिलीतील बाईचे कसे शोषण होते वगैरे वगैरे.........
ती अमृता सुभाष जरा irritating वाटते. ती कुठल्याही मूवी मध्ये लॉउडच वाटते करीनासारखी.
Submitted by मनःस्विनी on 3 September, 2009 - 12:23
आणि यात बरेच कच्चे दुवे होते. सोनाली कुलकर्णी नवर्याला वाचवायला एकदा पुढार्याच्या इच्छेला बळी पडते मान्य्,,पण नवरा सुटल्यानंतरही ती पुढे तेच करत राहते. आणि नवर्याने सोडल्यावरही? खरतर ती सुशिक्षित बाई असते ना..गाव सोडुन दुसरीकडे सहज जाउ शकली असती ती..
यातले काही सीन आणि डायलॉग जरा भडक झाले असे मला वाटले.
नावावरुन मला वाटलेले की "सस्पेन्स" असेल पण काही भलताच निघाला
Submitted by mansmi18 on 3 September, 2009 - 12:51
हो तेच ना, एक independant lady, स्वतचे विचार परखड पणे मांडणारी(कुठल्यातरी एका सीन मध्ये ती सयाजी शिंदेला तिचे विचार एकवते वगैरे), स्वताची कंपनी चालवणारी दाखवलेली आहे. मग गाव सोडून जायची हिंमत का नसते? काहीही......
त्यात ती अमृता.. एकदम फालतु अॅक्टींग असते तिची तर सगळीकडे......... अॅटलिस्ट मी पाहिलेल्या सगळ्या तिच्या मराठी चित्रपटात.
मी आपली उगाच रात्रीचा जागून पाहिला, आता येइल सस्पेन्स आता काहितरी वेगळे असेल. ती गाणी, डायलॉग सगळे बोर......................
सयाजी शिंदे म्हणजे दुसरा संजय दत्त झालाय म्हणजे तेच तेच रोल.
संजय दत्त कसा गुंडाचे काम झोपेत करेल तसेच हे.... आवाज्,चेहरा एकदम त्याच भुमिकेला पर्फेक्ट. तोच तोच पणा.
Submitted by मनःस्विनी on 3 September, 2009 - 13:09
माझ अनुमोदन ' निशाणी डावा अंगठा 'साठी केदार्-जपान ला , आणी त्या रात्रि पाउस होता यासाठि वरिल सगळ्यांना..
सोनालिच्या बर्याच बारिक आवाजाला आशाबाईंचा आवाज अजिबात सुट होत नाही.
ढिसाळ कथा एकदम बटबटित चित्रण, अम्रुता सुभाष भयंकर लाउड.
(डिआयडि बघितल असल्यास २-५ मिनिटासाठि व्रुशालिहि दिसते, अम्रुताचि मैत्रिण दाखवलिय.)
Submitted by प्राजक्ता on 3 September, 2009 - 14:52
'गंध' पहाच!!!
जुना क्रश आता इतका खास नाही वाटत, कारण तो तोंड तर उघडतोच, वर मराठीही बोलतो पण कुठेही चीप न होता 'सेन्शुअस सीन' (तोही मराठीत) कसा चित्रित करतात यासाठी कुंडलकरला मानावं लागेल!
एव्हाना ठाऊक असेलच, की गंधमध्ये तीन वेगवेगळ्या कथा आहेत, सगळ्यात कॉमन एकच- गंध किंवा वास. तीनही कथा सशक्त. त्यातली कोणती जास्त आवडली सांगू शकत नाही. पण पूर्ण कथा म्हणून पहिली, वेगळी म्हणून दुसरी आणि केवळ नीना कुलकर्णी आणि त्या कथेतल्या पार्श्वध्वनीसाठी तिसरी आवडली. 'गंध' एक अनुभव आहे. पहाच!
खरच आहे wrong turn अत्यन्त
खरच आहे wrong turn अत्यन्त किळसवाणा आहे. Saw (1 to 5) सुद्धा त्याच प्रकारात मोडतो अस ऐकून आहे. म्हणुन बघण्याची इच्छा नाहि झाली.
गंध बघीतला का कुणी??? कसा
गंध बघीतला का कुणी??? कसा वाटला???
कोणी 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट'
कोणी 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' पाहिला आहे का? हॉरर फिल्म आहे... पण angle वेगळाच आहे. काही तरुण 'ब्लेअर विच' या दंतकथेवर डॉकुमेंटरी करायला जंगलात जातात आणि त्यांना बाहेर पडता येत नाही... त्यांच्या कॅमेरातुन त्यांना जे काही दिसतं (किंवा नाही दिसत), ते जे अनुभवतात ते दाखवलय. हातात धरलेला कॅमेरा, अजुबाजुचे आवाज यामुळे मस्त वातावरण निर्मिती झाली आहे... प्रत्यक्ष काही दाखवलच नाहिये पण हॉरर मस्त तयार होतो.
याचे शुटपण तसेच झाले होते.. काही कलाकारांना जंगलात सोडुन द्यायचे व दिवसभरात काय करायचय ते साधारण त्यांना सांगायचं, त्यातल्याच एकाला कॅमेरा दिला होता!
'गंध' मी बघितला. एक वेगळा
'गंध' मी बघितला. एक वेगळा प्रयोग असलेला सिनेमा म्हणून सर्वांनी बघावा असे वाटते. एकमेकांशी संबंध नसलेल्या, पण 'गंध' हा 'धागा' असलेल्या तीन अप्रतिम कथा या सिनेम्यात आहेत. चित्रपट चालेल की नाही, याची काळजी न करता मराठी सिनेमाचे निर्माते असे धाडस करीत आहेत, ही फारच छान गोष्ट आहे.
मिलिंद सोमणचे दर्शन सुखावून जाते. मराठी बोलताना त्याला पहिल्यांदाच पाहिले मी तरी. सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, नीना कुलकर्णीही अप्रतिम. इंग्रजी सबटायटल्ससकटही आहे हा सिनेमा काही थेटरांत.
तो विच प्रोजेक्ट म्हणजे
तो विच प्रोजेक्ट म्हणजे अग्यातचा बाबा का?
साजीरा हाय काय नाय काय पायलाय
साजीरा हाय काय नाय काय पायलाय काय??
नाय. त्याचं पोस्टर बघूनच
नाय.
त्याचं पोस्टर बघूनच घाबरलो.
Saw (1 to 5) सुद्धा त्याच
Saw (1 to 5) सुद्धा त्याच प्रकारात मोडतो अस ऐकून आहे
--------------------------------------------------
१००% ..चुकुनही वाटेला जाउ नका..मी सॉ ५ पाहिला..आता परत सॉ चे नाव काढणार नाही..
सॅम, क्लॉवरफील्ड पण तसाच
सॅम, क्लॉवरफील्ड पण तसाच आहे.. घरगुती कॅमेर्यावर सगळे चित्रण!
माझी झोप उडाली होती तो पाहून..
मनोरमा... बघितला. संग्रही
मनोरमा... बघितला. संग्रही ठेवण्यालायक. अभय देओलचे काम मस्त. मात्र मंत्र्याला (राठोड ?)विनाकारणच "हिंदूत्ववादी" पक्षाचा नेता दाखवले आहे. तो कुठल्याही पक्षाचा दाखवला असता तरी कथानकाचे काही नुकसान होणार नव्हते.
अँकी, बॉलीटीव्हीच्या लिंकबद्दल धन्यवाद. मी डीव्हीडी आणून ठेवली होती, ती अर्ध्यातच अडकली. मग उरलेला बॉलीटीव्हीवर बघितला
Quintin Tarantino चा
Quintin Tarantino चा Inglorious Bastards बघीतला. माझ्या पॅलेटसाठी थोडा जास्त violent असला तरी क्रिस्तोफ वॉल्झनी केलेली हान्सची भुमिका बघण्यासाठी तरी नक्कीच बघायला हवा. एकदम सही काम केलय त्याने.
बाकी ब्रॅड पीटचा सदर्न अॅक्सेंट कळायला मला जरा कष्ट पडले थेटरात सबटायटल नसल्यामुळे.
यशवंत, गारंबीचा बापू सिनेमा
यशवंत, गारंबीचा बापू सिनेमा म्हणजे दिग्दर्शक बाबा माजगांवकर ना ? ते माझे मावसकाका व मकडी मधला बाल कलाकार (ताजमहाल ) आलाप माजगांवकर चे बाबा.
' निशाणी डावा अंगठा ', एक
' निशाणी डावा अंगठा ', एक जबरदस्त चित्रपट..
खूप दिवसापासून बघायचा होता पण ऑनलाइन उपलब्ध नव्हता... कालच आपलीमराठी साइट वर पाहिला.... सगळ्यानी एकदा तरी आवर्जून पहावा असा पिक्चर... अशोक सराफ, मोहन आगाशे, निर्मिती सावंत, अनासपूरे याची कामे एकदम खतरनाक झालीत... कुठेही कंटाळवाणा होत नाही..प्रौढ साक्षरता अभियाना चा शिक्षक लोक कसा बोर्या वाजवतात त्यावर आहे.... काही-काही संवाद एकदम भारी आहेत..
जिल्हा परिषदेमधल्या शाळा - मास्तर लोक, सरकारी अधिकारी वर्ग यांचे चित्रण अगदी पर्फेक्ट घेतलेय..
श्री. रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या पुस्तकावरुन हा सिनेमा बनलाय.. त्याची चर्चा इथे वाचा
http://www.maayboli.com/node/8032
काल शॅडो पाहिला (का? का??
काल शॅडो पाहिला (का? का?? का???) नासिर खानने हिरो बनण्याची हौस भागवुन घेतली आणि सोबत सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर वगैरे मंडळींनी पैशांकडे पाहुन डोळे मिटुन त्याला साथ दिली.
सुरवातीपासुन शेवटपर्यंत फक्त अ. आणि आ. आहे. रिपोर्टर ह्रिशिता एकदाच हातात माइक घेऊन काहीतरी बोलते, पुढे फक्त आयटेम साँग्स करते.
सगळ्यात कहर सोनाली कुलकर्णीचा. सोनालीताईंच्या तोंडुन नासिरला उद्देशुन 'मै तुमसे प्यार करती हु' हे ऐकुन मी सोफ्यावरुन खाली पडले. असा डायलाग पुढे येईल याची जराही चुणुक आधीच्या एकाही सिनमध्ये न दाखवता डायरेक्ट 'मै अभी चाय पिने जा रही हु' च्या थाटात हा डायलाग आल्यावर मला जोरदार धक्का बसला. शेवटी लग्न बिग्न केलं की काय देव जाणे. सीडी आणलीय तर पुर्ण पाहिलीच पाहिजे म्हणुन डोळे जबरदस्तीने उघडे ठेवलेले मी, पण तरीही कधी मिटले कळालेच नाही......
सोनालीच्या बाबाचे डबिंग कोणी केलेय ते ओळखता आले नाही, पण आवाज खुप ओळखीचा वाटत होता. आवाजात खुप भाव होते पण नटाच्या चेह-यावरील रेषही हलत नव्हती.
रुनि, इन्ग्लोरिअस बास्टर्ड
रुनि, इन्ग्लोरिअस बास्टर्ड आला काय? लै भारी.. इथे रिलीज व्हायची शक्यता कमीच.. डाउनलोड करायला लावायला हवा..
त्या रात्री पाउस होता पाहिला.
त्या रात्री पाउस होता पाहिला. मला बोर वाटला. तोच विषय. गावातले नीच पॉलीटीशन बायकांचे शोषण करणार. त्यात एका फॅमिलीतील बाईचे कसे शोषण होते वगैरे वगैरे.........
ती अमृता सुभाष जरा irritating वाटते. ती कुठल्याही मूवी मध्ये लॉउडच वाटते करीनासारखी.
मनुस्विनी, १००% अनुमोदन.. आणि
मनुस्विनी,
१००% अनुमोदन..
आणि यात बरेच कच्चे दुवे होते. सोनाली कुलकर्णी नवर्याला वाचवायला एकदा पुढार्याच्या इच्छेला बळी पडते मान्य्,,पण नवरा सुटल्यानंतरही ती पुढे तेच करत राहते. आणि नवर्याने सोडल्यावरही? खरतर ती सुशिक्षित बाई असते ना..गाव सोडुन दुसरीकडे सहज जाउ शकली असती ती..
यातले काही सीन आणि डायलॉग जरा भडक झाले असे मला वाटले.
नावावरुन मला वाटलेले की "सस्पेन्स" असेल पण काही भलताच निघाला
हो तेच ना, एक independant
हो तेच ना, एक independant lady, स्वतचे विचार परखड पणे मांडणारी(कुठल्यातरी एका सीन मध्ये ती सयाजी शिंदेला तिचे विचार एकवते वगैरे), स्वताची कंपनी चालवणारी दाखवलेली आहे. मग गाव सोडून जायची हिंमत का नसते? काहीही......
त्यात ती अमृता.. एकदम फालतु अॅक्टींग असते तिची तर सगळीकडे......... अॅटलिस्ट मी पाहिलेल्या सगळ्या तिच्या मराठी चित्रपटात.
मी आपली उगाच रात्रीचा जागून पाहिला, आता येइल सस्पेन्स आता काहितरी वेगळे असेल. ती गाणी, डायलॉग सगळे बोर......................
सयाजी शिंदे म्हणजे दुसरा संजय दत्त झालाय म्हणजे तेच तेच रोल.
संजय दत्त कसा गुंडाचे काम झोपेत करेल तसेच हे.... आवाज्,चेहरा एकदम त्याच भुमिकेला पर्फेक्ट. तोच तोच पणा.
मनुस्विनी, अनुमोदन ! अमृता
मनुस्विनी,
अनुमोदन !
अमृता सुभाष नेहेमी नाटकात काम करत असल्या सारखी चित्रपटात पण वागते, सॉलिड ओव्हर अॅक्टिंग !
नाटकात काम करत असल्या
नाटकात काम करत असल्या सारखी
>>
डीजे... नुसतं नाटक नाही...
पथनाट्य....
कायमच लाऊड....
सॉल्लिड डॉक्यात जाते...
माझ अनुमोदन ' निशाणी डावा
माझ अनुमोदन ' निशाणी डावा अंगठा 'साठी केदार्-जपान ला , आणी त्या रात्रि पाउस होता यासाठि वरिल सगळ्यांना..
सोनालिच्या बर्याच बारिक आवाजाला आशाबाईंचा आवाज अजिबात सुट होत नाही.
ढिसाळ कथा एकदम बटबटित चित्रण, अम्रुता सुभाष भयंकर लाउड.
(डिआयडि बघितल असल्यास २-५ मिनिटासाठि व्रुशालिहि दिसते, अम्रुताचि मैत्रिण दाखवलिय.)
त्या रात्री पाउस होता मध्ये
त्या रात्री पाउस होता मध्ये होती ना वृषाली? मला बघितल्यासारखी वाटलीच पण मूवीजच इतका बेकार.... जावू दे.
आता गंध मूवी कसाय ते बघायचाय...... जुना क्रश(हो जुनाच झालाय.. लहानपणी अक्कल नसतानाचा क्रश) सोमणकाका (का सोमणांचा मिल्या) आहे त्यात.
च्यायला तुम्ही मराठी चित्रपट
च्यायला तुम्ही मराठी चित्रपट बघता? खरे तर तुम्हालाच एखादे फिल्म्फेअर वगैरे अॅवार्ड द्यायला पाहिजे
आपण तर कधीच मराठी चित्रपट संन्यास घेतलाय. रडे आणि दळभद्री लेकाचे.
मी काल स्टोनमॅन मर्डर्स
मी काल स्टोनमॅन मर्डर्स पाहिला. चांगला वाटला. नक्कीच पाहण्या लायक आहे.
त्या रात्री.... साठी आभार..
त्या रात्री.... साठी आभार.. माझ्याकडे सीडी होती आणि मला उगीचच चांगलाय, बघायला पाहिजे असे वाटत होते.. वेळ वाचला माझा..
निशाणी डावा अंगठा
निशाणी डावा अंगठा पाहिला...
धमाल आहे...
काल "निशाणी डावा अंगठा" एकदम
काल "निशाणी डावा अंगठा" एकदम मस्त..... खूप आवडला!
'गंध' पहाच!!! जुना क्रश आता
'गंध' पहाच!!!
पण कुठेही चीप न होता 'सेन्शुअस सीन' (तोही मराठीत) कसा चित्रित करतात यासाठी कुंडलकरला मानावं लागेल!
जुना क्रश आता इतका खास नाही वाटत, कारण तो तोंड तर उघडतोच, वर मराठीही बोलतो
एव्हाना ठाऊक असेलच, की गंधमध्ये तीन वेगवेगळ्या कथा आहेत, सगळ्यात कॉमन एकच- गंध किंवा वास. तीनही कथा सशक्त. त्यातली कोणती जास्त आवडली सांगू शकत नाही. पण पूर्ण कथा म्हणून पहिली, वेगळी म्हणून दुसरी आणि केवळ नीना कुलकर्णी आणि त्या कथेतल्या पार्श्वध्वनीसाठी तिसरी आवडली. 'गंध' एक अनुभव आहे. पहाच!
मी पण 'निशाणी डावा अंगठा'
मी पण 'निशाणी डावा अंगठा' पाहिला, झक्कास एकदम !! जमून आलाय अगदी!! मस्ट सी!
आत्ताच निशाणी डावा अंगठा
आत्ताच निशाणी डावा अंगठा चित्रपट पाहिला . सर्व कलाकारांनी मस्त कामे केली आहेत . हसून हसून खूप दिवसांनी पोट दुखले .
Pages