चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वैपाकपाणी अन लेकरु सांभाळणे यामुळे जाता येता बघावा लागला.
>>>
अरेरे, चूल आणि मूल यांच्या पाशात अजूनही बद्ध झालेल्या आपल्या भगिनीना अजूनही व्यक्तिविकासाची कवाडे नीट उघडी होऊ नयेत ना? हा हन्त हन्त !! Proud

लाइफ पार्टनर एक गंमत.

कालच लाइफ पार्टनर पाहिला. मजेशीर सिनेमा आहे. पूर्णपणे गोविन्दाचा शो आहे. त्यात माझी मनोभूमिका
आपली इनिंग संपवून आरामात कॉमेंटेटर बॉक्स मधे बसलेल्या रिचि बेनो नाहितर बॉयकॉट सारखी असल्याने
काही फारश्या अपेक्षा नवत्या. अग्यात, लक लआक वगैरे बघुन वैतागलेल्या जिवांना थोडेसे हसुन घेता येइल.
गोविन्दाचे मजेशीर काम, प्राची देसाइ या भक्कम जमेच्या बाजू आहेत. जेनेलिया गोड दिसते. लग्नाच्या सीन्स मधे साडी नेसली आहे तेन्वातर मस्तच. अनुपम खेर तिचे बाबा असून त्यांनी तिला खूप लाडावलेले असते. ती
ग्रुहक्रुत्यद्क्ष अजिबातच नसते व प्रेम करण्यात व स्वतः च्या व्यक्तिमत्त्वाचे पदर शोधण्याच्या गडबडीत तिला
रुचीरा वगैरे वाचायला वेळ होत नाही. तिचे व फरदीन चे कसे पटावे?

तुस्सार टिपिकल गुज्जु भावेश असतो. वडिलान्च्या ताटाखालचे मान्जर. त्याचे व उच्चशिक्षित प्राचिचे कसे पटावे?त्यात आपले गोविन्दाजी वकील. कोणाचाही घट्स्फोट घड्वीण्यात पटाईत. दोघान्चे लग्न गड्बडीत होते.
व मग वादावादी सुरु. शेवटी घट. हा प्रवास मनोरंजक होतो गोविन्दाच्या स्टाइलीतील विनोदामुळे. ते ऐकण्यासारखेच आहेत. त्यात तो खूपच बारीक झाला आहे. चान्गला दिसतो. ( जर तुम्हाला तसे लोक आवडत असतील तर)

गाणी बेकार आहेत. प्रितमला ढापायला काही सापड्लेले दिसत नाही.

कहानी में ट्विस्ट म्हणजे. शेवटी गोविन्दाच लग्न करायला बघतो. ते ही अम्रुता राव शी. हा भाग जमलेला नाही. मला फरदीन अजिबात आवड्त नाही. फिरोझखान च्या एक शंभरांश पण नाही. अम्रुता राव हवाइ सुन्दरी
पण होण्याच्या लायकीची नाही. एकुणात दोन तासांची गम्मत.

हाय मामी...

मी पण पाहिला लाईफ पार्टनर...
मला ही आवडला...
शेवट गंडलाय... पण बाकी धमाल...
गोविंदाचं टायमिंग अशक्य आहे...

पण मी २ कारणांमुळे रिव्ह्यू टाकला नाही -
१. ऑनलाईन प्रिंट फारच खराब, खूप काटछाट...
२. गोविंदाच्या बाबत मी थोडा बायस्ड असतो...

बाकी अमृता राव बद्दल हवे तेवढे मोदक...
(ते तिलाच खायला घाला... नाहितर काही दिवसांनी तिचा सब्स्टिट्यूट म्हणून बायो लॅब मधला हाडांचा सापळा चालेल...)

ऑनलाईन प्रिंट फारच खराब, खूप काटछाट >> मी कालच पहाणार होतो.. पण प्रिंट लैच बेकार आहे..
Sad

गोविंदा मुळे पहाणार हा पिक्चर..

काल मातृभूमी - अ नेशन विदाऊट वुमेन पाहिला...

नावावरूनच विषयाची कल्पना येईल...
अवघा दीड तासाचा सिनेमा...
पण टेकिंग स्लो आहे पण म्हणूनच परिणामकारक...
ट्यूलिप जोशी, सुशांत सिंग सोडता मोठी नावं नाहीत...
सुशांत ची भूमिकाही छोटी आहे...
ट्यूलिप चं काम चांगलं झालंय...

लोकांना हदरवण्यासाठीच काढलेला सिनेमा आहे आणि ते काम तो व्यवस्थीत करतो...
वेगळा प्रयत्न आहे... पण एकदातरी जरूर पहा...

(ते तिलाच खायला घाला... नाहितर काही दिवसांनी तिचा सब्स्टिट्यूट म्हणून बायो लॅब मधला हाडांचा सापळा चालेल...) >>> Lol
गोविंदासाठी बघायला पाहिजे.

कमीने ची प्रिंट आणखी खराब आहे...
कोपर्‍यातून घेतल्यासारखी...

श्या...
मुंबईत सिनेमा रिलीज नाही झाला तर लोकांना धड पायरेटेड प्रिंट्स पण नाही काढता येत...
Wink

यंकू, ते गाणे आहे ना प्राची च्या लग्नाचे, मला एक मिनिट असा भास झाला कि तुझे व ट्ण्याचेच लग्न आहे. एका
मांड्वात. सर्व महिला मंड्ली नटून बसली आहेत. छोटा सनत व इतर मुले खेळत आहेत. प्रसन्न वातावरण आहे.
रागवू नको हं माझ्यावर माबो चा परिणाम जरा जास्तच आहे. तू रोज एक सिनेमा पहातोस काय रे?

मामी...
तुम्ही मला हळूच फरदीन म्हणताय की तुस्शार...?
Uhoh

बाकी माझ्याकडे घरी टीव्ही नाही...
त्यामुळे रोज रात्री जेवताना मी ऑनलाईन सिनेमा लावतो...
कधी पूर्ण बघतो, कधी अर्धा (मग उरलेला अर्धा दुसर्‍या दिवशी)...

नाय नाय रे तुम्ही स्वतःच.
आणी मस्त संसार होणारे दोघान्चा ( एकमेकानशी नाय हा). तुम्ही माबो चे एलिजिबल बॅचलर ना म्हणून आठ्वण येते असे काही पाहिले की.

मी पण पीसीसमोरच जेवते. सीनेमाची साइट सांग हां वेळ झाला की. सिनेमा बघताना क्लिक करावे लागत नाही ना.

मी ibollytv.com वर बघतो...
बरेचदा साधारण २० मिनिटांनी नेक्स्ट पार्ट वर क्लिकावं लागतं...
पण काही लिंक्स आपोआप उघडणार्‍या असतात... (सर्व यूट्यूब लिंक्स...)

देशातून बघताना कदाचित नेट चा स्पीड कमी पडायची शक्यता आहे...

नाही...
मी डाऊनलोड करत नाही...
इथे लंडनमधे काही मित्रांना टोरन्ट्स वापरल्याकारणानी अँटी पायरसी डिपार्टमेंटचं वॅर्निंग लेटर आलं होतं...
त्यामुळे ऑनलाईन स्ट्रीमिंगच बघतो...

छ्या भारतात असली वार्निंग वगैरे देनारी पत्रे येत नाहीत. आली तरी असल्या पत्राना जिथे 'ठेवायचे' असते तिथे ठेवू... Happy

लोकांना हदरवण्यासाठीच काढलेला सिनेमा आहे आणि ते काम तो व्यवस्थीत करतो...
वेगळा प्रयत्न आहे... पण एकदातरी जरूर पहा...>>>>>>>>>>
पाहिला होता हा थीएटरमध्ये जाउन. तुला अनुमोदन.

दीप्ती नवलचे सुहास्य काय होते नं. एका सिनेमात( रंगबिरन्गी बहुतेक) तिने केस हलके पर्म केले होते. काय दिसले होते. त्याना साड्या काय दिसायच्या. साध्या कलकत्ता कॉट्नसुद्धा.
मिर्च मसाला तर माझा आद्य सिनेमा आहे. पुरुषी प्रव्रुत्तीशी झगडा हे कायम असल्यामुळे( हे आता संयुक्तामध्ये लिहायचे का?) त्यात त्या नसिरला शोऑफ करायचा असतो पण रेकॉर्ड तुट्ते व त्याला राग येतो. फौजी माणसे कशी बॉर्डरलाइन सायको असतात ते मस्त व्यक्त केले होते. मिर्च मसाला मधे इतक्या प्रभावी अभिनेत्री एकसाथ घेतल्यात की सिनेमा अमूल्य बनला आहे. ( हो सिनेमाची कॉस्ट वेगळी व व्हॅल्यु निराळी.) फेमिनिजम १०१ साठी गरजुनी तो जरूर बघावा. नाही तर बिल्लु मधे लाराने साडी घालून देखील ती भारतिय स्त्री वाटत नाही. कॅमे साबणच वाटते.

स्लर्टी, केटी केली सारखी मनमोकळी सुन्दरी फार कमी आपल्या हिन्दी सिनेमात. सारी स्त्री पात्रे एक तर संस्क्रुती जपतात नाहीतर वाइट पद्धतीने उल्ट्या दिशेला जातात. नॉर्मल फार कमी.

गुमनाम मधे तर हैदराबादी संवाद परिणामकारक रीत्या वापरलेले आहेत. उदा. उदास! एक अनार सौ बीमार. पुरानी हड्डी सही बोल री. इ. खरे तर मेहमूद च्या गुणवत्तेवर पीएचडी केली पाहिजे.

माझे असे मत आहे कि रोमान्स सही वठवायचा असेल तर थोडे असंस्क्रुतच व्हावे लागते.It is the place where the bitch meets the angel. पण तसे धाड्स किती करतात. करण बाळास जीवनानुभव फारसा नाही. आदित्य यास पंजाबीतून बाहेर पड्ता येत नाही.

आता बघा, नॉटिग हिल. व ४ वेडीन्ग्स व १ फ्युनरल मधील अतिशय साधे, बोलीभाषेतील संवाद, किती
नाजुक भावना प्रभावीपणे व्यक्त करतात. नॉ.हि. मधला त्याचा बावळ्ट मित्र, बहीण ही लूजर पात्रे किती
खरी आहेत. तसे आपल्या कडे विशाल भारद्वाज करू शकेल. ( मकबूल)

यन्कु धन्यवाद. हा मजकूर चुकून पुपू वर लिहिला होता तो इथे माहेरी आला आहे.

कमीने पाहिला.. ४ स्टार सारखे काय होते कळले नाही.
फक्त वेगळा असला म्हणुन एखादा चित्रपट चांगला होता असे म्हणतात का? वेगळा असुनही टुकार असु शकतो ना? (असो क्रिटिकली अक्लेमड आहे मग आम्ही पामर काय बोलणार? Sad )
असो. लहान मुलाना घेउन बघु नका.

माहेरी आणल्याबद्द्ल धन्यवाद मामी
मिर्च मसाला एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे,त्यात पॅरलल चाललेल्या कहाण्या,त्याचे टेकींग, रंगांचा वापर मास्टरपीस म्हणतात तो हा.
करण बाळास जो 'खरा' जीवनानुभव आहे तो त्याने पडद्यावर आणल्यास अनेकांना फेफरे येईल
रोमान्स सही वठवायचा असेल तर थोडे असंस्क्रुतच व्हावे लागते>> सहीच
उत्कृष्ट उदाहरण 'माय बेस्ट फ्रेंड्स वेडींग' मधली ज्युलिआ रॉबर्ट्स

मातृभूमी - खरच छान आहे.

कालच 'जुली अँड जुलिया' बघितला. कलाकार, दोन नॉव्हेल्स वरून गुंफलेली कहानी आणि दिग्दर्शन उत्तम. मेरिल स्ट्रीप नेहमी प्रमाणे outstanding. हलका फुलका आणि तरिही माहितीपूर्ण.

अश्विनी मामी अगदी बरोबर लिहलय तुम्ही. आपल्याकडच्या चित्रपटातल्या व्यक्तीरेखा एकतर black किंवा white असतात. मधली grey व्यक्तीरेखा फारशी कधी आढळत नाही. आढळली तरी पार imotional करुन टाकतात तो भाग.
कोणी My sister's keeper बघितला का? कसा आहे? मी पुस्तक वाचलय म्हणुन मला खुप उत्सुकता आहे movie बघण्याची. जनरली पुस्तक खुप चांगल पण मुव्ही तेवढा परिणाम कारक नाही असाच अनुभव आहे आतापर्यंतचा.

मी बघितला कमिने. टिपिकल विशाल भारद्वाज ट्च आहे. शाहिद ने डबल रोल मस्त निभावलाय. दिसतो पण छान. सगळ्यात कहर म्हणजे अमोल गुप्त्यांचा "भोपे भाऊ". जबरा काम केलय. सिनेमा हलका-फुलका वगैरे नाही बर का. violence अंगावर येतो. प्रियांका चक्क मराठीत बोललीय.
packed होत theater आणि public ने जाम टाळया वाजवल्या. टाइमपास आहे.

धन्यवाद, मी तर जुलि व जुलिया बघणार होते कमिने नसता चांगला तर. आता दोन्ही बघणार.

जुलि जुलिया चांगलाय ना?

कमिने पाहिला. छान आहे तसा. विशाल भारद्वाज ने पात्रे छान रंगवलेली आहेत. जो तो स्वत: च्या स्वभावाला शेवट पर्यंत सोड्त नाही. अचानक वाल्याचा वाल्मिकी कुठेही होत नाही , ही जमेची बाब. शाहिद कपूर ने रंगवलेली दोन्ही पात्रे न्याय देतात. त्यात वेगळेपण जाणवते. तसेच एक हकला आणि एक तोतला असूनही पाचकळ विनोद टाळले आहेत. उलट अशा लोकांच्या भावनांना हात घालायचाही एक छोटा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा ने रंगवलेली फटाकडी मराठी मुलगी सुद्धा मस्त आहे. नऊवारी साडीत ती छान दिसते. परप्रांतीय आणि मराठी या मुद्याला हात घातल्याने काही जणांच्या भावना दुखावल्या जातील कदाचीत Happy पण त्यामुळे कथा अजून रंगते. अमोल गुप्ते चा भोपे भाऊ अप्रतीम. मराठी, बंगाली, आफ्रिकन असे बरेच माफिया जमवले आहेत. असं बरंच काही असूनही चित्रपट खूप भारी वगैरे नाही.
४ स्टार सारखे काय होते कळले नाही >>मी सुद्धा मनस्मी शी सहमत. पण नुकतेच आलेले कंबख्त इष्क सारखे चित्रपट पाहून ज्या लोकांना अतिरेक झाला असेल त्यावर उतारा म्हणून बघायला नक्कीच चांगला आहे.

इथे बे एरिया मधे हाउस फुल्ल आहे कमिने. आम्हाला amc चे तिकीट नाही मिळाले. रविवारचे सगळे शो शनिवारीच सोल्ड आउट झाले. पण आम्ही मिशन कमिने वर निघाल्यामुळे दुसरी कडे जाउन बघितलाच.

तराना, अगदी. शनिवार, रविवार दोनही दिवस amc मधे चक्कर मारुन तिकीट नाही मिळाले 'कमिने' चे Sad

Pages