चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माणूस इतके दिवस कुठे होता?
>>
टशन च्या गाण्यात 'नशीला नशीला तेरा नैना' गात होता...
झूम बराबर झूम मधे 'हफ्फीभाई' चा अफलातून रोल करत होता...

अँकी हा पी.के.मिश्रा आहे? मला वाटायचे दादा कोंडके नी याच्या डोक्यावर हात ठेवला होता की काय.. अरे कसली गाणी लिहायचा ... Proud

asami आणी लालु ने निर्माण केलेल्या ऊत्सुकते खातर अखेर मी Daddy Cool पाहिला... संपुर्ण... Proud ... जा. जा. च्या संवादाचा जबरी संवादांचा असा asami ने ऊल्लेख केलेला असावा असा माझा अंदाज आहे Happy

मनोरंजक नसला तरी ईतर चित्रपटांप्रमाणे तेच तेच प्रेम रडगाण वा भाईगीरी ची स्टोरी लाईन नाही.... ऊगाच भडक संवाद, मारामारी, गाणी वै. दाखविलेलि नाही... सगळे काम नसलेले (बेकार) कलाकार घेवुन, स्वःस्तात केलेला प्रयोग आहे... पण स्वस्त आणी मस्त हे समीकरण फेल आणी फ्लॉप गेल. Proud .. फुकटात बघायला मीळाला तर एकदा झेलण्या सारखा आहे... दुसरी काम करता करत बघायचा म्हणजे झेपतो Happy

के के च्या घरात रहाणर्‍या त्या निळ्या पाया मधे घुंगरू वाल्या पात्राचे रिलेशन आणि प्रयोजन सांगाल का?
>>>> राजस्थानी कल्चरचा एखाचा घटक दाखविण्याचा प्रयोजन असाव Happy

पियुष मिश्रा म्हणजे जो दिलीपचा मीत्र असतो तो कि त्या कीरणचा भाऊ (हा भाऊ Sony वरच्या CID त दिसतो)

डॅडी कूल हा डेथ अ‍ॅट अ फ्युनरलची हिंदी कॉपी ना? डेथ अ‍ॅट अ फ्युनरल अचाट ब्रिटिश कॉमेडी आहे..

पियुश मिश्रा हा दिल्लीतील प्रायोगिक रंगभूमी (हिंदी+इंग्रजी)वर १८ वर्षे इमाने इतबारे नाटके बसवत होता, करत होता.. अनुराग कश्यप, इम्तियाझ अलि वगैरे त्याचे तिथले काही शागिर्द.. एनएसडीत असताना त्याला त्याच्या मुख्याध्यापकांनी बोलावून राजश्री फिल्म्सच्या सिनिअर बडजात्याची गाठ घालून दिली. त्या सिनिअर बडजात्याने त्याला मैने प्यार किया ऑफर केला.. ह्याने ती ऑफर कचर्‍याच्या डब्यात घातली.. त्यानंतर थेट मणिरत्नमच्या दिल से मध्ये पडद्यावर आला..

गुलालची गाणी पण पियुश मिश्रानेच लिहिली आहेत आणि बरीचशी त्यानेच म्हटली आहेत.

पीके मिश्रा (रेहमानच्या तमिळ गाण्यांचे भयाण हिंदी लिरिक्स लिहिणारा) आणि पियुश मिश्रा वेगवेगळे..

पीके मिश्रा (रेहमानच्या तमिळ गाण्यांचे भयाण हिंदी लिरिक्स लिहिणारा) आणि पियुश मिश्रा वेगवेगळे..

>>
ओह..

डॅडी कूल हा डेथ अ‍ॅट अ फ्युनरलची हिंदी कॉपी ना? डेथ अ‍ॅट अ फ्युनरल अचाट ब्रिटिश कॉमेडी आहे..>>> हो अगदि अगदि Happy

जा. जा. च्या संवादाचा जबरी संवादांचा असा asami ने ऊल्लेख केलेला असावा असा माझा अंदाज आहे>>नाही . तू परत एकदा पहा बर काही इतर कामे न करता Lol

प्लीज मला के के च्या घरात रहाणर्‍या त्या निळ्या पाया मधे घुंगरू वाल्या पात्राचे रिलेशन आणि प्रयोजन सांगाल का?

<<<< अर्ध नारी /अर्ध पुरुष , अर्धा लाल -अर्धा निळा , घुंगरु असलेला तो माणुस म्हणजे डुकि पन्ना सारख्या समाजातल्या सन्मानीय लोकांचे दोन चेहरे दाखवायच प्रतीक.. एक मुखवटा समाजाला दाखवायचा , दुसरा वैयक्तीक आयुष्यातला हिंसक (लाल रंग= उष्ण, निळा= शांत).
इन जनरल मोठ्या लोकांचे डबल स्टँडर्ड्स, अन्याय निमुट पणे सहन करणारा( ज्याला कॉमन लोक 'हतात बांगड्या भरून बसलेला )नपुसक समाज असं काहीतरी प्रतीक असावं माझा अंदाज :).

बाकी ज्यांनी गुलाल पाहिलाय त्यांनी पण लिहा.

मलाही हे प्रतिक बितिक डोक्यात शिरायला जरा वेळ लागतो. मी आपले काय काहीतरी असेल दाखवायचे म्हणून सोडून दिले.

तो पॅशन फॉर सिनेमा ब्लॉग वाचायला पाहिजे, त्यात असेल कदाचित.

त्या Little Miss Sunshine मधे शेवटी ते फ्री वे वरून ते स्पर्धेचे ठिकाण शोधत असतात ते हॉटेल त्यांना दिसत असते पण तेथे जायचा रस्ता (एक्झिट) सापडत नसतो. ते ही म्हणे प्रतिकात्मक आहे.

पीयूष मिश्रा आणि पी के मिश्रा हे एकच आहेत की काय अशी मलाही शंका आली होती आणि प्रचंड आश्चर्य वाटले होते. गुलाल मधली गाणी चांगली लिहीलेली आहेत (ते "सरफरोशी की तमन्ना..." वाली कडवी बघायला पाहिजेत, मजेदार वाटली ऐकताना). संगीत ही पीयूष मिश्रा चे च आहे बहुधा.

मात्र पहिल्यांदाच हातात पिस्तूल घेतलेल्या (त्या कॅरेक्टर वरून तरी तसे वाटते) माणसाच्या मानाने त्या दिलीपची नेमबाजी खूपच जोरदार वाटली Happy आणि 'ब्रेन वॉशिंग' ही जबरी :). काल पुणे का कोणत्यातरी बीबीवर ब्रेन वॉशिंग वाचले तेव्हा तेच आठवले.

पण मधेच त्या पात्राला मारून टाकलंय. ते कशाला असेल मग
<<<समाजाचा चेहरा समोर आणणार्‍याचा अंत/कटु सत्याचा पराजय म्हणून कदाचित!

अज्जुका कॅरे़क्टर डिझाइन करते ना आय मीन कॅरे़क्ट्रर्स ची कॉस्चुम डिझायनर आहे ना, ती कॉमेंट करु शकेल कदाचित या पात्रावर.

>त्या Little Miss Sunshine मधे शेवटी ते फ्री वे वरून ते स्पर्धेचे ठिकाण शोधत असतात ते हॉटेल त्यांना दिसत असते पण तेथे जायचा रस्ता (एक्झिट) सापडत नसतो. ते ही म्हणे प्रतिकात्मक आहे.
असे असेल तर सिनेमा बरोबर प्रतिकांची चीट शीट दिली पाहिजे.

जा. जा. च्या संवादाचा जबरी संवादांचा असा asami ने ऊल्लेख केलेला असावा असा माझा अंदाज आहे>>नाही हीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई>>>>>>> का का का नाहीईईईईईईईईईईई!!!!!!!!!!. तू परत एकदा पहा बर काही इतर कामे न करता >>>>>> नहीं ये मुझसे नहीं हो सकता .... Happy

asami आता तुम्हईच हिंट द्या.. संवाद कुणाचा, कुणा कुणात झाला वै त्यावरुन मी अंदाज लावेन Proud

के के चा तो गाणारा भाऊ.

त्याचा ड्रेस कसले प्रतिक आहे कोणास ठाऊक.

विजय - Happy

दिल है छोटासा छोटीसी आशा , भारत हमको जानसे प्यारा है ही आहेत पी के मिश्रांची गाणी. मात्र रहमानची दाक्षिणात्य गाणी हिन्दीत आण्ताना काही गाण्यांची ओढाताण करून ती मीटरमध्ये बसवताना काही गाणी विचित्र झाली होती खरी पण ते बहुतेक डान्स नम्बर असल्याने कथानकाचा आणि त्याच्या अर्थाचा तसा काही संबंध नव्हता...
हा कोण तुमचा उपरिनिर्दिष्ट पियूष मिश्रा आहे त्याचा आणि गीतकार मिश्राचा सुतराम संबंध नाही कारन गीतकार मिश्रा (६५) गेल्या वर्षीच निधन पावले आहेत

फारेद, रॉबिन जी आभार Happy हुश्श!!! कळाल एकदाच Happy

हे पात्र मला 'गदर' मधल्या दाढी वाल्या वेडसर पात्राची आठवण करुन देत होत... त्याची कॉपी केल्यासारक वाटल Happy

'गुलाल' मधला पियूष मिश्राचा डुकी बना अप्रतिम होता. गुलाल बघितल्यानंतर माझ्या सर्वात जास्त लक्षात राहणारं तेच पात्र. मुख्य पात्र नसूनही. त्या दोन रंगांतल्या, तृतीयपंथीसदृष पात्राचं प्रयोजन मलाही कळलं नव्हतं. वागणं, वावरणं सगळंच अनप्रेडिक्टेबल होतं त्याचं. अशा पात्रांची फॅशन येईल बहूतेक आता. दीपांजली म्हणतेय, तसं असावं. पण मग त्याला त्या घरात (की राजवाड्यात) सर्व पात्रांसोबत प्रॅक्टिकली वावरताना दाखविल्यामुळे अनुराग कश्यपला नेमकं काय म्हणायचं आहे, त्याबद्दल माझा गोंधळ उडाला.

रीटा बघितला. टण्याच्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन. फक्त 'विंटेज' कारबद्दल- मोहन आगाशे गुलछबू अन व्यवहारिक जगाशी आपला काहीच संबंध नसल्यागत दाखवायचा असल्यामुळे, अंदाजे सत्तरच्या दशकातही विंटेज कार रेणूकाबाईंनी दाखविली असावी. बाकी, आंग्लाळलेल्या उच्चारांचा अन पात्रांना अंधारात वावरायला लावण्याचा अकारण हव्यास अख्ख्या सिनेमाभर जाणवत राहतो. बाकी भावनांच्या उद्रेकासाठी कुकरच्या शिट्या वगैरे- 'नेहेमीचे यशस्वी' आहेतच. Proud
'स्वच्छ मनाने जागायचं आहे' म्हणजे काय? हे अचानकच येते, अन विनाकारण रिपीट होत राहते. का, ते कळत नाही. सारखं सारखं काल्पनिक जगात वावरणार्‍या अन व्यावहारिक पातळीवर शक्य न होणार्‍या गोष्टींचा आग्रह धरणारी रीटा शेवटी मात्र 'प्रॅक्टिकल' वाटेल असा निर्णय घेते. पण यामुळे तरी ती 'स्वच्छ मनाने' जगू शकणार आहे का, ते अधांतरीच राहते.

मी बघितला, त्या शोला सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त संख्या स्त्रीवर्गाची होती. Happy (शनिवार असल्याने गर्दीही बरी म्हणता येईल, अशी होती.)

'समांतर' वर एका रेडिओ चॅनेलची कॉमेंट- 'संपूर्ण सिनेमाभर त्यात काहीच होत नाही!' पालेकरांना मान्यही आहे म्हणे ते. Happy काहीही असले, तरी मला बघयचा आहेच.

'गुलाल' मधला पियूष मिश्राचा डुकी बना अप्रतिम होता.
<<< डुकी बना म्हणजे के के मेनन.
त्याचा भाऊ म्हणजे पियुष मिश्रा, मस्तं काम केलय त्यानी !

फॉक्स

दीपक तिजोरीचं दिग्दर्शन,
अर्जुन रामपाल, सन्नी देओल, उदिता गोस्वामी, सागरिका घाटगे आदि 'अभिनेते'...
अपेक्षा नव्हत्याच...

लेट ९० चा प्लॉट...
जरा बरे कलाकार आणि बरा दिग्दर्शक असता तर त्या काळात हिट सिनेमा बनला असता...

या रहस्यपटाच्या रहस्यभेदात काहिच थ्रिल नाहिये...
सुरवातीला थोडा संथ असलेला सिनेमा नंतर जरा वेग घेतो, पण तो तेवढ्यापुरताच...
दीपक तिजोरीचं दिग्दर्शन मधूनच भरकटल्यासारखं होतं...
क्लायमॅक्स मात्र पूर्णपणे गंडलाय...

मल्टिप्लेक्स मधे जर हिट सिनेमा हाऊसफुल असेल आणि इतर फारच टुकार असतील तर याला वासरात लंगडी गाय बनवण्यासारखा...

५ पैकी १.५ तारे

काल सोनीवर 'नमस्ते लंडन' व झी वर 'गुलाल' पाहिला.
नमस्ते लंडन कितीही वेळा पाहिला तरी कत्रिना साठी अजूनही पहावाच वाटतो Proud
पियूष मिश्राचं गुलालमधे नाव आहे पृथ्वी बन्ना ...

अगदी अगदी.
परत परत पहावसा वाट्णारा चित्रपट आहे 'नमस्ते लंडन'
सगळि गाणि पण छान आहेत. तसा एक 'सोचा न था' पण आहे.

केतकी,अनुमोदन 'सोचा न था' इम्तियाझ अलीचा सर्वात प्रामाणीक सिनेमा आहे एकदम रिफ्रेशिंग!!

सोचा न था, आणि जब वी मेट या दोन चित्रपटानी माझा अपेक्षाभंग केला.
मला वाटलेले चीझी आणि टुकार असतील पण फारच छान होते दोन्ही..परत पहावे असे.

Pages