चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावर परत कधीतरी लिहीन जमले तर..
>>

मी पण...

सद्ध्या इतकंच म्हणतो...
की भारतात चित्रपट हे कलेच्या दृष्टीनी बगणार्‍यांपेक्षा करमणूकीच्या दृष्टीनी बघणारा वर्ग मोठा आहे...

आणि हा वर्ग जेंव्हा पदरमोड करून तिकीट काढून थिएटर च्या काळोखात शिरतो तेंव्हा त्यांना रुपेरी पडद्यावर ते सर्व पहायचं असतं जे त्यांना स्वतःच्या आयुष्यात कधीही करता येणार नसतं...
ते जेंव्हा सिनेमाचं तिकीट विकत घेतात तेंव्हा ते २-२.५ तासांचं एक स्व्प्न विकत घेत असतात... ज्यात ते कधी श्रीमंत असतात, गाड्या उडवतात, महागडे कपडे घालतात, १० लोकांशी पंगा घेतात... वगैरे वगैरे...
ज्यावेळी ते स्वप्न त्यांचं समाधान करतं... सिनेमा हिट...

आणि याच कारणानी चित्रपट ही दुनियाभरातली एक मुख्य करमणूक आहे...

कलेसाठी सिनेमे बघणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तसे सिनेमे बनतात, करमणुकीसाठी बघणार्‍यासाठीही बनतात... कुणीही आपली आवड एकमेकांवर लादू नये हेच योग्य...

य दोन वेगवेगळ्या वर्गांना समोर ठेऊन एकच कथा दोन वेगळ्या प्रकारे सांगितली जाऊ शकते... पण अशावेळी टार्गेट ऑडियन्सच वेगळा असल्यानी त्यांची तुलना करू नये...

क्लासिक सिनेमा त्याच्याजागी ग्रेट आणि मसाला मूव्हीजही ग्रेटच...

हात भर पोस्ट वाहून गेली माझी Happy

टण्या, तू दिलेले उदाहरण हे चित्रकलेचे आहे आणि चर्चा चित्रपट माध्यमाबद्दल चालू आहे. या दोघाचे अविष्कार माध्यम भिन्न आहे, प्रेक्षकवर्ग भिन्न आहे, आणि अविष्काराचा हेतू भिन्न आहे.

रूचणे अर्थत आव्स्वाद घेणे हे "रूजवावे" लागते हे मला पटले नाही. कुणाला काय रूचेल हा ज्याच्या त्याच्या अवडीचा प्रश्न आहे. आवड अर्थात, त्या व्यक्तीच्या राहणीमान, संस्कृती आणि आजूबाजूचे वातावरण यावर अवलंबून असते. आणि हे सर्व घटक जसे बदलतात तशाच आवडी बदलत जातात. त्यालाच जर् तू "रूजणॅ" म्हणात असलास तर ठिक आहे पण मुद्दाम हून "माझी कलात्मक उंची वाढावी" म्हणून मी अमुक चित्रपट बघते असे असेल तर तो निव्वळ ढोंगीपणा आहे!!!

कारण चित्रपट हे जन संवाद माध्यम अर्थात मास मिडिया आहे.

मासेस ची व्याख्या तुला ठाऊक असेलच. विविध, पृथक, तरल, अविचारी, अविवेकी, मूर्ख, विस्कटलेल्या, अज्ञात, सैल, अशिक्षित, अगणित, वेगवेगळ्या व्यक्तीचा एकत्रित प्रच्.ड समूह म्हणजे मासेस.
आणि जन संवाद म्हणजे असंख्य विखुरलेल्या जनसामान्य श्रोत्याना विविध प्रकारे प्रभावित करून त्यांच्यात इच्छित अपेक्षित भावना चेतवण्याकरता व्यावसायिक मिडियाचा उपयोग करून दूरवर वेगाने सतत संदेश प्रसारित करतात. हेच असते मास मिडिया.

याअम्धे "कलकृतीच्या अविष्कारापेक्षा" त्याच्या व्यावसायिकतेला जास्त महत्व होते आणि राहील. कुठलाही चित्रप्ट बनवताना चित्रपटाची निर्मात्याला (इथे दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी अभिप्रेत आहेत) त्याचा प्रेक्षक वर्ग माहित असतो. तो जर माहित नसेल तर मग त्यची अवस्था गुलाल किंवा कमिने सारखी होते!!! (अगदी वाईट्ट्ट उदाहरण दिल्ली ६)

प्रत्येक कलाकृती "उच्च दर्जाची" होइल हे शक्य नाही आणि प्रत्येक उच्च कलाकृती ही प्रत्येकाला रूचेल (आस्वाद घेता येइल) असा दुराग्रह धरणेही चूक आहे. ज्याना जे समजते तेच आवडते किंवा नावडते!!

वेल सेड...

पण २ भा. प्र....
१. काल सखाराम गटणे ची किती पारायणं केली...?
२. पहिली पोस्ट खरंच वाहून गेली का टाईप करताना बोटांचा गुंता झाला आणि तो सोडवण्यात वेळ गेला...?

>>>>>माझ्या मते रुचणे (कलाकृतीचा आस्वाद घेणे) हे रुजवता येते. आस्वाद घेण्याचे प्राथमिक संस्कार नसतील तर क्षमता असून देखील प्रेक्षक/वाचक एखाद्या चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यास असमर्थ ठरतो.

टण्या, १००% अनुमोदन.

अँकी. गटणेगिरी केली तरच लोकान तुम्ही "कित्ती हुश्शार आह्त" हे समजतं. खोटं वाटलं तर कुठल्याही मार्केटिंग किंवा पी आरवाल्याना बोलताना ऐक. काडीचा अर्थ नसतो पण अगदी पॉइ.ट मांडून ते निरर्थक बोलतात. Proud

पहिली पोस्ट खरंच याहून मोठी आणि मुद्देसूद झाली होती. पण चर्चेला विषय चांगला आहे. हलवतेय मी ही पोस्ट योग्य ठिकाणी.

कुठल्याही मार्केटिंग किंवा पी आरवाल्याना बोलताना ऐक. काडीचा अर्थ नसतो पण अगदी पॉइ.ट मांडून ते निरर्थक बोलतात. >>त्यान्ची पीपीटी तर त्याहून वैट्ट

नंदिनी.. अत्यंत मुद्देसुद पोस्ट ( मासमिडीयाचे)... या विषयावर खरेच एक वेगळा बाफ उघडुन चर्चा चालु कर.. Happy

वाँटेड : डेड ऑर अलाईव्ह...

खास सलमान च्या पंख्यांसाठी मेजवानी
मेनू आयटम्स-
सलमान लूक्स लॉलीपॉप, सलमान बॉडी भर्ता, सलमान डान्स डोनट, सलमान अ‍ॅक्शन अचार, सलमान स्टाईल सूप, सलमान कॉमेडी कबाब... सबकुछ सलमान...
प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्हाला सलमान चं इतकंही वेड नसेल तर ही मेजवानी अ‍ॅव्हॉईडच करा...
कारण वरती उल्लेखलेले सगळे पदार्थ साधारण दर्जाचेच आहेत...
इतर इन्ग्रेडियंट्स पण कामापुरतेच आहेत...

अख्ख्या सिनेमातला १ संवाद मात्र वसूल आहे....
आयेशा ताकिया बरोबर स्टेशनवर बोलताना सलमान तिच्याकडे 'भूक लागलिये आणि तू डब्यातला पास्ता कधीच खायला देत नाही' म्हणून तक्रार करतो... ती वैतागून म्हणते "मला खा, मला खा..." त्यावर त्याचा प्रतिसाद आख्खा सिनेमा वसूल करतो.... "मी जास्ती चरबीवालं मटण खात नाही..."

गेल्या काही सिनेमांमधे पेंगुळलेला वाटणारा सलमान यात मात्र फुल जोश मधे आहे...
त्याला जे जे काही जमतं ते ते सगळं त्यानी पूर्णपणे एंजॉय करत सादर करून दाखवलंय...

सलमान दीवाने असाल तर आणि तरंच बघा...
माझ्याकडून ५ पैकी २ तारे
(१.५ सलमान साठी, ०.५ प्रभूदेवा च्या कोरिओग्राफी साठी)

अन्कुशेट सुप्रभात

<<वाँटेड : डेड ऑर अलाईव्ह..>>

ही तेलुगु सिनेमा पोकीरीची कॉपी आहे. पण त्यात तरूण हीरो होता. व नाच गाणी सुपर हिट होती. आम्ही
बोसच्या शोरूम मध्ये हाय एन्ड सिस्टीम वर त्याना पोकेरी ची गाणी वाजवून दाखवायला लावली होती व त्यानी लावलीही. सही आहेत. त्यामानाने ही नाहीत. सलमान ह्यावयात अ‍ॅक्षन रोल नीट करू शकतो का?
मला फार कन्विनसिन्ग वाट्त नाही. सारे मोठे खान झपाट्याने थकत चालले आहेत.

मामी, बोसची शोरूम नुसती लूटमार.... अडीच लाख म्हणे. ठेवलेत तुमच्या तीर्थ रूपाने...

मामी, बोसची शोरूम नुसती लूटमार.... अडीच लाख म्हणे. ठेवलेत तुमच्या तीर्थ रूपाने...>>
हूड सही. मला एका हितचिन्तकाने सान्गितले चुकूनही खर्च करू नकोस एवढे त्यात तुझ्या मुलीचे लग्न होइल. ते ही सही. मग गुमान सोनीचे घेतले. स्वस्तात. पण मला बोसची उत्पादने लै लै आवड्तात
विमान तळावर वगैरे ते मस्त स्पीकर्स पाहून अगदी जेलस व्हायला होते. त्यासाठी तरी खूप श्रिमन्त असायला हवे होते.

बर्‍याच मोठ्या चित्रपटसंन्यासानंतर हॅरी पॉटराचा सहावा भाग बघितला. पुस्तक न वाचलेल्या लोकांना हा चित्रपट कसा कळत असेल असा प्रश्न पडला.
त्यातला रॉन नेहमीप्रमाणे आवडला.

नंतर किंगफिशर कृपेने ४ + ३ असे ७ चित्रपट बघितले.
इथे वाचून जब वी मेट बद्दल फारच उत्सुकता होती. तो एकदम साधा नि प्रेडिक्टेबल निघाला. पुष्कळ विनोदी प्रसंगांत शेजारणीला ऐकू जाण्याइतके हसू आले ही जमेची बाजू.
ज्युनो बघितला, तोही बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल वाटला. पण तरी नेहमीपेक्षा (!) वेगळा म्हणून आवडला.
जाने भी दो यारो परत बघितला. तो फार पूर्वी बालपणी बघितला होता. यावेळी फारसे हसू आले नाही. Sad
मार्ली अ‍ॅन्ड मी मध्ये मार्लीची भूमिका मध्यवर्ती असेल असे वाटले होते. पण ती 'मी' ची निघाली. तरी चित्रपट आवडला.
वॉल ई बघून मजा आली. तसाच आइस एज परत एकदा पाह्यलाही आवडला.
जाने तू या जाने ना, एकदम तरूण ताजा वाटला. त्याची गोष्ट उलगडण्याची शैली आवडली.

इतके चित्रपट दोन आठवड्यात पाहिल्यामुळे डोक्यात थोडा कश्यात काय पाहिले याचा घोळ झाला आहे. त्यातल्या त्यात कुठल्यादोन चित्रपटात सारखे कलाकार नव्हते म्हणून बरं.

मामी वीकान्त स्पेशलः
प्राइस लेस नावाचा सिनेमा वर्ल्ड मुवीज वर येतो पाहिला आहे का. अतिशय छान अनुभव. आहे. पहिल्या जगातील लोकान्ची नर्म विनोदी रोमँटिक कॉमेडी. त्यात मुख्य पात्रे चार ऑड्री टाटो इरीन, गॅड ( ज्यां)
अनेक म्हातारे जावून येवून. एक खडूस श्रिमन्त म्हातारी. मुख्य विषय भारतीय संस्क्रुतीला धक्का पोचेल असा आहे. ती तरूण व सुन्दर. श्रिमन्त म्हातार्याना नादी लावून त्यान्च्या कडून नवे कपडे, महाग पर्सा
चपला वगैरे घ्यायचे त्यान्च्या बरोबर पंचतारान्कित जागी राहायचे. सुन्दर हसायचे लाडीक बोलायचे
सारे लक्ष म्हातारा डायमंड रिन्ग कधी देतो लग्न कधी करतो यावर. जान आपला पं. हाटेलात बार्टेन्डर.
त्यान्ची भेट होते. व दोघे एकमेकान्कडे आकर्षित होतात. खरे तर दोघे एकमेकाना अनुरूप पण हिला अमीर
म्हातारेच आवड्तात तो तरी काय करणार. तरी स्वतःचे पैसे संपेपरेन्त तो तिला "ठेवतो." मग रोजची हमाली चालू. त्यात त्याला खवट म्हातारी भेट्ते व एक ऑफर करते. आता याची ही चंगळ.
दोघे आपल्या आपल्या म्हातार्याना खूष ठेवत भेट्त राहतात. एकदा हे अंगाशी येते. मग तो तिला मदत करतो. शेवटी तिला कळते की सूख व प्रेम पैशात मोजता येत नाही. याला बेस्ट किस अवार्ड मिळाले आहे. ( जपून) पण असा विषय असला तरीही इतक्या हलक्याफुलक्या मजेशीर अंगाने फुलविला आहे. काही काही प्रसंग खास आहेत. त्याचे पैसे पार संपतात मग तो एक युरो चे नाणे काढून म्हणतो १० सेकंद माझी रहा. कधी ते नाणे ती वापरते. शेवटी दोघे स्कूटर वर जातात व टोल भरायला पैसे नसतात तेन्वा तेच नाणे उपयोगी येते.
त्याला महाग्डे घड्याळ मिळते तेन्वा ती वेळ विचारते व तो म्हण्तो " नाइन डाय्मंड्स पास्ट." काय दिस्तो
वा. छान जोडी आहे. जरूर बघा. हसाल नक्की पण आत कुठेतरी वॉर्म फीलिन्ग पण येइल. जगात खर्या गिफ्ट्स आहेत प्रेम, आरोग्य, तारुण्य, मैत्री, चौकस पणा. व ते विकत घेऊ पाहणारे श्रिमन्त पण कंपनीला हपापलेले वयस्कर लोक. ऑड्री आपली फेवरीट. अमेली केल्यावर नुसती पड्द्यावर आली तरी बास आहे.
हा हिंदीत करता येण्यासारखा आहे. तरूण जोडी इमरान खान व जेनेलिआ. म्हातारी तब्बू नाहीतर किरन
खेर ( पंजाबीपणा वगळून) म्हातारे इरफान खान, अनुपम खेर, शाहरूख. राहुल बोस पण वल्गर होणयाचा धोका खूप आहे इथे.

ओरिजिन्ल शॅनेल व उट कुटूर कपडे व इतर अ‍ॅक्सेसरीज आहेत. मी कपडे पट असिस्टंट बनायला तयार आहे.

मी तीन चार वेळा पाह्यलाय हा सिनेमा मामी. मस्त आहे.

>>मी कपडे पट असिस्टंट बनायला तयार आहे.<<
कधीपासून जॉइन होताय? मी शोधतेच आहे असिस्टंटस. निदान ३ तरी लागणारेत.

म्हातारी तब्बू
>>
मामीसाहिबा, जबानको लगाम दो ! Angry

बोसबद्दल गैरसमज काडून टाका मामी. केवळ हाईपच्या जोरावर त्याने धन्दा चालवलाय. खरे तर प्रिडिटरमिन्ड स्पेसिफिकेशन्च्या साऊन्ड सिस्टीमला लै लिमिटेशन असत्यात. फक्त स्पीकरची साईज आणि वर्कमनशिप्च्या जोरावर लोकाना तो मूर्ख बनवतोय. जसे गायक लोक स्वतःच्या आवाजाच्या जातकुळीनुसार मॅचिंग हार्मोनिअम बनवून घेतात तसे साऊन्ड सिस्टीम स्वतःचे फ्रिक्वेन्सी स्पेसिफिकेशन ठरवून असेम्बल केली पाहिजे अथवा करवून घेतली पाहिजे. तरच मझा आहे. त्यात पी एम पी ओ सारखे आवाजाच्या मोजमापाशी सम्बन्ध नसलेले आकडे ऐकवून आणखीच दिशाभूल. या क्षेत्रात माबो वर कोणी तज्ज्ञ् आहे का? मेहन्दी हसनचा खर्ज एकदा गाभार्‍यासारखा पण क्रीस्टल क्लीअर ऐकायचा आहे....

त्यात पी एम पी ओ सारखे आवाजाच्या मोजमापाशी सम्बन्ध नसलेले आकडे ऐकवून आणखीच दिशाभूल. >>
हूड खरेच की. त्यात ते काय म्हणाले, एम पी थ्री सीडी चालणार नाही. सीडी विकतच घ्याव्या लागतील.
ते शोरूम मध्ये इतके मस्त वाट्ते की एक मध्यमवर्गीय कमी पणा वाट्ला मला. घर लहान, महाग सिस्टीम
न परवड्नारी पण संगीत जीव की प्राण. अश्या सिस्टीम ज्युबीली हिल्स च्या बंगल्यातच शोभणार. पण सध्या नोकिया फोन वर खूष आहे. अगदी मस्त साउन्ड, परत वैयक्तिक. एक बाफ खरेच पाहिजे. फिलिप्स साउन्ड बार घेउ का? वर्थ आहे का? आपली आवड wide spectrum aahe.
भारतिय शास्त्रीय
बॉलीवूड
तेलुगु फिल्मी
भारतीय वाद्यवादन
वेस्टर्न रॉक पॉप रॅप.
गझल - जगजीत सिन्ग, पंकज उदास, आशा.
जुनी हिन्दी मराठी.
आता काय करावे.

बोसची शोरुम कुठे उघडली आहे हैद्राबादेत? एक प्रसाद्स मध्ये उघडली होती त्यांनी सुरुवातीला बहुतेक.. प्रसाद्स मध्ये वर्ल्डटेल रेडिओची पण शोरुम होती.. तो घेतला होता मी हौसेने (नोकरी लागल्यावर स्वतःसाठी केलेली पहिली खरेदी).. लै भारी गाणी असायची त्यावर..

सध्या माबोवर मामींचा मुक्त संचार असल्याने हैद्राबादची लै आठवण येते.. पॅराडाइज, बावर्ची, संगीत, आरटीसी क्रॉस रोड, माधापूर, मेहदीपट्टणम्, टँक बंड, नेकलेस रोड.. अन् आमची सिंधी कॉलनी.. ह्म्म.. बेष्ट दिवस होते.

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा भन्नाट चित्रपट यंदा भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. अतिशय योग्य अशी ही निवड आहे.

दादासाहेब फाळक्यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला हा चित्रपट त्यांच्या चित्रप्रवासाची गोष्ट अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं सांगतो. नंदु माधव, विभावरी देशपांडे यांचा सुंदर अभिनय, आनंद मोडक यांचं अप्रतिम पार्श्वसंगीत (यात वापरलेले पियानो आणि व्हायलिन निव्वळ ग्रेट), नितीन चंद्रकांत देसाई यांचं नेपथ्य आणि परेश मोकाशींचं दिग्दर्शन यांमुळे हा चित्रपट अतिशय देखणा झाला आहे.

चित्रपटाशी संबंधित सर्वांचं अभिनंदन Happy

अरे वा! हरिश्चंद्राची फॅक्टरीचे निर्माते व सर्व संलग्न कलाकार-तंत्रज्ञांचे अभिनंदन!

काल रेडिफवर 'रोड, मूव्ही' ह्या देव बेनेगलच्या अभय देओल मुख्य पात्र असलेल्या सिनेमा बद्दल फारच चांगला अभिप्राय आलेला आहे. टोरोन्टो फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवला गेला. दीड तासाचा सिनेमा आहे. भारतात प्रदर्शित होतोय का बघुया.

हा रोड मूव्ही बहुतेक लवकरच डिव्हीडीवर प्रदर्शित होणार आहे. एवढ्यातच Screenमध्ये बातमी होती.

चांगली बातमी.

'टिंग्या' तील त्या मुलाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार (सर्वोत्कृष्ठ बाल कलाकार) मिळाला असे वाचले. 'तारे जमीन पर' सुद्धा स्पर्धेत असताना मिळाला हे विशेष आहे.

अरे वा,हरिश्चंद्राची फॅक्टरी टिम चे अभिनंदन !!

'टिंग्या' तील त्या मुलाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार (सर्वोत्कृष्ठ बाल कलाकार) मिळाला असे वाचले. 'तारे जमीन पर' सुद्धा स्पर्धेत असताना मिळाला हे विशेष आहे.

<<< Exactly फारेंड !
टिंग्या च्या बालकलाकाराचे अभिनंदन !
अर्थात दर्शिल जाफरी नी पण मस्तच काम केलय , फिल्मफेअर नी त्याला बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड द्यायला हवं होतं ( शाह रुख ला देउन मोकळे झाले ना 'चक दे साठी??)

नाही. या वर्षाअखेर प्रदर्शित होईल. बर्‍यांच चित्रपट महोत्सवांत हा चित्रपट गाजला आहे. मी पुण्यातच एका महोत्सवात पाहिला होता.
'गंध', 'गाभ्रीचा पाऊस', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटांना वितरकच मिळत नव्हते. यांपैकी पहिले दोन प्रदर्शित झाले, आता ऑस्करच्या चर्चेमुळे हाही चित्रपट प्रदर्शित होईल.
'शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'एक डाव धोबीपछाड', 'गल्लीत गोंधळ' सारखे चित्रपट धो धो चालतात, आणि या सुंदर चित्रपटांना वितरकही मिळत नाहीत. Sad

हरिश्चंद्राची फॅक्टरी महोत्सवात असताना बघायचा होता, पण प्र्यत्न करूनही जाता आले नाही. Sad
आता प्रदर्शित केव्हा होतोय, याची वाट बघणे आले.

'गंध', 'गाभ्रीचा पाऊस' सारखे सिनेमेही तयार झाल्यावर कितीतरी दिवसांनी प्रदर्शित झाले. या ऑस्करच्या बातमीमुळे तरी हे उदासीनतेचं वातावरण बदलायला मदत होवो.

बर्‍याच लोकांनी 'पहाच' म्हणून सांगितलेला 'ओये लकी..' पाहिला आणि अजिबात आवडला नाही! (ह्या स्फोटक वाक्याबद्दल माझ्या एकूण समजेचे पोस्टमॉर्टेम होणार आता :)) चोरीचे ग्लोरिफिकेशन, मग ते कितीही भन्नाट का असेना, पटलेच नाही! Sad प्रचंड आवाज, अंधारातली दृष्य, अनोळखी चेहरे.. आम्ही खरंतर सिनेमाशी कनेक्टच नाही होऊ शकलो.. (परेश रावल विविध भूमिकात आहे हेच बरंच उशीरा कळालं, आधी झेपलंच नाही बराच वेळ की आत्ता हा असा होता, आता असं काय बोलतोय :फिदी:)

तरीही, 'सोचा न था' पाहणारे नक्कीच Happy

Pages