नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप : मायबोलीवरील आहार व पाककृती विभागात पाककृती कशा शोधाव्यात. हे मदतपुस्तिकेतले पान बघितले आहे का? का हे पण अवघड आहे ?
उदा: वांग्याच्या शब्दखूणा असलेल्या कृती इथे सापडतील.

गेल्या १-२ महिन्यांत इथे अनेक डूआयडींनी येऊन धुमाकुळ घातलेला आहे. त्यांना त्यांच्या अर्वाच्य लेखनामुळे, इतरांना शिवीगाळ केल्यामुळे व अत्यंत जातीयवादी लेखन केल्यामुळे कितीही वेळा हाकलून लावलं, तरी हाकलल्यानंतर ५ व्या मिनिटाला ते नवीन आयडी घेऊन परत येतात व परत तसेच अर्वाच्य प्रतिसाद देत बसतात. त्यांच्या विषारी लेखनामुळे इथले वातावरण अतिशय गढूळ झाले आहे.

इथल्या एका सभासदाला गेल्या महिन्यात ३ वेळा हाकलून लावले. तरीसुद्धा तो २ दिवसांपूर्वी नवीन आयडी घेऊन परत आलेला आहे व आपले जातीयवादी लेखनाचे अपूर्ण काम त्याने नव्या जोमाने पुढे सुरू ठेवले आहे. त्याचा हा ४ था नवीन आयडी ब्लॉक केला तरी काही क्षणातच ५ वा आयडी घेऊन तो परत येईल व तसेच गलिच्छ लेखन पुढे सुरू ठेवेल.

यावर एक प्रभावी उपाय आहे. माझ्या समजूतीप्रमाणे प्रत्येक आयडीशी संबंधित एक ईमेल आयडी असतो. एखादा सभासद नवीन सभासदत्व घेऊन आयडी मिळवितो, तेव्हा त्याला एक ईमेल आयडी देऊन आपले सभासदत्व त्या ईमेल आयडीद्वारा कन्फर्म करावे लागते. एका व्यक्तीला कितीही ईमेल आयडी मिळू शकत असल्याने, हे जातीयवादी सभासद हकालपट्टी झाल्यावर लगेच एक नवीन ईमेल आयडी तयार करतात व त्याद्वारे मायबोलीचे नवीन आयडीने सभासदत्व मिळवितात.

याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी, जेव्हा एखादी व्यक्ती मायबोलीचे नवीन सभासदत्व मिळवायचा प्रयत्न करते, तेव्हा त्याच्या/तिच्या ईमेल आयडीच्या बरोबरीने त्याचा/तिचा भ्रमणध्वनी क्रमांक देणे सक्तीचे करावे. सभासदत्वाचा अर्ज सबमिट केल्यावर, त्याच्या ईमेलवर पासवर्ड पाठवावा, तसेच त्याच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे अजून एक पासवर्ड स्ट्रिंग पाठवावी. हे दोन्ही पासवर्ड त्याने टाकून आपले सभासदत्व कन्फर्म केल्यानंतरच त्याला/तिला मायबोलीचा अ‍ॅक्सेस द्यावा.

जर त्या आयडीने गलिच्छ लेखन केल्यामुळे त्याचा/तिचा आयडी ब्लॉक केला तर, त्याला/तिला नवीन आयडीने सभासदत्व मिळविण्यासाठी नवीन ईमेल आयडी व नवीण भ्रमणध्वनी क्रमांक सक्तीचा करावा. जरी नवीन ईमेल खाते उघडणे अत्यंत सोपे असले तरी, त्या सभासदाला प्रत्येक वेळी नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मिळविणे खूपच अवघड आहे. एखाद्या व्यक्तीची असंख्य ईमेल खाती असू शकतात कारण ती फुकट आणि अगदी सहज मिळतात. पण एखाद्या व्यक्तीकडे फारतर जास्तीत जास्त २-३ वेगवेगळे भ्रमणध्वनी क्रमांक असू शकतील. तसेच दर ८-१० दिवसांनी नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मिळविणे हे तितके सोपे नाही. त्यामुळे एकदा हाकलून लावलेल्या सभासदाला इथे नवीन आयडी घेऊन परत येणे बरेच अवघड होईल.

जर ईमेल कन्फर्मेशनच्या बरोबरीने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कन्फर्मेशन सक्तीचे केले तर, या असभ्य आयडींचा व त्यांच्या डूआयडींचा ताप बराचसा कमी होईल.

ठराविक आयडींचे लिखाण सबस्क्राइब करण्याची सोय हवी. त्यातही त्या त्या आयडींच्या लिखाणाच्या प्रकारात चॉइस मिळाला तर फारच उत्तम.
>>> नीरजाला अनुमोदन.

किंवा फक्त लिखाणाच्या प्रकारात सबस्क्राइब करण्याचा चॉइस मिळाला तरी उत्तम. आयडी कुठलाही असो.

विचार व्हावा. विशेषतः स्फुट एकतर कविता किंवा ललित यामधे पोस्ट करावं लागतं. निव्वळ संवादातून काही लिहावंसं वाटलं तर कुठे पोस्ट करावं समजत नाही.

<<<गझला आणि तरहींसाठी वेगळा क्लोज्ड ग्रुप हवा. आणि त्या ग्रुपात धागे सार्वजनिक करण्याची सुविधा असू नये.>>>

मायबोलीने हे केले तर :

१. मराठी गझलसाठी ( 'पाच' सर्वात मोठ्या मराठी संकेतस्थळांपैकी तूर्तास खरच फक्त या संकेतस्थळावर गंभीरपणे) चाललेले काम बंद धाग्यात व्हायला लागेल

२. प्रवासवर्णने व आहारशास्त्र पाककृती यांना चांगले दिवस येतील व यावेतही

=====================

याच मागणीप्रमाणे सर्व वाहती पाने, कविता (गझल ही कविताच असते), कथा, काकाक, ललिते, विडंबने, प्रवासवर्णने, सावरकरांचे धागे आणि पाककृत्या या बंद स्वरुपाच्या का नसाव्यात याला काही लॉजिक नसावे. एक आपली गझल डोक्यात जाते याशिवाय त्यात काही महान भावना नसणार.

नीधप, आपल्या 'दयाळू' माहितीसाठी:

तरही उपक्रमामुळे आणि येथे गझलेवर होणार्‍या चर्चेमुळे ऑर्कुटवरच्या कम्युनिटीजच्या कम्युनिटीज येथे स्थलांतरीत होत आहेत. तिकडे त्यांना मिळणारे छप्परतोड प्रतिसाद येथे का मिळत नसावेत यावर अभ्यास करताना गझल सुधारण्यामागे आहेत.

जसे तुम्ही पिंका टाकल्याप्रमाणे गझलचा उल्लेख करताय, तशी सर्वच माणसे असती तर गझल हा प्रकार एकंदरच इतका डोक्यावर घेतला गेला नसता.

'मी हे अ‍ॅडमीनना सांगतीय, तुम्हाला काय घेणे देणे' असे आपण आता म्हणणार नसाल अशी आशा व्यक्त करतो.

-'बेफिकीर'!

तुमचा मुद्दा चुकीचा नाही पण तरी...
दिवसाला रतिबाप्रमाणे पोत्याने प्रसिद्ध होणार्‍या तरही/ गझला यांच्यापलिकडे मायबोलीच्या पहिल्या दोन पानांवर काही दिसूच नये असे होते हे बरोबर आहे का?

तुम्ही बहुतेक सर्व रचना वाचता. विश्लेषणही करता. त्यामुळे प्रसिद्ध होणार्‍या पुरात बहुतांशी ट ला ट असलाच प्रकार असतो, आणि खरोखरीचे उत्तम काव्य नमुन्यापुरतेच हे तर तुम्हालाही माहितीये.

माझा गझल या प्रकारावर आक्षेप/ रोष इत्यादी नक्कीच नाही पण इतक्या गझला रोजचेरोज वाचून कधीतरी त्यात एखादी बरी सापडल्यावर आनंद मानण्याइतके गझलेचे मोठेपण माझ्या आयुष्यात नाही. रोजच्या रतिबातून बरी निवडून कोणी पहिल्या पानावर ठेवली तर ती नक्कीच वाचली जाईल, समजून घेतली जाईल.. भले तंत्र हा प्रकार माझ्या पचनी पडणारा नसला तरी.

हा रतीबच रोजचे रोज दिसत असल्याने इतर अनेक चांगल्या गोष्टी वा महत्वाचे बाफ यांच्याकडे दुर्लक्ष होते. नवीन लिखाण मागे पडते. त्याचे काय?

मायबोली हे केवळ गझल-तरही प्रमोट करण्याचे व्यासपीठ नाही याबद्दल तरी संभ्रम नसावा.

सध्या मायबोलीचं लॉगिन मुख्यपृष्ठावरून थोडं स्क्रोलिंग करून करावं लागतं. ते मला फारसं आवडलेलं नाही. फेसबुकासारखी वरती लॉगिनची सोय कराल का? धन्यवाद!

मायबोलीच्या लॉगिन पेजला सुटसुटीत मेन्यु असू शकतो का ?

उदा.

सर्व लेखन| कथा| कविता| लेख |मागोवा |हितगुज| गप्पाटप्पा| चर्चा |बातमीफलक| प्रकाशचित्र|खादाडी| पाककला

आज त्याची गरज वाटतेय. ज्यांनी सर्व लेखन हा ऑप्शन निवडला आहे केवळ त्यांनाच सर्व लिखाण दिसावे. इतरांना त्यांच्या आवडीचेच लिखाण दिसावे.

प्रचि अपलोड करण्यासाठी ते खाजगी जागेमधे सेव्ह करावे लागते. एकदा धाग्यावर चित्र दिसू लागले कि खाजगी जागेमधून ते चित्र डिलीट केलं तरी चालण्यासारखे आहे असं वाटतं. खाजगी जागेमधून प्रचि काढून टाकल्यास मायबोली सर्वर वर येणारा ताण कमी होईल असं वाटतं. आपलं काय मत आहे ?

धाग्यामध्ये खाजगी जागेतील प्रकाशचित्राचा फक्त दुवा असतो, त्यामुळे तिथून चित्र काढले तर ते धाग्यावरही दिसेनासे होईल.

प्रत्येकाच्या प्रतिसादावर ऑप्शन ठेवायचे..... हा संदेश किती दिवस ठेवायचा... स्मायली/ जोक/ अभिनंदन वगैरे एक महिना ठेवावेत.

जे माहितीपूर्ण असतील त्यासाठी कायमचे ठेवावे असा ऑप्शन ठेवावा.

प्रत्येकाने आपापला प्रतिसाद प्रामाणिकपणे मार्क करावा.

साधारण महिनाभर सगळेच प्रतिसाद रहातील. तेंव्हा धागे अ‍ॅक्टिव असतात.

नंतर फाफट पसारा डिलिट होऊन फक्त माहितीपूर्ण प्रतिसाद रहातील.

( माझा हा प्रतिसाद कसा आहे? फाफट पसारा की कायमचा ठेवण्यायोग्य? )

मुक्त छंदातील कविताना कवीनी मूळ कवितेच्याच धाग्याला महिनाभर जिवंत असा ऑप्शन प्रामाणिकपणे मार्क करावा.. ई कचरा कमी केल्याचे त्याना पुण्य मिळेल.

मायबोलीवर खालील सुधारणा झाल्यास बरे होईल.
१) प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील.
(२) निवडक (मला आवडलेले लेख) संग्राह्य करण्यासाठी केवळ दहाची मर्यादा वाढवायला हवी.
(३) फोटो सेव्ह करण्यासाठी साईज थोडी वाढविण्याची गरज आहे. चांगले फोटो साईज कमी केल्याने पिक्सल खराब होतात. परिणामी छायाचित्र.
सध्या तरी एवढेच नावडते. बाकी ‘मायबोली’ छानच.

प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील. +१

>>> लिंबुभाऊ, अजिबात नको <<<<< Uhoh अग का गं?
सेपरेट सोय असेल ती, ज्याला हवि त्याने वापरावी. बाकी माबो आहे तशीच दिसेल
मला ट्री व्ह्यू हव्वाच्च Proud

१)एखाद्या धाग्यावरील पानाच्या प्रत्यक्षातल्या क्रमांकापेक्षा नोडवर दिसणारा क्रमांक एकाने कमी असतो.
उदा: या पानाचा नोड आहे http://www.maayboli.com/node/2070?page=17 पान आहे अठरावे.

२) कोणत्याही धाग्यावर पान दोनपासून मूळ लेखन न दिसता फक्त प्रतिसाद दिसतील तर बरे होईल.

३) प्रतिसाद लाइक आणि डिसलाइक करायची, आणि ते कोणी केले ते समजण्याची सोय सगळ्या धाग्यांवर देणे शक्य होईल का? (तसे हल्ली फक्त +१ करून भागत नाही, तर एकापुढे अनेक शून्ये किंवा पुन्हा १ हा आकडा अनेकवेळा लिहावा लागतो. Wink पण एका प्रतिसादाला एकदाच लाइक करायची सोय मिळाली तरी पुरे.)

२) कोणत्याही धाग्यावर पान दोनपासून मूळ लेखन न दिसता फक्त प्रतिसाद दिसतील तर बरे होईल.

३) प्रतिसाद लाइक आणि डिसलाइक करायची, आणि ते कोणी केले ते समजण्याची सोय सगळ्या धाग्यांवर देणे शक्य होईल का? (तसे हल्ली फक्त +१ करून भागत नाही, तर एकापुढे अनेक शून्ये किंवा पुन्हा १ हा आकडा अनेकवेळा लिहावा लागतो. डोळा मारा पण एका प्रतिसादाला एकदाच लाइक करायची सोय मिळाली तरी पुरे.)>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>+१००

१) प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील.

(३) फोटो सेव्ह करण्यासाठी साईज थोडी वाढविण्याची गरज आहे. चांगले फोटो साईज कमी केल्याने पिक्सल खराब होतात. परिणामी छायाचित्र.

सह्मत

प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील.>>>> +१

१) ( प्रतिक्रिया पाहण्यासाठी दरवेळी शेवटचे पान पाहावे लागते. त्या ऐवजी शेवटचे पान हे पहिले पान असले तर नवीन अपडेट काय आहेत ते पाहता येतील.
(२) निवडक (मला आवडलेले लेख) संग्राह्य करण्यासाठी केवळ दहाची मर्यादा वाढवायला हवी.
३) कोणत्याही धाग्यावर पान दोनपासून मूळ लेखन न दिसता फक्त प्रतिसाद दिसतील तर बरे होईल..)...सहमत.

मला ट्री व्ह्यू अन रन्गित अक्षरे हवित Happy
झालच तर माऊस्/पेनने इथेच चित्र/रेखाटन/हस्ताक्षर काढता आले तर फार बरे.

Pages