क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पतौडीबद्दल झक्कींना अनुमोदन.. त्याच्या जबरी क्षेत्ररक्षणामुळेच त्याला टायगर हा किताब मिळाला होता.. कव्हर्समधे क्षेत्ररक्षण कसे करायचे हे त्याने सगळ्यांना दाखवुन दिले.. डोक्यावर पनामा हॅट घालुन व शर्टाची कॉलर ताठ करुन सदैव रुबाबात वावरणारा पतौडी खरच एक स्टायलिश क्रिकेटपटु होता.

वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी तो कप्तान झाला. १९७१ च्या विंडिज व इंग्लंड दौर्‍याच्या आधी विजय मर्चंटने त्याचे डिसायडिंग व्होट वाडेकरला दिल्यामुळे त्याचे कप्तानपद गेले. त्यानंतर तो तुरळकच खेळला.....पण संपुर्ण ६० चे दशक तो भारताचा कप्तान होता.

१९६९-७० साली बिल लॉरी च्या ऑस्ट्रेलिया व ग्रॅहेम डाउलिंगच्या न्युझिलंड दौर्‍यांच्या वेळचे रेडिओवर ऐकलेले अनंत सेटलवाड्,पिअर्सन सुरिता व डॉ.पुरींचे धावते समालोचन व ब्रेबॉर्न स्टेडिअमवर इराणि ट्रॉफिमधे रुबाबदार बॅटींग व स्टायलिश फिल्डिंग करताना बघीतलेला नवाब ऑफ पतौडी म्हणजे माझ्या क्रिकेटच्या पहिल्या आठवणी होत.. अश्या या पतौडीच्या आत्म्याला शांती लाभो ही सदिच्छा..

>>> !!!.......सचिन तेंडूलकर मला घाबरायचा..... इति शोएब अख्तर!!!
----- त्याने ते विनोदाने म्हटले असेल.... असे म्हणायचे धाडस ग्रेग मॅकग्राथ, शेन वॉर्न, मुरलीधरन पण करणार नाही.
वर्ल्ड कप मधे अख्तरची वाट लावल्यावर किती तरी महिने स्वप्नात त्याला सचिनच दिसायचा.

मॅग्राथ (फक्त तोच) म्हंटला असता तर रावसाहेबप्रमाणे "त्याचं अधिकार होतं" म्हंटले असते Happy पण शोएब काय?

आता मुंबईतील बर्‍याच राजकीय लोकांनी शोएबने माफी मागावी वगैरे चालू केले आहे. नाहीतर पुस्तक प्रकाशन उधळून लावू वगैरे लोकशाही जोरात चालू आहे.

बरं ते जाऊदे, आपल्या १९ वर्षांखालील टीमने ऑसीज्च्या लोकांना काय धुतलाय पाहा.
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/529962.html

Australia Under-19s 163 (41.1 ov)

India Under-19s 167/0 (12.0 ov)

India Under-19s won by 10 wickets (with 228 balls remaining)

* Quadrangular Under-19 Series (India) - 1st Match
* Youth ODI no. 770 | 2011/12 season
* Played at Port Trust Diamond Jubilee Stadium, Visakhapatnam
* 27 September 2011 (50-over match)

Australia Under-19s innings (50 overs maximum) R B 4s 6s SR
C Bancroft* b Harmeet Singh 26 63 2 0 41.26

K Patterson lbw b Kalaria 15 22 3 0 68.18

NG Stevens c & b Harmeet Singh 4 13 1 0 30.76

W Bosisto lbw b Vikas Mishra 27 35 0 1 77.14

JJ Peirson† c Nath b Aparajith 51 59 3 0 86.44

A Turner b Aparajith 5 13 0 0 38.46

T Head c Harmeet Singh b Aparajith 19 28 3 0 67.85

S Cassell c Chand b Aparajith 0 1 0 0 0.00

A Pyecroft run out (Kalaria/Harmeet Singh) 0 3 0 0 0.00

D McGlinchey not out 1 8 0 0 12.50

B Chard b Aparajith 1 4 0 0 25.00

Extras (b 4, lb 2, w 6, nb 2) 14

Total (all out; 41.1 overs) 163 (3.95 runs per over)
Fall of wickets1-27 (Patterson, 7.3 ov), 2-40 (Stevens, 12.5 ov), 3-68 (Bancroft, 18.4 ov), 4-105 (Bosisto, 26.1 ov), 5-113 (Turner, 29.1 ov), 6-153 (Head, 37.2 ov), 7-153 (Cassell, 37.3 ov), 8-156 (Pyecroft, 38.3 ov), 9-161 (Peirson, 39.6 ov), 10-163 (Chard, 41.1 ov)

Bowling O M R W Econ
Sandeep Sharma 6 1 18 0 3.00 (1w)

RB Kalaria 8 1 20 1 2.50 (1nb, 1w)

Harmeet Singh 8 0 26 2 3.25 (1w)

Vikas Mishra 9 0 40 1 4.44 (2w)

B Aparajith 8.1 0 38 5 4.65 (1w)

AD Nath 1 0 6 0 6.00 (1nb)

U Chand 1 0 9 0 9.00

India Under-19s innings (target: 164 runs from 50 overs) R B 4s 6s SR
M Vohra not out 79 35 15 2 225.71

U Chand* not out 72 40 11 3 180.00

Extras (lb 4, w 9, nb 3) 16

Total (0 wickets; 12 overs) 167 (13.91 runs per over)
Did not bat SK Patel†, Sandeep Sharma, AD Nath, GH Vihari, K Deobrat, B Aparajith, Vikas Mishra, Harmeet Singh, RB Kalaria

Bowling O M R W Econ
A Pyecroft 4 0 48 0 12.00 (3nb, 1w)

B Chard 2 0 21 0 10.50

A Turner 2 0 35 0 17.50 (2w)

D McGlinchey 3 0 36 0 12.00

S Cassell 1 0 23 0 23.00 (1w)

आरे कुणाच्या बोलण्याला किती किंमत द्यायची याचा साधा पोचपाच तरी ठेवा!
असं कसं? अहो 'राडा' करायला हे योग्य कारण आहे! लै मज्जा राव, खूप पैसे मिळतात!
शिवाय ते राजकीय लोक आहेत. तिकडे शोएबच काय, कुणीहि फडतूस माणूस काहीतरी बोलतो, लिहितो नि इकडे लोक आपल्याच देशाचे, लोकांचे नुकसान करतात. हे 'भारतीय राजकारण' आहे. असेच असते!
आता मुंबईतील बर्‍याच राजकीय लोकांनी शोएबने माफी मागावी वगैरे चालू केले आहे. नाहीतर पुस्तक प्रकाशन उधळून लावू वगैरे लोकशाही जोरात चालू आहे.

आणि कुणी उपोषणाला पण बसणार नाही का? बघा, लाचलुचपत एकदम बंद, स्विस बँकेतले पैसे परत! आता कुणि काढतात का हा विषय? कारण काम झालेले आहे.
शिवाय एक अर्ज लिहून त्यावर पाच हजार 'साइन्स' घ्या. बघा गूगलवर मराठी आले की नाही लग्गेच!!

Proud Proud Proud

"शोएब फेक्तर च्या वेगवान गोलंदाजीचा सामना करताना सचिनचे पाय कापत होते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे - शाहिद आफ्रिदी

http://www.indianexpress.com/news/i-saw-tendulkars-legs-shivering-while-...

शोएब फेक्तरच्या वेगाची व गोलंदाजीची इतकी भीति वाटत असताना जर सचिनने त्याला इतका चोपला असेल, तर तो त्याच्या गोलंदाजीला अजिबात घाबरत नसता, तर शोएबला किती मार पडला असता?

सामना वृतपत्र
मुनाफ पटेलसोबत शारीरिक संबंध बॉबी डार्लिंगचा स्फोट
नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) - काही दिवसांपूर्वी बॉबी डार्लिंगला मुंबई पोलिसांनी आपत्तीजनक अवस्थेत पकडल्यानंतर माझे फक्त एकाच पुरुषासोबत शारीरिक संबंध असल्याचे स्पष्ट करीत बॉबीने पळता पाय काढण्याचा प्रयत्न केला.
बॉबीने मुनाफला यामध्ये गोवल्यानंतर विश्‍वविजेत्या हिंदुस्थानी संघाचा सदस्य मुनाफच्या पायाखालील वाळू सरकली. या प्रकरणावर तो म्हणाला, मी बॉबीला भेटलो, पण बॉबी आणि माझे शारीरिक संबंध नव्हते.
मुनाफची प्रतिक्रिया ऐकून बॉबीने त्याच्यावर शब्दांचा मारा केला. माझा उपयोग करून मुनाफने सोडून दिले. आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो. पण त्याने मला कॉलगर्ल आणि वेश्याप्रमाणे ‘ट्रीट’ केले. मला हे अजिबात आवडले नाही, असे परखड मत बॉबीने व्यक्त केले. मुनाफ खरा मुसलमान असेल तर कुराणची शपथ घेऊन सांगेल की माझ्यासोबत संबंध नव्हते. माझ्याकडे पुरावेही आहेत. त्याच्यासोबत संबंध असल्याचे, असे स्पष्ट मतही पुढे बॉबीने व्यक्त केले.

झिम्बाब्वेने काही दिवसांपूर्वी किवीजविरूद्धच्या ३ र्‍या एक दिवसीय सामन्यात तब्बल ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला होता. आज त्यांनी किवीजना पुन्हा एकदा दणका दिला.

पहिल्या कसोटी सामन्यातल्या आजच्या ५ व्या दिवशी विजयासाठी ३६६ धावा करायच्या असताना चहापानाच्या वेळी झिम्बाब्वेने तब्बल ३ बाद २६५ अशी मजल मारलेली होती व विजयासाठी उर्वरित २९ षटकात फक्त १०१ धावा हव्या होत्या. पण चहापानानंतर ब्रँडन टेलर १२२ धावा करून बाद झाला व पारडे फिरले. शेवटी किवीजने जेमतेम ५.५ षटके शिल्लक असताना झिम्बाब्वेवर फक्त ३४ धावांनी विजय मिळविला.

एकंदरीत मधल्या ४-५ वर्षांच्या बहिष्काराच्या कालखंडानंतर झिन्म्बाब्वेने जोरदार पुनरागमन केले आहे.

वे. इंडीज ३३-१.
आतापर्यंत दोन झेल सोडले.
पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात फिरकी गोलंदाजांचा चेंडू इतका वळतोय ! सामना चार-पांच दिवस चालेल ? आपली अशीच एक शंका !

वे.इंडीज - ३०४.
फिरकी गोलंदाजाना १० पैकी ९ बळी ! भारताने पहिल्या डावात आघाडी मिळवणं अत्यावश्यक.

भारत १८८-७.
बिशूचे कांही चेंडू आत्ताच सरपटी जाताहेत !!! भारताचं दुसर्‍या डावातही कांही खरं नाही.
[ माझे 'तज्ञ' कॉमेंटस वाचायला इथं कुणीच येत नाही, यावरून कसोटी क्रिकेटचं भवितव्य कठीण आहे असा तर निष्कर्ष निघत नाही ना ! कीं, मलाच ही तंबी आहे ? Wink ]

नव्या सिरिजचा नवीन बाफ नाही ना उघडला कोणी अजून...

विडींजची वाट लावल्यावर आपलीही वाट लागून विडींजच्या दुसर्‍या डावाची एक विकेट गेली पण... सुरुवातीलाच दोन्ही कडून स्पीनर

उद्याच निकाल लागला तर आपण नक्कीच हारलेले असू... परवा पर्यंत मॅच गेली तरच ड्रॉ किंवा जिंकायची संधी..

दुसर्‍या दिवसअखेर जरी विंडीज ११६ धावांनी पुढे असले व त्यांचे अजून ८ गडी बाद व्हायचे शिल्लक असले तरी, उद्या चहापानापर्यंत भारत त्यांचा डाव १५० च्या आत गुंडाळेल व विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा भारत ४ थ्या दिवशी करून सामना जिंकेल.

शाब्बास मास्तुरे, माझ्या मनातले बोललात.
फक्त भारत ऐवजी बीसीसीआय असे लिहा.
कारण खुद्द बीसीसी आय ने सांगितले आहे की ते भारताचे प्रतिनिधित्व करत नाहीत, म्हणून भारत सरकार कडे त्यांना त्यांच्या पैशाच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे अधिकार नाहीत.

अजून बीसीसीआय चे लोक एक दिवशीय सामन्याच्या मूडमधे आहेत. शिवाय सचिन, द्रवीड व लक्ष्मण या तिघांपैकी फक्त एकानेच धावा काढायच्या असा नियम आहे.

धोणी फक्त दुसर्‍या डावात सिक्सर मारून जिंकण्याची वात पहातो आहे, तो पर्यंत उगाच फलंदाजी करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा आरामात तंबूत बसावे, डुलक्या घ्याव्या. कुणि विचारले तर म्हणावे मी सामन्याचे डावपेच आखतो आहे, निरनिरळ्या शक्यता विचारात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याचा विचार करतो आहे!

खरे तर बिशूला सामन्यातून काढून टाकायला पाहिजे. सरपट्टी बॉल टाकायचे नाहीत हा नियम भारतातल्या शेंबड्या पोराला सुद्धा ठाउक आहे. गल्ली क्रिकेटचे नियम आता इथेहि हळू हळू आणले पाहिजेत. भारतात खेळणार, भारताच्या संस्कृती प्रमाणे नियम.

<< सरपट्टी बॉल टाकायचे नाहीत हा नियम भारतातल्या शेंबड्या पोराला सुद्धा ठाउक आहे. >> झक्कीसाहेब, बिशू तसे बॉल टाकत नाहीये, आपणच केलेल्या खेळपट्टीवर ते तसे पडताहेत !! आणि, बिशूच्या रक्तात ' भारताच्या संस्कृति'चा अंश तर आहेच ना !!! Wink

भाऊ तुम्ही झक्कींचे म्हनणे सिरिअसली घेत जाऊ नका. कारण ते स्वतःच लिहिताना सिरिअसली लिहीत नाहीत असे दिसते आहे...

आपणच केलेल्या खेळपट्टीवर ते तसे पडताहेत !!

"अंगणच वाकडे, नाहीतर मी किती छान कायदेशीर गोलंदाजी करतो!!"

फलंदाजी चांगली का झाली नाही - खेळपट्टी खराब होती.
गोलंदाजी चांगली का झाली नाही - खेळपट्टी खराब होती.
क्षेत्ररक्षण चांगले का झाले नाही - खेळपट्टी खराब होती.
ते का जिंकले - खेळपट्टी खराब होती.
आपण का हरलो - खेळपट्टी खराब होती.

आता उगाच प्रत्यक्ष खेळण्याचे कष्ट घेण्यापेक्षा, फक्त खेळपट्टी बनवावी, दोन्ही बाजूंनी संघाची निवड करावी, नि मग ठरवावे की कोण जिंकले नि कोण हरले.

अजून नवीन बीबी कसा काढला नाही?

फारेंड, परदेसाइ, केदार, असामी यांचे काय म्हणणे आहे?

जे लोक खेळत असतात, त्यांच्यापेक्षा बाकीच्यांनाच जास्त समजते की खेळपट्टी कशी आहे, कश्या प्रकारचे फटके मारावे, कशी गोलंदाजी करावी, कुणाला गोलंदाजी द्यावी वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष खेळ बघण्यापेक्षा त्यांनी लिहीलेले वाचूनच जास्त समजते.

एकदा क्रिकेट सुरु झाले की, भारतातला भ्रष्टाचार कमी होईल का? स्विस बँकेतला पैसा परत येईल का? काश्मीर भारताला मिळेल का? पाकीस्तान सुधारेल का?? असल्या कमी सिरिअस प्रश्नांकडे लक्ष जात नाही.

भाऊ तुम्ही झक्कींचे म्हनणे सिरिअसली घेत जाऊ नका.

आयला, उगाच असे लिहून त्यांनी ऐकले तर ते व्यंगचित्रे काढणे बंद करतील. तर तसले वेडेवाकडे उपदेश करू नका. कितीहि सिरिअसली लिहिण्यापेक्षा एका व्यंगचित्रातून ते बरेचसे सांगतात.

बाळूजी.. झक्की न्यू-जर्सी (USA) मधे रहातात. आणि ते Internet वर मॅच बघतात दिसली तर.. Happy

सरपट्टी चेंडू टाकल्यास्/पडल्यास आम्ही Dead-ball देतो. Lol

<< कितीहि सिरिअसली लिहिण्यापेक्षा एका व्यंगचित्रातून ते बरेचसे सांगतात. >> झक्कीसाहेब, हे तुमचं म्हणणं मात्र मी खरंच सिरीयसली घेतलं तर मा.बो.वर काय अनर्थ ओढवेल, याचा तरी विचार करा !!! Wink

http://www.maayboli.com/node/30380 - नवीन धागा. आता आपण जिंकू!

बाजो सॅटेलाईट टिव्ही प्रत्येकाकडे असेलच असे नाही, शिवाय अनेक सॅटेलाईट प्रोव्हाइडर्स, त्यामुळे तो प्रोव्हाईडर परत आपल्याकडे पाहिजे. लै घोळ हो. त्या पेक्षा इंटरनेट सोपे.

Pages