Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
जयसूर्या आज आपला शेवटचा
जयसूर्या आज आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. अजून २ दिवसांनी ३० जूनला तो वयाची ४२ वर्षे पूर्ण करेल.
जवळपास सचिनबरोबरच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. सचिन पहिला सामना नोव्हेंबर १९८९ मध्ये खेळला तर जयसूर्या डिसेंबर १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला. त्याची एकूण कारकीर्द २१ वर्षे ६ महिने २ दिवस एवढी आहे.
त्याच्या पहिल्या ऑसीजविरूध्द्च्या सामन्यात जेफ मार्श, डेव्हिड बून, अॅलन बॉर्डर, डीन जोन्स वगैरे मंडळी ऑसीजच्या संघात होती. जयसूर्या २०१० मध्ये आयपीएलमध्ये खेळताना जेफ मार्शचा मुलगा (शॉन मार्श) एका संघातून खेळत होता. पिता व पुत्र अशा दोघांच्या कारकीर्दीत खेळणार्या दुर्मिळ खेळाडूंमध्ये जयसूर्याचा समावेश होतो.
>>लक्ष्मणसारख्या फारश्या चपळ
>>लक्ष्मणसारख्या फारश्या चपळ नसलेल्या एखाद्या क्षेत्ररक्षकाऐवजी, त्याच्या पायात गोळे आलेत असे कारण पुढे करून रैनासारख्या अतिशय चपळ असलेल्या १२ व्या खेळाडूला बदली क्षेत्ररक्षक म्हणून खेळवता येईल.
मास्तुरे,
अगदी! याच्साठी मी वर क्र. ८ मधे लिहीले आहे.
>>जर रनरला बंदी असेल तर १२ व्या खेळाडूला सुध्दा बंदी हवी.
तसा तर्क नाही चालणार कारण खरोखरच खेळाडूला दुखापत असेल तर १२ व्याला मैदानात क्षेत्ररक्षण करावेच लागेल.. मुळात रनर चा फायदा फलंदाजाला आणि संघालाचा जास्त होतो. धावा होतात. डाव चालू रहातो. पण क्षेत्ररक्षणाला बदली म्हणून आलेला मैदानात "ऊभा" असतो. प्रत्त्येक चेंडू त्याच्याकडे येईलच असे नाही. आणि तो नसला तरी डावावर फरक पडत नाही पण सर्व फलंदाज बाद केल्याशिवाय डाव संपत नाही. त्यामूळे रनर चे लॉजिक १२ व्या खेळाडूसाठी वापरता येत नाही.
**************************************************
आज लक्षमण खेळणारच.. नाहीतर ईंग्लंड च्या दौर्यात डच्चू मिळेल हे त्याला माहित आहे
पण असेही द्रविड व कं पेक्षा फॉर्मातील लक्षमण बघायला केव्हाही आवडेल. त्याला पाहू रैना ने धडे गिरवले तरी बरे होईल. बाकी विजय नेहेमीप्रमाणेच फ्लॉप आहे. मुकुंद च्या बाबतीत "दैव देते कर्म नेते" आहे. कोहली ला कसोटी ची मानसिकता जितक्या लवकर कळेल तेव्हडे बरे. निदान समोर द्रविड ला खेळताना पाहून तरी या तरूणांच्या पायांना गोंद लागला (वाण नाही पण गुण) तरी फायद्याचे आहे. कसोटीत गोंद आणि हातोडा दोन्ही वापरावे लागते
अपवाद- सेहवाग! 
रैनाला असद राऊफने ढापला...
रैनाला असद राऊफने ढापला...
तोच काय आपली पूर्ण इनिंगच
तोच काय आपली पूर्ण इनिंगच कोसळली आहे. कान्ट बिलिव्ह. पण ही टेस्ट आहे अजून दोन दिवसांनंतरच मत बनवेल.
आता आज काही होणार नाही. २ बाद
आता आज काही होणार नाही. २ बाद १६ वरून फार तर फार २ बाद ३० पर्यंत जातील.
मग उद्या सकाळी ताजेतवाने झालेले तरुण गोलंदाज अत्यंत भेदक व अचूक गोलंदाजी करून, नि तरुण क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण, अशक्य झेल झेलून, वेस्ट इंडिजला १२५ पर्यंत गुंडाळतील. की पुनः ७६ ची आघाडी, मग चौथ्या दिवशी सकाळपर्यंत आणखी ३००-३२५ धावांचा डोंगर उभारून उरलेल्या दीड पावणेदोन दिवसात त्यांना पुनः २५०-३०० च्या आत गुंडाळून निर्णायक धावसंख्येने विजय मिळवतील!! जय हो, जय धोनि, जय भारत!!
तेव्हढे एकच आहे भारताकडे, क्रिकेट. नाहीतर इतर कुठल्याहि खेळात भारताला कोण विचारतो!
झक्की विंडीज ३ बाद ३०.
झक्की विंडीज ३ बाद ३०.
झक्की तिसरा गेला नि चौथाहि
झक्की तिसरा गेला नि चौथाहि जवळजवळ गेलाच होता.
अजून एक ओव्हर राहिली असती तर
अजून एक ओव्हर राहिली असती तर चौथाही गेला असता. पण उद्या पहिल्या सत्रात दोन ते तीन विकेट सहज मिळतील.
आजकालच्या कॉमेंट्रीचा ट्रेन्ड पाहता, "इशान, प्रविण अॅन्ड मिथून विल लूक फॉर पर्चेस इन द फर्स्ट सेशन, मे बी फोर टू ५ ओव्हर्स फॉर भज्जी" असे बरळायला हरकत नाही.
उद्या पर्यंत धीर धरवत नाही.:)
>>रैनाला असद राऊफने ढापला...
>>रैनाला असद राऊफने ढापला...
एकंदरीत या मालिकेत जाम ढापाढापी (दोन्ही पंच, दोन्ही संघ) चालू आहे. हे सर्व DRS साठी करत आहेत की काय?
एकंदरीत दोन्ही सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व आहे हे पाहून बरे वाटले. या खेळपट्ट्यांवर सचिन, विरू, गौतम यांना खेळायला पहायला आवडले असते.
रैना ला या मालिकेचा अन अनुभवाचा खूप फायदा होणार हे निश्चीत.
काल लिहिल्यासारखंच झालं.
काल लिहिल्यासारखंच झालं. आत्ता भज्जी येतोय. शेवटच्या दोन तीन ओव्हर्स साठी. पहिले सेशन मस्त झाले. प्रविण, इशांत कसले जबरी टाकत आहेत.
लै भारी ५ गेले.
लै भारी ५ गेले.
अजून जरा 'ऑन द स्टंप' बोलिंग
अजून जरा 'ऑन द स्टंप' बोलिंग हवी आहे.. बॅट्समनला 'खेळू का सोडू?' असं वाटायला हवं..
रैना खूपच चांगली खेळी खेळला. इंग्लंडमधे ७वी जागा त्याची (युवराज पण असेलच त्या जागेसाठी)
वादळी पाऊस, काल खेळ बंद,
वादळी पाऊस, काल खेळ बंद, तरीही निकालाची खूप शक्यता.
'मॉडिफाईड डीआरएस'ला भारताची मान्यता ? तपशील पहायला आवडेल.
सचिन पूर्वी यॉर्कशायरकडून
सचिन पूर्वी यॉर्कशायरकडून खेळला होता त्या संदर्भाने एक सुंदर लेख
http://www.guardian.co.uk/sport/blog/2011/jun/29/sachin-tendulkar-yorksh...
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/ind...
जेव्हा हा निर्णय दिला गेला तेव्हा अंपायरने नो-बॉलची खूणा केव्हाच केली होती. आणि आत्तापर्यंत अंपायर नो-बॉलच्या बाबतीत इतके गणलेले नाहीत (लाईनवर की पुढे एवढाच फरक येतो). जेव्हा replay आला तेव्हा बॉलरचा बूट चांगला दोन ईंच आत होता. हे काय चाललंय काय? की आता Replay पण न्युट्रल कडुन घ्यावा लागणार... DRS मधे हे नाटक नवीनच..
अहो ती त्या यंत्राची चूक
अहो ती त्या यंत्राची चूक नव्हे, म्हणतात की ज्या माणसाने त्या यंत्राला जो चेंडू दाखवला त्यावर धोनी बाद दिलाच नव्हता. दुसराच चेंडू होता! आता माणूसच तो, चूक होणारच!
माझ्या मते, पूर्वीसारखे मैदानावरील पंचाचा निर्णय शेवटचा मानून सर्वांनी त्याचे ऐकावे. आता ही नवीन fancy, shmancy, new fangled यंत्रे, फक्त पंचांचे निर्णय बरोबर होते की चूक हे बघायला शांतपणे, घाइ न करता, वापरावीत. मग त्या पंचाला किती दंड करायचा, की हाकलूनच द्यायचे हे ठरवावे. उगाच खेळाचा खोळंबा नि पुनः असल्या चुका! त्यापेक्षा जास्त लक्ष पंचांचे शिक्षण, ते पूर्वग्रहदूषित आहेत की नाही यावर जरा वेळ घालवावा.
बिचारा रैना, चांगला खेळत होता, त्याला खोटे बाद दिले नि वर त्यालाच दंड! नि माजोरी पंच नुसता उद्दामपणे कुजकट हसतो. त्याला तालिबान्यांकडे द्या, ज्या हाताने बाद दिले तो हातच कापून टाकतील!
झक्की आपली सुचना आवडली.
झक्की आपली सुचना आवडली.
झक्की, (निदान या क्षेत्रात
झक्की, (निदान या क्षेत्रात तरी) भारताला जबरी वट आली आहे. तो बघा डॅरिल हार्पर स्वतःहून बाजूला झाला भारताने हरकत घेतल्यावर.
खेळाडूला दंड देताना खरं तर
खेळाडूला दंड देताना खरं तर पंचाचा निर्णय बरोबर होता का चूक हे खरंतर पाहून मगच दंड द्यायचा की नाही ते ठरवलं पाहिजे. म्हणजे चूक पंचाची आणि भोगायची खेळाडूने..
आज काय विकेट पडणार नाही की काय?
कशा बशा ७ गेल्या.
कशा बशा ७ गेल्या.
खेळाडूला दंड देताना खरं तर
खेळाडूला दंड देताना खरं तर पंचाचा निर्णय बरोबर होता का चूक हे खरंतर पाहून मगच दंड द्यायचा की नाही ते ठरवलं पाहिजे. म्हणजे चूक पंचाची आणि भोगायची खेळाडूने..>> Chris Broad बद्दल घेतलेले आक्षेप बरेचदा खरे वाटतात, दोन्ही टेस्ट्मधे displeasure to umpire decision च्या नावाखाली जे दंड लावलेत ते चुकीचे (कमीत कमी over the top) वाटतात.
आठवी गेली पण पहिल्या डावाच्या
आठवी गेली पण पहिल्या डावाच्या भरीव आघाडीची शक्यता नाही. खेळपट्टी ' निकाल ' लावण्याची शक्यता मात्र दाट !! धोनीवर दुसरा डाव घोषित करण्याबाबत पेंच उभा राहण्याचीही शक्यता !
धोनीच्या बाबतीत झालेली चूक
धोनीच्या बाबतीत झालेली चूक सगळ्यांनीच मान्य केलीय, तेव्हा तो वाद नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे...
१. गोलंदाज चेंडू टाकतो.
२. पंचाला दिसतं की चेंडू क्रीझच्या पुढून टाकलाय आणि तो नो-बॉलची खूण करतो.
३. प्रकाशाची गती (Light speed) चेंडूच्या गतीपेक्षा जास्त असल्याने फलंदाजाला पंचाचा हात दिसतो.
४. एकादा चेंडू नो-बॉल आहे, म्हणजे त्यावर रन-आऊट शिवाय कोणत्याही प्रकारे आऊट होता येत नाही हे फलंदाजाला माहीत असतं.
५. फलंदाज चेंडू तटावतो आणि झेल जातो..
त्यानंतर जरी पंचाला वाटलं/कळलं की चेंडू नो-बॉल नव्हता, तरी तो नो-बॉलच धरायला हवा.
According to cricket rules the batsman is right to hit the no-ball any which way he wants. The way it was done in WI, NO ball can be no-ball unless and until the entire action has completed.
हार्परला काय झालं? निवृत्ती
हार्परला काय झालं? निवृत्ती जवळ आलीच आहे तर भारतीयांच्या नावाने शिमगा करून शहीद व्हायचा प्रयत्न की काय?
२५० झाल्या की त्यांना खेळायला
२५० झाल्या की त्यांना खेळायला द्यावे काय?
भारत फार हळू खेळत आहे. २.६७
भारत फार हळू खेळत आहे. २.६७ चा रनरेट. अजून ६०, ७० धावा नक्कीच वाढल्या असत्या. भारतीय जिंकण्यासाठी न खेळता ड्रॉ करण्यासाठी खेळत आहेत असे वाटते. आज १० ओव्हर्स राहिल्यात, विकेट्स आहेत तर चान्स घेऊन आज अजून ३५ + धावा करून उद्या १ तासानंतर त्यांना द्यावे, पण असे दिसते की उद्या लंच पर्यंत आपण खेळून ३३५ च्या आसपास त्यांना देऊ. तो पर्यंत उशीर झालेला असेल.
गो फॉर किल!
केदार तेच की. मला आधी २ विकेट
केदार तेच की. मला आधी २ विकेट गेल्यावर ढोण्या टी२०सारखे कचकावुन मारा अशा सुचना देईल. तर कसले काय. असो. जिंकण्याच्या दृष्टीने २५० पण खुप आहेत.
३०० पर्यंत न्यावे असे मला
३०० पर्यंत न्यावे असे मला वाटते. कारण एका दिवसात ३०० सहज होऊ शकतात, त्यामुळे ते गाजर हवे.
७ -२ मुळे मारता येत नाही हे कबूल, पण २.६७, २.६७?? खूपच कमी आहे. निदान साडे तीन तरी हवा होता. ह्याबद्दल धोणी आणि टिमला विचारायला हवे की असे हळू का खेळत आहेत. पिच आणि बॉलिंग अजिबात डॅडली नाही. रादर नवीन बॉल घ्यायला पण ते कचरत आहेत.
३०० पर्यंत नेले की लक्षाची
३०० पर्यंत नेले की लक्षाची सेंच्युरी होऊदे असे वाटेल, मग कोहलीची हाफ असे करत करत ड्रॉ करतील.
लक्षाची सेंच्युरी होऊदे असे
लक्षाची सेंच्युरी होऊदे असे वाटेल, मग कोहलीची हाफ
किती हळू खेळायचे? कसोटी सामना असला म्हणून काय झाले? नि आता महत्वाचे काय? वैयक्तिक पराक्रम का संघ जिंकणे? बस करा खेळणे, दिवस संपला. ते काय नेहेमी नेहेमी पटापटा बाद होणार नाहीयेत! त्यांनाहि हळू खेळता येत असेल.
Pages