Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
अरे त्या बारामतीकरांना
अरे त्या बारामतीकरांना कोणितरी आवरा: बीसीसीआय, आयसीसी झालं, आता एमसीए तरी लायक माणसांसाठी सोडा. दुसरे उमेदवार लातुरकर. "कमी तिथे आम्ही" अशी यांची कारकिर्द; हे काय दिवे लावणार? कर्नल यांनी फिल्डींग लावली आहे पण मॅच फिक्स करण्यात वरील दोन धुरंधर पटाईत आहेत. दगाफटका करुन मुंबई क्रिकेटचं वाटोळं केलं नाहि म्हणजे मिळवली.
अरे त्या बारामतीकरांना
अरे त्या बारामतीकरांना कोणितरी आवरा: >> राज कसे आवरणार? इटस फ्री वल्ड!
International Cricket Council chief वरून MCA म्हणजे डिमोशनच की!
>>> भारतीय जिंकण्यासाठी न
>>> भारतीय जिंकण्यासाठी न खेळता ड्रॉ करण्यासाठी खेळत आहेत असे वाटते.
मालिकेतला पहिला सामना जिंकला की उर्वरित सामने अनिर्णीत ठेवून मालिका १-० जिंकण्याची भारताची जुनी खोड आहे किंवा मालिकेतला एक सामना हरला की उरलेल्या सामन्यात जिंकण्यासाठी अजिबात प्रयत्न न करता ते सामने अनिर्णित ठेवून मालिका कमी फरकाने हरण्यात भारत धन्यता मानतो (उदा. जानेवारी १९९३ व जानेवारी २०११ मधले द. आफ्रिकेविरूध्द्चे मालिकेतले शेवटचे सामने).
१९८१ ची इंग्लंडविरूध्द्ची मालिका आठवते का? वानखेडेवरचा पहिला सामना जिंकल्यावर उर्वरित ५ सामने गावसकर, विश्वनाथ, यशपाल शर्मा इ. नी अत्यंत संथ खेळून अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले होते. गावसकरला ख्रिस टॅवरे, बॉयकॉट, कीथ फ्लेचर यांनी पण संथ फलंदाजी करून हातभार लावला होता. त्या मालिकेत एका दिवसात जेमतेम २०० धावा व्हायच्या. गावसकरने दुसर्या कसोटी सामन्यात तब्बल २ दिवस आणि तिसर्या दिवसाचा १ तास एवढा वेळ फलंदाजी करून १७२ धावा केल्या होत्या. विश्वनाथने जवळपास तसेच करून ५ व्या सामन्यात २ दिवस व तिसर्या दिवशी उपाहारापर्यंत फलंदाजी करून २२२ धावा केल्या होत्या.
धोनीला तोच गुण लागलेला दिसतोय!
>>> अरे त्या बारामतीकरांना
>>> अरे त्या बारामतीकरांना कोणितरी आवरा: बीसीसीआय, आयसीसी झालं, आता एमसीए तरी लायक माणसांसाठी सोडा.
आयसीसीने म्हणे नवीन नियम केलाय. बांगलादेश, श्रीलंका व पाकिस्तानला त्यांच्या क्रिकेट बोर्डावर राजकारणी नेमायला बंदी केलीय म्हणे. हा नियम भारताला का लागू नाही? हातात कधीही चेंडूफळी धरलेली नसताना पवार २००५ पासून बीसीसीआय वर नागोबासारखे वेटोळे घालून बसले आहेत. राजीव शुक्ला, अरूण जेटली, नरेन्द्र मोदी, निरंजन शहा, ललित मोदी, शशांक मनोहर, लालूप्रसाद यादव, विलास देशमुख इ. मंडळी आयुष्यात एकदा तरी क्रिकेट खेळले आहेत का?
आयसीसीचा नियम बोर्डावर
आयसीसीचा नियम बोर्डावर राजकारणी (न)नेमण्याबाबत आहे की बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप्/कंट्रोल नसावा असा आहे.
पाकिस्तानी आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तिथल्या सरकारांच्या अधीन आहेत.
इंटरनॅशनल ऑलिंपिक कौन्सिलचाही असा नियम आहे ना?
आयसीसीचा नियम बोर्डावर
आयसीसीचा नियम बोर्डावर राजकारणी (न)नेमण्याबाबत आहे की बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप्/कंट्रोल नसावा असा आहे.
बरोबर प्वॉइंट!!
पाकिस्तानी आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तिथल्या सरकारांच्या अधीन आहेत.
भारत सरकारच्या अधीन काहीच नाही. पवार, सोनिया या फक्त ठळक व्यक्ति आहेत. सोनिया, पवार सरकारचे काम कुठे करतात?
सरकारात नाममात्र. लोक केंव्हाहि त्यांना निवडणुकात हरवून सरकारातून काढू टाकू शकतात!
खुद्द इंदिरा गांधींचे सरकार या भारतीय जनतेने पाडले होते!
क्रिकेट ला आजकाल पैसे कोण जास्त देतात? भारतीयच. मग? त्यांच्यावर नियम लादण्याचे धार्ष्ट्य कसे करता? उद्या सगळ्या जगातले क्रिकेट एकट्या पवारांच्या हाती घेण्याइतके पैसे नि 'अनुयायी' त्यांच्या जवळ आहेत!!
इंटरनॅशनल ऑलिंपिक कौन्सिलचाही असा नियम आहे ना?
हो ना. चीन, रशिया कुठे त्यात ढवळाढवळ करतात? तसेच भारत सरकारपण क्रिकेटमधे ढवळाढवळ करत नाहीत. भारतात क्रिकेटवर पैसे लावायला बंदी आहे म्हणून स्विस बँकेतला पैसे घेऊन, इंग्लंड मधे लावतात!! मॅच फिक्सिंग ते करत नाहीत, आता त्यांचे अनुयायी काय करतात त्यावर ते कसे लक्ष ठेवणार? त्यांना इतर कामे नाहीत का? (अरे, त्या रामदेव बाबाला जरा गप्प करा रे! असे करा, रात्री एक वाजता एकदम आर्मीच पाठवा, दिल्ली पोलीस काही कामाचे नाहीत.)!!
:फिदी:,
८३ ओव्हर्स मध्ये २८१ करायचे
८३ ओव्हर्स मध्ये २८१ करायचे आहेत त्यांना.
माझ्यामते अजून २०-२५ एक धावा हव्या होत्या ज्या कालच झाल्या असत्या.. एकूण ३१० वगैरे. आज तर पब्लीक पटापट आऊट झाले. नंतर सारखे स्विंग आणि मिस पाहून कंटाळा येत होता.
. पहिल्या लवकर तीन पडल्या तर ते टेन्शन मध्ये येतील. आता बघू काय होते ते
>>International Cricket
>>International Cricket Council chief वरून MCA म्हणजे डिमोशनच की! <<
फक्त कागदोपत्री. पैसा इथेहि भरपुर आहे. उगाच नाहि हे मुंगळे गुळाला चिकटायला येतात.
'डीक्लेरेशन' तरी 'स्पोर्टींग'
'डीक्लेरेशन' तरी 'स्पोर्टींग' आहे. वे. इंडीजचा प्रतिसाद काय येतो पाहूं.
ती कॅच घेता आली असती तर लंचला
ती कॅच घेता आली असती तर लंचला आपण वरचढ असलो असतो. मिथूनने फार ऑफला टाकावे, तिसरी स्लिप काढून लेग गली ठेवावी, जेणे करून त्याने एक दोन बॉल लेग बाऊन्सला टाकले की अगदीच प्रिडिक्टेबल होणार नाही. त्यास विकेट मिळाली नाही तरी चालेल पण धावा देऊ नयेत. लंच नंतर पहिल्या ५-६ ओव्हर्स नंतर परत ओव्हर्स साठी इशानला आणने क्रमप्राप्त आहे. आज तोच जिंकून देण्यास मदत करू शकतो. कारण विकेट मध्ये बाउन्स आहे, आज खरी इशानच्या स्टॅमीनाची खरी टेस्ट!
विंडीज ने पंचाच्या साथीने
विंडीज ने पंचाच्या साथीने
शेवटी सामन्यात रंगत आणली खरी पण आपले लुटूपुटूचे गोलंदाज कमी पडले. मिथून ची गोलंदाजी पाहून हा चुकून संघात आला याची खात्री पटली. बाकी धोणी ने लावेलेले बचावात्मक क्षेत्ररक्षण पहाता सामना आपण जिंकला तरच आश्चर्य होते!
असो. ईशांत चे भले झाले तर आपलेही होईलच. अण्णांच्या जोडीला आता अप्पालाही सूर गवसला असल्याने मधली फळी मजबूत वाटते, खेरीज त्यात रैना ही सुजाणपणे खेळतोय. कोहली ला शेवटच्या सामन्यात सूर गवसेल अशी आशा. कुमार ची गोलंदाजी करून झालेली दमछाक पहावत नाही- त्याला "बूस्ट" दिले जावे. भज्जी आता "प्रेडिक्टेबल आणि रीडेबल" झाला आहे तेव्हा तिसर्या सामन्यात फार आशा नाहीत.
बाकी मुकुंद, विजय आणि त्या यादीत आता धोणी यांची फलंदाजी ही सध्ध्या विंडीज मधील पावसागत आहे- बेभरवशाची- धोणी त्या बाबतीत सातत्य राखून आहे :).
ईंग्लंड विरुध्ध मालिकेत आता साहेब, सेहवाग, गंभीर, युवी, झहीर पुनः अवतरल्याने सद्य संघातील कुणा कुणाला डच्चू मिळेल- धोणी सोडून?
दिनेश चांदीमल काय खेळला आज.
दिनेश चांदीमल काय खेळला आज. सुपर्ब! त्याने व महेलाने इंग्लंडला पळता भुई थोडी केले. अॅंजलो मॅथ्युने दिनेशच्या शतकासाठी अजिबात धावा केल्या नाहीत, ते पाहून इरिटेशन झाले पण शेवटी दिनेशचे शतक झाले, त्याचा जास्त आनंद मॅथ्युला झाला. मस्त झाली मॅच.
मागे मी इथे मर्यादित षटकांचा
मागे मी इथे मर्यादित षटकांचा (प्रत्येक डावात १०० च्या आसपास) कसोटी सामना अशी कल्पना मांडली होती. म्हणजे सामना अनिर्णित रहाणार नाही.
पण हरून लोर्गॅट, आय सी सि चे चीफ एक्झेक्युटिव्ह माझ्याहून हुषार. त्यांनी आज प्रस्ताव मांडला आहे की वेळेचे बंधन नकोच! चालेल तितके दिवस चालू दे सामना. संपेस्तवर खेळायचा.
या प्रस्तावाला द्रवीड व भारतीय संघाचा, पाकीस्तानचा जबरदस्त पाठिंबा मिळेल. मग भारत वि. पाकीस्तान सामना पंधरा वीस दिवस चालेल. रन रेट ५ षटकांना एक धाव. आणि तरी भारतातले लोक रजा काढून (सरकारी कर्मचार्यांना रजा काढावी लागत नाही म्हणे!) आणि हजारो रुपयाची तिकीटे काढून स्टेडियम भरभरून गर्दी करतील.
हो, ते अतिरेकी, नि भ्रष्टाचार नि असल्या धंद्यात लक्ष घालण्यापेक्षा हे बरे.

पण झक्की त्याचा असा प्रॉब्लेम
पण झक्की त्याचा असा प्रॉब्लेम आहे की अतिरेक्यांना चांगली १५-२० दिवसांची विंडो मिळेल बाँबस्फोट करायला.
पण झक्की त्याचा असा प्रॉब्लेम
पण झक्की त्याचा असा प्रॉब्लेम आहे की अतिरेक्यांना चांगली १५-२० दिवसांची विंडो मिळेल बाँबस्फोट करायला.
हॅSSS! ते काय कुणाला घाबरतात काय? त्यांना जे करायचे तेंव्हा, करायचे तिथे, ते करतात!! आणि सगळे लोक क्रिकेट पहायला गेले तर बाहेर कुणाला मारणार?
शेवटी वेंगसरकर ला हरवून कुणि
शेवटी वेंगसरकर ला हरवून कुणि राजकारणी निवडून आला म्हणे एम सी ए चा अध्यक्ष का काय ते. त्यांच्या मते, अश्या जागी निवडून यायला क्रिकेटपेक्षा अॅडमिनिस्ट्रेशन, पैसे मॅनेज करणे इ. गुणांची जास्त आवश्यकता असते. नि हा बाबा म्हणे पूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रि होता. म्हणजे त्याच्या अंगी नक्कीच हे गुण जास्त असणार. महाराष्ट्र सरकार चालवणे म्हणजे काही गंमत नाही!
तुम्हाला पटले नाही तर तो तुमच्या घरी काही माणसे पाठवून पटवून देईल. आणि योगायोगाने त्याच वेळी तुमचा हात, पाय मोडला, दोन चार हाडे मोडली, तर तुमच्या पक्के लक्षात राहील.
जरूर
जरूर वाचा:
http://www.espncricinfo.com/india/content/story/530571.html
हा माकेन काय शरद पवार नि ते कोण एम सी ए चे मुख्य त्यांच्या विरुद्ध पार्टीचे असावेत!!
फेरोजशहा कोटला चे मैदान नि करमाफी दिल्याने आता सरकारचा हक्क नि कायदे लागू होतात म्हणे.
मला वाटले होते की देशाची जमीन ही जनतेच्या मालकीची असते, सरकार फक्त त्याची काळजी घेण्याला जबाबदार आहे. नाही का, भारतीय रेल्वे जनताकी संपत्ति आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते!
आणि तसे काही नसेल, तर ते मैदान देण्यापूर्वी काही लेखी करार मदार केले होते, की नाही? का नाही?
का तेंव्हा झोपा काढल्या नि आता जागे झाले? आळशी, कामचुकार, मूर्ख, पण पक्के हलकट नि हरामखोर लोक!!
आणि काहो, करमाफी ही देशातील गरीब लोकांना क्रिकेटचा आनंद उपभोगिता यावा म्हणून दिली होती ना?! त्या बद्दल बीसीसी आय ने तेव्हढीच रक्कम तिकीटाच्या किमतीत कमी केली असेल ना? पुनः, तसे काही लेखी करार मदार केले होते की नाही? तेंव्हा काय झोपला होतात काय?
आळशी, कामचुकार, मूर्ख, पण पक्के हलकट नि हरामखोर लोक!! सरकारात काय नि बीसी सी आय मधे काय? यांच्या पायी १०० कोटी सामान्य जनता भरडून निघते!!
चेंडूफळीच्या इतिहासातील काही
चेंडूफळीच्या इतिहासातील काही अविस्मरणीय क्षण -
http://cricket.yahoo.com/photos/cricket-s-most-iconic-moments_1315571711...
तेंडुलकरचा नवा 'वनडे का फंडा'
तेंडुलकरचा नवा 'वनडे का फंडा'
नवाब टायगर खरोखरच ग्रेट होता.
नवाब टायगर खरोखरच ग्रेट होता. त्याने पहिल्यांदी आपल्याला जिंकायची उमेद दिली. खरोखरच रॉयल.
एकदा आपली टीम त्याने शिकारीला जंगलात नेली. तिथे दरोडेखोरांनी टीम मेंबर्सना घेराव घातला. झाडाला बांधून ठेवले. गुंडाप्पा विश्वनाथ रडायला लागला. मी खूप मोठा बॅटस्मन आहे वगैरे समजवायला लागला. सगळ्यांची तंतरली. थोड्या वेळाने जेंव्हा कळाले की ती पतौडीचीच माणसे होती तेंव्हा सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. ही मजा कुठे तरी वाचल्याचे आठवतेय. बहुतेक सनी डेज.
नवाब ऑफ पतौडी आमचा हिरो!!
नवाब ऑफ पतौडी आमचा हिरो!! त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे.
तो कॅप्टन होइस्तवर भारतीय क्षेत्ररक्षक, पँटीची इस्त्री मोडू नये, कपड्यांना धूळ लागू नये म्हणून काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करायचे. खाली वाकून चेंडू अडवता येतो हे त्या काळच्या भारतीय क्षेत्ररक्षकांना माहित नव्हते. ज्या दिशेने चेंडू जात असेल त्याच दिशेने पळत जाउन चेंडू अडवता येतो हेहि त्यानेच दाखवून दिले. तोपर्यंत पायाशी आलेले चेंडू पायाने अडवणे एव्हढेच क्षेत्ररक्षकांना माहित होते.
पतौडीने संघाचे कपडे धुण्याचे काँट्रॅक्ट स्वतःच्या पैशाने स्वतःच्या एका नोकराला दिले. तसेच दररोज दहा वेळा खाली वाकून स्वतःचे गुढगे धरायचे (तळपायापर्यंत कसे वाकणार? क्कैच्च्या क्कैच्च!) असा नियम केला. बिचारा मांजरेकर, (विजय मांजरेकर, आत्ताच्या मांजरेकरचे वडील) त्याला तेहि जमेना, म्हणून निवृत्त व्हावे लागले.
क्रिकेटचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाला त्याने हिंदी सिनेमात पाठवले - हिंदी सिनेमाचे नुकसान झाले तरी कळणार कुणाला?
क्रिक इन्फो वर वाचा, त्याच्याबद्दल कुणि काय म्हंटले आहे. विशेषतः खुद्द सचिनने त्याच्या बद्दल चांगले म्हंटले आहे म्हणजे तो ग्रेटच होता हे तुमच्या लक्षात येईल. शिवाय मुख्य म्हणजे गोर्या लोकांनी पण त्याची स्तुति केली, म्हणजे तो ग्रेटच असणार हे सर्व भारतीयांना लगेच पटेल.
नुकतीच आपली इंग्लंडने केलेली
नुकतीच आपली इंग्लंडने केलेली धुलाई पतौडीला सहन झाली नाही आणि त्यानं देह ठेवला.
जोक ऑफ द इअर !!!.......सचिन
जोक ऑफ द इअर !!!.......सचिन तेंडूलकर मला घाबरायचा..... इति शोएब अख्तर!!!
आजकालची ही फॅशन असावी.
आजकालची ही फॅशन असावी. निवृत्त होताना एक पुस्तक लिहयचे आणि त्यात सचिन आणि इतर मान्यवरांवर चिखलफेक करायची म्हणजे आपोआप पुस्तकाचा खप वाढणार.
कोण कोणाला किती घाबरायचा हे सगळ्यांनी मैदानावर पाहिले आहे
शोएबच्या नशिबाने
शोएबच्या नशिबाने त्याच्याविरूद्ध एवढ्यात सचिन व द्रविड खेळणार नाहीत. २००६ च्या पाक सिरीज चा उल्लेख केलाय त्याने, जेव्हा सचिन टेनिस एल्बो मुळे त्रस्त होता. त्याआधी फक्त १९९९ च्या सिरीज मधे त्याने त्या दोन विकेट्स काढल्या लागोपाठच्या बॉल्स वर, त्या एका भांडवलावर हे उद्गार आहेत त्याचे.
लेका, तुझ्यासह अर्धा पाक संघ संघाबाहेर ज्या पराभवाने गेला तो २००३ चा विश्वचषकातील पराभव आठव - त्याची सुरूवात कोणी आणि शेवट कोणी केला ते आठव
टेस्ट्मधले हवे असेल तर, २००४ साली तुम्ही लोक भारताकडून पहिल्यांदा घरी मॅच हरलात तेव्हा मुलतान ला भारताच्या ६७५ मधे वीरू च्या ३०९ बरोबर तुज्याचविरूद्ध १९४* कोणी केले ते आठव, आणि पहिल्यांदा घरी सिरीज हरलात तेव्हा (तू जिथली एक्सप्रेस समजला जातोस त्या) रावळपिंडीला तुमच्या टीम ला कोणत्याच डावात जेवढे सगळे मिळून करता आले नाहीत तेवढे २७० कोणी मारले ते आठव.
रिटायर झालास तरी तुझे "फेकणे" चालूच आहे असे दिसते
रीटायर झाला तरी पोट चालु
रीटायर झाला तरी पोट चालु रहाण्यासाठी चांगली आयडिया केलीये अख्तरर्मियांनी.
रिटायर झालास तरी तुझे "फेकणे"
रिटायर झालास तरी तुझे "फेकणे" चालूच आहे >>
बरोब्बर !!!
>>> !!!.......सचिन तेंडूलकर
>>> !!!.......सचिन तेंडूलकर मला घाबरायचा..... इति शोएब अख्तर!!!
बरोबर आहे. अॅन्डी रॉबर्टस, होल्डिंग, माल्कम मार्शल, डोनाल्ड, गार्नर वगैरे तथाकथित जलदगती गोलंदाज सुध्दा रवी शास्त्रीला घाबरायचे.
!!!.......सचिन तेंडूलकर मला
!!!.......सचिन तेंडूलकर मला घाबरायचा..... इति शोएब अख्तर!>>असे बोलणार्याला सर्वच जण घाबरणार
अख्तरची फेकाफेकी (द्रविड व
अख्तरची फेकाफेकी (द्रविड व सचिनबद्दल) -
Akhtar says in the book "Controversially Yours" that they do not know "the art of finishing the game".
The temperamental Pakistan speedster has accused Tendulkar of being scared to face his scorching pace on a slow Faisalabad track.
"....Vivian Richards, Ricky Ponting, Brian Lara and the likes of them are great batsmen who dominated with the bat and were truly match-winners. Initially, when I bowled against Sachin, I found these qualities missing. He might have had more runs and records, he lacked the ability to finish the game," he said in the book.
Akhtar, who retired from international cricket during the World Cup this year, referred to India's tour of Pakistan in 2006 and said that his team could have faced a humbling defeat but for the fact that they managed to rein in Tendulkar.
"What went in our favour was that Sachin was suffering from tennis elbow! This severely handicapped the great batsman. We managed to psychologically browbeat him.
"We bounced the ball at him and were able to unnerve him. I returned to the dressing room that first day with the knowledge that Sachin was not comfortable facing fast and rising ball. He was distinctly uncomfortable against me. That was enough to build on," he said.
२००३ च्या विश्वचषकात सचिनकडून हाग्या मार मिळालेल्या अख्तरच्या जखमा ८ वर्षानंतर सुध्दा हुळहुळत आहेत याचा हे पुस्तक म्हणजे ढळढळीत पुरावा आहे.
Pages