क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीओ वर हे कव्हरेज आहे आणि अमेरिकेत काँमकास्टवर सुद्धा नीओ मिळते आता. लोकांनी आप आपल्या केबल्/सॅटे. प्रोव्हाईडर कडे चौकशी करावी Happy

मात्र लाईव्ह नसताना तेच तेच हायलाईट्स दाखवून जाम बोअर मारतात ते Happy

>>> फक्त भारत ऐवजी बीसीसीआय असे लिहा. कारण खुद्द बीसीसी आय ने सांगितले आहे की ते भारताचे प्रतिनिधित्व करत नाहीत,

झक्की,

ते बीसीसीआयमधले बुभुक्षित लांडगे काहीही बरळू देत, आमच्या दृष्टीने हा भारताचाच संघ आहे.

बाकी तुमचे उर्वरीत प्रतिसाद नेहमीप्रमाणेच जबरदस्त! Happy

न्यू जर्सीत सॅटेलाईट टी व्ही दिसत असेल
ते काय विचारता? अहो या आमच्या बाग राज्यात काय काय दिसते म्हणून सांगू! येऊनच बघा एकदा. त्यापुढे क्रिकेट बघायला वेळच नसतो.

वे. इंडीज [दुसरा डाव] - १०९-७ [ ४३ षटकं] !!
कसोटी सामन्यांचं ५० षटकांच्या सामन्यांत रुपांतर होण्याचं प्रात्यक्षिक कोटलावर सादर होत असावं !! Wink

वे. ईडीज - १६२-९.
आघाडी २६० च्या वर ! या खत्रूड खेळपट्टीवर २ - २ १/२ दिवस खेळून सामना अनिर्णित ठेवणं जवळ जवळ अशक्य. भारताच्या अत्यंत अनुभवी त्रयीपैकी दोघानी तरी मोठी खेळी करून सामना जिंकून देणं ही अत्यंत रास्त अपेक्षा. हीच ' अनुभवा'ची खरी कसोटी ठरावी या कसोटी सामन्याच्या निमित्ताने !!!

आँ, बाजो, मुंबईत टाटा स्कायवर दिसतंय की निओ स्पोर्ट्स आणि निओ क्रिकेट ४०९. क्रमांकावर. आम्हाला टेन क्रिकेट नाही दिसत.त्याचे वेगळे पैसे पडतील म्हणे.
तुम्ही पॅकेज नीट घेतले नाही का?

भाऊ, सामन्याबद्दल स्पेश्यल धाग्यावर लिवा की.

टाटा स्कायचा प्लॅन बदलून घ्या बाजो.. नवीन प्लॅन आलाय त्याच्यात स्पोर्ट्सचे चॅनेल आहेत.. एकदम स्वस्त प्लॅन आहे.. ह्या सगळ्या मॅचेस निओ स्पोर्ट्सवर दाखवणार आहेत..

Pages