क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या प्रवीण कुमारला म्हणे हाकलून दिले, काहीतरी एकदम धोकादायक गोलंदाजी केली म्हणे! काय झाले?
(लोक वामकुक्षी करत असताना, मॅच बंद ठेवायला काय होते यांना? तेंव्हाच सगळे खळबळजनक उरकून घ्यायचे नि मग आम्ही आपले मागून विचारत बसतो, काय झाले, काय झाले!)

प्रविणकुमार मला आवडतो. बॉल नवीन असताना दोन्ही बाजुने स्विंग मिळतो, ते पाहायलाही मजा येते.>>पेस नसला तरी गडी डोके वापरतो. कदाचित पेस नसल्यामूळेच असेल Happy

ण काल मात्र आपले सर्वात अनुभवी ,खंदे फलंदाज [ द्रविड, लक्ष्मण व धोनी ] फार अनुभवी नसलेल्या बिशू नामक लेग-स्पीनरला बळी पडलेत !!>> सेहवाग असता तर .... Happy

त्या प्रवीण कुमारला म्हणे हाकलून दिले, काहीतरी एकदम धोकादायक गोलंदाजी केली म्हणे! काय झाले?>>तुम्ही tabloids साठी काम करायचा का ? प्रत्येक ठिकाणी काहितरी खळबळजनक घालायचेच Lol

पिचवर follow through आल्याबद्दल त्याला तिनदा warning दिली आणी मग त्या inning मधे बॉलिंग करता येणार नाहि असे सांगीतले.

तुम्ही tabloids साठी काम करायचा का ?
नाही. पण तुम्हाला वाटत असेल की मला ते जमेल, तर कुठेतरी चिकटवून द्या ना! मी पूर्वी (अनेक वर्षांपूर्वी) ऑफिसमधे जसा मन लावून उत्कृष्ठ काम करत असे तसे (आठवले तर,) पुनः करीन.

मग आता काय, जरा जस्त मागून स्टार्ट घेऊन गोलंदाजी करायची का, अँगलने? म्हणजे केव्हढा तरी फरक, तसे करून आत्तासारखी प्रभावी गोलंदाजी करता येईल का?

ते जाउ दे. आता जागा झालोय्. आता बघू दुसर्‍या डावात तरी द्र्वीड, लक्ष्मण नि धोनी खेळतात का. विजय तर गेलाच.

म्हणजे केव्हढा तरी फरक, तसे करून आत्तासारखी प्रभावी गोलंदाजी करता येईल का? >>त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली कि कळेल, तोवर बघत रहा. वामकुक्षी टाळा Lol

वामकुक्षी टाळा
कशाला? तुम्ही बघून, मागून सांगा मला. मी हायलाईट्स बघतोच. तेव्हढे पुरे.
वेळ भरपूर आहे. उद्या संध्याकाळपर्यंत खेळून द्रवीडला शतक पुरे करता येईल. तोपर्यंत रैना, लक्ष्मण, धोनी, कोहली मिळून आणखी एक दोन शतके काढून घेतील. म्हणजे मग शेवटचे दोन दिवस आरामात खेळून, त्यांना तीनशे साडेतीनशे करू दिले तरी जिंकू.

बाकी एरवी उसळणारा चेंडू एकदम न उसळता जमीनीपाशी राहिला नि विजय बाद झाला! असा चेंडू मुद्दाम टाकता येत नसावा. विजयचे दुर्भाग्य!

विकेट गरा गरा फिरत असताना सुद्धा पहिल्या ५ विकेटस इशांत आणि प्रविण ने घेतल्या.
विकेट खर म्हणजे अनफिट टू प्ले अशी होती. शेण ने किंवा कुंबळे ने १०० मधे विंडिजला खोलले असते. भजी ने भुक्कड बॉलिंग टाकली सुरुवातीला. बॉल येवढा वळत असताना काय करायचे हेच त्याला समजत नव्हते. असो.
मॅच जिंकल्यातच जमा आहे Happy

<< तोपर्यंत रैना, लक्ष्मण, धोनी, कोहली मिळून आणखी एक दोन शतके काढून घेतील. >> झक्कीजी, लक्ष्मणसाहेब आधीच शून्यावर बाद झालेत !
<< मॅच जिंकल्यातच जमा आहे >> हम कुछ नही कहते !! Wink

मस्त खेळ झाला कालचा. स्पिन आणि स्विंग दोन्ही जबरी होत होते. भज्जीने शेवटी त्यांचा मुख्य मोहरा काढला हे ही महत्त्वाचे.

टफ पिच वर पुन्हा द्रविड पाय रोवून उभा आहे. त्याची विकेट काढायची म्हणजे बोलर नेच काहीतरी खास करावे लागते हे पुन्हा दिसू लागले आहे.

>>> मॅच जिंकल्यातच जमा आहे

सहमत. जास्तीत जास्त उद्या उपाहारापर्यंत सामना संपेल.

>>> विजयचे दुर्भाग्य!

विजय हा फक्त आयपीएलमध्ये धावा करतो. T-20, एकदिवसीय सामने व कसोटी सामने यात तो फारसा चमकलेला नाही.

लक्ष्मणसाहेब आधीच शून्यावर बाद झालेत !

भाऊ, अजून रैना, धोनी, कोहली आहेत, शिवाय हरभजन सिंग पण आहे.
तेंव्हा नेहेमी पॉझिटिव्ह विचार करावेत, चांगल्या गोष्टींची इच्छा करावी.

खेळाच्या दुसर्‍यादिवशी, दुसरी इनिंग सुरू झाली. असं केलं तर तीन दिवसात टेस्ट मॅच संपेल. मग वेस्टईंडिज मधे तीन दिवसांची टेस्ट मॅच आणि इंग्लंड्मधे १० दिवसांची टेस्ट मॅच असं ठेवावं का? Proud

विराट कोहली पण चांगला टिकून आहे..

राहुल द्रविडः १२५ चेंडूत ४५ धावा. हा प्राणी काय कंपोजच्या गोळ्या खाऊन झोपतो काय?
चला, कमीतकमी अंपायरची वामकुक्षीतरी नीट होत असावी हा फलंदाजीला आल्यावर Proud

<< तेंव्हा नेहेमी पॉझिटिव्ह विचार करावेत, चांगल्या गोष्टींची इच्छा करावी . >> झक्कीसाहेब, लक्ष्मणबाबत फक्त 'फॅक्चुअल करेक्शन' केलं, पॉझिटीव्ह/निगेटीव्हचा तिथं प्रश्न येत नसावा ! Wink

राहुल द्रविडः १२५ चेंडूत ४५ धावा. हा प्राणी काय कंपोजच्या गोळ्या खाऊन झोपतो काय?

तसे नाही हो. कसोटी सामन्यात तसेच खेळतात. १९९७ मधे इंग्लंडमधे गांगुलीचे हे उदाहरण पहा. Ganguly, born and brought up in Calcutta, where the ball can move around on very similar slow pitches, was quite at ease. He batted for more than seven hours and hit 20 fours in his 131.
१३१ मधे २० चौकार, तरी एव्हढा वेळ.

भाउ, लिहीले तेंव्हा खेळायला सुद्धा आला नव्हता . असो. पॉझिटीव्ह/निगेटीव्हचा तिथं प्रश्न येत नसावा पण असावा असे माझे मत आहे, कारण निगेटिव्ह विचार कटाक्षाने टाळावेत, कधी ते अंकूर धरून फोफाट्याने वाढतील ते सांगता येत नाही.

लवकरच खेळ सुरु होईल, तेंव्हा ही चर्चा संपवू.

<< भाउ, लिहीले तेंव्हा खेळायला सुद्धा आला नव्हता >> झक्कीसाहेब, तसं असेल तर मी दिलगीर आहे.

द्रविड आहे म्हणून निदान इतके तरी झाले. अन्यथा २० २० प्रमाणे बाकींनी २ तासात पळ काढला. अवघड आहे. निदान ३०० ची लिड हवी होती प्रविणकुमार पण गेला..

तरी आपले चान्सेस जास्त आहेत.

खेळपट्टी फलंदाजीला अवघड आहे हे निश्चित; चौथ्या डावात ३०० करणं कठीणच. आतां खरी कसोटी चंदरपॉल, सारवान व ब्राव्हो या अनुभवी फलंदा़जाची व आपल्या गोलंदाजांची - विशेषतः, भज्जी व मिश्राची.
[बिशूचा गुडघा दुखावला होता म्हणून त्याला बहुधा उशीरा बॉल दिला गेला ].
त्याच्या अगणित अप्रतिम खेळींपैकी द्रविडची आणखी एक अविस्मरणीय खेळी !

या धाग्यातील १६ नोव्हेंबर २००९ ला स्वरूप यांचा पहिला प्रतिसाद :

द्रविड है ही बेस्ट!
अनसंग हिरो ऑफ इंडियन क्रिकेट
Happy

द्रविडचे अभिनंदन. त्याच्यामुळेच जिंकू अन्यथा वाट लागली होतीच. गेला द्रविड पण त्याने काम केले.

दोन गेले, आठच राहिले. आता सिमन्स ला उडवा. मग बाकीच्यांचा समाचार उद्या घेऊ. त्या प्रवीणकुमारला सांभाळा, इशांतकुमारचे काही अजून बस्तान बसलेले नाही असे दिसते.

मला वाटतं चंद्रपॉलवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. द्रविडसारखाच तो दीर्घानुभवी, चिवट व 'लंबी बारी' खेळण्यात माहीर आहे. अर्थात तो फॉर्ममधे नाही व विकेट खरंच खतरनाक दिसत्येय, विशेषतः भज्जी व मिश्रा यांची गोलंदाजी खेळण्यासाठी. आपलं सुधारलेलं क्षेत्ररक्षणही आज उपयुक्त व निर्णायक ठरूं शकतं.
पहिला एक तास तरी मॅच बघणं 'कंपलसरी' !! पुढचं तेंव्हा ठरेलच .

हो चंदरपॉल आणि ब्राव्हो उडाले की मॅच आपली, तो पर्यंत काही खरं नाही.
किंवा उद्या इशांतला पहिल्या अर्ध्या-एक तासात लय मिळू दे, मग त्यांचे काही खरं नाही. त्याने टाईट लाईन ठेवून असिस्ट केले तरी मग भज्जी अन मिश्राला बळी मिळतील.

जिंकला की सामना. आज फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आपण १०० पेक्षा जास्त फरकाने जिंकणार.

Pages