क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माने आपला अ‍ॅटिट्युड(नो पार्टीज) आणि फिटनेस (वजन वाढले होते) सुधारायचा यशस्वी प्रयत्न केलाय. त्याला स्वतःलाच आपलं कुठे चुकलं ते कळलं.
(आमचा गाववाला-बोरिवलीकर आहे तो Happy )

गंभीर, युवी, रैना, विराट यानी हेच शिकायला हवं. 'अरे का का रे' म्हणा पण त्यासाठी विकेट गमावू नका.>> जमेल जमेल.

आमचा गाववाला-बोरिवलीकर >> मयेकर पुण्यातले पुणेकर वाचले नाही का? Happy की ते तुमच्या गावाचे वैशिष्ट्य Happy

इंग्लंड दौर्‍यासाठी संघ निवडताना निवडसमितीला कांही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. सगळ्या नवीन फलंदाजांपैकीं ' स्विंग ' गोलंदाजी खेळण्यास कुणाचं तंत्र व 'टेंपरॅमेंट' सरस आहे हा निकष लावूनच निवड करावी लागेल. [ अशोक मंकडसारखा तंत्रशुद्ध, अभ्यासू व उदयोन्मुख ' ओपनर'सुद्धा इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर साफ अयशस्वी झाला व बदनाम होऊन अकालीच क्रिकेटमधून बाद झाला, हे लक्षात घ्यायला हवं]. सचिन व सेहवाग संघात आल्यावर द्रविड व लक्ष्मण या दोघानाही संघात घ्यायचं कीं त्यातल्या एकालाच घ्यायचं [ किंवा एकेकालाच आळीपाळीने कसोटी सामन्यात खेळवायचं ], यावरही आतां निदान विचार करण्याची तरी वेळ आली आहे, असं मला वाटतं. कदाचित, वे. इंडीज दौर्‍यावरील या दोघांची कामगिरी, फॉर्म व फिटनेस पाहून यावर निर्णय घेणे सोपेही होईल.
[Incidentally, I beg to differ with Harsha Bhogale if what he says here is supposed to have a bearing on selection of the team for England tour. If one has the potential to be a great player, the only thing that matters is how seriously and with dedication one develops that potential; Having live models before them is only incidental. All the greats mentioned here made their debu at a very early age [ Gavaskar, Vishvanath, Dravid at the age of 21yrs to 23 years, Laxman at 20 and sachin at 16. ] and did not wait for any live models for achieving greatness. In short, no selection is justifiable on the ground of providing live models to new players who aspire to be greats of the game. ]

इंग्लंडच्या दौर्‍यावर झहीरपेक्षा प्रवीण व मुनाफ जास्त यशस्वी ठरतील. सचिन, सेहवाग, गंभीर, युवराज व झहीर आत आल्यावर मुकुंद, मुरली विजय, इशांत शर्मा, रोहीत शर्मा, अमित मिश्रा इ. ना संघात जागा मिळणार नाही.

इंग्लंडच्या दौर्‍यावर झहीरपेक्षा प्रवीण व मुनाफ जास्त यशस्वी ठरतील>>प्रवीण समजू शकतो, झहीर नाहि ठरणार नि मुनफ ठरेल ??????

त्यातल्या एकालाच घ्यायचं किंवा एकेकालाच आळीपाळीने कसोटी सामन्यात खेळवायचं >> मलाही असेच वाटते. धोनीने ह्यात पुढाकार घ्यायला हवा.

सगळ्या नवीन फलंदाजांपैकीं ' स्विंग ' गोलंदाजी खेळण्यास कुणाचं तंत्र व 'टेंपरॅमेंट' सरस आहे हा निकष लावूनच निवड करावी लागेल.>>लेट समरमधे England मधे swing पेक्षा bounce ची चिंता जास्त करावी लागेल का ? anderson सोड्ला तर बाकीचे Poms (ट्रेमलेट, ब्रॉड) hit the deck style चे आहेत ना सध्या ?

मलाही वाटतं झहीर तर हवाच. नवीन चेंडू व कांहीसा जुना झालेला चेंडू दोन्ही भेदकपणे वापरण्यात तो आता माहीर आहे .

<इंग्लंडच्या दौर्‍यावर झहीरपेक्षा प्रवीण व मुनाफ जास्त यशस्वी ठरतील>
कसे काय?

इंग्लंडच्या हवामानात प्रवीण व मुनाफ जास्त चांगला स्विंग करतील (दोन्ही बाजूने). पूर्वी मदनलाल, बिन्नी, संधू, प्रभाकर यांनाही इंग्लिश हवामानाचा फायदा मिळालेला आहे.

हो? सध्या बहुसंख्य जाणकारांच्या (क्रीडा पत्रकार, माजी खेळाडू) मते झहीर हा जगातला (नुसता भारतातला नव्हे) सर्वोत्कृष्ठ स्विंग बॉलर आहे. यात जेम्स अँडरसनसारखा इंग्लिश क्रिकेटरही आला.
शिवाय झहीर नुस्ताच प्रमुख गोलंदाज नाही, तो भारतीय संघाचा अनऑफिशियल बोलिंग कोचही आहे.

<< शिवाय झहीर नुस्ताच प्रमुख गोलंदाज नाही, तो भारतीय संघाचा अनऑफिशियल बोलिंग कोचही आहे. >> + डावरा + वेगवान + रिव्हर्स स्विंग स्पेश्यालिस्ट !!

इंग्लंडच्या हवामानात प्रवीण व मुनाफ जास्त चांगला स्विंग करतील (दोन्ही बाजूने). पूर्वी मदनलाल, बिन्नी, संधू, प्रभाकर यांनाही इंग्लिश हवामानाचा फायदा मिळालेला आहे. >> मुनफ स्विंग करेल नि झहीर नाहि हे पटणे कठीण आहे. मुनफ चे बॉलीम्ग मुख्यत्वे करून good length/short of the good length ठेवत बॉल कट करायचा ह्या principle वर असते (गेली काहि वर्षे तरी). तो अचानक स्विंग वर भर देणे कठीण वाटते. ह्याउलट झहिर जुना नि नवा दोन्ही बॉल तेव्हढ्याच सफाईने स्विंग करतोय. (मान्य कि तो फक्त स्विंग बॉलर नाहि, सीम नि कटर पण सढळपणे वापरतो.) But that's what makes him deadly

गाववालो... झहीर खानने इंग्लंडमध्ये काऊंटी मध्ये खेळूनच बॉलिंग सुधारली आहे... त्यामुळे इंग्लंड दौर्‍यासाठी तो डीफॉल्ट सिलेक्शन आहे..

<< त्यामुळे इंग्लंड दौर्‍यासाठी तो डीफॉल्ट सिलेक्शन आहे.. >> आणि,तो सिलेक्ट न होणं हा डीफॉल्ट होईल ! Wink

<< त्यामुळे इंग्लंड दौर्‍यासाठी तो डीफॉल्ट सिलेक्शन आहे.. >> आणि,तो सिलेक्ट न होणं हा "डीफॉल्ट" होईल ! Wink

<< त्यामुळे इंग्लंड दौर्‍यासाठी तो डीफॉल्ट सिलेक्शन आहे.. >> आणि,तो सिलेक्ट न होणं हा "डीफॉल्ट" होईल ! Wink

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने काहीतरी नवीन विचित्र नियम काढलेले आहेत. नवीन नियमांनुसार यापुढे जखमी फलंदाजाला रनर मिळणारच नाही. गावसकरने यावर चांगली टीका केली आहे. जर फलंदाजाला रनर मिळणार नसेल तर क्षेत्ररक्षण करताना एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या जागी तात्पुरते राखीव खेळाडूला क्षेत्ररक्षण करायला पण बंदी असली पाहिजे, तसेच, नेहमीचा ड्रिंक्स ब्रेक सोडून क्षेत्ररक्षकांना दोन षटकांच्या मध्ये सीमारेषेच्या बाहेर जाऊन पेयपानाला बंदी असली पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.

हो ना रनर न देण्याचा सरसकट नियम चुकीचा आहे. सध्याच्या संकेतांप्रमाणे विरोधी कप्तानाच्या संमतीने दिला जातो तेच चांगले आहे. असे वाचले की स्ट्राउस ने (का कुक ने) कोणालातरी नाकारला होता. पण म्हणून लगेच नियम कशाला काय कळाले नाही.

एक दिवसाचे क्रिकेट (आणि २०-२० वाले) जर थोडे गोलंदाजीच्या बाजूने करायचे असेल तरः
१. बाउन्ड्रीला अडवलेला चेंडू जोपर्यंत रेषेच्या आत आहे तोपर्यंत तो चौकार ठरवू नये. खूप मेहनत करून फिल्डर ने अडवलेला चेंडू केवळ त्याच्या बुटाच्या लेसचे टोक त्या अ‍ॅड बॅनर ला लागले म्हणून चौकार देणे अन्यायकारक आहे. ज्याप्रमाणे क्रीज ची लाईन ही फिल्डिंग साईडची समजली जाते तशी सीमारेषाही करावी. फक्त आजकाल तेथे अ‍ॅड बोर्ड असतात त्यामुळे त्याला बॉल लागला तर चौकार पण फिल्डर ने आधीच अडवला तर फिल्डर कोठेही असला तरी चौकार नाही असे करावे. (सिक्स च्या बाबतीत मात्र सध्याचा नियम बरोबर आहे).
(हे तीन टेस्ट प्रमाणे होतील)
२. फ्री हिट बंद करावी.
३. बाउन्सर्स आणखी टाकू द्यावेत.
४. बोलर्स ना कितीही ओव्हर्स टाकू द्याव्यात.

>>> २. फ्री हिट बंद करावी.

बरोबर. त्याचबरोबर २० षटकांच्या पॉवरप्ले ऐवजी तो १५ षटकांचाच करावा आणि सर्व पॉवरप्ले मध्ये ३ क्षेत्ररक्षकांना ३० यार्डच्या रेषेबाहेर परवानगी द्यावी.

>>गावसकरने यावर चांगली टीका केली आहे. जर फलंदाजाला रनर मिळणार नसेल तर क्षेत्ररक्षण करताना एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या जागी तात्पुरते राखीव खेळाडूला क्षेत्ररक्षण करायला पण बंदी असली पाहिजे, तसेच, नेहमीचा ड्रिंक्स ब्रेक सोडून क्षेत्ररक्षकांना दोन षटकांच्या मध्ये सीमारेषेच्या बाहेर जाऊन पेयपानाला बंदी असली पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.

सन्नीभाय "अतीशयोक्ती" प्रेमी आहे हे काही नव्याने सांगायला नको.. त्याच्या वरील विधानात अतीशयोक्तीच वाटते. आणि क्षेत्ररक्षकांच्या पेयपानाचा या वरील नियमाशी काय संबंध? Happy

मला तरी सरसकट रनर नको हा नियम खूप आवडला कारण यात मूळ रनर पेक्षा दुखापत झालेल्या फलंदाजाची क्षमता, फलंदाजी, आणि त्यामूळे दोन्ही बाजूने बदलू शकणारे समीकरण हाच मूळ मुद्दा आहे हे "अधोरेखित" होते. रनर आणि फलंदाज दोघेही मैदानावर असल्याने त्यातून निर्माण झालेला गोंधळ, क्वचित वाद, यातील गमतीचा भाग सोडता रनर देणे हा निर्णय बहुतांशी फलंदाजी करणार्‍या संघाच्या हिताचाच असतो. आणि retired hurt म्हणून नंतर पुन्हा फलंदाजीला यायचा पर्याय ऊपलब्ध असतोच की. एक दिवसीय मध्ये तेव्हडी षटके परतून यायला शिल्लक नसतील तो भाग वेगळा पण कसोटी मध्ये नक्कीच असतील.
तेव्हा सरसकट रनर नकोच हा नियम "संतुलीत" आणि "योग्य" वाटतो. मात्र यातून काही परिस्थितीत अडचण येवू शकते, जसे:
१. शेवटची जोडी खेळते आहे आणि त्यातल्या एकाला दुखापत झाली तर? अशा वेळी सामना अनिर्णीत घोषित करणार (कसोटी) का डकवर्थ सारखा काही नियम वापरणार (एकदिवसीय, २०/२० वगैरे..)
२. वरील क्र १ साठी, शेवटचा फलंदाज खेळवणे आणि दुसर्‍या बाजूला अशा वेळी दुसरा "रनर" ठेवणे हे शक्य आहे का ? किमान दोन्ही बाजूने धावचित करता यायला हवे ना?
३. या नियमाचा गैरवापर होवू शकतो का- जसे की शेवटची जोडी खेळत असेल आणि सामना हारणार हे माहित असेल तर मुद्दामून दुखापत करून घेणे वगैरे...?

वरील नियमा प्रमाणेच जर गोलंदाज दुखावलेला असेल तर त्याचे एखादे शिल्लक षटक दुसर्‍या गोलंदाजाकडून पूर्ण करून घेता येईल का, जसे सध्या करू दिले जाते, का ते षटकही तसेच अर्धवट सोडायचे? ईथे पुन्हा तेज गोलंदाजाला दुखापत असेल तर नियमीत स्पिन गोलंदाज ते षटक पूर्ण करू शकतो का?

एकंदरीत रनर नकोच असा सरसकट निर्णय लादायचा तर त्यात वरील परिस्थितींमध्ये मार्गदर्शक अशी ऊप कलमे टाकावी लागतील असे वाटते.

बाकी DRS हा संपूर्ण प्रकारच मला हास्यास्पद वाटतो. त्यातही मुख्ख्य मुद्दा हाच होता की काही पंच अलिकडे मुद्दामून एखाद्या संघाविरुध्ध/खेळाडूविरुध्ध चूकीचे निर्णय देत होते, तर काही पंच अगदीच "ढ" कामगिरी करत असल्याने एकंदरीत अनेक चूकीचे निर्णय दिले जात होते. पायचित चा निर्णय १००% अचूकतेने देणारे तंत्रद्यान येवू शकत नाही कारण टप्पा पडल्यावर चेंडू कसा कुठे जाईल हे चेंडूला देखिल माहित नसते :). अगदीच थेट यष्टीसमोर फलंदाज ऊभा असेल तेही त्याच्या क्रीज च्या आत मागे तर पायचित द्यायला अशा तंत्रज्ञानाची गरजही नाही पण एरवी हा निर्णय एखादा पंच जितका चुकीचा देवू शकतो तितकीच चूक तंत्रद्यान करू शकते. ऊरला सवाल स्निकोमिटर आणि हॉट्स्पॉट चा तर ९९% त्या बाबतीत तंत्रज्ञान अचूक असले तरी त्याचा ऊपयोग, चेंडू बॅट ला लागला आहे की नाही याच साठी केला जातो ज्यातून झेलबाद किंवा बॅट ला आधी लागला असेल तर पायचित देता येणार नाही यासाठी केला जावू शकतो.
धावचित/यष्टिचीत साठी अगदी नॉ बॉल आहे का नाही हे तपासून पाहण्यासाठी सुध्धा आजकाल सर्वच पंच to be on safe side तिसर्‍या पंचाची (म्हणे पुन्हा एकदा तंत्रद्यान) ची मदत घेतात. मग आता पंचाना मैदानावर स्वताच्या बळावर एखाद्या फलंदाजाला बाद्/नाबाद ठरवण्या सारखं उरलच काय? Happy

थोडक्यात, मानवी चूक जशी ग्राह्य धरावी लागेल (excludiing any other descriminatory or malicious intent by any upire against any player or team) तशीच तंत्रज्ञानाची चूकही ग्राह्य धरावीच लागेल. मग शेवटी स्विकार कुणाचा करायचा? यावरही आता दर २५ षटकांनंतर दोन्ही पंच बदलणे असा पर्याय असू शकतो का? प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?

एक नक्की जितके तंत्र प्रयोग तितके सामन्यातील ऊत्सुकता, अनिश्चीतता, त्यातील चुरस कमी होत जाईल असे मला तरी वाटते. काही अपवाद आहेत जसे एकदीवसीय मध्ये किमान ९ क्षेत्ररक्षक पहिल्या १४ षटकात आतल्या वर्तुळाच्या आता असावे लागतात- ज्यामूळे जयसूर्या या तार्‍याचा ऊदय झाला आणि त्यानंतर "ठोकाठोक" हा एकदिवसीय चा अविभाज्य अंग बनले. प्रेक्षकांना मेजवानी. तसेच २५ षटकानंतर चेंडू बदलणे हेही चांगले आहे.

बाकी असाच एक मलान पटणारा नियम म्हणजे एकाच षटकात फक्त दोन ऊसळते चेंडू टकता येतात म्हणे. पण का? समजा एखादा फलंदाज ऊसळते चेंडू खेळू शकत नसेल तर त्याला बाद करायला सहा चेंडू ऊसळते टाकले तर बिघडले कुठे- जोवर फलंदाजाच्या हातात बॅट आहे तोवर its fair game!. स्पिनर ने एकाच षटकात साही चेंडू स्पिन करायचे नाहीत किंवा स्पिनर ने ५० k पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकायचा नाही असा कुठे नियम आहे? Happy
हा आता चेंडू निव्वळ ऊसळता नसून धोकादायक्/बॉडीलाईन आहे तर त्यावर बंदी आहेच- जसे डोक्यावरून एका षटाकात फक्त एकच चेंडू टकता येतो. दुसरा त्याच षटकात पुन्हा टाकला तर गोलंदाला बाद ठरवण्यात येते. कमरेच्या वर थेट टप्पा न पडता टकलेला चेंडू साधारण याच बॉडीलाईन नियमावलीत आल्याने तो चेंडू बाद ठरवण्यात येतो.

बाकी कसोटी मध्ये अधिक गंमत/रंगत निर्माण करायची असेल तरः
१. दोन खेळपट्ट्या ठेवायच्या एक संपूर्णपणे फिरकी दुसरी संपूर्णपणे वेगवान. अर्थात दोन दिवस त्यावर खेळल्यावर अपोआप दोन्ही बदलतीलचः नाणेफेक जिंकलेल्या कप्तानाला पहिला डाव/किंवा पहिले दोन दिवस जे आधी संपेल ते, कुठल्या खेळपट्टीवर खेळायचा आहे (गोलंदाजी वा फलंदाजी) याबाबत पर्याय ऊपलब्ध असावा Happy
१अ: नाणेफेकीचा कौल काहीही लागला तरी संघात नंतर बदल करात येणार नाही.

२. पहिला डावात (दोन्ही संघांना) जास्ती जास्त ४०० धावाच करू दिल्या जाव्यात- नंतर डाव सक्तीने घोषित. :).
२अ: क्र. १ मध्ये नाणेफेक जिंकल्यावर कप्तानला खेळपट्टी पसंतीची नको असेल आणि आधी फलंदाजी करायची असेल तर क्र. २ नियम सक्तीचा नसेल. अशा वेळी नाणेफेक हरलेल्या कप्तानाला क्र१. चा पर्याय ऊपलब्ध करून दिला जावा.
२बः क्र. १ नुसार पसंतीची खेळपट्टी निवडली तर जास्ती जास्त ४०० धावांचा नियम लागू होईल.
(यातून एकतर तुम्ही संघावर पैज घ्याल किंवा खेळपट्टीवर!)

३. जास्ती जास्त फक्त प्रत्त्येकी ५ फलंदाज वेगवान किंवा फिरकी गोलंदाजी वर बाद करू दिले जावेत.
३अ: यात क्र. १ चा पर्याय जर नाणेफेक जिंकलेल्या कप्तानाने स्विकारला असेल आणि आधी फलंदाजी घेतली असेल तर दुसर्‍या संघासाठी हा नियम ३ लागू होणार नाही- कारण त्यांना खेळपट्टी पसंतीची मिळाली नसेल.
३बः जर क्र. १ चा पर्याय नाणेफेक जिंकलेल्या कप्तानाने स्विकारला असेल तर आणि आधी गोलंदाजी घेतली असेल तर वरील नियम ३ लागू होईल.
३कः क्र. १ चा पर्याय जर नाणेफेक जिंकलेल्या कप्तानाने स्विकारला नसेल आणि आधी फलंदाजी घेतली असेल तर दुसर्‍या संघासाठी हा नियम ३ लागू होईल
३डः जर क्र. १ चा पर्याय नाणेफेक जिंकलेल्या कप्तानाने स्विकारला नसेल तर आणि आधी गोलंदाजी घेतली असेल तर वरील नियम ३ लागू होणार नाही.

४. नाणेफेक जिंकल्यावर खेळपट्टी हवी का फलंदाजी/गोलंदाजी करणार यापैकी एकच पर्याय दिला जावा. अर्थातच त्या अनुशंगाने वरील क्र १,२, ३ मध्ये आवश्यक ते बदल होतील.

५. फॉलो ऑन चा नियम रद्द करावा. (अरे त्या गोलंदाजांना काही "जीव" आहे की नाही?)

५. मुद्दामून सातत्याने केलेली नकारात्मक गोलंदाजी वा नकारात्मक फलंदाजी यावर काय ऊपाय करता येईल?

६. पावसासाठी एक दिवस राखीव ठेवावा (सध्ध्या पावसासाठी एकही दिवस राखीव नसतो)

७. पाच सामन्यांची मालिका असेल तर एका मालिकेत कुठल्याही एका खेळाडूला तीन पेक्षा अधिक सामने (कुठलेही तीन) खेळता येणार नाहीत. यामूळे अर्थातच नवोदितांना अधिक संधी मिळतील. शिवाय एखाद्या मालिकेदरम्यान निव्वळ "पाणके" म्हणून संघाच्या बरोबर गेलेल्यांचा खर्च आणि संधी योग्य मार्गी लागेल Happy

८. फक्त फलंदाजी करून नंतर दुखापतीच्या नावाखाली क्षेत्ररक्षणाच्या वेळी संपूर्ण सामना तंबूत बसून काढणे हे खेळाडूसाठी अमान्य करण्यात यावे.
८अ: दुखापत गंभीर असेल अन खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकत नसेल तरच बदली खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून ठेवावा. अशा वेळी ऊर्वरीत डावात त्या फलंदाजाला फलंदाजी करता येणार नाही.
८बः दुखापत गंभीर नसेल तर किमान ५० षटके क्षेत्ररक्षण करायची सक्ती असावी.
८कः दुखापत गंभीर नसेल किंवा तसा धोका पत्करायचा नसेल आणि ५० षटके क्षेत्ररक्षण करायचे नसेल तर संघाच्या धावसंख्येतून २५ धावा कमी केल्या जाव्यात.

९. दर दिवशी दोन नविन पंच ठेवावेत. थोडक्यात एकाच सामन्यात एकूण ४ पंच आलटून पालटून काम करतील. त्याचप्रमाणे तिसरा पंच म्हणून दोघांनी आलटून पालटून काम करावे.

या फॉर्मॅट वर आधारीत नविन कसोटी लिग बनली तर मजा येईल..

अजून काही सुचतय का कुणाला..? Happy

गावसकर चा प्रश्न बरोबरच आहे ना? वन डे मधे फिल्डर जर मधेच बाहेर जाऊन पाणी पिउन विश्रांती घेउन परत येउन लगेच खेळू शकत असेल तर अनफेअर आहे ते. कारण बराच वेळ खेळणार्‍या फलंदाजाला तो पर्याय नाही. फिल्डर पेक्षा बॅट्समन कधीही जास्त दमतो. कसोटी मधे अशा फिल्डर ला किमान लगेच बोलिंग करता येत नाही आणि बहुधा असे मधेच बाहेरही जाता येत नाही (कॅज्युअली).

सरसकट रनरच नाही हे चुकीचे आहे. फलंदाजीला येणारा बॅट्स्मन मुळातच जखमी असेल तर रनर आत्ताही घेउ शकत नाही. तो फक्त खेळताना काही झाले तरच मिळत होता. तो ही दुसर्‍या संघाच्या कप्तानाच्या परवानगीनेच.

मुळात सध्या रनर वगैरेचा खूप गैरफायदा घेतला जातोय वगैरे असे काही नाही.

योग - बोलर जर मधेच जखमी झाला तर दुसरा कोणीही ती ओव्हर पूर्ण करू शकतो. उसळत्या चेंडूबद्दल सहमत. माझा न. ३ मुद्दा तोच आहे.

तुझ्या कसोटीच्या पर्यायांबद्दलः
४. फॉलो ऑन नाहीतरी सक्तीचा नाहीच. ज्याला आपल्या बोलर्सची काळजी असते तो देतच नाही (गांगुली ने वॉ च्या शेवटच्या टेस्ट्मधे सिडनीला दिला नव्हता).
५. निगेटिव्ह बोलिंग बद्दल फलंदाजांनीच उत्तर शोधून काढले पाहिजे. नाहीतरी लेग साईडला एलबीडब्ल्यू नसतोच.

>>फॉलो ऑन नाहीतरी सक्तीचा नाहीच. ज्याला आपल्या बोलर्सची काळजी असते तो देतच नाही (गांगुली ने वॉ च्या शेवटच्या टेस्ट्मधे सिडनीला दिला नव्हता).

फॉलो ऑन चा पर्यायच असू नये असे मी म्हणतोय..

>> निगेटिव्ह बोलिंग बद्दल फलंदाजांनीच उत्तर शोधून काढले पाहिजे. नाहीतरी लेग साईडला एलबीडब्ल्यू नसतोच
मान्य! पण त्याने खेळातील गंमत्/चुरस कमी होते या अर्थाने मी म्हटले होते.

कारण टप्पा पडल्यावर चेंडू कसा कुठे जाईल हे चेंडूला देखिल माहित नसते

ज्या काळात विमान, स्पेस शटल इ. डिझाईन करतात त्या काळात वरील प्रश्न कठीण असू नये. अप्रगत अश्या यंत्रासाठी म्हणे ६० हजार डॉ. दर दिवशी दिल्या जातात, (संदर्भः शहा, बीसीसी आय चे vice president) तेव्हढ्या पैशात कुठलाहि तज्ञ हे काम सहज करेल.

मग हे सर्व नियम, यूडीआरेस, स्निकॉमीटर, हॉट स्पॉट इ. सर्व गोष्टी एकाच app मधे घालून, आय फोन का आय पॅड का कायसेसे असते, त्यात घालून ती यंत्रे पंचांना द्यावीत! मग पंच मैदानावर नसले तरी चालेल! खरे तर पंचहि नकोतच. एकदा तांत्रिक बाजू सांभाळली की मग "त्यातही मुख्ख्य मुद्दा हाच होता की काही पंच अलिकडे मुद्दामून एखाद्या संघाविरुध्ध/खेळाडूविरुध्ध चूकीचे निर्णय देत होते, तर काही पंच अगदीच "ढ" कामगिरी करत असल्याने एकंदरीत अनेक चूकीचे निर्णय दिले जात होते." हा मुद्दा उर॑णारच नाही.

कशी काय आहे कल्पना? २०१५ च्या विश्वचषकापर्यंत अंमलात आणता येईल का?
Happy Light 1

असाम्या,
पण क्र. १ मान्य केलं तर २, ३ देखिल वापरावे लागेल अन्यथा पुन्हा एकाच संघाला नाणेफेकीचा फायदा होईल.. ४ देखिल त्या अनुशंगाने मग विचारात घेता येईल ?

नाहि तसे नाहि मला दोन पिचेस असाव्यात हे आवडले, नाणेफेकी नंतर जिंकणार्‍याला पिच की फलंदाजी/गोलंदाजी आधी करणार हे निवडू द्यावे नि अर्थात २-३ दिवसांनंतर पिच बदलावे. Random Human element असावा असे वाटते.

>>> तेव्हा सरसकट रनर नकोच हा नियम "संतुलीत" आणि "योग्य" वाटतो.

तसे असेल तर, जखमी झालेल्या क्षेत्ररक्षकाच्या ऐवजी किंवा क्षेत्ररक्षण करणार्‍या एखाद्या खेळाडूच्या जागी तात्पुरते क्षेत्ररक्षण करण्यासाठी, १२ व्या खेळाडूला सुध्दा क्षेत्ररक्षण करण्याची बंदी पाहिजे. कारण १२ व्या खेळाडूच्या नियमाचाही गैरफायदा घेता येतो. लक्ष्मणसारख्या फारश्या चपळ नसलेल्या एखाद्या क्षेत्ररक्षकाऐवजी, त्याच्या पायात गोळे आलेत असे कारण पुढे करून रैनासारख्या अतिशय चपळ असलेल्या १२ व्या खेळाडूला बदली क्षेत्ररक्षक म्हणून खेळवता येईल.

जर रनरला बंदी असेल तर १२ व्या खेळाडूला सुध्दा बंदी हवी.

Pages