Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
<< काय बरे झाले? >> सामना
<< काय बरे झाले? >> सामना अधुन मधून थोडाच वेळ पाहिला त्यामुळे सांगू नाही शकत. पण जे झाले तें बरे झाले - वे.इंडीजला आत्मविश्वास मिळेल व आपण बेफिकीर नाही होणार; सामने रंगतदार तरी होतील !
भाऊ.. फारच जबरी झब्बू...
भाऊ.. फारच जबरी झब्बू...
>>> अरेच्या, आज हरले भारतीय
>>> अरेच्या, आज हरले भारतीय तर कुणाची काहीच प्रतिक्रिया नाही? कुणाचे कसे चुकले वगैरे.
रात्री २ पर्यंत जागून बघावे इतक्या महत्वाचे नाहीत हे सामने.
त्यात मालिका जिंकली आहे आधीच.
त्यात मालिका जिंकली आहे आधीच. हे डेड रबर्स.
पण.. पण.. पण... आपले खेळावर
पण.. पण.. पण...
आपले खेळावर प्रेम आहे का कुणि चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण चांगले केले ते बघायचे?
ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या अॅशेस मॅचेस कशासाठी बघायच्या? म्हणजे खेळाची आवड का फक्त जिंकायची?
>>> म्हणजे खेळाची आवड का फक्त
>>> म्हणजे खेळाची आवड का फक्त जिंकायची?
चांगल्या खेळाडूंचा (म्हणजे सचिन, सेहवाग, शेन वॉर्न, गिलख्रिस्ट, गावसकर, कपिल देव इ.) खेळ बघण्याची आवड आहे. भारताचा 'ब' संघ आणि रसातळाला गेलेला विंडीजचा संघ यांच्यातले सामने बघायला तितकी मजा येत नाही.
इंग्लंडमधील कसोटी सामने
इंग्लंडमधील कसोटी सामने चांगले ७ - ८ दिवसांचे ठेवावेत, म्हणजे कसाबसा पाच दिवसांइतका खेळ होईल!! एक दिवसीय सामने सुद्धा इंग्लंडमधे तीन दिवसीय करावे! उगाच डकवर्थ लुईस काय आणि उद्या लॉर्ड फॉकलंड नियम लावून ५ षटकात निक्काल लावायचा त्याला अर्थ आहे का?
इंग्लंडमधे मैदानावर क्रिकेट खेळण्यापेक्षा, घरात बसून Wii क्रिकेट खेळावे!!
:वैतागः

<< इंग्लंडमधील कसोटी सामने
<< इंग्लंडमधील कसोटी सामने चांगले ७ - ८ दिवसांचे ठेवावेत, म्हणजे कसाबसा पाच दिवसांइतका खेळ होईल!! >> आणि झक्कीसाहेब, इथं [ मुंबईत ] तर इंग्लंडच्या असल्या वातावरणाची संवय व्हावी म्हणून पावसाळ्यात " कांगा लीग " स्पर्धा सुरूं करण्यात आली ! विरार, कल्याणच्या खेळाडूनी सकाळी पेपरात बघायचं कीं आझाद, क्रॉस इ.मैदानांवर तळं झालंय का व नसेल तरच मग निघायचं मॅचसाठी !!
अमेरिकेत बसून हे डोक्यात येत
अमेरिकेत बसून हे डोक्यात येत नाही हो. आपले ते खरे, नि इतरांनी आपल्यासाठी बदलावे अशी आमच्याकडे पद्धत आहे.
म्हणून तर जगभर मेट्रिक पद्धत चालते, पण अमेरिकेत नाही. विकायचे असेल काही अमेरिकेत, तर झक मारत करा जुन्या पद्धतीप्रमाणे इंच नि पौंडात! आणि लोक झक मारतातच!!
आता आपल्याकडे बेसबॉल खेळतात का? खेळायला पाहिजे, काय त्या इंग्लंडच्या नादी लागता, गेले त्यांचे दिवस. आता अमेरिका आणि अमेरिका. रशिया नाही की चीन नाही!!
फक्त अमेरिकाच तेरा ट्रिलियन डॉ. चे कर्ज डोक्यावर घेऊन, जगाचे मालक असल्यासारखे वागणे करू जाणे!! बाकीचे देश बिचारे गरीब, अमेरिकेचे ऐकतात!


गमतीत लिहीले आहे बरं का. नाहीतर उठतील काही लोक तरवारी उपसून भांडायला!
<< आता अमेरिका आणि अमेरिका.
<< आता अमेरिका आणि अमेरिका. रशिया नाही की चीन नाही!! >> एक वेळ, आणि फार पूर्वीही नाही, इंग्लंडबद्दलही हेंच म्हटलं जायचं !
जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत
जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत घ्या मजा करून!
रात्री २ पर्यंत जागून बघावे
रात्री २ पर्यंत जागून बघावे इतक्या महत्वाचे नाहीत हे सामने.
बरोबर आहे.
आजच क्रिक इन्फो वर वाचले - आफ्रिदी वि. PCB, Gayle Vs. WICB आणि
काटीच वि. CA , शिवाय जयसूरिया आणि श्री लंका, या बातम्यांपुढे दुय्यम वेस्ट इंडिज आणि दुय्यम भारत यांच्या सामन्यांकडे, नि (पावसामुळे) तीन दिवसाच्य इंग्लंड श्री लंकेच्या सामन्याकडे कोण लक्ष देतो?
चला मॅच सुरू झाली. भारताची
चला मॅच सुरू झाली. भारताची बॅटिंग .. बघताय ना झक्की?
झक्कींनी नेहमीप्रमाणे षटकार
झक्कींनी नेहमीप्रमाणे षटकार मारलेला आहे...
आपली पहिली बॅटींग म्हणजे मॅच
आपली पहिली बॅटींग म्हणजे मॅच हारण्याची फुल तयारी करुनच उतरलेले दिसताहेत..
या बातम्यांपुढे दुय्यम वेस्ट
या बातम्यांपुढे दुय्यम वेस्ट इंडिज आणि दुय्यम भारत यांच्या सामन्यांकडे >> चुकीची विचार पद्धती वाटतेय मला. काही वर्षांनी सचिन, द्रविड, लक्ष्मण निव्रुत्त झाले कि जवळपास हिच टीम असेल (सेहवाग, गंभीर धरून) अशा वेळी त्यातले किती जण कसे खेळतात, परिस्थिती कशी हाताळतात ह्याचे उत्तम उदाहरण कळणार आहे. पुढच्या Eng tour मधे short balls ची बरसात असणार Finn, Tremlet, Broad कडे बघून उघद आहे. अशा वेळी विंडीजमधे झालेला सराव उपयोगी येउ शकेल (कितपत उपयोग होईल हा मुद्दा वेगळा). वरच्या तिघांचे सोडा पण चौथा जो कोणी नि त्याचा backup जो कोणी असेल (कोहली, शर्मा, बद्री) त्यांना नक्की फायदा होणार आहे. This is better opportunity to assess Ishant's form, Munaf's fitness and Mithun's endurance. ह्या तिघांपैकीच एक जण दुसरा किंवा तिसरा बॉलर म्हणून झहीर बरोबर( जर असेल) तर असणार आहे. वेस्ट इंडिजची दुय्यम टीम आहे हे चांगलेच तेव्हढे expectations कमी असतील.
रैनाला कर्णधारपद झेपत
रैनाला कर्णधारपद झेपत नाहीय्ये बहुतेक. पाचही सामन्यात तो अपयशी ठरलाय.
नवीन लोकांपैकी शिखर धवन ४ पैकी १ च सामना चांगला खेळला, उरलेले फ्लॉप;
बद्रिनाथ फक्त एकमेव T20 मध्ये चांगला खेळला व सर्व एकदिवसीय सामने फ्लॉप झाला;
पार्थिव पटेल ओव्हरऑल चांगला खेळला;
कोहली २ सामन्यात चांगला खेळला, एका सामन्यात त्याला पंचांनी ढापले, उरलेले २ सामने फ्लॉप;
युसुफ पठाण पहिले चारही सामने फ्लॉप;
मनोज तिवारी खेळलेले २ ही सामने फ्लॉप,
रोहीत शर्मा सर्व सामने चांगला खेळला (हा मोठा धक्का बसला. उरलेल्यांबद्दलचे अंदाज बरोबर आले. रोहित मात्र अनपेक्षितरित्या चांगला खेळला.)
बद्रिनाथ, धवन, पठाण हे इंग्लंडला जायची शक्यता खूपच कमी आहे.
२५१ ला सर्वबाद.. खरं तर थोडं
२५१ ला सर्वबाद.. खरं तर थोडं नीट खेळले असते तर २८०/२८५ झाले असते..
नवीन लोकात रोहित जागा मिळवेल. खरं तर रैनाने नीट खेळायला हवं नाहीतर त्याची दांडी जाईल सगळे आले की...
आपण चांगलेच हरलोय; आपली
आपण चांगलेच हरलोय; आपली गोलंदाजी सुधारल्याशिवाय कांही खरं नाही !
<< अशा वेळी विंडीजमधे झालेला सराव उपयोगी येउ शकेल >> असामीजी, प्रत्येक मालिकेच्या वेळी आपण "पुढच्या मालिकेसाठी", "विश्वचषकासाठी", इ. आताची मालिका उपयोगी ठरेल, असं कां म्हणतो ! दोन देशातील मालिका म्हणजे काय सराव सामने का असतात ? वे. इंडीजमधील अनुभव इंग्लंडच्या वातावरणात, खेळपट्ट्यांवर कितपत उपयोगी ठरतो ?
एखाद-दुसरा प्रयोग समजण्यासारखा आहे पण आपला "ब" संघच दुसर्या देशाशी - अन तेही वे.इंडीजसारख्या - मालिका खेळण्यासाठी पाठवणं हा आगाऊपणा आहे, असं मला राहून राहून वाटतं. कदाचित आपण वे.ईंडीजला आत्मविश्वास कमावून देऊं व आपला गमावून बसूं !
इंडियन एस्प्रेसचे मुख्य
इंडियन एस्प्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी घेतलेली झहीर खानची मुलाखत
http://www.ndtv.com/video/player/walk-the-talk/walk-the-talk-with-zaheer...
http://www.indianexpress.com/news/im-enjoying-going-to-sleep-with-the-pr...
सचिन, गंभीर, सेहवाग, झहीर इ.
सचिन, गंभीर, सेहवाग, झहीर इ. सुपरस्टार नसल्यामुळे विंडीजमध्ये आपली भंबेरी उडणार असं वाटत आहे. विशेषतः विंडीजच्या फिडेल एडवर्डस्, रोच, रामपाल इ. गोलंदाजांसमोर बरेच जण नांगी टाकतील असा अंदाज आहे. सुदैवाने विंडीजकडे गेल नाही आणि त्यांची फलंदाजी खूप दुर्बल आहे. त्यामुळे मालिका चुरशीची होईल.
इंग्लंडमध्ये आपण इंग्लंडला एकदिवसीय सामन्यात हरवू, पण कसोटीत आपण हरू असे वाटते. इंग्लंडचा कसोटी संघ स्वत:च्या देशात खूपच बलवान आहे. कुक, ट्रॉट, बेल, मॉर्गन, पीटर्सन फॉर्मात आहेत. स्ट्रॉस आणि प्रॉयर आता फेल होत असले तरी ते भारताविरूध्द चांगले खेळतात. अॅन्डरसन, ट्रेम्लेट, स्वान, ब्रॉड हे गोलंदाज देखील इंग्लंडमध्ये जबरदस्त कामगिरी करतात. त्यामुळे कसोटीत इंग्लंडला हरविणे अवघड वाटते.
मुरलीधरन व मलिंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा संघ पुरता ढेपाळल्यासारखा दिसतो. लागोपाठ २ विश्वचषक स्पर्घेत अंतिम फेरीत हरल्यामुळेसुध्दा त्यांच्या संघात मरगळ आलेली दिसत आहे. एकंदरीत श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाप्रमाणेच उलट्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे.
भाऊ, तो आगाउपणा इंग्लिश लोक
भाऊ, तो आगाउपणा इंग्लिश लोक पूर्वी करायचे. अॅशेस खेळण्याचा (आणि मार खाण्याचा) प्रत्यक्ष काळ सोडून बाकी उर्वरित सर्व काळ हा कायम "पुढच्या अॅशेस ची तयारी" असल्यासारखीच वक्तव्ये ते करत. जोपर्यंत त्यांचा संघ इतर संघांना हरवू शकेल इतपत होता (साधारण ८५ पर्यंत) तोपर्यंत त्याचे कौतुक होते, पण नंतर तो आगाउपणाच वाटला. पण त्यांच्या क्रिकेटप्रेमी लोकांना केवळ अॅशेस चेच महत्त्व वाटत असल्याने तसे झाले असेल.
भारताचा यावेळेसतरी हा आगाऊपणा वाटत नाही. कारण वर्ल्ड कप आणि नंतर आयपीएल मुळे सगळेच खेळाडू दमलेले होते. त्यात अडीच महिन्यांचा इंग्लंड दौरा (मग इंग्लंडचा आपल्याकडे दौरा, मग विंडीज आणि मग आपला ऑस्ट्रेलिया दौरा) पुढे असल्याने आत्ता बर्याच लोकांना विश्रांती देण्याची गरज होती. आता आयपीएल खेळून आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकणे यावर टीका होउ शकते पण त्यात पैसा असल्याने कोणी आयपीएल टाळणे शक्य नाही.
पूर्वीपासून मे-जून महिने साधारण भाकडच असायचे. फक्त इंग्लंड चा मौसम चालू होत असे, त्यातही कसोटी चालू व्हायला वेळच लागायचा. त्यामुळे क्रिकेटर्स लोकांना सुट्टी देण्याची हीच वेळ बरोबर असावी. कालच सचिनच्या मुलाखतीत त्याने सांगितले की हे एक दोन महिने जर त्याने ब्रेक घेतला नसता तर जवळजवळ २४ महिने त्याला सलग आपल्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ काढायला मिळाला नसता.
हे खरे आहे की वेस्ट इंडिज चा संघ तेवढा भारी नाही आणि कदाचित तेथील मॅचेसमधून बीसीसीआय ला विशेष काही मिळणार नसेल, त्याचा परिणामही नक्कीच असेल.
मयेकरजी, झहीरच्या मुलाखतीच्या
मयेकरजी, झहीरच्या मुलाखतीच्या लींकबद्दल धन्यवाद. झहीर हा एक परिपक्व गोलंदाज झालाच आहे पण मुलाखतीत तो स्वतचे विचार मांडण्यातही परिपक्व झालाय असं जाणवलं.
<< कुक, ट्रॉट, बेल, मॉर्गन, पीटर्सन फॉर्मात आहेत >> मास्तुरेजी, शिवाय, तिथलं हवामान व खेळपट्ट्या आपल्याविरुद्ध नेहमी 'फॉर्मा'त असतातच !
<< तो आगाउपणा इंग्लिश लोक पूर्वी करायचे >> फारएण्डजी, हा आगाऊपणा ते आजतागायतही करतातच ! << भारताचा यावेळेसतरी हा आगाऊपणा वाटत नाही >> हे मात्र बरंचसं पटतं.
आजच्या पहिल्या कसोटीसाठी भारताला शुभेच्छा.
पहिल्या कसोटीत भारत ४ बाद ६९.
पहिल्या कसोटीत भारत ४ बाद ६९. नवीन खेळाडू (अभिनव मुकुंद, मुरली विजय आणि कोहली) पहिल्या डावात तरी अपयशी ठरलेले दिसत आहेत. लक्ष्मणही गेला. एकटा द्रविड किल्ला लढवतोय.
असामीजी, प्रत्येक मालिकेच्या
असामीजी, प्रत्येक मालिकेच्या वेळी आपण "पुढच्या मालिकेसाठी", "विश्वचषकासाठी", इ. आताची मालिका उपयोगी ठरेल, असं कां म्हणतो ! दोन देशातील मालिका म्हणजे काय सराव सामने का असतात ?
>> आता असे बघा कि गेल्या काहि वर्षांमधे झालेले मह्त्वाचे दौरे बघितले तर बहुतेक वेळा एखादा सराव सामना तिथल्य वातावरणाशी, हवामानाशी, पिचेसशी जूळवून घायला मिळतो. तेंव्हा अशा वेळी आधीचा दौरा हा पुढच्या दौर्याची तयारी करण्यासाठी वापरण्यामधे काही चुकीचे नाहि. ह्याचा अर्थ असा नाहि कि ते lightly घ्यावेत. तर उलट पुढच्या मह्त्वाच्या दौर्याच्या द्रुष्टीने केलेली पूर्वतयारी आहे, आजच्या fast paced style मधे ह्याशिवाय दुसरे काय करता येणार ?
वे. इंडीजमधील अनुभव इंग्लंडच्या वातावरणात, खेळपट्ट्यांवर कितपत उपयोगी ठरतो ? >> तुम्ही माझे वाक्य out of context घेत आहात. विंडीजमधे गेलेले बरेच जण International test साठी नवे आहेत त्यांना eng मधे खेळ्ण्याआधी विंडिजमधे बाप्तिस्मा मिळेल अशा अर्थाने ते होते. तुम्ही जर हुसेन किंवा flower च्या मुलाखती वाचल्यात तर short ball strategy बद्दल वाचायला मिळेल. त्याचा सराव विंडिजमधे होणारच आहे हे दिसतेय.
भारत २४६ धावात सर्वबाद. short
भारत २४६ धावात सर्वबाद.
short ball strategy यात बरंच तथ्य आहे हे मान्य. पण काल मात्र आपले सर्वात अनुभवी ,खंदे फलंदाज [ द्रविड, लक्ष्मण व धोनी ] फार अनुभवी नसलेल्या बिशू नामक लेग-स्पीनरला बळी पडलेत !!
वा: ! आल्या आल्या शर्माने
वा: ! आल्या आल्या शर्माने सारवानला पायचित केलंय !! वे.ईं. ३५-२.
वे.इं. ११९-५. प्रविणकुमारच्या
वे.इं. ११९-५.
प्रविणकुमारच्या शिस्तबद्ध स्विंग गोलंदाजीचं खूप कौतुक करताहेत वे.इं.तज्ञ मंडळी ! बरं वाटलं ऐकून !!
प्रविणकुमार मला आवडतो. बॉल
प्रविणकुमार मला आवडतो. बॉल नवीन असताना दोन्ही बाजुने स्विंग मिळतो, ते पाहायलाही मजा येते.
भारत सामना जिंकेल असं वाटायला
भारत सामना जिंकेल असं वाटायला लागलंय. काल ८५/६ अशी आपली भीषण परिस्थिती होती. पण आज पारडं एकदम फिरलेलं दिसतंय.
Pages