क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थांबो रे थांबो.. विंडीजची गोची झाली असली तरी इतक्यात त्यांना बाद धरु नका.. चंदर नामका एक बडा खतरा अभी सामने खडा है... १९७ च धावा करायच्या आहेत.. तेव्हा जरा दम धरा.. तो गेला की मगच नाच सुरु करा.. तोपर्यंत धीर धरा..

जिंकलो, नेहमीप्रमाणेच शेवटच्या विकेट्सनी भारताला तंगवले. द्रविडला कसोटीत पर्याय नाही.

मला वाटतं द्रविड व प्रविणकुमार हे या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरावे. द्रविडबद्दल बोलण्याची गरजच नाही. पण काल ब्राव्हो व चंदरपॉल याना बाद करून कुमारने सामना जिंकून दिला असंच म्हणावं लागेल. विशेषत, ज्या तर्‍हेने मुद्दाम 'फॉर्वर्ड शॉर्ट लेग' लावून आपण आंखूड टप्प्याचा चेंडू आपटण्याची शक्यता ब्राव्होच्या डोक्यात भरवून , एका अप्रतिम स्विन्गींग चेंडूने कुमारने ब्राव्होला त्रिफळाचित केलं, तें कौतुकास्पद होतं. बोलताना रांगडा वाटणार्‍या ह्या खेळाडूला 'क्रिकेटींग ब्रेन"आहे, टप्पा व स्विंगवर उत्तम नियंत्रण आहे व वेग कमी असल्याने उगीचच आपण आ़खूड चेंडू आपटून टाकण्याच्या भानगडीत पडूं नये याचं उत्तम भान आहे. खूप उपयोगी व प्रभावी ठरणार हा प्रविणकुमार, विशेषतः इंग्लंडमधे सुद्धा.
त्याउलट, काळजी वाटते ती भज्जीसाहेबाची ! कालची खेळपट्टी त्याच्याकरता स्वप्नवत होती; चेंडू वेगाने व खूप वळत होता, चेंडूचं उसळणं लहरी होतं. पण भज्जी प्रभावी नाही ठरला.उलट सॅमीने सलग तीन षटकार ठोकून भज्जीच्या किर्तिला सणसणीत चपराकच दिली !
भारताचं मनःपूर्वक अभिनंदन.

[ कुणीही मायबोलीकराने वरच्या लिखाणाने फसून जावून कृपया माझ्या नांवाची "एक्सपर्ट" म्हणून टीव्हीवाल्यांकडे शिफारस करूं नये ! कारण, खरंच मला त्यासाठी नाही वेळ देता येणार !! Wink ]

द्रविड हाच दोन्ही संघातला एकमेव फरक ठरला. दुसर्‍या डावातल्या द्रविडच्या ११२ काढून टाकल्या तर इतर १० जणांनी (+ अतिरिक्त) फक्त १४० धावा केल्या. विंडीजच्या दुसर्‍या डावातल्या २६२ पैकी ८ जणांनी एकूण २३६ धावा केल्या. त्यात ते सर्वजण १५ ते ४१ या धावांदरम्यान बाद झाले. याचा अर्थ असा की यातल्या एकानेही स्थिरावल्यावर दीर्घ खेळी खेळण्याची क्षमता दाखविली नाही. याउलट द्रविडने उरलेले सर्व जण स्वस्तात बाद होत असताना शेवटपर्यंत एक बाजू लावून धरली व त्यामुळेच भारत जिंकला. द्रविड पूल करताना ६ वर त्याचा झेल सॅमीने सोडल्यावर खेळपट्टीचा अंदाज घेऊन ११२ करून बाद होईपर्यंत द्रविडने एकदाही पुल मारण्याचा प्रयत्न केला नाही. पुल न मारता सुध्दा खंबीर उभे राहून धावा करता येतात हे त्याने दाखवून दिले. यातच त्याची महानता दिसून येते. विंडिजच्या एका फलंदाजाने तरी द्रविडपासून स्फूर्ती घेऊन पाय रोवून खेळले असते, तर आज भारताचा पराभव झाला असता.

भाउसाहेब तुम्ही रैना ला विसरलात. बाहेर आपण पहिल्या टेस्टची दुसरी इनिंग नेहमीच चांगली खेळतो. प्रॉब्लेम असतो तो पहिल्या इनिंग मधे.

५ आउट ९५ ला बेदीला डाव डिक्लेअर करायला लागला होता बॉलर्सना इजा होइल या भितीने ते याच ग्राउंडवर. काळ बदलला. काल शर्माच्या स्नॉर्टर वर रामफल बाद झाल्याच पाहून थोडी अपमानाची भरपाई झाल्या सारखे वाटले. शिवाय ३ स्लिप दोन गली , दोन शॉर्ट लेग चे द्रूष्य ही सुखावणारे होते. टर्निंग विकेटवर शर्मा आणि प्रविण आपल्याच स्पिनरना भारी ठरले. कालाय तस्मै नमः.

<< भाउसाहेब तुम्ही रैना ला विसरलात >> नाही. रैना हा निश्चितच नवीन खेळाडूंतला 'लंबे रेसका " घोडा आहे.
<< टर्निंग विकेटवर शर्मा आणि प्रविण आपल्याच स्पिनरना भारी ठरले. कालाय तस्मै नमः. >> आणि, विकेट स्पीनरना साजेशी असूनही ! त्यामानाने बिशू वे.इंडीजसाठी खूपच फलदायी ठरला, हेही महत्वाचे. 'फिरकी'ची आपली मक्तेदारी तर गेलीच आहे पण फिरकी खेळण्याची आपल्या फलंदाजांची क्षमताही आता रोडावत चालली आहे ; कदाचित, या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी असाव्यात !
[ 'फर्स्ट वॉर्नींग' - परत मला 'साहेब' लावलं, तर 'नो बॉल' द्यावा लागेल ! Wink ]

<< तीन वॉर्निंग नंतर लिखाण बंद करायला सांगणार का ह्या डावा पुरते... >> विक्रमजी या क्षेत्रातले भारी माणूस आहेत; बिचार्‍या माझीच अंपायरची करिअर संपून जाईल !! Wink

>>> कुणीही मायबोलीकराने वरच्या लिखाणाने फसून जावून कृपया माझ्या नांवाची "एक्सपर्ट" म्हणून टीव्हीवाल्यांकडे शिफारस करूं नये ! कारण, खरंच मला त्यासाठी नाही वेळ देता येणार

भाऊराव,

तुम्ही व्यंगचित्रे काढण्यात किती बीझी आहात त्याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून मी कालच धोनीला सांगितलं की उगाच वेस्ट इंडिज हून सारखा रात्रीबेरात्री भाऊरावांना फोन करून सल्ला विचारण्याऐवजी ह्या "क्रिकेटच्या" धाग्यावरच्या भाऊरावांच्या एक्स्पर्ट कॉमेन्ट्स वाचत रहा. Lol Lol Lol

<< धाग्यावरच्या भाऊरावांच्या एक्स्पर्ट कॉमेन्ट्स वाचत रहा. >> मास्तुरेजी, नाय हो हल्लीची ही स्मार्ट पोरं माझ्यासारख्या जाणकारांचा सल्ला घेत ; तसा घेतलाच असता तर काय बिशाद होती जागतिक क्रमांकात पहिल्या नंबरावर आपली टीम यायची ! Wink
रच्याकने, << वेस्ट इंडिज हून सारखा रात्रीबेरात्री ..फोन करून ..>> वे.इंडीजच्या रात्रीबेरात्री कीं इथल्या ? Wink

हे विषयांतर असेल तर क्षमस्व. पण क्रिकेटबद्दलच आहे.
यूडीआरएस पद्धतीचा वाद पुनः डोके वर काढणार असे दिसते आहे. धोनी ने पंचांच्या चुकीच्या निर्णयांबद्दल केलेली जोरदार टीका, एक ज्येष्ठ भारतीय खेळाडूने सर्व संघाच्या वतीने ऑस्ट्रेलियन पंच हार्पर वर केलेली टीका, पहाता भारताने या पद्धतीला का नकार द्यावा?
याचे कारण सचिन तेंडूलकरने सांगितले ते असे की स्निकोमीटर व हॉट स्पॉट हेहि जर या पद्धतीत अंतर्भूत केले तरच या पद्धतीचा खरा उपयोग नाहीतर परत संशयाला जागा. आता हे असे करायला काय अडचणी असाव्यात? कदाचित् तंत्रज्ञान वाटते तितके खात्रीलायक नसावे, किंवा खर्च जास्त येत असावा.
हे दोन्ही प्रश्न लवकर सुटण्यासारखे आहेत.

मला नक्की माहित नाही पण प्रत्येक डावात किती वेळा या पद्धतीचा उपयोग करता येईल यावर काही बंधने आहेत.

त्या जोडीला जर त्या बंधनापेक्षा जास्त पैसे घेऊन अधिक वेळा वापर करता येईल असे ठेवले तर भारताला फायदा होईल, कारण भारतीय क्रिकेट संस्था सर्वात जास्त श्रीमंत!!
नाहीतरी आजकाल जगात महत्वाचे काय? आंतरराष्ट्रीय संबंधांत लष्करी बळ, (अणूशस्त्रे), व पैसा!!!
देशातल्या देशा गुंडगिरी नि पैसा. हे सत्य आहे.
( Wink :दिवा:)

भज्जीच्या बॉलींगवरची टिका रास्त असली तरी त्याच्या पहिल्या इनिंगमधल्या बॅटिंगबद्दल त्याचे कौतुक करणेही तेव्हढेच जरुरी आहे. His counterattack inspired Raina as well as pushed WI back, pushed them to be over aggressive exposing their inexperience. दुसर्‍या इनिंगमधेहि त्याने द्रविड्ला साथ देताना अतिशय दुर्मिळ असा संयम दाखवला. प्रवीण्कुमारच्या दोन्ही इनिंगमधल्या रॅश शॉट च्या पार्श्वभूमीवर (bit strange for a guy who bowls so intelligently) ते जास्तच उठून दिसले.

<< तरी त्याच्या पहिल्या इनिंगमधल्या बॅटिंगबद्दल त्याचे कौतुक करणेही तेव्हढेच जरुरी आहे. >> असामीजी, एकदम मान्य. फक्त, संघातला भज्जी हा सर्वात अनुभवी गोलंदाज व हुकमी एक्का असल्यासारखाच आहे व त्याच्या फिरकीला इतकी साथ देणारी विकेट असूनही तो प्रभावी न ठरणं काळजी करण्यासारखं आहे, असं वाटलं . त्याच्यावर टीका करण्याचा खरंच उद्देश नव्हता . भल्या भल्याना ' बॅड पॅच'ला तोंड द्यावं लागतं !

भज्जी बॅटिंग करत असला तरी आपल्याला तो बोलर म्हणून जास्त हवा आहे. कुठल्याही टेस्टमॅचमधे पहिला स्पीनर म्हणून त्याला घेतला जातो. त्यामुळे असल्या खेळपट्टीवर त्याच्याकडून विकेट्सची अपेक्षा करणं गैर नाही..
संघाचे अभिनंदन. पुढच्या सामन्यात मुनाफ परत येईल. कदाचित सलामीला पार्थिव पटेल..

शिवाय ३ स्लिप दोन गली , दोन शॉर्ट लेग चे द्रूष्य ही सुखावणारे होते. टर्निंग विकेटवर शर्मा आणि प्रविण आपल्याच स्पिनरना भारी ठरले. कालाय तस्मै नमः. >>> खरंय विक्रम. मी सुदैवाने पूर्णच मॅच (काम करता करता, न करून) पाहिली. प्रविण आणि इशांत ने खरच चांगली गोलंदाजी केली आणि भज्जी आणि मिश्रा मात्र मार खात होते.

इंग्लंडसाठी प्रविणकुमार असेल असे मला वाटत आहे. झहीर, मुनाफ, शर्मा आणि प्रविण पैकी तीन आणि परत भज्जी असे असेल. दोन ऐवजी एकाच फुलटाईम स्पिनरने आपण खेळू. उरलेले काम विरू आणि असला तर रैना.

भज्जी बॅटिंग करत असला तरी आपल्याला तो बोलर म्हणून जास्त हवा आहे. >> अनुमोदन. कुंबळे असला असता तर स्पिन न येताही ह्या विकेटवर त्याने फलंदाजांची पळता भुई थोडी अशी गत केली असती. आपले दोन्ही स्पिनर दुसर्‍या डावात अयशस्वी ठरले हेच खरे.
बिशू आल्यावर तो आता दर ओव्हर मध्ये काही तरी करेल, मजा दाखवेल असे वाटायचे, ते भज्जी आल्यावर अगदी फलंदाजाच्या सभोवती सगळे असताना पण फारसे काही झाले नाही. बिशू वरचढ ठरला. अर्थात भज्जीचे फलंदाजीचे कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचे होतेच.

[

<< बिशू वरचढ ठरला. >> गोलंदाजीत तर तो सरस होताच पण "अ‍ॅटिट्यूड"च्या बाबतीत तर आदर्शवत ! त्याचं क्षेत्ररक्षण, विशेषतः घेतलेले अप्रतिम झेल, व फलंदाजीतली लढाऊ चिकाटी यापासून प्रविणकुमार कंपनीने "विकेट घेतल्या, माझं काम झालं ", ही वृत्ती सोडायला शिकणं आवश्यक !!
<< इंग्लंडसाठी प्रविणकुमार असेल असे मला वाटत आहे >> 'असेल' नाही असायलाच हवा ! त्याच्या शैलीच्या गोलंदाजासाठी - व त्याच्यामुळे भारतासाठी - इंग्लंड दौरा खूपच फलदायी ठरेल, असं मला वाटतं. शिवाय, << आणि असला तर रैना. >> कां? तोही असायलाच हवा.

कां? तोही असायलाच हवा >> हो पण तो पर्यंत सचिन आणि विरू टीम मध्ये परत येतील. गंभीर देखील येणार, त्यामुळे सचिन, विरू, गंभीर, द्रविड लक्ष्मण, धोणी असे मुख्य फलंदाज असतील. कोहली, मुकुंद आणि विजय हे तिघेही नसतील. पैकी कोहली असायला हवा असे माझे वैयक्तीक मत आहे पण मग गंभीरचे काय? हा प्रश्न येतो. ह्या सगळ्या धावपळीत रैना बसत नाही. त्याने जर विडींजच्या उरलेल्या टेस्ट मध्ये अजून भरीव कामगीरी केली तर मात्र तो असू शकतो. मला रैना आवडतो, ज्या रितीने तो बॉल खाली येऊन छक्का मारतो, ते पाहणे केवळ! पण तरीही वरचे तिघे आले की ह्या सर्वांवर प्रश्नचिन्ह आहेच. शिवाय झहीर येणार, म्हणजे त्याची जागा मोकळी. वर ६ असताना झहीर, शर्मा/प्रविण / मुनाफ, भज्जी हे जोडीला आले. प्रश्न उरतो ११ वा कोण? तो रैना किंवा आणखी एक स्पिनर आणि तिथेच गोची होईल. स्पेशालिस्ट म्हणून परत जर मिश्राजी कडे गेले तर रैना बाहेर, पार्टटाईम अन बॅटसमन म्हणून रैना कडे वळलो तर तो येईल. म्हणून असला तर असे लिहिले.

शिवाय युवराज टेस्ट मध्ये खेळला आहे, त्याचे काय होते ते ही पाहावे लागेल. तो आला तर बिचारा रैना आउट. आणि वरचे तिघेही तर तसेही आउट (कोहली, विजय, मुकुंद)

१० वर्षापूर्वी कोणीच नसायचं, तेच ते लोकं खेळायचे आता मस्त बेंच आहे ही अभिमानाचीच गोष्ट. Happy

रोहित शर्माने एक दिवशीय सामन्यात खूप धावा काढल्या होत्य. त्याला काय दुखापत झाली की काय? का त्याच्याजवळ म्याट्रिक पास झाल्याचे प्रमाणपत्र नाही, कमीत कमी सहावी पर्यंत तरी शिक्षण हवे अशी अट आहे, म्हणून इथल्या लोकांनी त्याला नाकारले?
Light 1

Lol तो १० वी पूर्व आहे.

टेस्ट मध्ये अजुन त्याला संधी मिळालेली नाही. परत एकदा सांगतो की मला तो ही आवडतो पण तीन वर्षांपूर्वीचां. त्याने आयपील मोड मधून बाहेर यावे, त्याला संधी मिळावी असेच मी ही म्हणेल. कारण त्याच्याकडे टेंपरामेंट आणि शॉटस आहेत. पण वनडे साठी तो जास्त योग्य वाटतो.

तो आला तेंव्हा मी मित्रांसोबत चर्चा करताना द्रविडची खरी रिप्लेसमेंट आहे असे म्हणायचो, पण त्याने सर्व वाया घातले हे ही खरेच, त्याला वनडेत संधी मिळावे, युसुफला इतक्यांदा मिळते तर त्याला का नको? पण टेस्ट साठी बालवाडीची (म्हणजे फर्स्टक्लास क्रिकेटची परिक्षा पास व्हावी लागते. त्याच्या आधी आपला पुजारा आणि रायडू मला टेस्ट साठी चालतील.

In a way it is good that Dravid, VVS Laxman and Sachin Tendulkar have had an extended run, for there must be a gradual handing over of the baton. Virat Kohli, Cheteshwar Pujara, Suresh Raina or Rohit Sharma must know what it takes to seek greatness, and maybe then achieve it. They will have to fight their own battles but a live example would help. That is why I am particularly delighted that Dravid plays in the Ranji Trophy whenever he can. He has often spoken of hanging on to every word that people like Gundappa Viswanath spoke to youngsters in Karnataka. And now that the time has come to carry forward that tradition, he is doing his bit. Cricket could do with more Johnny Appleseeds.

I don't know how much longer he will play for India, for by the time he plays at Lord's next, he will be closer to 39 than 38. But what I do know is that whenever an all-time Indian XI gets picked, Nos. 1, 3 and 4 will be written simultaneously.

हर्षा भोगले.

गौतम गंभीर (डोक्याने भडकू असला तरी) एक उत्तम खेळाडू आहे. फटकेबाजी करेल, द्रविड सारखा किल्ला लढवेल, जलदगती गोलंदाजाला खेळेल, आणि स्पीनरलाही खेळेल. आणि परत तो सलामी फलंदाज आहे... तेव्हा गंभीरची जागा पक्की. मला फक्त त्याच्याबद्दल Problem वाटतो तो, तो जेव्हा शिव्या देतो/भडकतो तेव्हा. (World Cup, पाकिस्तानच्या मॅच मधे स्वतःच्या चुकीने आऊट झाला तेव्हाही तो शिव्या देत होता). यापूर्वी इतर टीमबरोबर भांडून त्याने शिक्षाही भोगली आहे.
सचिन/द्रविड/धोनि कडून थोडा Control शिकायलाच हवा त्याने.

फक्त, संघातला भज्जी हा सर्वात अनुभवी गोलंदाज व हुकमी एक्का असल्यासारखाच आहे व त्याच्या फिरकीला इतकी साथ देणारी विकेट असूनही तो प्रभावी न ठरणं काळजी करण्यासारखं आहे, असं वाटलं >> ह्याबाबत प्रश्नच नाहि. (तसेच हे नवीनही नाहि. Place granted असण्याएव्हढा effective वाटत नाहि टेस्टमधे तरी.) फक्त त्याच्या मह्त्वाच्या contribution कडे दुर्लक्ष नको असे मला सुचवायचे होते.

पैकी कोहली असायला हवा असे माझे वैयक्तीक मत आहे पण मग गंभीरचे काय? हा प्रश्न येतो> >seriously ? If I had to choose Indian team for tests, I will circle gambheer with no question marks or any hesitation at any point. I don't think he needs to prove himself. फिट असतील तर सचिन, विरू, गंभीर, द्रविड लक्ष्मण, धोणी ह्यांना substitute नसावा. सहावा कोंण हे विकेटकडे बघून ठरवायला लागेल. पुजारा, कोहली किंवा रैना. उद्या द्रविड लक्ष्मण मधले कोणी बाजूला झाले कि गंभीरला एक position खाली खेचून मुकुंद लाही opener म्हणून वापरायला हरकत नाहि.

सचिन/द्रविड/धोनि कडून थोडा Control शिकायलाच हवा त्याने.>> अनुमोदन, फक्त ती त्याची प्रव्रुत्ती दिसतेय. he had struggle a lot and I guess thats what is reflected here. I really like his comment after World Cup win about dedicating world Cup to November 2008 Mumbai victims. He never backed out from that comment after outcry in Pakistan. Kind of shows what he is. ती खडूस attitude आहे त्यामुळेच तो परत येऊ शकला असे मला वाटते. U-19 World Cup च्या वेळी त्याचा केव्हधा बोलबाला झाला होता पण आकाश चोप्रा त्याच्या पुढे टिममधे आला. गंभीरला फारशा संध्या मिळाल्या नाहित नि ज्या मिळाल्या त्या त्याच्या flashy खेळामूळे फुकट गेल्या. Chappel च्या वेळी तो परत शिरला नि टिकला. त्याच्या technique बद्दल शंका असणार्‍यांवर पुरून उरला. This is not to say he has better technique etc पण त्याच्या Never say Never again attitude मूळे तो पुरून उरतोय.

I will circle gambheer with no question marks or any hesitation at any point. >> हेच मी म्हणतोय, त्यामुळे वरचे चार (गंभीर, विरू, द्रविड, सचिन ) कन्फर्म. धोनी नंतर कोण स्पिनर की अजुन एक बॅटसमन हाच प्रश्न उरतो.

Never say Never again attitude मला त्याचा अ‍ॅटिट्युडच आवडतो. खास करून पाकी टीम सोबत Happy . (ऑय अ‍ॅम सॉरी पण हे क्रिकेट आहे, खेळ आणि राजकारण वगैरे वगैरे महान आणि उदात्त विचार ऐकायला बरे वाटतात, पण समोरचे काडी करत असतील तर आपण त्या काड्या मोडायला शिकायला हव्यात. अझ्झा एक तसा होता. भडकू., त्यानंतर भज्जी अन गंभीर! )

Never say Never again attitude मला त्याचा अ‍ॅटिट्युडच आवडतो. खास करून पाकी टीम सोबत <<< बरोबर, पटलं.

पण म्हणून डोक्यात राख घालून विकेट गमवायची नाही, उलट बॅट अशी तळपली पाहीजे, की त्या टीमला, 'कुठून झक मारली , आणि याच्या वाट्याला गेलो' असं वाटलं पाहिजे. तो भांडून आऊट होतो तेव्हा वाईट वाटतं ते याचमुळे. सचिन/द्रविड/धोनीला Sledging करण्याचा प्रयत्नही कुणी करत नाही. विरूच्याही वाटेला कुणी जात नाही. गंभीर, युवी, रैना, विराट यानी हेच शिकायला हवं. 'अरे का का रे' म्हणा पण त्यासाठी विकेट गमावू नका.

माझ्या दॄष्टीने गंभीरमधे हा एकच वीकपॉईंट आहे..

Pages