क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंडीज दौर्‍यासाठी (फक्त एकदिवसीय सामन्यासाठी) गंभीरला कर्णधार केलंय. इतर खेळाडू असे आहेत -
रैना, पार्थिव पटेल, कोहली, युवराज सिंग, बद्रिनाथ, रोहित शर्मा, हरभजन, आर अश्विन, प्रवीण कुमार, इशांत शर्मा, मुनाफ, विनय कुमार, युसुफ पठाण, अमित मिश्रा, बुध्दिमान साहा

यापैकी बद्रिनाथ, रोहित शर्मा, इशांत शर्मा, विनय कुमार, युसुफ पठाण आणि बुध्दिमान साहा यांना पूर्वी बरेच वेळा संधी मिळून ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांना परत कशाला घेतलं? त्यांच्यापैकी काहीजणांऐवजी सौरभ तिवारी, रायडू, इं. ना संधी द्यायला पाहिजे होती.

मास्तर त्याचं नाव बुध्दिमान साहा नाही वृद्धिमान साहा आहे. का तू गमतीत लिहीलंयस तसं?

>> त्यांना परत कशाला घेतलं?
पूर्वी अपयशी ठरले म्हणून परत ठरतीलच असं काही नाही. समजा ठरले तरी परत संधी द्यायचीच नाही हेही काही बरोबर नाही. सौरभ तिवारी, रायडू ला पण मिळेलच कधी तरी. तू ओरडून घसा कोरडा करू नकोस. या बाफ वरच वर्ल्ड कप चालू असताना 'धोनीला काढा' असा धोशा लावलेला होता. पुढे काय झालं ते सब दुनिया जानती है!

बद्रिनाथ >> मूळात टेस्ट कॅलीबरच्या खेळाडूला ODI मधे संधी दिलेली तेंव्हा हे ग्राह्य धरू नये.

>>> पूर्वी अपयशी ठरले म्हणून परत ठरतीलच असं काही नाही.

चिमण,

तू भलताच आशावादी आहेस. रोहित शर्मा, इशांत शर्मा, युसुफ पठाण यांना गेल्या ४ वर्षांत भरपूर संधी मिळालेली आहे आणि अनेक वेळा अपयशी होऊन त्यांनी आपल्या निवडीबद्दल पश्चाताप व्यक्त करायला लावलेला आहे. युसुफ पठाणने २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ६ डावात मिळून एकूण ५४ धावा केल्या होत्या. तरीसुध्दा त्यांना घ्यावं असं तुला वाटतंय!

वृध्दिमान साहा हा वनडेचा खेळाडू नाही. फार तर कसोटी सामन्यासाठी त्याचा विचार करता येईल. विनयकुमार हा फक्त २०१० च्या आयपीएल मध्ये चांगला खेळला. तो, नमन ओझा इ. ना संधी दिल्यावर त्यांना काहिही करता आलं नाही. ते फक्त आयपीएलचेच खेळाडू आहेत. विनयकुमार तर यावर्षीच्या आयपीएलमध्ये सुध्दा फेल आहे.

त्यातल्या त्यात बद्रीनाथचा विचार करता येईल. त्याच्यात कॅलिबर असले तर ते दिसेल लवकरच. घोडामैदान फार दूर नाही.

हो मी आशावादी आहे आणि तेव्हढंच आपल्या हातात आहे बरे मास्तरा! Wink
तू कितीही बोंब मारलीस तरीही घेतलेल्या कुणालाही ते वगळणार नाहीत(दुखापत झाल्याशिवाय) तेव्हा रिलॅक्स अँड एन्जॉय!

बद्रीनाथला संधी मिळाली हे चांगलं झालं. चांगला खेळतो तो.
युसूफ पठान = अफ्रिदी.. सामन्याच्या पहिल्या चेंडूला षटकार मारला की आपण जिंकलो असं बिनडोक खेळणारे.
विनयकुमार इथे ना तिथे. म्हणजे वेग नाही, स्वींग नाही, स्पीन नाही
वॄध्दीमान हा पटेलला बॅकप राहील.
रोहित शर्मा.. कधी गरम कधी थंड...

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघ निवडले गेले. गंभीर, सचिन, सेहवाग, युवराज नाहीत. द्रविड नि लक्ष्मण कसोटी सामन्यांसाठी, रैना कसोटी खेरीजच्या सामन्यात कर्णधार.

नवीन लोकांना उत्कृष्ठ संधि. यातूनच उद्याचे सुनिल, सचिन निर्माण होतील. तेंव्हा तुम्ही सर्वजण लहान असाल, पण वेस्ट इंडिज दौर्‍यातच सुनिल गावास्कर प्रथम चमकला नि नंतर अनेक वर्षे उत्तम फलंदाज म्हणून गाजला, असे त्याने स्वतः सहि करून दिलेल्या त्याच्या चरित्रात मी वाचले. नाहीतर इथे बसून मला काही समजत नव्हते, भारतात कोण क्रिकेट खेळाडू अहेत, काय करताहेत वगैरे.

आजच्या सामना मधील बाळ ठाकरेंचे सचिन विषयीचे विधान :

" ‘मराठी’ सचिन तेंडुलकर याच्या विक्रमांचा अभिमान आहेच, पण खेळाडू देशाचे असतात हे मान्य. मात्र ‘मुंबई’ ही अख्ख्या देशाची हे त्याचे म्हणणे अजिबात मान्य नाही. त्याची कामगिरी देशासाठी गौरवशाली असली तरी तोही पैशांसाठी खेळतो हे विसरू नका. त्याची दानतही स्वत:च्या खिशाला खार न लावता वस्तू लिलावासाठी देण्याची असत"

(ठाकरेंच्या इंटरव्ह्यु मधील व्हिडीओ मधे तरी मला असे काही वाक्य आढळले नाही.)

<< तरी तोही पैशांसाठी खेळतो हे विसरू नका. >> अगदी खरंय ! पैशासाठी कुणी क्रिकेट खेळतो, तर कुणी राजकारण ! शिवाय, अख्खं क्रिकेटविश्व ज्याला आदर्श क्रिकेटपटू मानतं तो जर मराठी असेल, तर त्याला खाली खेचण्याची पारंपारिक जबाबदारीही शेवटी मराठी माणसावरच येते ना !!

भाऊ Happy

>>> शिवाय, अख्खं क्रिकेटविश्व ज्याला आदर्श क्रिकेटपटू मानतं तो जर मराठी असेल, तर त्याला खाली खेचण्याची पारंपारिक जबाबदारीही शेवटी मराठी माणसावरच येते ना !!

भाऊराव,

अनुमोदन. तुमचे वाक्य खालीलप्रमाणे हवे.

"शिवाय, अख्खं क्रिकेटविश्व ज्याला आदर्श क्रिकेटपटू मानतं तो जर मराठी असेल, तर त्याला खाली खेचणे हे सर्व मराठी माणसांचे आद्य कर्तव्य आहे."

>>> वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघ निवडले गेले. गंभीर, सचिन, सेहवाग, युवराज नाहीत.

बीसीसीआयने म्हणे गौतम गंभीर जखमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता काय उपयोग? बीसीसीआयनेच आयपीएल नावाची जत्रा सुरू केली, क्रिकेटपटूंचा बाजार मांडला आणि भरपूर पैसा कमवला. मग आता का तक्रार करता?

हे आयपीएल लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. खेळाडू आता आपल्या देशासाठी खेळण्याऐवजी ह्या जत्रेला जास्त प्राधान्य देत आहेत. गेल, पोलार्ड, ब्राव्हो, मलिंगा आपल्या देशासाठी न खेळता इथे घाम गाळत आहेत. पुढच्या वर्षी अशा खेळाडूंची संख्या खूप वाढलेली दिसेल.

फार पूर्वीची गोष्ट नाही; इंग्लंडच्या वर्तमानपत्रांत भारताच्या दौर्‍यासाठी इंग्लंडनं "बी" संध खेळवावा, कसोटी सामने तीन दिवसांचेच ठेवावेत असं लिहीलं जायचं व तें वाचून इंग्लंडच्या मग्रूरीचा राग व किळस यायचा. वेस्ट इंडीजमधील या भारतीय संघनिवडीवरची प्रतिक्रिया कांहीशी अशीच झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही !

भाउ खरे आहे.

फक्त आजचा इंग्लंडचा पराक्रम पाहिलात का? शेवटच्या दिवशी अवघ्या ९६ धावांची आघाडी घेऊन, डाव घोषित करून, श्रीलंकेला फलंदाजी दिली. ते सुद्धा अँडरसनसारखा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नव्हता तरी. पण अहो आश्चर्य! श्रीलंकेसारख्या विष्वचषक उपविजेत्या संघाला त्यांनी चक्क ८२ धावात सर्व बाद केले! सामना अनिर्णित राहील अशी जवळ जवळ निश्चिती असताना, कारण बर्‍याच 'पंडितांना' तसे वाटले म्हणून, १ डाव नि १४ धावांनी घसघशित विजय मिळवला!!

धन्य, धन्य! स्वान ने १६ धावात ४, ट्रेम्लेटने ४० धावात ४ नि ब्रॉड ने २१ धावात २ असे गदी बाद करून अवघ्या २४.४ षटकात श्रीलंकेला गुंडाळले! या श्रीलंकेने विश्वचषक सामन्यात कदाचित्, २० षटकात, फरसे बळी न देता, ९६ पेक्षा किती तरी जास्त धावा केल्या असतील!

आत मात्र कसोटी सामनेहि बघण्याजोगे होतील अशी आशा आहे.

<< आणि सगळे साधारण दोन दिवसाचा खेळ पावसानी वाया घालवल्यावर घडले.. >> आणि सगळे साधारण दोन दिवसाचा खेळ पावसानी वाया घालवल्यामुळेच घडले.. !!! Wink

मुरलीधरन आणि मलिंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा संघ अत्यंत दुबळा झालेला आहे. जर त्यांना चांगले गोलंदाज सापडले नाहीत तर काही काळातच तो संघ १९८० च्या दशकातल्या संघासारखा होईल.

कमाल आहे आपल्या लोकांची. पिच स्लो आहे हे मान्य पण बॉल कसे खेळावेत? अगदी ५ वी फ सारखे रोहित खेळत आहे. फक्त पार्थिव आणि बद्रीनाथ थोडी तरी लढत देत आहेत पण बाकीचे? निदान १२० व्हायला हवेत. तो रेडा अजुनही आहे, निदान त्याला दोन तरी ओव्हर्स मिळाव्यात. रोहित आउट हो बाबा! येउदे पठाणला.

चला, वेस्ट इंडिजच्या दौर्‍याची सुरुवात तरी चांगली झाली.
जरी रैना नि कोहलीने निराशा केली तरी बद्रिनाथ, शर्मा, पटेल यांना जमू लागली आहे फलंदाजी असे दिसते, म्हणजे निदान धावा काढण्याच्या दृष्टीने. बाकी कशी काय फलंदाजी केली, चुकीचे फटके मारले की बरोबर, किती वेळा बाद होता होता वाचले ते माहित नाही.

कुणी बघतंय का आजची मॅच ? वे.इं. २१४. भारत ३४-२. पार्थिव व कोहली दोघेही निष्काळजीपणे बाद .

पण सामना जिंकला. शिखर धवन, रोहित शर्मा नि रैना यांनी मिळून बर्‍याच धावा काढल्या. शेवटी हरभजन ने छक्का मारून विजय पक्का केला.
आता हाच नियम झाला आहे का, की छक्का मारूनच जिंकायचे? एक एक धाव करून नाही?
सर्व नवीन खेळाडूंना चांगली संधि मिळाली आहे. यातूनच उद्याचे गावास्कर, कपिल देव नि कुंबळे तयार होतील.

मी बघितली मॅच. अतिशय कंटाळा आला होता मध्ये. नंतर बंद केली, मग परत दोन मिनिटांनी चालू केली. Happy एकंदरीत एकुण कंटाळवानीच मॅच होती आजची.

पार्थिवला धांवचीत केलं तें 'इलेक्ट्रीफायींग' होतं . बाकी जरा मरगळच जाणवत होती. कोहलीला आवाक्याबाहेरच्या चेंडूला बॅट घालण्याच्या खास भारतीय रोगाची लागण झालीच असं दिसतंय ! तो बिशू चेंडू इतके छान वळवतो पण डोकं वापरत नसावा. त्याला चांगला प्रशिक्षक मिळाला तर तो खतरनाक ठरूं शकतो , असं मला वाटतं. मी ही भारताचे तीन बाद झाल्यावर बंद केला टीव्ही.

मास्तरा, रोहीत शर्मा खेळला बरं! नाही, त्याला का घेतला म्हणून तू उगाच भुई धोपटत होतास म्हणून सांगीतलं हो! Wink

Pages