क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी आहे तो, ५०० चा तरी लीड घ्यायला बघणार>>>>>>>>
तरी नशीब डाव डिक्लेअर केला.
ते भांडणाच मी पण टाइम्सला वाचल.
तमिमनी खिमाच केला सगळ्या गोलंदाजांचा.>>> हो रे हो. तो वन्डेच्या स्ट्राइकरेटने हाणत होता.
मॅन ऑफ द मॅच कोण आहे?? जहीर का? ७ विकेत ह्या डावात.

बांगले चांगले खेळले पण. अगदीच एकतर्फी झाले नाही. नाहीतर पूर्वी त्याना कोणी सिरिअसली घेतच नसत. मॅचही पाहत नसे त्यांची कोणी... भविष्यात चॅलेन्जिन्ग टीम होइल असे वाटते. त्याना एक्सपोजर मिळायला पाहिजे

आजच्या मॅचबद्दलचा ट्रिविया - सौजन्यः cricinfo

This isn't the first time a team has chased down a target without any of their batsmen scoring a run. It has happened at least once before, when a no-ball from Syed Kirmani gave West Indies a win in Barbados in 1983.

>>कदाचीत मनिष पांडेला टीममधे घेतील पण..
नाही घेत. घेतले तरी त्याला खेळवणार नाही धोनीबा.

कालच्या झहीरच्या विकेट्स आणि ओझाने घेतलेली विकेट - ते बॉल्स खल्लास होते.
मुरलीचा कॅचपण जबर्दस्त !

मी मॅच पाहिली नाही, पण आक्रमक फिल्डिंग लावल्याने तसे झाले असेल. अशा होपलेस सिच्युएशन मधे एखादा उठतो आणि बोलर्स ची धुलाई करतो असे बर्‍याच वेळा झालेले आहे. त्याने मॅच च्या निकालात काही फरक पडत नाही. कदाचित आता आपण जिंकत नाही हे लक्षात आल्यावर काही प्रेशर न घेता खेळल्यामुळे तसे खेळता येत असेल. लक्ष्मण नंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध बर्‍याच चांगल्या इनिन्ग्स खेळला पण त्याची २००० सालची सिडने ची खेळी अशीच होती.

...पण त्याची २००० सालची सिडने ची खेळी अशीच होती.
>>
कुंबळे आणि आगरकरच्या लॉर्ड्स वरच्या टेस्ट सेंच्युरीज पण अशाच...

>>...पण त्याची २००० सालची सिडने ची खेळी अशीच होती.
>>
कुंबळे आणि आगरकरच्या लॉर्ड्स वरच्या टेस्ट सेंच्युरीज पण अशाच...
>>
Happy १००% खरे..

आज टीम ची घोषणा होणार आहे साउथ अफ्रीका सिरीज साठी..

बांगले चांगले खेळले पण. अगदीच एकतर्फी झाले नाही. नाहीतर पूर्वी त्याना कोणी सिरिअसली घेतच नसत. मॅचही पाहत नसे त्यांची कोणी... भविष्यात

>>
च्या मारी , माझ्या या विधानाचा चक्क 'अन्नुलेख' करण्यात आला. Angry

पण 'साहेबा'नी हेच नन्तर बांगला देशाच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन बांगल्याना सांगितले आणि शाबासकी दिली.
म्हणजे इथं 'काय' म्हनतोय याच्या ऐवजी 'कोण' म्हणतोय याला महत्व आहे Sad
दि.२८ चा म.टा.

सचिन तेंडुलकरची बांगलादेशाला शाबासकी

चमकदार कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकरने बांगलादेशाला खास त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन शाबासकी दिली. कसोटी मालिकेचा बक्षीस समारंभ आटोपल्यावर सचिन बांगलादेशचे सहाय्यक प्रशिक्षक खालिद महमूदसह खेळाडूंना भेटायला गेला होता. 'दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत फलंदाजांनी टाकलेल्या नांगीचा अपवाद वगळता, बांगलादेशाने छान कामगिरी केली', असे कौतुकोद्गार सचिनने काढले

साहेब सर्वात सिनियर आहेत ना म्हणून गेले असतील समजूत काढायला....
बांगलादेशच्या खेळणार्‍या ११ जणांच्या सामन्यांची बेरीज पण साहेबांनी खेळलेल्या सामन्यांएवढी नसेल

नंद्या... एकदमच भारी...

किरु... पाँटिंग कोणता रेकॉर्ड मोडेल असे तुला वाटले म्हणुन तू ही तुलना पोस्ट केलीस.. का त्याला कुठलेच रेकॉर्ड मोडता येणार नाही असे तुला म्हणायचे आहे...

वनडे रेकॉर्डच्या तुलनेत काही अर्थ नाही कारण साहेब तब्बल १०० वनडे जास्त खेळलेत, अ‍ॅव्हरेजमधे फार फरक नसल्याने पॉटींगने तेवढ्या वनडे खेळल्या असत्या तर.... अर्थात हा हायपॉथेटीकल प्रश्न आहे. प्रत्यक्षात असे होणे नाही त्यामुळे तिथे साहेबच टॉपवर राहणार.
टेस्टमधे मात्र साहेबांचे अ‍ॅव्हरेज कमी असूनही पाँटींग त्यांना कधी गाठू शकेल असे वाटत नाही.
फिटनेस हीच बॉटमलाईन ठरेल.

टेस्ट मध्ये एकूण धावा पॉन्टिन्गच्या अगदी आवाक्यात आहेत. पॉन्टिन्गचा फॉर्म लक्शात घेता इतरही बाबीत तो गाठू शकेल. कारण साहेबही पुढे पुढे जात असले तरी पॉन्टिन्ग अजून बरेच खेळेल असे वाटते.

>>पॉन्टिन्ग अजून बरेच खेळेल असे वाटते.
तसे तो बोलला देखील आहे. टेस्ट साठी २०-२० खेलने बन्द केले आहे..आणि काही दिवसात ५०-५० सोडेल..
साहेबान्ना पण फिट रहायला हव...शतकान्चे शतक झालेले खुप आवडेल...:)

द. आफ्रिके विरुद्ध टीम जाहिर झाली...
सौजन्य: www.cricinfo.com

India squad for first Test: MS Dhoni (capt/wk), Virender Sehwag, Gautam Gambhir, S Badrinath, Sachin Tendulkar, VVS Laxman, Harbhajan Singh, Zaheer Khan, Amit Mishra, Pragyan Ojha, Ishant Sharma, M Vijay, Sudeep Tyagi, Abhimanyu Mithun, Wriddhiman Saha.

Board President's XI: Abhinav Mukund, Parthiv Patel (wk), Ajinkya Rahane, Rohit Sharma (capt), Manish Pandey, Cheteshwar Pujara, Abhishek Nayar, Piyush Chawla, R Ashwin, R Vinay Kumar, Abhimanyu Mithun, Shikhar Dhawan, Umesh Yadav, Manpreet Gony.

बिचारा कार्तिक.. चांगला खेळूनही बाहेर... आणि बद्रिनाथला परत संधी..

शतकान्चे शतक झालेले खुप आवडेल...

मग आता मग आता पॅरॅग्वे, उरुग्वे, सिएरा लिओने,बेनिन, टोगो, मायनामार, इ. देशांना कसोटी दर्जा द्या. नि त्यांचे एकामागून एक, एक दिवशीय व कसोटी सामने भारतातच ठेवा. एकटा तेंडूलकर, त्या देशाच्या खेळाडूंचे जाणे येणे, भारतात रहाणे इ. सगळे खर्च करू शकेल. शिवाय भारतातले लोक सामने बघायला जातीलच. इथले बेसबॉल चे खेळाडू जसे सीझनमधे १६२ सामने खेळतात, तसे दररोज खेळायचे. म्हणजे शंभर शतके २०१० संपायच्या आत पूर्ण होतील. भारतातल्या सगळ्याच खेळाडूंचे निरनिराळे विक्रम होतील.

त्यातून मिळालेल्या पैशातून शरद पवार सहज पंतप्रधान बनू शकतील. नाहीतरी बाकी त्यांना काय करायचे आहे, क्रिकेटचे काय होते याच्याशी!

कैफ ला घ्यायला हवा होता असे वाटते. सध्या फॉर्म मधे दिसतोय. तसेही अशा खेळाडूंचा फॉर्म ठरवणे खूप अवघड असते. पण त्याला एक दोन दौर्‍यातच सलग चान्स मिळालाय आत्तापर्यंत. गांगुली आणि द्रविड कप्तान असेपर्यंत तो होता.

पॉंटिंग २००७ पर्यंत खूप जबरदस्त फॉर्म मधे होता, पण गेली दोन वर्षे त्यामानाने कमी झालाय. मी नक्की चेक करून लिहीतो, पण बहुधा गेल्या तीन वर्षातील कसोटी धावा आणि शतके सचिनने त्याच्यापेक्षा जास्त मारली आहेत - १०. आणि हो - त्यातील ३ ऑस्ट्रेलियाविरूद्ध, १ इंग्लंड वि. ३८७ चेस करताना चौथ्या डावात, एक परवा पहिल्या मॅच मधे हलाखीची परिस्थिती असताना, १ न्यूझीलंड मधे. मग आता आहेच बांगलादेश समोर तर मारली म्हणून कोठे बिघडले? Happy

वरची कसोटी सामन्यांची आकडेवारी वाचुन माझा पाँटींगबद्दलचा आदर खुपच वाढलाय (माणुस म्हणुन नव्हे तर खेळाडू म्हणुन). त्याची आकडेवारी extrapolate केली तर सचिन इतकीच प्रभावी आकडेवारी आहे. त्यामानाने त्याला सचिन इतका कधीच आदर मिळाला नाहिये.

एकुण शतकांमध्येही सचिनची ८ शतके बांग्लादेश व झिम्बाब्वे विरुध्द आहेत तर पाँटीगची फक्त २ शतके या संघांविरुध्द आहेत.

अर्थात हे सगळे IMO Happy

हो मान्य. तेवढा भारी आहे तो, त्यामुळेच क्रिकइन्फो ने या दशकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडल्याचे (बॅट्समन मधे तरी) आश्चर्य वाटले नाही.

बाकी शतकांच्या बाबतीत मला असे वाटते की ते सचिन कंट्रोल करू शकत नाही - दौरा असेल त्यांच्याविरूद्द तर तो काय करणार. तसेच अजून ऑस्ट्रेलियाविरूद्ध जर खेळला तर अजूनही मारेल असे वाटते.

सचिन आणि पाँटिंग च्या कामगिरीतला मोठ्ठा फरक-

सचिनला कधीही भारतीय गोलंदाजी फोडून काढायची संधी आली नाही...
आणि पाँटिंगला कधीही ऑसी गोलंदाजीला तोंड द्यावं लागलं नाही...

त्यामानाने त्याला सचिन इतका कधीच आदर मिळाला नाहिये.

>>
आणि मिळणारही नाही. सचिनच्या प्रतिमेत त्याच्या जबरदस्त कामगिरीचा जेवढा वाटा आहे तेवढाच त्याची ऋजुता, नम्रपणा, सुसंसकृतपणा याचाही आहे. त्या बाबतीत पॉन्टिंगची पाटी कोरीच आहे...
पण पाँटिंगच्या कर्तृत्वात कॅपटन्सीचे ओझेही आहे. ते साम्भाळून त्याने एवढे केले आहे... त्या बाबतीत सचिन मात्र यशवी झाला नाही. त्यात अझरुद्दीन आणि गांगुली यांचा काड्याघालूपणाचाही मोठा वाटा आहे....

त्यात अझरुद्दीन आणि गांगुली यांचा काड्याघालूपणाचाही मोठा वाटा आहे....>>> गांगुली तेव्हा तेवढा मोठा नव्हता (सचिन ने कप्तानपद २००० साली सोडले). मला वाटते सचिनने बोर्डाशी भांडण्यापेक्षा बॅटिंगवर लक्ष केंद्रित केले. त्याला एक सो एक अफाट खेळाडू मिळाले होते - नोएल डेव्हिड तर संघात निवड झाली तेव्हाही त्याला माहीत नव्हता. गुंडाप्पाच्या कृपेने ९६ च्या आसपास अर्धे खेळाडू कर्नाटक चे होते (सुजीत सोमसुंदर आठवतोय का? तसेच सुनील जोशी ई.). गांगुलीचे त्याबाबतीत बरे होते कारण दालमिया जोरात होता तेव्हा.

पॉन्टिंग चे कप्तान म्हणून फारसे कौशल्य वाटत नाही. उलट बोर्डर, टेलर, वॉ ने इतकी वर्षे टिकवलेली किर्ती बरीच कमी झाली त्याच्या काळात.

सचिन आणि पाँटिंग च्या कामगिरीतला मोठ्ठा फरक->>
१. crickinfo वरच article होते ज्यात ह्या्त दोघांच्या विरुद्ध खेळलेल्या ballers ची सरासरी दिली होती. ती बघून काय ते ठरवायचे.
२. Longevity चा मुद्दाही आहेच परत. २० वर्षे vs १० वर्षे
३. ज्यांनी २००१ मधे हरभजनसमोर चाचपडणारा Ponting पाहिला असेल त्यांच्यासाठी बाकी सगळे दुय्यम ठरावे Happy म्हणजे सचिन काही ठराविक प्रकारे बरेचदा गचकला कि जसा स्वत:ला adjust करत आला तसे Ponting ला नीट जमले नाही. कदाचित genius आणि ग्रेट मधला फरक असेल हा.

सहमत.
शिवाय ऑसी टिम मध्ये तो सोडूनह इतरही खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्म करायचे. गेले काही वर्षे सोडले की सच्या गेला की लोक टिव्ही बंद करायचे. हे सच्यालाही माहीत आहे, त्या प्रेशरमध्येही तो खेळायचा.
पाँटिंग चागला खेळाडू आहे, व्यक्ती नाही म्हणून तो आवडत नाही, त्यापेक्षा त्याचाच टिम मध्ये असणारे अनेक लोक आवडतात. उदा शेन वॉर्न, ब्रेट ली सारखे.

Pages