Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
आणि आता सचिन अत्यंत वेडेपणा
आणि आता सचिन अत्यंत वेडेपणा चालू करेल.. कितीही वाईत बॉल आला तरी तो बचावात्मकच खेळेल आणि मग मुरली अशक्य हावभाव करत भयानक बॉलींग सुरु करेल की मग तर लागलीच वाट...
सचिननी फार बचावत्मक खेळता कामा नये नाही तर मुरली आणि हेरात बसलीतच डोक्यावर...
>मुरली अशक्य हावभाव करत अगदी
>मुरली अशक्य हावभाव करत
अगदी अगदी...
सचिन ने भिंत व्हायला जावू नये...
वाचली बाबा एकदाची मॅच.. आणि
वाचली बाबा एकदाची मॅच.. आणि ती पण सचिनच्या शतकाच्या बरोबर.... आणि नाबाद म्हणजे तिसर्या डावातला अॅव्हरेज वाढला साहेबांचा....
होय... पण हे शतक नाही
होय... पण हे शतक नाही बघवले...... (सनी देवल ने एखाद्या साईड हिरो ला मदतीला घेवून दोन चार कच्च्या बच्च्याना चित्रपटात धुतले तर कसे वाटेल, तसेच!)
आणि तरिही सन्नी (गवास्कर) महाराज स्तुती सुमने उधळायचे काही कमी करत नव्हते.
(सनी देवल ने एखाद्या साईड
(सनी देवल ने एखाद्या साईड हिरो ला मदतीला घेवून दोन चार कच्च्या बच्च्याना चित्रपटात धुतले तर कसे वाटेल, तसेच!)>>>
<<पण हे शतक नाही बघवले......
<<पण हे शतक नाही बघवले...... >>
पटापटा शतक काढून बाद व्हायचे, नि परत येऊन पॅड सोडेस्तवर आणखी दोन, चार गडी परत आलेले बघणे नि सामना हरल्याचे दु:ख नको असल्याने तो सावकाश खेळला. असा आपला माझा अंदाज. बोलून चालून ही काहि ५०-५० किंवा २०-२० मॅच नाही.
या अशा पाटा खेळपट्टीवर
या अशा पाटा खेळपट्टीवर धावांचे पाट वाहिलेले पाहता एकंदरीत गेली दहा वर्षे क्रिकेट चे सडा संमार्जन या बाबतीत bcci ची पाटी अजूनही कोरीच आहे हे दिसून येते. च्यामारी एकवेळ T20 (Test 20) घेतली असती तरी निकाल लागला असता. माझ्या मते काल अमित मिश्रा ने २४ धावा पटकावल्या तेव्हाच सामन्याचा निकाल लागला होता. सचिन ९८ वर असताना पंचाने त्या गोलंदाजाला चक्क प्रेमाचा सल्ला दिलेला बघितला का कुणी? मला तर इथे दुबई मधे स्पष्ट ऐकू आले, तो म्हणला: अरे हर्या (हेराथ), याला २ धावा हव्या आहेत अन आपल्याला लवकर घरी जायचे आहे, तेव्हा जरा चेंडू बॅट वर टाक. (अन्यथा आधिची पाच सहा षटके सगळे चेंडू वेलेगेडारा आणि कंपनी दहाव्या यष्टीवर फेकत होते)
असो. सामना वाचला...
पण जंबो असता तर बहुतेक काहितरी घडामोडी झाल्या असत्या बहुदा. अशा कितीतरी पाटा विकेट वर त्याने रक्ताचे पाणी करून आपल्याला विजय मिळवून दिले आहेत.
मला अहमदावाद च्या पब्लिक चं कौतुक वाटतं राव. इतक्या मोठ्या संख्येने शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले जणू काही एकदिवसीय सामना आहे अन त्यांच्या वाट्याला काय आले तर रटाळ क्रिकेट.
यापेक्षा शारदाश्रमचे सामने अधिक चुरशीचे होतात हे सचिन नक्की कबूल करेल.
on that note well done "pitch".
लागोपाठ दुसर्या कसोटी
लागोपाठ दुसर्या कसोटी सामन्यात पाटा खेळपट्टी बनवून काय मिळविले बीसीसीआय ने? आधीच कसोटी क्रिकेटला वाईट दिवस आलेत. त्यात अशा पाटा खेळपट्टीवर निरस सामने व्हायला लागले तर लवकरच कसोटी क्रिकेटचे निधन होईल. कानपूरच्या खेळपट्टीवर इशांत शर्मा, भजी इ. खालची मंडळी सुद्धा त्रिशतक करतील.
भारत दुसर्या दिवस अखेर ८ बाद
भारत दुसर्या दिवस अखेर ८ बाद ९०० धावा करून डाव घोषित करेल. ५ व्या दिवस अखेर श्रीलंकेची पहिल्या डावातली धावसंख्या ७ बाद १३०० असेल व सामना अनिर्णीत राहिल.
हाहाहा... शक्य आहे.. मला
हाहाहा... शक्य आहे..
मला वाटतं उद्या चहापानापर्यंत ७५० करून लंकेला शेवटच्या सत्रात १५ ओव्हर्स खेळायला देतील.
खेळपट्टी निदान शेवटचे दोन दिवस तरी करामत दाखवेल (तेव्हडेच बाकी होते पहिल्या सामन्यात).
हे वाचा:
http://www.cricinfo.com/indvsl2009/content/current/story/436295.html
फॉलो ऑन लादला आहे खरा. पण
फॉलो ऑन लादला आहे खरा. पण खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी चांगली आहे. एक दोन विकेट सोडता लंकेचे फलंदाज (विशेषता: वरच्या फळीतील) स्वताच्या चूकीने बाद झाले आहेत. त्यामूळे पुन्हा फलंदाजीला येवून त्यांन्नी ४००+ केले तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातही संगा, दिलशान, माहेला परत "लागले" तर दोन दिवस खेळूनही काढतील अन भारताच्या धावसंख्येला पारही करतील.
या सामन्यात भारताचा पराभव अशक्य असला तरीही लंकेचा पराभव अट्ळ आहे असे अत्ता म्हणता येणार नाही. ऊद्या ऊपाहारापर्यंत चित्र स्पष्ट होईल असे वाटते.
खेळपट्टी उर्वरीत दोन दिवसात किती वळते अन तुटते यावर बरेच काही अवलंबून असेल अन्यथा आपल्याकडे "भेदक" गोलंदाजी नावालाही नाही. केरळा एक्स्प्रेस चांगली धावते आहे हे मात्रं खरं
खरं तर दोन दिवस गोलंदाजी केल्यावर धोणीने (आवश्यक नसले तरी) गोलंदाजांन्ना थोडी विश्रांती देवून आज दिवस अखेर अजून १५०+ धावा कुटून उद्या लंकेला खेळायला दिले असते तरी चालले असते. याचे दोन फायदे झाले असते:
१. शेवटच्या डावात आपल्याला खेळायला लागायची सुतराम शक्यता ऊरत नाही.
२. गोलंदाज ऊद्या नव्या दमाने मैदानात ऊतरू शकतात आणि आपल्या फलंदाजीमूळे खेळपतट्टी तुटायला मदत झालेली असेल.
*****************************************************
अरे हा अपडेट लिहीतानाच लंकेचा दिलशान आऊट झाला की. The jinx is still on ...

(पुढील विकेट लवकर पडली नाही तर येतोच अपडेट द्यायला काय मंडळी?)
श्रीसांथ पाच विकेट्स घेइल
श्रीसांथ पाच विकेट्स घेइल स्वप्नातही वाटले नव्हते.. आता दिलशान ला ही त्यानेच काढले..
लगे रहो श्रीसांथ...
योग लवकर या अपडेट्स द्यायला
येतो रे भाऊ... विकेट थोडी
येतो रे भाऊ...
विकेट थोडी वळते आहे असे वाटते..
****************************************
अरे गेला ही एक पुन्हा: परन्विताना.
चार गेले राव..
चार गेले राव..
आज चार गेलेत. श्रीशांतला
आज चार गेलेत.
श्रीशांतला चांगलाच सुर गवसलाय.
हावभाव, इशारे कमी करुन गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलय.
योग... ह्या कसोटीत फारच अघटित
योग...
ह्या कसोटीत फारच अघटित गोष्टी घडत आहेत... आता इथून पुढे चमत्कार झाला तरच श्रीलंकेचा पराभव वाचेल बहुतेक..
>ह्या कसोटीत फारच अघटित
>ह्या कसोटीत फारच अघटित गोष्टी घडत आहेत...
हो ना... मेंडीस चे शतक होणार बहुतेक
एकंदरीत या खेळपट्टीत अन भारतीय गोलंदाजीत विशेष घाबरण्यासारखं काही नव्हतं हेच पुन्हा समरवीरा, मुरली, अन मेंडीस ने सिध्ध केलय. बहुतांश लंकेच्या फलंदाजांन्नी आपल्या विकेट दील्या असे मी म्हणेन. आपल्या गोलंदाजांन्नी रतीब घातला अन ते चुका करत गेले. अशा खेळपट्टीवर फलंदाजावर दबाव आणणे अन चुका करायला भाग पाडणे हे महत्वाचे. ओझाच्या अचूक अन संयत गोलंदाजीने हेच काम केले हे मात्र खरे.
आता बघुया अजून किती काळ झुंज देतायत...
जिंकले रे एकदाचे.
जिंकले रे एकदाचे.
शंभराव्वा कसोटी विजय...
शंभराव्वा कसोटी विजय...
भारतीय वाघापुढे लंकेच्या
भारतीय वाघापुढे लंकेच्या सिंहाची सपशेल शरणागती...
आयला कसलं भारी हेडींग सुचलय मला...
भारत नं १. आता किती दिवस
भारत नं १.
आता किती दिवस टिकवतो ते बघायच.
नंतर एडिट्लय,
भारत अजून नं १ नाही. पुढची जिंकली तर मग होणार.
आयसीसी च्या साईटवर अजून नंबर
आयसीसी च्या साईटवर अजून नंबर ३च दिसतोय...
माझ्यामते आपली सध्याची टेस्ट
माझ्यामते आपली सध्याची टेस्ट बॅटींग लाइन आता पर्यंतची सर्वोत्क्रुष्ट आहे.
सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे फॅब फोर मधले आहेतच. शिवाय, विरू, गंभिर, आणि धोनी.
युवी पण आहेच पण त्याच्या ऐवजी रैना चालेल. त्यांच्या रन्स आणि शतक एकत्र केली तर जगातली आतापर्यंतची कुठलीही टीम जवळपासही येउ शकणार नाही.
गंभिर तर खूपच छान खेळतोय, सगळ्याच प्रकारात.
आपल बॉलिंग आणि फिल्डिंग डिपार्ट्मेंट मात्र गंडलय.
आणि कॅप्टन लकी आहे. टॉस हरलो असतो तर असाच निकाल लागला असता का?
सेहवाग चे २०० होईपर्यंत
सेहवाग चे २०० होईपर्यंत मुद्दामून ईथे अपडेट द्यायला येत नव्हतो:

हे पहा एका ओव्हर मधे साहेब १८६ वरून २०२ वरः. या एका बाबतीत सेहवाग हा सचिन अन द्रविड पेक्षा लय लय भारी वाटतो
------------------------------------------------------------------------------------
End of over 57 (18 runs) India 330/1 V Sehwag 202* (168b 27x4 6x6) KMDN Kulasekara 12-0-84-0
R Dravid 35* (56b 5x4) HMRKB Herath 17-1-89-1
56.6
Kulasekara to Sehwag, FOUR
56.4
Kulasekara to Sehwag, FOUR, three in a row. 196 now. 100 of the partnership is also up. It was going down the leg side, poor delivery, and Sehwag plays the leg glance
56.3
Kulasekara to Sehwag, FOUR, moves to 192 with a flick shot. Angelo runs across from deep backward square-leg but is unable to cut it off
56.2
Kulasekara to Sehwag, FOUR, short in length and outside off stump, flashed away to the point boundary. Dravid likes it and punches the gloves
56.1

Kulasekara to Sehwag, no run, short in length, outside off stump, mistimes the cut shot
-------------------------------------------------------------------------------
महान, आचाट, अशक्य, अतर्क्य........... अजून काय विशेषणे आहेत का कुणाकडे? सेहवाग वर आज एक अख्ख पान लिहावं लागेल भाऊ. याने अख्ख्या लंकेलाच (मुंबईच्या) धोबीघाटात धुतला. एक एक फटका म्हणजे आहाहा. लाखाचा कोट... अचंबीत अन स्तंभीत!!!!!!
हा अजून असाच दोन दिवस खेळत रहावा असं वाटतय.........
ही one day आहे का test? लंकेच्या खेळाडूंन्ना विचारायला हवं: बहुदा 20/20 आहे म्हणतील- द्रविड पण ६० च्या स्ट्राईक रेट ने मारतोय म्हटल्यावर
अरे कुणी लाइव्ह लिंक द्या ...
अरे कुणी लाइव्ह लिंक द्या ... एक होती पण गंडलीय..
सेहेवाग - जो सिक्सर मारुन ३०० करतो...
हो रे...मलाही ईथे बहारीन मधे
हो रे...मलाही ईथे बहारीन मधे पहाता येत नाहीये..

रात्री दुबईला पोचलो की highlights बघेन.
आज दिवसाखेर भारताला १००+ ची बढत मिळाली तर एक विक्रमच होईल. गंभीर च्या बहिणीच्या लग्नाचे फटाके सेहवाग ईथे फोडतोय. अक्षरशः गिरणी उघडली आहे साहेबाने, भरडतोय प्रत्त्येक गोलंदाजाला. सुरसुर्या श्रिकांत नंतर हा आपला official mad max म्हणायचा
३ त्रिशतके करणारा सेहवाग हा
३ त्रिशतके करणारा सेहवाग हा क्रिकेटविश्वातला पहिला फलंदाज ठरणार बहुतेक!
धुतलाय नुसता सेहवागने.
धुतलाय नुसता सेहवागने.
नुसता धुतलाय? पार आपटून आपटून
नुसता धुतलाय? पार आपटून आपटून धुतलाय... वन डे मध्ये पण एवढं कोणी मारत नाही... १२२ चा स्ट्राइक रेट...
थांबा.. घाई करु नका... दिवस
थांबा.. घाई करु नका... दिवस संपला की मगच पुढचे अपडेटस द्या... सेहवाग साहेब आजच ३०० मारायचा विक्रम करण्याच्या बेतात आहेत...
Pages