क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार एंड, धन्यवाद. इतके दिवस जगलो कसा बसा कैफ कोण माहीत नसूनसुद्धा. आता काय थोडेच उरलेत, जातील तेहि.

बद्रिनाथ व विजय.. हे दोन अतिशय फाल्तु प्लेयर्स बहुतेक श्रिकांत तामिळनाडुचा असल्यामुळे निव्वळ त्याच्या वशिल्याने टिममधे आले आहेत. सेहवाग्-तेंडुलकरच्या २४९ च्या अप्रतिम भागीदारीने भारताचे पारडे जे वर झाले होते त्यावर अक्षरशः पाणी फिरवत आहेत ही वशिल्याची तट्टू.. भारतिय फलंदाजीचे भविष्य अगदीच दयनिय दिसत आहे..:(

>>बद्रिनाथ व विजय.. हे दोन अतिशय फाल्तु प्लेयर्स
विजयबद्दल निश्चित सांगू शकतो, की तो चांगला खेळाडू आहे. बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला खेळला आहे. बद्रि - ऑल टॉक; नो अप्लीकेशन.

>>साहेबराव कोपरदुखे पाटील वान्द्रेकर यांचे ४७ वे शतक
हा हा हा!! Happy

साहेबान्चा सध्याचा फॉर्म (४ शतक-४ टेस्ट) बेस्ट आहे म्हणत आहेत मिडियावाले..पण..Form is temporary, class is permanent.

अरे साहेबांचे काय एव्हडे? त्याच्या कारकीर्दीत आता तो खर्‍या अर्थाने निर्धास्तपणे खेळतोय त्यामूळे मला वाटते पुढील प्रत्त्येक सामने मोठी धावसंख्या गाठणार.. गवास्कर ला स्तुती सुमने उधळायला अजून संधी Happy

सेहवाग ज्या प्रकारे खेळतो निव्वळ त्यामूळे सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागायच्या शक्यता अधिक असतात. नाहीतर एरवी सामना वाचवायचा म्हणून आपण खेळत असू. सेहवाग अन गंभीर जोडीने भन्नाट आक्रमकता कसोटी मध्ये दाखवल्याने गेले बरेच सामने आपण जिंकत आलो आहोत असे मला वाटते.
असो. ३०० + ची बढत घेवून पाहुण्यांना खेळायला दिले तर या खेळपट्टीवर भज्जी अन मिश्रा उरलेले सोपस्कार पुरे करतील असे वाटते.

दोन्ही संघ तोलामोलाचे वाटतात: त्यांचेकडे डुमिनी अन प्रिंस अन आपल्याकडे विजय अन बद्री Happy

साहेबांना त्रिवार सलाम!!! आता कसलं टेन्शन नाय, कुणाला काय प्रूव्ह करायचे राहिलेले नाय, एखाद्या कलाकाराने स्वांत: सुखाय म्हणून काहीतरी तयार करावं तसा खेळतोय तो आता.

व्वा! काय पण छान वाटले. ६४३! दुसर्‍या डावात दक्षिण अफ्रिकेला अजून ३४२ धावा करण्याचे आव्हान! चार चार शतके!

पहिल्या कसोटीच्या पराभवाचे उट्टे काढणार!

आता हुरळून जाऊन क्षेत्ररक्षणात ढिलाई केली नाही म्हणजे झाले. माझ्या मते भारतीयांचे तिथेच चुकते. वैयक्तिक पराक्रमात आनंद मानून पुढे अजून संघासाठी काही काम करायचे आहे, सामना जिंकायचा आहे, याचे भान रहात नाही.

हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श.... जिंकले बुवा एकदाचे..... आमलानी रडवलेच होते... पण दुसर्‍या बाजूने खिंडार पडल्याने जिंकले...

जिंकलो शेवटी! पावसाने काल ३-४ तास वाया गेले व ८ व्या आणि १० व्या जोडीने वात आणला तरी जिद्दिने जिंकलो. ८ वा बळी मिळवायला २४ षटके तर १० वा बळी मिळवायला २२ षटके लागली. आमला व कॅलिस आणि पीटर्सनचा एकेक डाव सोडला तर आफ्रिकेचे बाकी सर्व फलंदाज (स्मिथ, ड्युमिनी, डीव्हीलिअर्स, प्रिन्स इ.) पूर्ण मालिकेत अपयशी ठरले. खूप दिवसांनी इतकी क्लोज मॅच झाली. आमला काय खाऊन आला होता कोणास ठाऊक! लागोपाठ ३ डावात शतके (त्यातली २ नाबाद), ३ डावात ४९४ धावा (सरासरी ४९४:00) !! Great Performance ! ! !

एवढ्या गरबडीत सायेबराव कोपरदुखे पाटील वान्द्रेकर यांचे दुसर्‍या इनिंगमधले ४८ वे शतक हुकले की .. ठीक है वो किस्सा फिर कभी....

उद्यापासून सर्व भारतीय फलंदाजांनी आमला सारखी दाढी वाढवावी. म्हणजे ते त्याच्यासारखे दिसतील व तशीच शतके ठोकतील. मागे इंग्लंडचे ग्रेस यांचीहि अशीच लांब दाढी होती. तेंव्हा दाढी वाढवणे हेच योग्य. नाहीतरी आजकाल दोन दिवस वाढलेली दाढी राखणे ही फॅशनच झाली आहे. माझ्या मते तेंडूलकरला सुद्धा छोटीशी दाढी आहे. तीच त्याने वाढवली तर अमला सारखे प्रत्येक इनिंगमधे शतक करेल.

तसेच अमलाप्रमाणे मुसलमान होऊन बायकोला बुरख्यात बसवून खेळायचे हे हि करता येईल.

भारताच्या जलदगती आक्रमणाची आता पंचाईत आहे. झहीर जखमी आहे. इशांत बराचसा निष्प्रभ झाला आहे. उपलब्ध पर्याय सुद्धा फारसे फॉर्ममध्ये नाहीत (इरफान, मुनाफ, रूद्र प्रताप, श्रीशांत, धवल कुलकर्णी, आविष्कार साळवी इ.). कर्नाटकचा विनयकुमार बरा आहे म्हणतात. कदाचित त्याला, इरफान व रूद्र प्रतापला आत आणावे.

>>> नाहीतरी आजकाल दोन दिवस वाढलेली दाढी राखणे ही फॅशनच झाली आहे.

अहो, आमलाची दाढी कमीत कमी दोन दशकांची असेल.

दाढीसाठी तो डाबर आमला (केश तेल) वापरत असावा, किंवा त्या तेलाचे नाव त्याच्यावरूनच आले असावे. आता डाबर ने त्याला ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर करायला हरकत नाही Happy

काल झहीर जखमी झाल्याने बहुधा जास्त वेळ लागला. मुनाफ सध्या कोठे आहे? इरफान तर आयपीएल मधे सुद्धा दिसत नाही यावेळेस?

पण पूर्वी अशा एखाद्या टिकाउ बॅट्स्मन ला तसेच खेळू देउन इतरांना आउट करण्याच्या मागे आपले कप्तान लागत तसाच प्रकार काल झाला की काय? सेहवाग ने बॉल बाउन्ड्री बाहेर 'किक' करणे वगैरे प्रकारातून टीम चा प्लॅन दिसतो.

कलकत्त्याची टेस्ट मॅच जबरीच जिंकलो. मला एक कळत नाही .. बरेच मिडिआवाले असे पोर्ट्रेट करत आहेत की भारत हा कसोटी सामना कसाबसा शेवटचे ९ चेंडु बाकी असताना जिंकला.. पण एक पुर्ण दिवस वाया गेला त्याचे काय? तो जर वाया नसता गेला तर हा सामना आपण अगदी सहज जिंकला असता.. असो. खरोखरच आपला संघ जिद्दीने खेळला. सेहवाग्,तेंडुलकर्,लक्ष्मण,धोनी व हरभजन.. स्तुतीला पात्र आहेत. पण ३५० धावांची आघाडी असुनही धोनीने जी क्षेत्ररक्षण रचना केली होती ती बुचकाळ्यात टाकणारीच होती.

आजचा पहिला एक दिवसिय सामना कसाबसा जिंकलो. त्या श्रिसंथला का म्हणुन घेतात संघात हेही एक कोडच आहे. आणी आर. आश्विन! अजुन एक तामिळनाडुचा वशिल्याचा तट्टू! श्रिकांतला ठणकावुन सांगणारे आपल्या निवड समीतीत कोणीच दिसत नाही... ही अशी उघड उघड वशिलेबाजी आपल्याला वर्ल्ड कप २०११ मधे फारच महागात पडेल. तेंडूलकरच्या दैदिप्यमान कारकिर्द्रीची सांगता आपण २०११ वर्ल्ड कप जिंकुन व्हायची असेल तर या मोकाट सुटलेल्या व आपल्या तामिळनाडुमधल्या बद्री,विजय व आश्विन सारख्या अगदी फडतुस खेळाडुंना संघात घुसवणार्‍या श्रिकांतला निवडसमीतीमधुन हाकलला पाहीजे. नाहीतर हे बद्री,मुरली विजय व आश्विनसारखे वशिल्याचे तट्टू परत एकदा वर्ल्ड कप २०११ मधे.. १०० कोटी भारतियांच्या पदरी निराशाच पाडतील.

माझ्या मते वर्ल्ड कपला भारताचा संघ असा असावा.

तेंडुलकर
सेहवाग
गंभिर
धोनी
युवराज
रैना
अभिषेक नायर
युसुफ पठाण
हरभजन
प्रविण कुमार
झहीर खान

म्हणजे ११ पैकी ९ जण्(धोनी व गंभिर सोडुन) गोलंदाजी करु शकणारे व नंबर ८ पर्यंत फलंदाजी करु शकणारा असा हा संघ असेल.म्हणजे संघाचा बॅलंस खरच चांगला असु शकेल.पहिल्या ८ पैकी ७(नायर बाबत अजुन तसे म्हणता येणार नाही) जण.. कोणीही.. ऑन एनि गिव्हन डे.. मॅच विनर ठरु शकतात. दॅट्स प्रिटी गुड ऑड्स!

बारावा गडी.. विराट कोहली

राखीव गडी:

अमित मिश्रा
इर्फान पठाण
मनीष पांडे
रविंद्र जडेजा

मुकुंद श्रीसंत (याचा नक्की उच्चार काय आहे?) केरळ चा आहे ना? का तो श्रीकांत च्या 'झोन' मधे येतो म्हणून तू असे लिहीले आहेस?

इशांत नाही का चांगला वन डेत?

>>इशांत नाही का चांगला वन डेत?
इशांत चांगला ??? Wink
फक्त एका चान्गल्य सिरीजच्या जोरावर किती दिवस राहणार
१४० चा वेग पण नाही राहिला..

मुकुन्द ,

team चान्गली आहे , पण एकच चूक वाटते .
३ च specialist bowler घेणे risky आहे .
माझ्या मते नायर ऐवजी आणखी १ specialist bowler असेल तर जास्त समतोल होईल .

७ Batsman + zaheer + Harbhajan + Praveen = Not bad Happy

आणी ४ specialist bowler + Jadeja/Pathan(Y) + Yuvaraaj + Sehwag = Good Happy

तुमच काय मत आहे ?

२०११ साठी असा संघ असावा -

तेंडुलकर
सेहवाग
गंभिर
धोनी
युवराज
रैना
रविन्द्र जडेजा
हरभजन
प्रविण कुमार
इरफान पठाण
झहीर खान

बारावा गडी - राहुल द्रविड

राखीव गडी:

नेहरा, अभिषेक नायर, मनीष पांडे, युसुफ पठाण

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने दुखापतींमुळे कसोटी क्रिकेट मधून अकाली निवृत्ती पत्करली. तो ३३ वर्षांचा आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ७६ कसोटीत ३१० बळी मिळवून सुद्धा एका डावात त्याला ५ पेक्षा जास्त बळी त्याला कधीही मिळविता आले नाही, तसेच एका कसोटीत त्याला कधीही १० किंवा जास्त बळी मिळविता आले नाहीत.

Batting and fielding averages
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
Tests 76 90 18 1451 64 20.15 2739 52.97 0 5 182 18 23 0
ODIs 186 92 37 897 57 16.30 1115 80.44 0 2 47 25 44 0
T20Is 17 9 4 91 43* 18.20 63 144.44 0 0 8 4 5 0

Bowling averages
Mat Inns Balls Runs Wkts BBI BBM Ave Econ SR 4w 5w 10
Tests 76 150 16531 9554 310 5/30 9/171 30.81 3.46 53.3 17 10 0
ODIs 186 182 9478 7456 324 5/22 5/22 23.01 4.71 29.2 11 9 0
T20Is 17 17 355 454 17 3/27 3/27 26.70 7.67 20.8 0 0 0

सर सचिन यांचे अजून एक शतक...>>>
गेल्या वेळेस धावबाद झाल्यामुळे चिडून धोपटून काढलेले शतक वाटले.. कुटतो आहे नुसता.. आता करा लगेच त्याची आणि पॉन्टींगची तुलना... काहीच उपयोग नाही त्याचा... साहेब हे साहेबच आहेत आणि रहाणार...

आता करा लगेच त्याची आणि पॉन्टींगची तुलना...
>>
पाँटिंग हा सर सचिन इतका महान होऊच शकत नाही...

त्याचं एकही शतक मॅकग्रा, गिलेस्पी, वॉर्न, फ्लेमिंग, ली अशा बॉलिंग अ‍ॅटॅक समोर काढलेलं नाहिये....

आणि सर सचिनला कधीच नेहरा, ईशांत, सुनील जोशी, निखिल चोप्रा, वगैरेंना फोडून काढायचा चान्स मिळाला नाहिये...

Pages