क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत जिंकला खरा.. पण खरच अश्या मॅच झाल्या पहिजेत का ? एका दिवसात ८०० च्या वर रन्स ?
पिच खराब होते का बॉलिंग भंगार होती, का आपले बॅट्स्मन चांगले खेळले ?
Australia च्या विरुद्ध हैदराबाद ची पण मॅच अशीच..

खरोखर या आधी जेमेतेम २००-२५० रन्स व्ह्यायच्या.. आणि त्यामधली चुरस पहाताना खरच मजा यायची.. ती मजा आता नाही आली.. Sad का हा परिणाम Powerpaly चा आहे ?

असे सामने पाहिले की लक्षात येते की प्रतिपक्षाला एकहि धाव 'देणे' किती धोकादायक आहे. एक चेंडू जास्त मिळता तर चौकार मारून ते जिंकले असते. प्रत्येक वाचवलेली धाव अत्यंत महत्वाची.

तिकडे ऑसिज व विंडीज यांच्यात टेस्ट चांगली चालली आहे. ऑस्ट्रेलियाने ५२०/७ वर डाव घोषित केल्यावर गेलने झंझावती खेळी करत शतक केले [१०२ धावा], पण तो बाद झालाय. जर विंडीजच्या मध्यपळीने व्यवस्थित खेळ केला तर, विंडीजला संधी आहे.

धोणीचे आणखी एक शतक. मस्तच. ९६ वरच बाद व्हायचा, पण वाचला. तसे फारसे महागात पडणार नाही श्रीलंकेला. शतक झाले, पण एकूण धावांच्या हिशेबात फार नाही.

मागच्या सामन्यातल्या ४०० धावांच्या मानाने ३०० एकदम कमी वाटतात. आता बघू गोलंदाज नि क्षेत्ररक्षक काय करतात.

आज अजूनच धमाल येणार. झहीर अन नेहराच्या जोडीला ईशांत ला आणलाय म्हणजे लंका ४२५ करेल बहुतेक Happy
(ईशांत ला बरेच धडे गिरवायचे आहेत अजून):)
आजच्या खेळपट्टीवर गुडघ्याच्या वर चेंडू उसळल्यास बक्षीस ठेवा.

ईशांतच्या २ ओव्हर्स मधे ३१ रन्स...

९६ मधे अशाच २ ओव्ह. मधे ३३ रन्स दिल्यानी मनोज प्रभाकरचं करिअर बरबाद झालं होतं...
ईशांतच्या बाबतीत असं व्हायची सुतराम शक्यता नाही...

ही बांगलादेशात चालू झालेली तिरंगी स्पर्धा उसगावकरांसाठी www.espn360.com वर फुकट आहे. अर्थात आत्ताच एक वन डे सिरीज झाल्याने अजून फारसा इंटरेस्ट नाही. (त्यात सचिन नाही. टेस्ट मॅच ला असेल नंतर).

Hats off To Australia!

पहिल्या डावात फक्त १२७ धावा करून व २०६ धावांच्या पिछाडीने दुसर्‍या डावाची सुरुवात केल्यावर एकवेळ ऑस्ट्रलियाची अवस्था ८ बाद २६१ अशी झाली होती (म्हणजे ८ बाद ५५ आणि जवळपास दीड दिवस शिल्लक होता). पण शेवटच्या चेंडूपर्यंत कधीही हार न मानणार्‍या ऑस्ट्रेलियाने जबरदस्त झुंज देऊन दुसरा डाव ३८१ पर्यंत रेटला व पाकिस्तानचा दुसर्‍या डावात फक्त १३९ धावात खुर्दा करून ३६ धावांनी सनसनाटी विजय मिळविला.

आशुतोश०७११, ...(आपल्या क्रिकेटर्सची हीच खासियात आहे,कधी हातातली मॅच घालवतील सांगता येणार नाही.) हे परत एकदा काल घडल ..

मुंबई पुन्हा रणजी चँपियन! जबरी झाली मॅच फक्त ६ रनांनी जिंकले. रणजी फायनल मधली क्लोजेस्ट असावी. अशा मॅचेसच टेस्ट आणि डॉमेस्टीक क्रिकेट वाचवू शकतील.

आगाऊ - रणजी मध्ये मुंबई वि. हरयाणा ही [साल आठवत नाही] मॅच २ धावांनी कपिल देवचा हरयाणा संघ जिंकला होता. त्या नंतर बहुतेक हीच. पिच मात्र एकदम झक्कास होते, गंगा ग्लेडस् असे नाव त्या मैदानाचे !
मनीष पांडे, विनायक सामंत, अभिषेक नायर, सतिश, आणि धवल कुलकर्णी चमकले. त्यात त्या मनीषने घेतलेला अफलातून झेल इथे पहाच . मनीष [१४४] आणि सतिश [७५] यांनी केलेल्या भागीदारीने कर्नाटक मॅच जिंकेल असेच वाटत होते, पण मुंबईच्या इक्बाल अब्दुल्लाने काढलेल्या विकेटमुळे एकदम चित्र पालटले.

काय जबरी कॅच आहे तो! मस्त मॅच झाली. रणजी मधे दोन्ही टीम्स ऑल आउट होणे हेच आधी मुळात क्वचित होते. मी असे ऐकले की लगेच टेस्ट चालू होत असल्याने द्रविड वगैरे खेळू शकले नाहीत (सचिन चे माहीत नाही, त्याने ब्रेक घेतला होता)

हा मनिष पांडे मला आवडतो. त्याचाकडे एकदम जबरी शॉट्स आहेत, टेंपरामेंट आहे, आज ना उद्या तो भारतासाठी खेळायलाच पाहीजे. Happy

आयपीएल मध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय - मनीष पांडे.
ज्या पीचवर बॉल स्विंग होत होता, सीम होत होता, ज्यावर जाफरभाऊ पण पडले, तिथे ह्याने शतक झळकवले.
निश्चितच चांगली बॅटिंग आहे.

वासिम जाफर मला आवडयचा. पण तो आक्रमक नाही वाटत. (काही केल्या). टेस्ट मध्ये मात्र तो चांगला आहे, पण आता जागा नाही.

वासिम जाफर हा पाटा खेळपट्टीवरचा एक नंबर ओपनर!. चिकटला की चिकटला.
आता - मुरली विजय सारखे बरेच लाईनमध्ये आहेत.

नंद्या.. जबरी कॅच! (आणी ती रणजी ट्रॉफी फायनल जेव्हा मुंबई हरयाणाविरुद्ध हरली तेव्हा वेंगसरकर शतक मारुन दुसर्‍या बाजुला नाबाद स्ट्रँडेड राहीला होता व अक्षरशः ढसाढ्सा रडला होता हरल्यावर...
:(. कपिल देव हरयाणाचा कप्तान होता.)

यु ट्यूबवरच मग या पांडेची बॅटींग बघीतली.. होतकरु वाटतो.. टेक्निक पर्फेक्ट नाही पण आत्मविश्वास तरी जबरी दिसतो.. मधे मनोज तिवारी म्हणुन एक प्लेयर आला होता.. मला वाटते १-२ वन डे पण खेळला पण फिल्डिंग प्रॅक्टिसमधे जखमी झाला तो अजुन परत आलाच नाही.. तोही असाच पांडे सारखा आक्रमक फलंदाज होता..

पण फायनल मस्तच झाली. राज.. अरे तू रामनाथ पारकरचे नाव घेतल्यामुळे मी परत ७० व ८० च्या दशकात गेलो व एकदम नॉस्टॅल्जिक वाटले.. रामनाथ पारकरपेक्षा जाफरला जास्त संधी मिळाली होती.. पारकर बिचारा एखादाच कसोटी सामना खेळला बहुतेक्..पण रणजी मधे मात्र रामनाथ पारकर एकदम वाघ होता.. तसे मुंबईचे बरेच आघाडीचे फलंदाज रणजीमधे वाघ होते पण कसोटी सामन्यात मात्र ते येन केन कारणाने चमकले नाहीत.. उदाहरणार्थ.. सुधीर नाइक्,रामनाथ पारकर्,गुलाम परकार व लालचंद राजपुत..

आणि एक.. या फायनलनंतर राहुल द्रविडने दिलेली मुलाखत वाचताना हे कळले की आज काल रणजी सामन्यांचे धावते समालोचन आकाशवाणी वर होत नाही. हे वाचुन वाइट वाटले.. माझ्या लहानपणी सगळ्या रणजी सामन्यांचे धावते समालोचन इंग्रजीतच नाही तर पुणे स्टेशनवर बाळ पंडित व वि.वि. करमरकरांचे मराठी समालोचनही असायचे.. उदा.... पांडुरंग साळगावकर हे आता टिळक रस्त्याच्या बाजुने आपले नविन षटक सुरु करतील व त्यांना सामना करतील मुंबईचे अशोक मांकड.. आणी हा पहिला चेंडु.. आखुड टप्प्याचा.. मांकड यांनी अतिशय सुंदर रितिने पुल केला आहे व हा अजुन एक चौकार.. मांकड यांची धावसंख्या झाली आहे ९४ व मुंबई २ बाद ४२६!.. Happy

'टिळक रस्त्याच्या बाजूला काही झाडे आहेत , तिकडून थोडासा वारा येतो आहे. खालच्या स्टॅन्डला नुकताच रंग दिला आहे. ओहो सुन्दर चेडू. दरम्यान साळगावकरने चेन्डू टाकला होता आणि त्यावर नाईकने फटका मारला होता आता चेन्डू घेऊन सालगावकर पुन्हा धावतोय. तर ह्या स्टेन्डला १९७२ ला रंग दिला होता नाही का माधव? दर्म्यान हा चेन्डू गलीतील पेटीवालेकडे गेला आणि त्याने तो कलेक्ट केला. माफ करा गलीत पेटीवाले नाहीये . सापट्णेकर मला वाटते तिथे सोलकर असावा. नाही नाही बहुधा पेटीवाले. पण माधव म्हनतोय की तो खडीवाले आहे. दरम्यान साळगावकरच षटक सम्पलेलं आहे आणि आता कानिटकर पुढच्या ओव्हरसाठी तयार. १९७२ ला रणजी मोसमात जो पूर्वेकडच्या स्टॅन्डला जो रन्ग देण्यात आला होता.....'

>>एकदम नॉस्टॅल्जिक वाटले.. <<
अगदी खरं. तो काळंच (७०-८०), माझ्या मते, क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. वेस्ट इंडिजचे एकाहुन एक कर्दनकाळ बोलर्स, ईंग्लंड्-ऑस्ट्रेलियाचे चिवट फलंदाज... वो बात ही कुछ और थी.

त्या काळात एक एक्झिबिशन मॅच वानखेडेवर पाहिल्याची आठवतय. त्यात पांडुरंग साळगावकरने एक शॉर्ट्पीच टाकुन कालिचरणचा कान फोडला होता.

त्याच दरम्यान गुलाम परकारचा क्षेत्ररक्षणात जबरी दरारा होता. संपुर्ण कव्हर साइड (बॅक्वर्ड पॉइंट ते एक्स्ट्रा कवर) तो चित्त्याच्या चपळाइने सांभाळायचा; कव्हर्सला मारलेल्या ड्राइव्हवर धाव घ्यावी का नको याचा विचार बॅटसमन १० वेळा करीत असे. Happy

>>यु ट्यूबवरच मग या पांडेची बॅटींग बघीतली.. होतकरु वाटतो.. टेक्निक पर्फेक्ट नाही पण आत्मविश्वास तरी जबरी दिसतो.. मधे मनोज तिवारी म्हणुन एक प्लेयर आला होता.. मला वाटते १-२ वन डे पण खेळला पण फिल्डिंग प्रॅक्टिसमधे जखमी झाला तो अजुन परत आलाच नाही.. तोही असाच पांडे सारखा आक्रमक फलंदाज होता..

मुकुंद, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. टेक्निक पर्फेक्ट नाही अजून पांडेचे पण त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर तो भविष्यात भारतीय संघात जरूर स्थान मिळवेल.

मनोज तिवारी - त्याचे खांद्याचे ऑपरेशन झाले आणि नंतर तो कुठेच दिसला नाही. बंगालकडून तरी खेळतो का नाही कोण जाणे.

उमेश यादव हा असाच विदर्भचा बोलर, फिल्डींग प्रॅक्टिसमध्ये गेला तो गेलाच.

काय लेको, जरा दोन दिवस कोठे जायची सोय नाही. एवढी साहेबांनी सेन्च्युरी मारली तरी येथे एकही पोस्ट नाही, that's just rude!

काल हॉटेल च्या लॉबी मधे सौरभ गांगुली ला भेटलो. तो दिसल्यावर त्याच्याशी जाउन बोलण्याचा मोह आवरला नाही. Happy

Pages