क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्स,
सेहवाग आज बाद झालेला नाही म्हणजे उद्या नव्या दमाने कत्तल करणार लंकेच्या गोलंदाजांची.
त्याच्या आजच्या खेळीचं एका शब्दात वर्णन करायचं तर : "लंकादहन"

ऊद्याही खेळपट्टी अशीच चांगली राहिली तर सचिन, युवी अन धोणी मिळून एक "ढगफुटी" बघायला मिळेल मुंबईत :).

बर्‍याच तज्ञांन्नी काल लंकेचा पलडा भारी अन मुरली काहीतरी स्पेशल करणार अशी भाकीते अन विश्लेषणे(logical) केली होती. ज्या खेळपट्टीवर भज्जी हातभर चेंडू वळवत होता अन उसळवत होता त्या खेळपट्टीवर मुरली देखिल कमाल करेल असे म्हणत होते. ते कितीही तार्कीक असलं तरी सेहवाग ज्या प्रकारे फलंदाजीला approach करतो त्यामूळे अशी सगळी गणितं अन तर्क खोटे ठरतात. मला वाटतं क्रिकेटचा डॉन, लारा अन त्यानंतर ईतका आक्रमक अन सकारात्मक approach test cricket मध्ये सेहवाग खेरीज कुणी ठेवला नसेल. on that count he desrves to score another 300 and be the first one to score 4 tripple hundreds in Test. That record alone will speak about the character of Sehavag and how he has changed test cricket for India in last decade or so.
ऊद्या अख्खा दिवस डकणार टिव्ही समोर. Happy

on that count he desrves to score another 300 and be the first one to score 4 tripple hundreds in Test.

- (उद्या केलेच तर) हे त्याचे ३रे त्रिशतक असेल. ४ सोडा, ३ त्रिशतके सुद्धा अजूनपर्यंत कोणीही केलेली नाहीत. पूर्वी फक्त ब्रॅडमन, सेहवाग व लारा यांनी २ वेळा ३०० चा टप्पा ओलांडला आहे.

बर्‍याच तज्ञांन्नी काल लंकेचा पलडा भारी अन मुरली काहीतरी स्पेशल करणार अशी भाकीते अन विश्लेषणे(logical) केली होती. ज्या खेळपट्टीवर भज्जी हातभर चेंडू वळवत होता अन उसळवत होता त्या खेळपट्टीवर मुरली देखिल कमाल करेल असे म्हणत होते.

- १९७८ मध्ये प्रसन्ना, चन्द्रा व बेदी यांची झहीर अब्बास, जावेद, इम्रानखान, मजीद इ. नी पाकिस्तानमध्ये अशीच कत्तल केली होती. परिमाणी या तिघांची कारकीर्द कायमस्वरूपी संपुष्टात आली. प्रसन्नाची ही शेवटचीच मालिका ठरली. तर बेदी व चंद्राला केवळ महिनाभरात पुढच्याच मालिकेत कायमचे घरी बसावे लागले. तिघांचेही वय निवृत्तीच्या जवळ आले नव्हते (तिघेही ३५ च्या आतच होते). पण कत्तलीनंतर त्यांचा सूरच हरपला. मुरली या मालिकेनंतर त्याच वाटेने जाणार बहुतेक. अर्थात त्याचे निवृत्तीचे वय सुद्धा जवळ आले आहे (३७ वर्षे ८ महिने).

गुरूजी,
खरं आहे.
अगदी काल परवा पर्यंत क्रिकेट-कत्तलीच्या बाबतीत मॅथ्यू हेडन अन सर रिचर्ड्स यांन्ना मी "यम" मानत होतो. ऑसीज मधे यम देखिल लाल गोरा असेल हे हेडन ला पाहून मान्य करावे लागते. हेडन निव्वळ घणाघाती फटक्यांन्नी समोरच्याला मारायचा तर रिचर्ड्स थंडपणे गम चिघळत गोलंदाजांची चामडी लोळवायचा.
सेहवागची आजची खेळी बघता अन याआधीच्या द्विशतकी खेळी पाहता यमाच्या यादीत त्याचीही नोंद कराविशी वाटते. फक्त हा यम हसत खेळत बडवतो.
ऊद्या पहिला एक तास पुन्हा टिकला तर गडी बघता बघता ४०० करेल असे वाटते. दिवसाखेर भारताची आघाडी ४५० पर्यंत झाली (त्या दृष्टीनेच धोनी अन कंपनीचे डावपेच असतील) तर ऊरलेले दोन दिवस लंकेला गुंडाळायला पुरेसे आहेत.

cricinfo मधल सेहेवाग च्या मुलतान इनिंग्स विषयी चे एक मस्त वाक्य

<<
At Multan just over five years ago, Sehewag pretty much ended the career of one very special offspinner, Saqlain Mushtaq. Saqlain had gone into that series speaking of a surprise ball, the teesra [the third one]. After much discussion in the media box, it was decided that it was the delivery that Sehwag kept whacking over midwicket for fours and sixes.
>>

Happy

अगदी अगदी...

त्या पाठोपाठ द्रविड पण Sad सचिन्-द्रविड हल्ली फार कमी वेळा एकमेकांसोबत partnership मधे खेळतात..
एक कोण तरी जातोच लवकर.. Sad

अरेरे.. ७ धावा कमी पडल्या Sad
as they say cricket is a funny game.
पण मला वाटतं तो सकाळी अती-सावध (त्याच्या standards ने) खेळत होता अन त्यामूळे half hearted push खेळला..
असो.

आज दिवसखेर लंका आपल्या आघाडीची बरोबरी करेल असे मला वाटते. खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी योग्य वाटते. भज्जी एकटा १० गडी बाद करू शकणार नाही तेव्हा मला वाटतं विरू, युवराज, तेंडू यांन्ना गोलंदाजी देवून पहावे. ओझा ला टर्न मिळतोय पण त्याचा अनुभव कमी पडतोय. धोनी ची क्षेत्ररक्षण रचना बचावात्मक वाटते.

माहेला अन प्रसन्ना या खेळपट्टीवर ५०+ करू शकतील असे वाटते.

ऊद्या सकाळच्या सत्रात काय घडते त्यावर पुढील निकाल अवलंबून राहील.

अरे वा! १४४/५.... आता निकाल स्पष्ट आहे.
झहीर ने खूपच सुंदर गोलंदाजी केली. आणि धोनी महाशयाने सिली पॉईंट ला गडी ऊभा केल्यावर लंकेच्या फलंदाजांवरील दडपण खूपच वाढले.
way to go.....
आता अजून एक गडी बाद झाला की कदाचित आजच संपेल सामना.

आज सेहेवाग पेटला होता, श्रीलंकेची कत्तल करायचीच या उद्देशाने आला होता. त्याने खेळलेले फटके तर लाजवाब होते. गोलंदाजांची दया येतेय. त्यास धोनी व सच्याने पुरेपूर साथ दिली. सामूहीक कत्तलीत आफ्रिकन माफियानंतर सेहेवागचेच नाव अग्रस्थानी असेल. Happy

अरे रे!!
आज ४०० झाले असते. खाल्च्या फळीने कच खाल्ली. अजुन ५ ओव्हर बाकी आहेत. पण सहा विकेट्स गेल्या.
आज युवी असता तर बर झाल असत.

ऑस्ट्रेलियाला एकदा वाटलेली आहे... दक्षिण अफ्रिकेनी त्यांना चारशे पेक्षा जास्त रन करुन हरवले होते तेव्हा...
अंक्या बहुतेक लागलीच गळती.. जयसूर्या पण गेला..

ऑस्ट्रेलियाला एकदा वाटलेली आहे >>
मलाही सेम वाटलेले आपण जेव्हा ४०० केले तेव्हा ... बघु.. आपले लोक काय करतात ते..
दिलशान आहे अजुन Sad

भारत जिंकला रे......................................जिंकला...................................

मरत मरत जिंकला... सहज जिंकायला पाहिजे होता... श्रीलंकेच्या फलंदाजांवर कधीच दडपण वाटले नाही.. ४००+ धावांचे...

मरत मरत जिंकला...
>>
अगदी...

पण जिंकलो हे महत्वाचं...

Pages