Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
ज्यांनी २००१ मधे हरभजनसमोर
ज्यांनी २००१ मधे हरभजनसमोर चाचपडणारा Ponting पाहिला असेल त्यांच्यासाठी बाकी सगळे दुय्यम ठरावे>>> सहमत. पॉन्टिंग भारतात अजून फारसा चालला नाही (२००८ चे बंगलोर चे एक शतक वगळता). सचिन जर ऑस्ट्रेलियात चालला नसता तर त्याला कोणी बर्यापैकी बॅट्समेन मधेही धरले नसते
जसे द्रविड चे आत्ताचे स्थान हे त्याच्या कोलकत्ता (२००१) आणि अॅडलेड (२००३) नंतरच मिळाले.
crickinfo वरच article होते
crickinfo वरच article होते ज्यात ह्या्त दोघांच्या विरुद्ध खेळलेल्या ballers ची सरासरी दिली होती. ती बघून काय ते ठरवायचे. >> लिंक आहे का?
लिंक आहे का?>> गेला तासभर तीच
लिंक आहे का?>> गेला तासभर तीच शोधतोय पण मिळत नाहिये. तुला मिळाली तर इथे टाक. trivia असतात ना त्याच्यामधे आली होती.
पॉन्टिंग भारतात अजून फारसा चालला नाही >> मुरलीसमोर लंकेमधे कसा काय पेटून खेळलेला देव जाणे
>>एकुण शतकांमध्येही सचिनची ८
>>एकुण शतकांमध्येही सचिनची ८ शतके बांग्लादेश व झिम्बाब्वे विरुध्द आहेत तर पाँटीगची फक्त २ शतके या संघांविरुध्द आहेत.
पण सचिनची जेवढी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहेत, तेव्हढी [० आहेत] पाँटिंगची अजिबात नाहीत.
पाँटींगने कॅप्ट्न म्हणून फार
पाँटींगने कॅप्ट्न म्हणून फार ग्रेट कामगिरी केलेली नाही,तो एका ग्रेट टीमचा लकी कॅप्टन होता,आता मॅकग्रा,वॉर्न,हेडन,लँगर रिटायर झाल्यावर त्याची धांदल उडाली आहे.
तो एका ग्रेट टीमचा लकी कॅप्टन
तो एका ग्रेट टीमचा लकी कॅप्टन होता >> धोणी पण त्याच मार्गावर आहे
त्या दिनेश कार्तिकला काढुन
त्या दिनेश कार्तिकला काढुन नवीन विकेटकीपर का घेतलाय?? काहि कळत नाही.
कार्तिकने मागच्या काहि मॅचेस मध्ये फॉर्म दाखवलाय की.
तसही धोनी बाहेर असेल तरच त्याला चान्स मिळणार होता.
कार्तिकचे यष्टीकरण खूप खराब
कार्तिकचे यष्टीकरण खूप खराब आहे. तो यष्टीचित करण्याच्या बर्याच संधी वाया घालवितो. तो बरेच झेलही सोडतो. मागील वर्षी इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी सामन्यात त्याने जवळपास ४० बाईज दिल्या होत्या. निव्वळ फलंदाजीवर तो संघात बसू शकत नाही.
जसे गोलंदाजी नि फलंदाजीचे
जसे गोलंदाजी नि फलंदाजीचे आकडे ठेवतात, तसे क्षेत्ररक्षणाचेहि ठेवावेत. किती झेल सोडले, किती संधि वाया घालवल्या, किती चेंडू नीट अडवले नाहीत, नीट फेकले नाहीत वगैरे. म्हणजे मग फलंदाजी व गोलंदाजी बरोबरच या सर्व संख्या विचारात घेऊन निवड केली जाईल.
अर्थात् इथे अपेक्षित आहे की निवड अश्या शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते, वशिल्याने किंवा कुणाच्या मनमानीने नाही.
अरे काय म्हणावे या
अरे काय म्हणावे या १७वर्षां[पासून]च्या मुर्खाला :
आधी हे आणि आता हे
२६ कॅमेरे असताना हा येड.झेड क्रिकेटचा बॉल चावतो?
'Indian Summers' मधे जॉन राईट
'Indian Summers' मधे जॉन राईट ने काही खेळाडूंबद्दल लिहीले होते की एरव्ही तूफान फटकेबाजी करणारे पण प्रत्यक्ष अवघड मॅच च्या दिवशी काहीतरी कारण काढून खेळायचे टाळणारे खेळाडू त्याला कसे आवडत नाहीत वगैरे. आजची रोहित शर्माची बातमी वाचून तो त्या लाईनीत चालला आहे का अशी शंका येते. तेंडुलकर किंवा द्रविड चा वारसा पुढे चालवणार अशी किर्ती झाली होती सुरूवातीला त्याची, पण आता भरकटलेला दिसतो.
द्रविड, लक्ष्मण जखमी. युवराज चे स्थान मुळातच धोक्यात आहे, पण तो ही जखमी. आता लक्ष्मण च्या जागी रोहित शर्मा आला असता पण तो म्हणे फुटबॉल खेळताना जखमी झाला. म्हणजे जखमी ची रिप्लेसमेंट सुद्धा जखमी! हॉट शॉट मधला एक संवाद आठवला "We need to go get the men who went to get the men who went to get the men.."
We need to go get the men who
We need to go get the men who went to get the men who went to get the men.." >>
लै भारी फारएंड
आफ्रिका १०७/२ ... झहिर ने स्मिथ आणि प्रिन्स ला लवकर धाडले तंबूत.. पण कलिस झोडतोय
आज शतक ठोकणार बहूतेक कलिस
साहेबांनी ४६वे कसोटी शतक
साहेबांनी ४६वे कसोटी शतक ठोकले आणि लगेच बाद झाले... ते ही अत्यंत दुर्दैवी पद्धतीने...
Harris to Tendulkar, OUT, Harris has struck! What a wicket. And that over the wicket and outside leg stump line has worked again. The little big man of Indian cricket has fallen after a fine hundred. It landed outside leg stump on a length, Tendulkar went for the sweep, the ball turned in, bounced off the thigh pad, went on to the elbow guard and fell on the stumps. Harris can't believe it, he runs around in sheer joy and falls flat on his back on the ground even as the team-mates crowd him. What a moment.
सौजन्य : क्रिकइन्फोवरचे धावते समालोचन..
क्रिकइन्फोवरच एका वाचणार्याने फार महान लिहिले होते... त्याचा थोडक्यात आशय..
आता सचिनचे अजून एक शतक वाया गेले म्हणून मिडिया बोंब मारणार पण त्याच वेळेस त्याला बाकीच्या कोणत्याही फलंदाजाने नीट साथ दिली नाही हे विसरणार...
लै वाईट हारलो राव.. हॅरिस
लै वाईट हारलो राव.. हॅरिस सारखा गोलंदाज बळी घेतोय आणि आपले हरभजन आणि मिश्रा चमकदार सोडाच पण किमान त्यांच्या किमान अपेक्षीव्हडी कामगिरी करु शकले नाहीत.. गेल्या २५ वर्षात आपण भारतात फक्त तीन वेळा डावाने पराभूत झालेलो आहोत आणि तिन्ही वेळा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध..
हरायच्या लायकिचेच खेळले..
हरायच्या लायकिचेच खेळले.. सेहवाग - सचिन ची फाइट वाया गेली..
स्मिथने जेव्हा सेहवाग चा सेकंड इनिंग मधे कॅच घेतला तेव्हा त्याची रिअॅक्शन बघण्यासारखी होती.. त्याने दाखवुन दिले.. आता मॅच आपली आहे..
भज्जीला आणि शर्माला बाहेर काढा आता.. लै बिल झाले..सलग तीन सिरिज नियमितपणे बेक्कार परफोर्मन्स
हरल्याचे वाईट वाटले वरचे
हरल्याचे वाईट वाटले
वरचे पॉन्टिंग तेंडुलकर चर्चा मस्त वाटली. मलापण पॉन्टिंगबद्दल आदर आहे, पण तेंडुलकरबद्दल असामान्य आदर आहे...
केदार, फारएन्ड किंवा इतर जाणकार लोकांनी एखादा मस्त लेख लिहा रे तेंडुलकर-पॉन्टिंग वर...
इशांत शर्माला विश्रांतीची
इशांत शर्माला विश्रांतीची सक्त गरज आहे.
बर्याच दिवसांनी आपली टीम पूर्वीप्रमाणे म्हणजे पराभूत मनस्थितीत खेळते आहे असे वाटले,गेले काही सीझन जे फायटींग स्पिरिट दिसत होते ते गायब झाले आहे.धोनीची ड्रीम रन खलास.
अफ्रिके सोबत खेळताना आपल्याला
अफ्रिके सोबत खेळताना आपल्याला उच्च मनोबलाची गरज आहे. SA भारतात येऊन नेहमी आपल्याला हरवून जाते, आपण तिकडे जातो तेंव्हाही बरेचदा हारतो. मग कुणीही नॉन एस खेळाडू येतो न आपल्याला हरवून जातो. आपण मॅच सुरु व्हायच्या आधीच माईंड गेम मध्ये हारलेलो असतो असे वाटते. (धोणी कप्तान असला तरी, आठवा मागची सिरिज). पण तेंडल्या नेहमीप्रमाणे ग्रेट. दोघांना कुणाची साथ मिळाली नाही हेच खरे. बाकी पार्नेल पण उद्या परवा आपल्याला येड्यात काढेन. (तसा पार्नेल मला आवडतो, चांगला बॉलर होईल यात शंका नाही.)
इशांतला दोन वर्षे हाकलायला पाहीजे. तो ऑसी बरोबर चालला पण नंतर त्याने फार काही चमकदार कामगिरी करुन मॅच एकहाती आणली असे कधी आठवत नाही. तो चांगला बॉलर आहे, पण आत्ता काही कामाचा नाही, त्यापेक्षा डिंडा किंवा नविन जो बॉलर घेतला आहे त्याला संधी द्यावी.
इशांतला दोन वर्षे हाकलायला
इशांतला दोन वर्षे हाकलायला पाहीजे >> प्रचंड अनूमोदन , मनिष पांडे, तिवारी याना द्या कि संधी.. आता पुढच्या मॅच मधे परत श्रीसांथ ला घेतील.. आणी त्या तिवारी, पांडेला बाहेर ठेवतिल.
त्या भज्जीला ही काढा बाहेर थोडे दिवस..
>>मधे परत श्रीसांथ ला घेतील..
>>मधे परत श्रीसांथ ला घेतील.. आणी त्या तिवारी, पांडेला बाहेर ठेवतिल.

खरय......
>>त्या भज्जीला ही काढा बाहेर थोडे दिवस..
थोडे दिवस??? कायमचे काढले तर जास्त बरे होइल...
साहेब...खरच ग्रेट...
आपला संघ इतके सामने का खेळतो?
आपला संघ इतके सामने का खेळतो? जेंव्हा बघावे तेंव्हा भारत आणि कुणितरी यांच्यात सामने. अशाने विश्रांति कशी मिळणार? प्रत्येक सामन्याचे महत्व कसे वाटणार?
नाहीतर, असा काहीतरी नियम केला पाहिजे, की प्रत्येक सामन्यानंतर निदान पाच खेळाडूंना महिनाभर सक्तीने विश्रांति. त्यामुळे नवीन खेळाडूंना तरी संधी मिळेल.
आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळायचे होते तर बांगलादेशचे सामने कशाला ठेवले? आता म्हणतील, गेल्या सहा महिन्यात इतके सामने जिंकले धोणीने! अहो पण महत्वाचे कोणते?
जसे इथल्या पॅट्स नि २००६ मधे लागोपाठ १७ का अठरा सामने जिंकले, पण अत्यंत महत्वाचा सुपर बॉल हरले! यंदाचे कोल्ट्स असेच.
भारताने आता फक्त एक ते चार क्रमांकाच्या संघांबरोबरच खेळावे. आनि ते सर्व सामने जिंकायचेच अश्या जिद्दीने खेळायचे, नि त्यासाठी तब्येत अगदी १०० टक्के असायला पाहिजे. उगाच, हात दुखत असताना सुद्धा खेळला, नि तरी ७ धावा काढल्या!! असली कौतुके नकोत.
या झक्कींना संघातून ताबडतोब
या झक्कींना संघातून ताबडतोब काढून टाका पाहू..
जसे इथल्या पॅट्स नि २००६ मधे
जसे इथल्या पॅट्स नि २००६ मधे लागोपाठ १७ का अठरा सामने जिंकले, पण अत्यंत महत्वाचा सुपर बॉल हरले! >ह्याचा cricket शी ह्या match काय संबंध ? मागचे SL, BAN चे सामने हरले असते नि जिंकले असते तर म्हणाला असता कि एव्हढ्या फडतूस टीमबरोबर हरलाच नि SAF बरोबर जिंकलात म्हणजे fluke होता.
प्रचंड अनूमोदन , मनिष पांडे, तिवारी याना द्या कि संधी>> मी म्हणेन कि नको. तिवारीने मागच्य एक्दोन वर्षांमधे फारसे काही केलेले नाहीये. पांडे is too young and raw, Let him absorb IPL and few domestic seasons. त्याचा पण ईशान्त नको. तसेही Badri नि विजय दोघेही बरे खेळले आहेत. they deserve more chances. आनि हे दोघे असतील तर त्याच वेळी शक्यतोवर तिसरा नवा खेळाडू नको. too much raw team against very well settled and good attack.
मूळात fab 4 मधले लोक आसपास असताना rotation करून नवे खेळाडू आणले तर त्यांनाही सोपे जाईल. विजयची केस बघा. नाहितर ह्या वेळी झाले तसे एकदम ३-४ जण नवे आले कि कठीण जाणारच.
साहेब - ९१ १००+ स्कोअर्स.
साहेब - ९१ १००+ स्कोअर्स. [ओडीआय + टेस्टस] !
टेस्ट मॅचेसमध्ये दुसर्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त १०० काढलेला अव्वल फलंदाज.
जोशी बुवा ईशांतला काढून बॅट्समन असलेल्या पांडे तिवारी यांना कसे घेता येईल?
बोलिंग डिपार्टमेंटमध्ये सध्या बेंचवर आहेत ते म्हणजे अभिमन्यू मुकुंद, सुदीप त्यागी, आणि बॅडबॉय, श्रीसंथ. [तो फारच संथ आहे खरं]. बाकी ईन फॉर्म असे कुणीच नाही. इशांतला बसवून अभिमन्यूला खेळवायला हवे खरंतर.
स्पीन बॉलिंगमध्ये चावलाने जे साध्य केले ते अमित मिश्राला जमले नाही.
हरभजन तर तो ऑफस्पिनर आहे हेच विसरतोय. त्याच्यापेक्षा आमचा रमेश पोवार चांगलाय !
मुरली विजयला ठेवले पाहिजे संघात. काढून उपयोगी नाही. तो अव्वल ३/४ नंबरचा खेळाडू होईल.
सकाळच्या सत्रात इतके चांगले खेळत असलेला सेहवाग, किती वाईटरित्या आउट झाला तिसर्या सत्रात.
मनिष पांडे, तिवारी याना द्या
मनिष पांडे, तिवारी याना द्या कि संधी>> अहो, अभिषेक नायरला का बसवलंय तेच कळना ???
national team पेक्षा अध्यक्षीय संघच चांगला खेळला...
आपला संघ इतके सामने का खेळतो?
आपला संघ इतके सामने का खेळतो? जेंव्हा बघावे तेंव्हा भारत आणि कुणितरी यांच्यात सामने. अशाने विश्रांति कशी मिळणार? प्रत्येक सामन्याचे महत्व कसे वाटणार? >> अनुमोदन. जसे ऑस्ट्रेलियाने काही वर्षांपुर्वी कसोटीसाठी एक आणी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी एक असे संघ तयार केले होते (आता परिस्थिती काय आहे माहित नाही) तसे करायची गरज आहे. तसेच एक दिवसीय सामने बाद करुन फक्त कसोटी आणी ट्वेंटी ट्वेंटी असे दोनच प्रकार ठेवावेत असे मला वाटते. तसेच जे चांगले कसोटी खेळाडु आहेत त्यांना फक्त कसोटीत खेळवावे (त्यांचे ट्वेंटी ट्वेंटी/आयपीएल न खेळण्याने बुडणारे पैसे भारतीय क्रिकेट मंडळाने माफक स्वरुपात भरपाई करुन द्यावेत).
माझ्या माहितीत तरी एवढे वेगवेगळे (कसोटी ५ दिवस ते ट्वेंटी ट्वेंटी - ३ तास) प्रकार असणारे खेळ नाहीत (चुभुद्याघ्या). एक दिवशी एक प्रकार आणी ४ दिवसात लगेच वेगळा प्रकार खेळायला लाऊन खेळाडुंवर अन्याय होतोय असे मला वाटते (त्यांना प्रचंड पैसे मिळत असले तरिही)
मर्यादित शतकांसाठी एक
मर्यादित शतकांसाठी एक
>>>
आं?
कुठे काय
कुठे काय
अरे चोरा....
अरे चोरा....
मोठ्या खेळाडूंची
मोठ्या खेळाडूंची अनुपस्थिती/नवीन खेळाडू, लंका-बांगलादेश नंतर एकदम खरीखुरी वेगवान बोलिंग खेळणे, अचानक कमकुवत झालेली आपली बोलिंग आणि सेहवाग-गंभीर ची बहुधा बर्याच वेळानंतर अपयशी सलामी - बहुधा ही कारणे असावीत.
कोणी दुलीप ट्रॉफीतील यूसूफ पठाण आणि कार्तिक ची कामगिरी पाहिलीत का? कार्तिक ला घेउन बघायला पाहिजे. यूसूफ वन डे मधे तरी एवढा प्रभावी न ठरल्याने कदाचित पूर्वीचे आपले 'फ्लॅट ट्रॅक बुलीज' असायचे तसा आहे का? तसे नसेल तर जबरी फॉर्म मधे असल्याने कलकत्त्याला मटका लागून जाईल एखादे वेळेस
इडन गार्डन ला द्रविड आणि लक्ष्मण पाहिजेत. राखीव कुरण आहे ते त्यांचे
Pages