Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
आज सकाळपासून [भारतीय
आज सकाळपासून [भारतीय प्रमाणवेळ ९.३०] 'नवीन लेखन' हे पान उघडत नसल्याने पटलावरील ताज्या हालचाली वाचने वा त्यानुसा प्रतिसाद देणे थांबले आहे. मात्र 'मायबोली' ची बाकीची सदरे व्यवस्थित दिसतात....उदा. हे 'मदतपुस्तिका'... तसेच विचारपूसमधूनही एकमेकाची चौकशी, देवाणघेवाण होत आहे.
फक्त "नवीन लेखन' प्रतिसाद देत नाही.
[मी पीसी व्हायरस फ्री आहे हे तपासून घेतले आहे.... नेट स्पीडही व्यवस्थित आहे.]
अशोक पाटील
कृपया ई मेल मधील पासवर्ड
कृपया ई मेल मधील पासवर्ड कोणता ते सांगाल का प्लीझ ?
आपल्याला हवा तो पासवर्ड save करता येतो का ?
कसा ?
अशोक., एकदा लॉग आऊट करून
अशोक., एकदा लॉग आऊट करून पुन्हा लॉग इन करून 'नवीन लेखन' पहाल का?
कारण मला 'नवीन लेखन' टॅब व्यवस्थित वापरता येतो आहे.
इथे कळवा.
~ मदत समिती
विनया पवार - तुम्ही ही लिंक
विनया पवार - तुम्ही ही लिंक तपासा - परवलीचा शब्द (पासवर्ड) कसा बदलावा?
मंजूडी.... धन्यवाद... तसे
मंजूडी....
धन्यवाद... तसे करून पाहिले....पण परत लॉग इन करताना 'नव्याने सदस्यत्व घ्या' असा संदेश स्क्रीनवर झळकला....म्हणजे माझे पहिले सदस्यत्व रद्दबिद्द झाले की काय म्हणून घाबरून जाऊन थेट कॉम्प्युटरच ऑफ करून ठेवला.... आणि तासाभराने आता पुन्हा चालू केल्यावर मात्र "सारे काही ठीकठाक...आल इज वेल !".
[याचाच अर्थ असाही की 'मशिन रीस्टार्ट' करणे हादेखील एक चांगला विकल्प होऊ शकतो अशा अडचणीच्याप्रसंगी...]
'नवीन लेखन' चे पानही झटदिशी उघडले आहे.
अशोक पाटील
पाटील सर, तुम्हाला करपटलेलं
पाटील सर,
तुम्हाला करपटलेलं बिस्किट (corrupt cookie) मिळालेलं दिस्तंय माबो कडून..
असो. आल इज वेल
धन्यवाद ,
धन्यवाद ,
मंजूडी ......
Corrupt Cookie ??? व्वॉव....
Corrupt Cookie ??? व्वॉव.... डॉक्टर. पण ते कशा सन्मानार्थ मिळाले असावे याचा अंदाज मात्र येत नाही. कारण तसी मी काम अॅन्ड क्वॉएट काईंड मेम्बर आहे इथला, हे अॅडमिनही मान्य करतील.
तरीही असो.....एका तासाभराच्या झटापटीनंतर माबो गाडी बार्शी नॅरो गेजवरून दिल्ली राजधानी ब्रॉडगेजवर आली एकदाची.... त्यामुळे नो चिंताबिंता !
अशोक पाटील
माझे जुने अकौंट कायमचे काढून
माझे जुने अकौंट कायमचे काढून टाकायचे आहे.डिलीट् करायचे आहे.कसे ते सांगाल कां?
मदत_समिती, धन्यवाद.
मदत_समिती, धन्यवाद.
चुकून लिहिलेला प्रतिसाद.
चुकून लिहिलेला प्रतिसाद. स्वयंसंपादित.
हल्ली मला प्रतिसाद देताना
हल्ली मला प्रतिसाद देताना मराठीत टाइपलेलं इंग्रजीत येतं. प्रतिसादाची खिडकीही दाराइतकी मोठ्ठी असते.
IE7 वापरतेय ऑफिसात. बाकी कुणाला असं होतय का?
(डोक्टरांच्या समोर बसून... हल्ली दिसत नाही नीट वगैरे म्हटल्यासारखं वाटत्य)
नेट स्लो आहे तुमची. स्क्रिप्ट
नेट स्लो आहे तुमची. स्क्रिप्ट पूर्ण एक्झिक्यूट होत नाहीये. रिफ्रेश करत रहावे हाच एक इलाज आहे.
गझल कार्यशाळेची लिंक मिळेल का
गझल कार्यशाळेची लिंक मिळेल का हो?? प्लीज.
दाद, आय.ई.७ पूर्णपणे बंद
दाद, आय.ई.७ पूर्णपणे बंद करून, एकदा कूकीज आणि कॅश क्लिअर करून बघणार का ?
नंदिनी -
मायबोली विशेष या दुव्यावर गेलात की लगेचच गझल कार्यशाळा ही लिंक मिळेल.
-मदत_समिती.
मला मी विचारलेल्या प्रश्नांची
मला मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर हि नाही मिळली आणि माझी टाकलेली कथा हि नाही पाहायला मिळत आहे.
कृपया शोधण्यास मदत करा.
मुग्धाजोग, तुमची कथा सेव
मुग्धाजोग,
तुमची कथा सेव झालेली दिसत नाही अन्यथा तुमच्या सदस्यखात्यात "लेखन" या टॅबमधेय ती दिसली असती.
अस का तर पुन्हा एकदा कथा कॉपी
अस का तर पुन्हा एकदा कथा कॉपी करते.
धन्यवाद अद्मिन मी परत एकदा
धन्यवाद अद्मिन मी परत एकदा कथा अपलोड केली आणि आता ती पाहता येते.
आभार
अकाउंट edit कस करायच प्लीज़
अकाउंट edit कस करायच प्लीज़ कोणी सांगेल का
धन्यवाद मदत समिती. मागच्या
धन्यवाद मदत समिती. मागच्या वेळेला शोधताना ही लिंक मिळाली नव्हती...
आता पेजच बूक मार्क करून ठेवते.
राखी "माझे सदस्यत्व" मध्ये जा
राखी "माझे सदस्यत्व" मध्ये जा आणि "संपादन" पर्याय वापरा
नवीन पद्धतीप्रमाणे हस्तकला या
नवीन पद्धतीप्रमाणे हस्तकला या विषयावर कुठे लिहायचं आणि फोटो टाकायचे?
फक्त चित्रकला च दिसत आहे.
नवीन लेखन करा मधे गेलं की हस्तकला कुठेच दिसत नाहे.
कृपया मदत करा........(उत्तर
कृपया मदत करा........(उत्तर द्या!)
मानुषी, गुलमोहर - इतर कला आहे
मानुषी, गुलमोहर - इतर कला आहे की.
भरत जरा स्टेपवाइज सांगाल?
भरत जरा स्टेपवाइज सांगाल?
मानुषी नमस्कार, कृपया
मानुषी नमस्कार,
कृपया मदतपुस्तिकेतला मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? किंवा हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा? हा दुवा बघणार का? आपल्या हवे असलेले मार्गदर्शन तिथे सापडेल.
त्या दुव्यावर दर्शविल्याप्रमाणे तुम्ही गुलमोहर - इतर कला या ग्रुपात नवीन धागा सुरू करू शकता.
-मदत_समिती
धन्यवाद मदत समिती!
धन्यवाद मदत समिती!
मला कालपासून आय.ई व गुगल
मला कालपासून आय.ई व गुगल क्रोम दोन्हीकडे माबोचा लेआऊट असा दिसतो आहे. काय कारण असेल?
आज एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वाय-फाय वर असताना हा लेआऊट येतोय, ३जी कनेक्शन घेतलं की माबोचा नॉर्मल लेआऊट दिसतोय. अचानक असं व्हायचं काय असेल कारण?
धन्यवाद रूनी !
धन्यवाद रूनी !
Pages