मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मी दिलेल्या प्रतिसाद नंतर " संपादन " असे का दिसते आहे
>>
तुमचा प्रतिसाद तुम्हालाच संपादित करता यावा म्हणून!

गुजरात व्हायब्रेंट "इंडीया शायनिंग" च्या दिशेने ?
या धाग्यावर आज "ग्रूप सभासदांसाठी" असे का दिसत आहे ?
हा धागा चालू घडामोडी या ग्रूप मधे असेल तर मी आधीच सभासद आहे.
वेगळ्या ग्रूप मधे हलवला असल्यास कृपया कळविणे.

मयूर,
मदत कसली?
सध्या अभ्यास कर. भरपूर.
हे बघ, बाजारात आपण जातो. आपल्याला हवं ते घ्यायला. बरोबर?
पण हवं ते घेण्यासाठी आपल्याजवळ काय हवं असतं? पैसे.
यालाच चलन असेही म्हणतात.
उद्या उठून आयुष्य जगण्यासाठी तुला हवं ते तू करू शकतोस. पण आधी चलन खिशात ठेव. चलन = डिग्री. ती चांगली असली तर पैसे नावाचं चलन आपोआप येतं.
तुला आवडतं ते तर करच. पण हे देखिल लक्षात ठेव, की आज मज्जा करशील तर आयुष्यभर कष्ट करशील. अन आज कष्ट करशील तर आयुष्यभर मज्जा. अभ्यासावर वेळ घालव. मायबोली बंद. अन हो, फेसबुक अन बाकीची नेटही पूर्णच बंद. आई बाबा सांगतात ते बरोबर आहे. Wink दोन महिने ऐकल्याने फायदाच होईल.
पुढच्या महिन्यात आहे ना परिक्षा? मग आता फुल्ल टू लढाई करायचीये आपल्याला. चल, ये आखाड्यात! मस्त तयरी कर.
धो डालेंगे एक्झाम क्को!

ओके?

रिझल्ट लागला की सांग. तोपर्यंत लपून बस. येऊच नकोस नेटवर Wink

अन रिझल्ट नंतर सांगतो पुढे काय करायचं ते. आत्तापासून कसली काळजी?

मयूर पाटिल नमस्कार,

एक विनंती आहे तुम्हाला. हितगुज ग्रूप: माहिती हवी आहे या ग्रुपमध्ये एक नवीन लेखनाचा धागा सुरू करून तिथे हा प्रश्न विचारा. बरीच उत्तरे मिळतील. तुमचा प्रश्न मदतपुस्तिकेत जरा अस्थानी आहे म्हणून सुचविले आहे. नवीन धागा कसा सुरू करावा याबद्दल मदत हवी असल्यास मदतपुस्तिकेतला हा दुवा बघा. बारावीनंतरच्या काही करिअरवाटांबद्दलची माहिती या धाग्यावर सापडेल.

धन्यवाद
मदत_समिती.

गुजरात व्हायब्रेंट "इंडीया शायनिंग" च्या दिशेने ?
या धाग्यावर आज "ग्रूप सभासदांसाठी" असे का दिसत आहे ?
हा धागा चालू घडामोडी या ग्रूप मधे असेल तर मी आधीच सभासद आहे.
वेगळ्या ग्रूप मधे हलवला असल्यास कृपया कळविणे.
>>>
महेश, कुठलाही नवीन धागा उघडताना धागाकर्त्याला तो धागा सार्वजनिक करायचा असल्यास एका चौकोनात (चेक बॉक्स) टिक करावे लागते. म्हणजे मग जे माबोकर त्या ग्रूप चे सदस्य नाहीत, त्यांनाही तो धागा दिसू शकतो. पण धागाकर्त्याने तो चेक बॉक्स टिक न केल्यास तो धागा त्या ग्रूप पुरता मर्यादित राहतो. अश्या सगळ्या धाग्यांखाली (त्या त्या ग्रूप चे सदस्य असणार्‍यांना) "ग्रूप सभासदांसाठी" असे दिसते.

मि अमित ,
मदतपुस्तिकेतला हा धागा बघितलात का ? त्यावर उत्तर आहे.
स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

सुजा,
मदतपुस्तिकेतला हा धागा बघणार का?
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

धन्यवाद.
मदत_समिती.

निंबुडा, सार्वजनिक नसलेला आणि ग्रूप करीता मर्यादित असलेला धागा हा फरक माहित आहेच,
पण प्रश्न असा आहे की मी आधीच त्या ग्रूपचा सभासद आहे तरीही मला तो धागा का दिसत नाही,
आज अजुन एका धाग्याबाबत (४०४१८), येथे पण मी इतिहास ग्रूपचा सभासद आहे तरीही परवानगी नाही असे येत आहे. Sad

मी काल अलेक्झांडरची स्वारी आणी भारतीयांचा पराक्रम यावर इतिहास विभागात लेख लिहला होता, पण आज तो दिसत नाही हे कसे काय?

अलेक्झांडरची स्वारी आणी भारतीयांचा पराक्रम या लेखात मी सावरकरांच्या एका ग्रंथाचा उल्लेख केला होता त्यावरून बर्‍याच आयडींमध्ये प्रतिक्रिया युध्द सुरू झाल्यासारखे वाटले. मी केवळ एक संदर्भ म्हणुन या पुस्तकाचा ऊल्लेख केला बाकी लिखाणाशी माझा काही संबंध नाही. तेव्हापासुन माझी पोस्ट मायबोली वर दिसत नाही.

संक्रातीचा हलवा कसा बनवतात, यावर आत्ता आत्ताच माबोवर एक लेख वाचला होता. पण आता तो सापडत नाही आहे, कुठे विचारावे? प्रश्न अस्थानी असल्यास योग्य बाफ सांगावा.

बाजीराव-अवि, नमस्कार :
येथे तुम्हाला तुमचा धागा दिसेल. कदाचित तो अनुल्लेखनीय प्रतिसादांची साफसफाई करण्यासाठी प्रशासकांनी अप्रकाशित केला असावा असे वाटते.

प्रिती शिन्दे , नमस्कार,
आहारशास्त्र आणि पाककृती या दुव्यावर क्लिक केलेत तर , तुम्हाला उजव्या कोपर्‍यात 'सामील व्हा' असे लिहीलेले बटण दिसेल, ते दाबून तुम्ही ग्रुपमध्ये सामील होऊ शकता.

dhaaraa , नमस्कार
गोड...काटा रुते कुणाला...!? हा तुम्हाला हवा असलेला धागा आहे का? शोध सुविधा वापरून तुम्ही तो शोधू शकता, किंवा आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रुपच्या अनुक्रमणिकेत तुम्हाला धागा सापडेल.

धन्यवाद
मदत_समिती.

मला पहिल्या गझल कार्यशाळेची लिंक मिळू शकेल का? शोध मधे जाऊन शोध घेतला तर गझल कार्यशाळा २ ची लिंक मिळत आहे. जुन्या माबोवर जाऊन शोधून पाहिले तर मी कुंभमेळ्यात गेल्यासारखी हरवून गेले. म्हणून मदतसमितीकडे विचारत आहे.

धन्यवाद.

अ‍ॅडमिन, कृपया येथे सावरकर विरोधी हीन भाषेत जो प्रतिसाद लिहिला गेला आहे तो उडविण्यात यावा.
अन्यथा त्यावर वाद सुरू होऊ शकेल असे वाटते.
http://www.maayboli.com/node/40418

http://www.maayboli.com/node/40757

इथे मी एक ललित लिहायला घेतलंय, पण वेळेअभावी पूर्ण लिहून लगेच प्रकाशित करता येत नाहिये. तो धागा अप्रकाशित करायचा पर्याय मला संपादनात दिसत नाहिये. काय करता येईल? अर्धवट झालंय, लवकरात लवकर अप्रकाशित व्हावं असं वाटतंय.

Sad

प्रज्ञा९ , नमस्कार. सध्या लेखन अप्रकाशित ठेवण्याची सुविधा बंद आहे. तुम्ही याबद्दल प्रशासकांशी बोलून बघणार का?

उज्ज्वला अन्नछत्रे, नमस्कार
धागा सार्वजनिक करण्यासाठी मदतपुस्तिकेतला हा दुवा बघा. हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?

-धन्यवाद
मदत_समिती.

विनया पवार,
तुम्ही लॉग इन केल्यावर उजवीकडे
नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व
जाण्याची नोंद
असं दिसत असेल ना? ' जाण्याची नोंद ' हे लॉग आउट आहे.

कृपया ई मेल मधील पासवर्ड कोणता ते सांगाल का प्लीझ ?
आपल्याला हवा तो पासवर्ड save करता येतो का ?
कसा ?

Pages